सुख, समृद्धी, सफलता, भरभराट मिळवण्यासाठी श्रीसूक्त स्तोत्राचे रोज पठण करा – श्रीसूक्त स्तोत्र मराठी अर्थासहित

shree suktam marathi
II श्रीसूक्तम II
१. श्री सूक्त स्तोत्र म्हणजे काय?
आपल्या संपूर्ण विश्वात असा एकही व्यक्ती नाही सापडणार की जो माता लक्ष्मीचे पूजन केल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद कुणाला नको असतो सर्वांनाच माता लक्ष्मी ची कृपादृष्टी हवी असते. राजा असो वा रंक , स्त्री असो अथवा पुरुष सर्वांनाच माता लक्ष्मी ची कृपादृष्टी हवी असते. म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी स्तोत्र आपल्या पूर्वजानी लिहून ठेवलेले आहेत. आता याच श्रीसुक्ताविषयी आपण जाणून घेणार आहोत.
२. श्री सूक्त स्तोत्र पठण का करावे?
१. श्रीसूक्त हे माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी म्हंटले जाणारे प्राचीन स्तोत्र आहे.
२. श्रीसूक्त हे दररोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस म्हंटले पाहिजे जेणेकरून आपल्या घरात नेहमी पैसे राहतील.
३. श्रीसूक्त हे स्तोत्र ऋग्वेदामध्ये सामावलेलं या आहे. तरीही सामान्य लोकांना संस्कृत मध्ये शब्दोचा शब्दोच्चार जमत नसल्याने प्राकृत भाषेतही श्रीसूक्त आहे.
४. वेगवेगळ्या पद्धतीने माता लक्ष्मी मातेला या स्तोत्रामध्ये आळवले आहे .
हेही वाचा
हम गया नाही, हम जिंदा है – श्री स्वामी समर्थ आख्यायिका
३. श्रीसूक्त स्तोत्र
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं,
सुवर्णरजतस्त्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं,
जातवेदो म आ वह ।।१।।
तां म आ वह जातवेदो,
लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं,
गामश्वं पुरूषानहम् ।।२।।
अश्वपूर्वां रथमध्यां,
हस्तिनादप्रमोदिनीम् ।
श्रियं देवीमुप ह्वये,
श्रीर्मा देवी जुषताम् ।।३।।
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां,
ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मेस्थितां पद्मवर्णां
तामिहोप ह्वये श्रियम् ।।४।।
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं,
श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणं प्र पद्ये,
अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।।५।।
आदित्यवर्णे तपसोऽधि जातो,
वनस्पतिस्तव वृक्षोऽक्ष बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु या,
अन्तरा याश्च बाह्या अलक्ष्मीः ।।६।।
उपैतु मां दैवसखः,
कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्,
कीर्तिमृद्धिं ददातु मे ।।७।।
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं,
नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च,
सर्वां निर्णुद मे गृहात् ।।८।।
गन्धद्वारां दुराधर्षां,
नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां,
तामिहोप ह्वये श्रियम् ।।९।।
मनसः काममाकूतिं,
वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य,
मयि श्रीः श्रयतां यशः ।।१०।।
कर्दमेन प्रजा भूता,
मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले,
मातरं पद्ममालिनीम् ।।११।।
आपः सृजन्तु स्निग्धानि,
चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं,
वासय मे कुले ।।१२।।
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं,
पिंगलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं,
जातवेदो म आ वह ।।१३।।
तां म आवह जातवेदो,
लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो,
दास्योऽश्वान् विन्देयं पूरुषानहम् ।। १४ ।।
य: शुचि: प्रयतो भूत्वा,
जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पंचदशर्चं च,
श्रीकाम: सततं जपेत् ।।१५।।
।। इति समाप्ति ।।
४. श्री सूक्तचा मराठी भावार्थ
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं,
सुवर्णरजतस्त्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं,
जातवेदो म आ वह ।।१।।
तां म आ वह जातवेदो,
लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं,
गामश्वं पुरूषानहम् ।।२।।
मराठी अर्थ –
हे अग्निदेवता सोन्यासमान वर्ण असणाऱ्या , हरिणीप्रमाणे चपळ असणाऱ्या सर्व पापांचे हरण करणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल असणाऱ्या लक्ष्मीदेवतेला माझे आवाहन कर , हे अग्निदेवता कधीही दूर न जाणाऱ्या लक्ष्मी देवतेला माझ्याकडून आवाहन कर कि जिच्याकडून मला धन , गाय , घोडा , आप्तेष्ट नातलग सर्व मिळावे.
अश्वपूर्वां रथमध्यां,
हस्तिनादप्रमोदिनीम् ।
श्रियं देवीमुप ह्वये,
श्रीर्मा देवी जुषताम् ।।३।।
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां
ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मेस्थितां पद्मवर्णां,
तामिहोप ह्वये श्रियम् ।।४।।
मराठी अर्थ –
जिच्या मिरवणुकीत लक्ष्मी स्वतः मध्यभागी असलेल्या रथात बसलेली आहे आणि त्या रथाच्या सुरुवातीला घोडे आहेत आणि हत्ती मोठ्याने ललकारी देत आहेत अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो देवी माझ्यावर कृपा कर ,
देवीचे हास्य चमकदार आहे आणि जी सोन्याच्या मखरात बसलेली आहे , मायाळू आहे तेजस्वी आहे . जी देवी स्वतः तृप्त आहे समाधानी आहे ती इतरांनाही तृप्त आणि समाधानी ठेवते अशी कमळात विराजमान झालेली जिची कांती कमळाप्रमाणे आहे अशा लक्ष्मीला मी आमंत्रित करतो.
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं,
श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणं प्र पद्ये,
अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।।५।।
मराठी अर्थ –
जीची आभा चंद्रासमान आहे , तिन्ही लोक जिची पूजा करतात , जिचे यश देदीप्यमान आहे जी उदार आहे अशा देवीला मी शरण जातो माझे दारिद्र्य नष्ट होवो हि देवी तुझ्या चरणी प्रार्थना करतो.
आदित्यवर्णे तपसोऽधि जातो,
वनस्पतिस्तव वृक्षोऽक्ष बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु या,
अन्तरा याश्च बाह्या अलक्ष्मीः ।।६।।
मराठी अर्थ –
हे देवी तुझी कांती सूर्यसमान आहे , तुझ्या तपश्चर्येतून निर्माण झालेला बेल वृक्ष त्याची बेल फळें माझ्या मनातील सर्व अज्ञान दूर करो
उपैतु मां देवसखः,
कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्,
कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥
मराठी अर्थ –
देवाचा मित्र असणारा कुबेर त्याच्या सर्व संपत्तीसह माझ्याकडे येवो म्हणजेच कीर्ती आणि सर्व संपत्ती माझ्याकडे येवो आणि त्याची सर्व कीर्ती आणि उत्कर्ष मला देवो
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं,
नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च,
सर्वां निर्णुद गृहात् ॥८॥
मराठी अर्थ –
भूक , तहान , अस्वच्छता रुपी असलेल्या थोरल्या लक्ष्मी चा म्हणजेच अलक्ष्मीचा मी नाश करतो , संकटे , सर्व प्रकारचे अपयश या सगळ्यांचा मी नाश करतो या सगळ्या नकारात्मक गोष्टी घरामधून हाकलवून दे.
गन्धद्वारां दुराधर्षां,
नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरींग् सर्वभूतानां,
तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥
मराठी अर्थ –
जी देवी सुगंधित सुवासांचे प्रवेशद्वार आहे , जिच्यावर कधीच आक्रमण होऊ शकत नाही , ज्याठिकाणी नेहमी बरकत आहे , समृद्धी आहे संपत्तीचे अवशेष आहेत अशा ठिकाणी स्वामिनीला मी येथे आमंत्रित करतो.
मनसः काममाकूतिं,
वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य,
मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥
मराठी अर्थ –
माझ्या मनाची इच्छा , आकांक्षाची पूर्ती बोलण्यातला सच्चेपणा , सुंदर रूप , पशु , अन्न जिच्यामुळे मिळते ती देवी लक्ष्मी मला यश देवो
कर्दमेन प्रजाभूता,
सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले,
मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
मराठी अर्थ –
लोकांसाठी चिखल हाच आधारभूत आहे , हे कदर्म ( इंदिरेच्या मुला ) तू माझ्यासोबत राहा या आणि तुझ्याबरोबर माता लक्ष्मीलाही माझ्यात स्थापित कर.
आपः सृजन्तु स्निग्धानि,
चिक्लीत वस गृहे ।
नि च देवी मातरं,
श्रियं वासय कुले ॥१२॥
मराठी अर्थ –
पाण्यामधून ( आप )ओलसर असा सात्विक लोभस असं चिक्लीत माझ्या घरात वास कर आणि तुझ्यासवे माता लक्ष्मी हि वास करो.
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं,
पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं,
जातवेदो म आवह ॥१३॥
मराठी अर्थ –
हे अग्निदेवा , कमळाच्या तलावाप्रमाणे रसपूर्ण असणाऱ्या पालनकर्त्यांचे , सोनेरी रंगाच्या कमळाचा हार घातलेल्या , चंद्रासमान शीतल सोन्यासारख्या लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर
आर्द्रां यः करिणीं यष्टिं,
सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं,
जातवेदो म आवह ॥१४॥
मराठी अर्थ –
हे अग्निदेवा , जी जगनिर्मितीला कारण ठरणारी आहे कमळाच्या हार घातलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे अशा लक्ष्मी मातेला मी आवाहन करतो.
तां म आवह जातवेदो,
लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो,
दास्योऽश्वान् विन्देयं पूरुषानहम् ॥१५॥
मराठी अर्थ –
हे अग्निदेव माझ्यापासून कधीही दूर न जाणाऱ्या लक्ष्मी देवीला मी आळवतो कि मला भरपूर धान्य , गायी , घोडे , सेवक आप्तेष्ट मिळतील म्हणून मी अशा लक्ष्मीला आवाहन करतो
यः शुचिः प्रयतो भूत्वा,
जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पञ्चदशर्चं च,
श्रीकामः सततं जपेत् ॥१६॥
मराठी अर्थ –
जो पवित्र अशा लक्ष्मी मातेच्या भक्तीने परिपूर्ण असेल , जो भक्त तुपाने हवंन करेल त्या भक्ताचे मनोरथ नेहमी पूर्ण होईल . नेहमी भक्ताने श्रीसुक्ताची हि पंधरा कडवी म्हणावीत.
=============
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.