Skip to content Skip to sidebar Skip to footer

सिंधुदुर्ग – एक ऐतिहासिक किल्ला | Sindhudurg Fort in marathi

Sindhudurg Fort in marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेबरोबरच खूप महत्त्वाची आणि आपल्या देशाला कायम स्वरुपी उपयोगी पडतील अशी अनेक कार्ये केली आहेत. ते केवळ जनतेचे राजे नव्हते तर खऱ्या अर्थाने जनतेच्या रक्षणासाठी त्यांनी अभूतपूर्व कामगिरी करून ठेवली होती.

त्यांचे जनतेवरील प्रेम, त्यांच्या रक्षणाची मनापासून घेतलेली जबाबदारी खरंच वाखाणण्याजोगी होती, आहे आणि राहील. त्यांच्या कामाची हातोटी, दूरदृष्टीेकोण याचे कितीही कौतुक केले तरी अपुरेच आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण ३६२ किल्ले काबीज केले होते. या सर्व किल्ल्यांना आज ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले असून यातील बरेच किल्ले प्रेक्षणीय ठिकाणे बनलेली आहेत. यातील एक खूप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला, अथांग समुद्र लाभलेला, हिरव्यागार वनराईत असलेला, आंबोली घाटातील किल्ला म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला.

हा किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात बांधलेला जलदुर्ग आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी राजांनी बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे विदेशी व्यापाराची वाढती संख्या. या विदेशी व्यापाऱ्यामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, जंजीर जिद्दी, डच यांचा समावेश होतो. या विदेशी व्यापाऱ्याचा भारतीय बाजारपेठेवर वाढता प्रभाव थांबवण्यासाठी शिवाजी राजांनी हा किल्ला बांधला. भारत सरकारने या किल्ल्याला २१ जून २०१० मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

छत्रपती शिवाजी राजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. हा किल्ला बांधण्यासाठी शिवाजी राजांनी गोव्यातील पोर्तुगिजांच्याकडून कारागीर मागवले होते. ई. स १६६४ मध्ये शिवाजी राजांनी हिरोजी इंदलकर यांना किल्ला बांधण्याची आज्ञा दिली होती. हा किल्ला कुरटे बेटावर एकूण ४८ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीची लांबी तीन किमी असून बुरुजांची संख्या बावन्न तर किल्ल्यात एकूण ४५ दगडी जिने आहेत.

शिवाजी महाराजांनी सागरी मार्गावरील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच शत्रूला परतवण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करणे आवश्यक आहे हे ओळखले होते. या जलदुर्गपैकी एक महत्वाचा दुर्ग म्हणजे सिंधूदुर्ग. याचे नावही अगदी अर्थपूर्ण आहे सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला. म्हणून याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत यांची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी आहेत.

किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये शिवाजी राजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयांची निर्मिती केली आहे. याच किल्ल्यात शिवाजी महाराजांचे भगवान शंकराच्या रुपातील मंदिर आहे जे १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांनी बांधले आहे.

शिवाजी राजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा किल्ला. शिवाजी राजांकडे अनेक किल्ले होते आणि त्यांचा विस्तार खूप पसरलेला होता. सर्व किल्ल्यांच्या पूर्वेला विजापूर, दक्षिणेला हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वऱ्हाड इतका होता. शिवाजींनी या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी १६६४ साली मालवण जवळील कुरटे ठिकाणी काळाकभिन्न खडक असलेले बेट निवडले. शिवाजींच्या हस्ते किल्ल्याच्या तटाची पायाभरणी झाली.

आज या जागेला मोरयाचा दगड या नावाने ओळखले जाते. या खडकावर मध्यभागी गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती तर दुसरीकडे चंद्रकृती कोरून पूजा केली. हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. किल्ला उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी किल्ला बांधण्यासाठी ही जागा शोधली त्यांना गावे इनामे म्हणून देण्यात आली. ज्या कुरटे खडकावर हा किल्ला तीन शतके उभा आहे तो काळाकभिन्न खडक मालवण पासून अर्धा मैल समुद्रात आहे. खडकावर समुद्र मार्गांनी व्यापलेले क्षेत्र एकूण ४८ एकर आहे.

या किल्ल्याचा तट दोन मैल, उंची तीस फूट, रुंदी बारा फूट आहे. या तटास भक्कम असे बावीस बुरुज आहेत. बुरुजभोवती भक्कम खडक आहेत आणि पश्चिमेस तसेच दक्षिणेस तटाच्या पायात ५०० खंडो शिसे घातले आहेत.

हा किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हा किल्ला अनेक कारणांनी पाहण्यासारखा आहे. त्यातील एक म्हणजे या किल्ल्याचे बांधकाम.
दुसरे म्हणजे या किल्ल्याचे पाय उभारण्यासाठी शिसे या धातूचा उपयोग करण्यात आला आहे.
या किल्ल्याचे खूप मोठे प्रवेशद्वार.
या किल्ल्यात असलेले बावीस बुरुज आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात.
संरक्षणाच्या हेतूने असलेले दोन उंच मनोरे.
किल्ल्यात असलेल्या तीन गोड पाण्याच्या विहिरी.
आणि यात अजून एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे किल्ल्यावर शिवाजी राजांच्या उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठसे उमटलेले दिसतात.

५.१ सुनामी बेट

हे बेट किल्ल्यापासून अर्धा किमी अंतरावर आहे. या बेटावरील समुद्र शांत असल्याने जेट स्की, कायक रायडर, स्पीड बोट, वॉटर स्कूटर आणि बंपर बोटचा आनंद घेता येतो.

५.२ तारकर्ली बीच

हे अंतर किल्ल्यापासून दहा किमी आहे. हा कोकणातील सुंदर बीच म्हणून ओळखला जातो. कारण इथे सूर्यास्ताची मोहक आणि आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळतात.

५.३ मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य

हे अभयारण्य खूप सुंदर आहे. इथे अनेक माशांच्या प्रजाती तसेच इतर सागरी वन्यजीव पाहायला मिळतात.

याशिवाय कोलंब समुद्र किनारा, रामेश्वर मंदिर, रॉक गार्डन ही ठिकाणे ही पाहण्यासारखी आहेत.

रेल्वे : यासाठी पुण्याहून पुणे मांडवी एक्स्प्रेस उपलब्ध आहे.

विमान : गोयारे फ्लाईट गोव्या पर्यंत आहे आणि तिथून खाजगी वहाने उपलब्ध आहेत.

बस : सिंधूदुर्गसाठी पुण्याहून थेट बस नाही. पुणे वरून आधी कणकवली पर्यंत जाऊन तिथून खाजगी वहाने करून सिंधुदुर्ग पर्यंत जावे लागते.

हा किल्ला सकाळी १० ते सायंकाळी ५:३० पर्यंत उघडा असतो. भारतीय पर्यटकांसाठी ५० रुपये दर आहे तर विदेशी पर्यटकांना साठी २०० रुपये प्रति व्यक्ती दर आहे.

तसे तर संपूर्ण वर्ष हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. पण तरीही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात जावे.

तर अशा या ऐतिहासिक महत्व लाभलेल्या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.