शिवरायांचे जन्मस्थान – शिवनेरी किल्ला

Shivneri Fort Information in Marathi: १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला गेला आहे,याचे कारण तर सगळ्यांनाच माहीत आहे,याच दिवशी मराठा साम्राज्याचा महान राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या समाजासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले आणि अशी कामगिरी केली की सगळे जग आजन्म त्याची दखल घेईल.येणाऱ्या १९ फेब्रुवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती आहे.त्याच निमित्ताने शिवरायांच्या जन्मठिकाण शिवनेरी गडाबद्दल काही.
१. शिवनेरी गडाविषयी माहिती
शिवनेरी गड ( किल्ला ) हा आपल्या इतिहासातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे.भारत देशातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळ सतराव्या शतकातील हा लष्करी किल्ला आहे.सतराव्या शतकात यादवांनी नाणेघाट डोंगरावर सुमारे ३५०० फूट उंचीवर हा किल्ला बांधला.डोंगर,डोंगराच्या पोटात वसलेली लेणी आणि त्यावर बांधलेला हा किल्ला असल्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. नाणेघाट येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात व्यापार होतो,त्यामुळे राज्यकर्त्यांनी व्यापारी दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला.
पुण्यापासून १०५ किमी अंतरावर असलेला हा किल्ला ३०० मी उंच टेकडीवर वसलेला आहे.या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत,एक म्हणजे राजमार्ग जो सात वेशी म्हणजेच सीमा ओलांडून जावा लागतो तर दुसरा मार्ग म्हणजे साक ली मार्ग.हा किल्ला चारही बाजूने उताराने वेढलेला आहे आणि हेच याचे मुख्य आकर्षण आहे.विशेष म्हणजे याचा आकार शिवपिंड प्रमाणे आहे.
२. शिवनेरी गडाचा इतिहास
जुन्नर तालुका प्राचीन भारतातील जुन्या शहरातील एक शहर आहे जुन्नर म्हणजे जरना नगर म्हणजेच जुने शहर.हे एक शाक राजवटीचे राज्य होते.जुन्नर शहर भोवतालच्या डोंगरावर १०० पेक्षा जास्त लेण्या आहेत,त्यातीलच एक लेणी म्हणजेच शिवनेरी किल्ला किंवा गड.या लेण्यांपैकी शिवनेरी ही एकच अशी लेणी होती,जिला मोठ्या खाडीने सुरक्षित केले होतें आणि म्हणूनच बाकी लेण्यांपेक्षा हा गड सुरक्षेच्या दृष्टीने योग्य होता.या गडावर ६४ लेण्या आणि आठ शिलालेख सापडले आहेत.या किल्ल्यावर शिलाहार,सातवाहन,बहामनी,यादव आणि नंतर मुघल साम्राज्य अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे.छत्रपती शिवाजी राजांचे आजोबा मालोजी भोसले यांच्याकडे १५९५ मध्ये किल्ला आणि परिसर ताब्यात होता,पुढे १५९९ मध्ये त्यांनी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांना दिला आणि पुढे त्यांनीच तो बांधला.
१६३७ मध्ये हा शिवनेरी किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.नंतर ४० वर्षांनी हाच किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात आला आणि १७१६ मध्ये मराठा साम्राज्याचा ताब्यात आला पुढे त्यांनी तो पेशव्यांच्या ताब्यात दिला.
३. गडाची रचना
शिवनेरी गड हा टेकडी किल्ला आहे.याची संरचना त्रिकोणी आहे,तर याचे प्रवेशद्वार दक्षिण- पश्चिमेस आहे.यातील मुख्य इमारत म्हणजे प्रार्थना हॉल,थडगे आणि मशीद हे आहेत.या किल्ल्या भोवतालची भिंत चिखलाची असून,किल्ल्याच्या आतील बाजूला ( दिशेला ) दरवाजा आहे.किल्ल्यातील आवाराच्या मध्यभागी पाण्याचा तलाव आहे यालाच बदामी तलाव असे म्हणतात.या तलावात पाण्याचे दोन झरे आहेत,या झऱ्याना गंगा आणि यमुना अशी नावे असून,तलावाचे पाणी पिण्यायोग्य आहे.याच तलावाच्या दक्षिणेला तरुण शिवाजी महाराज आणि त्याच्या आई जिजामाता यांची सुबक मूर्ती पाहायला मिळेल जे येथे येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
४. शिवनेरी आणि शिवाजी राजे यांचे नाते
छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाबाई यांच्या पोटात होते,त्यावेळी शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे विजापूरचा राजा सुलतान आदील शहाच्या सैन्यात सेनापती होते.त्यावेळी होणाऱ्या सततच्या युद्धामुळे शहाजी राजांना जिजाबाई यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली,शिवनेरी हा किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत योग्य होता कारण किल्ल्याकडे जाण्यासाठी सात वेस ओलांडून जावे लागते,शिवाय याची उंची ३५०० फूट इतकी आहे आणि या किल्ल्याला मोठ्या खाडीने संरक्षित केले असल्यामुळे ही जागा जिजाऊ साठी योग्य होती.तसेच हा गड खूप मजबूत होता,शत्रू पासून रक्षण करण्यासाठी सीमा भिंत उंच असल्यामुळे इथे जिजाऊ यांना ठेवण्यात आले होते.
या किल्ल्यात १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवाजी राजांचा जन्म झाला आणि हा किल्ला पावन झाला.याच किल्ल्यात जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराज यांना महान राजाचे गुण आणि साम्राज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे शिकवली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर
माता जिजाबाई यांच्या शिकवण्याचा खूप प्रभाव होता.याच किल्ल्याचे अजून एक आकर्षण म्हणजे येथे असलेले शिवाई देवी चे मंदिर.याच देवीच्या नावावरून छत्रपती महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
हे शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असल्यामुळे शिवाय इथेच माता जिजाबाई यांच्याकडून राजा होण्याचे मुख्य गुण त्यांनी घेतले म्हणून त्यांची नाळ या गडाशी जास्त घट्टपणे जोडली गेली.पण फक्त दोन वर्षे शिवाजी महाराज यांनी या गडावर वास्तव्य केले आणि त्यांनी हा गड सोडला.पुढे १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा गड जिंकण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले.
५. शिवनेरीला जाण्याचे मार्ग
जुन्नरच्या शिवनेरी गडावर जाण्यासाठी पुणे हे मुख्य ठिकाण आहे.आपण येथे बस,रेल्वे आणि विमान अशा कोणत्याही मार्गाने जाऊ शकतो.
बस: पुणे ते शिवनेरी हे अंतर ९५ किमी आहे. पुणे,मुंबई,हैदराबाद,कोल्हापूर आणि गोवा पासून बस उपलब्ध आहेत,तसेच खाजगी सेवा सुद्धा आहेत.जुंनारपासून किल्ल्या पर्यंत आपण टॅक्सी,रिक्षा याद्वारे जाऊ शकतो.
रेल्वे : मुंबई,हैदराबाद,बेंगलोर,चेन्नई, दिल्ली वरून आपण पुणे येथील रेल्वे स्टेशन वर येऊ शकतो,तिथून खाजगी वाहने किंवा बस द्वारे गडावर पोहचू शकतो.
विमान : त्यासाठी आपण पुणे-लोहगाव या विमानतळावर उतरून मग गडावर जाऊ शकतो.
६. शिवनेरी वरील आकर्षणे :
ज्या महामार्गने आपण येथे गड पाहू शकतो ते सात दरवाजे येथील एक आकर्षण आहे.या प्रत्येक दरवाज्याला विशिष्ठ असे नाव आहे.महा दरवाजा, पीर दरवाजा,फाटक दरवाजा, हट दरवाजा,पर्गांचाना,कुलबक्त आणि शेवटचा शिपाई दरवाजा अशी नावे आहेत.
शिवाजी महाराज यांनी इथे जन्म घेतल्यामुळे याची पवित्रता आणि महानता खूप वाढली.त्यामुळे जिथे राजांचा जन्म झाला होता ते घर पुन्हा पूनार्थापित करण्यात आले,हे घर सुद्धा प्रेक्षणीय आहे.
याच ठिकाणी दक्षिण टोकाला बदामी तलाव जवळ जिजाबाई आणि शिवबा यांची सुबक मूर्ती (पुतळे) सुद्धा पर्यटक आवर्जून पाहतात.
या शिवाय अंबरखाना,प्राचीन लेणी,बदामी तलाव,पुतळे,मोगल मशीद,शिवकुंज किल्ला,जुन्नर लेणी,लेण्याद्री गुहा,पार्वती हिल पुणे,शिवनेरी राजा दिनकर केळकर संग्रहालय,सिंहगड किल्ला आणि एम्प्रेस गार्डन ही ठिकाणे सुद्धा अतिशय प्रेक्षणीय आहेत.
शिपाई द्वारचे सेंट दरवाज्याजवळ डावीकडे शिवाई मंदिर आहे.ते खूप जुने आणि सुबक नक्षीकाम केलेले देवीचे मंदिर आहे.
७. FAQ | गडासंदर्भात असलेले काही प्रश्न आणि उत्तरे:
७.१. शिवनेरी गडावर जणांच्या वाटा
उत्तर : या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१. साकली मार्ग
२. राजमार्ग : यासाठी सात दरवाजे ओलांडून जावे लागते.
७.२. गडावर पोहोचण्यासाठी रोपवे ची सोय आहे का?
उत्तर : नाही.अद्याप तरी अशी सोय नाही.पण यासाठी मागणी करण्यात आली आहे.
७.३. गडावर काही खाण्यापिण्याची सोय आहे का?
उत्तर : येथे अस्सल पुणेरी चवीचे आणि मराठमोळे सगळे पदार्थ मिळतात.जसे की पावभाजी,पुरणपोळी,मिसळ पाव. तसेच पुण्यापासून ते गडापर्यंत जाताना अनेक हॉटेल्स आहेत.शिवाय गडावरील भोवतालच्या परिसरात सुद्धा अनेक खमंग, चमचमीत आणि अस्सल पुणेरी पदार्थांची चव चाखायला मिळते.यात भेळपुरी,वडापाव,मिसळपाव, पोहे,पावभाजी,पिठले भाकरी,दाबेली आणि पुरणपोळी यासारखे चविष्ट पदार्थ आहेत.
७.४. शिवनेरी गडावर पायऱ्या आहेत का असल्यास किती?
उत्तर : हो पायऱ्या आहेत आणि ४५ आहेत.
७.५. किल्ला कोणी बांधला?
उत्तर : हा किल्ला छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे भोसले यांनी त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी राजांसाठी बांधला.
७.६. सध्या शिवनेरी गडाची देखभाल कोण बघत?
उत्तर : या गडाची देखभाल भारत सरकार करत आहे.
===============