छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचय

काही लोकं आपल्या कामामुळे,कर्तबगारीमुळे कायमच जीवंत राहतात.आपल्या भारतभूमीत असे अनेक शूरवीर,कर्तबगार लोक जन्माला आले,ज्यामुळे आपली भारत भूमी कायमची पावन झाली,महान झाली.माधवराव पेशवे, तात्या टोपे, भगत सिंग,सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा,सिंधुताई सकपाळ अशी एक ना अनेक कितीतरी नावे घेता येतील ज्यांच्या कामामुळे यांना अमरत्व प्राप्त झाले आणि हे सर्वच आपल्या भारत भूमीत जन्माला आले हे आपले केवढे मोठे सौभाग्य. ज्याच्या वीरगाथा ऐकताना अंगावर काटे उभे राहतात,ज्याच्या येण्याने,जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवला,ज्याचे नाव इतिहासातील पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे,ज्याची ख्याती आजपर्यंत तशीच आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा तशीच रहाणार आहे असा विरपुरूष,मराठा साम्राज्याचा महान राजा,शक्तिशाली,निष्ठावान, पराक्रमी,क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज म्हणजे शिवछत्रपती “शिवाजी महाराज” (shivaji maharaj story in marathi)
१. शिवाजी महारांजांविषयी माहिती | shivaji maharaj story in marathi
२. शिवाजी महाराजांचा जन्म | Birth Place of Shivaji Maharaj
शहाजीराजे भोसले हे शिवाजी राजे यांचे वडील विजापूर सुलतान सेनेचे सेनापती होते तर त्यांच्या आई जिजाबाई जाधव कुळात जन्माला आलेल्या हुशार आणि प्रतिभाशाली महिला होत्या.शिवनेरी गडावर असलेल्या शिवाई देवीला जिजामाता यांनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी इच्छा मागितली होती आणि त्यांची ईच्छा पूर्ण झाल्यानंतर देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते.शिवाजीराजे यांचे बालपण आईच्या प्रभावशाली मार्गदर्शनाखाली गेले.जिजाऊ यांनी लहानपापासूनच राम आणि कृष्ण यांच्या कथा शिवाजी राजांना सांगितल्या हित्या,त्या ऐकुन अन्याय करणाऱ्या विरुद्ध शिवाजींच्या मनात चीड निर्माण झाली होती.युद्धाचे, घोडेस्वारीचे,राजनीतिचे तसेच परकीय सत्तेविरूद्ध आक्रमण करण्यासाठी लागणारी शिस्त याचे धडे जिजाऊनी शिवाजी राजेंना दिले आणि इतक्या लहान वयातच शिवाजींनी ते सगळे उत्तम रीतीने आकलन करून घेतले,इतकी समज त्यांना खूप लहान वयात होती.त्याच वेळी ते मोठी कामगिरी करून दाखवणार असे स्पष्ट दिसून येत होते.लहान वयातच त्यांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली होती.त्यांची पहिली गुरु त्यांच्या आई जिजामाता आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव हे होते.त्याच वेळी त्यांना काही खऱ्या आणि धाडसी मित्रांची साथ मिळाली जे त्यांच्याच वयाचे होते.ज्यांनी पुढे स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी राजांची मदत केली आणि महत्त्वपूर्ण कामगिरी निभावली.
३. स्वराज्य निर्माण करण्याची ओढ
शिवनेरी सोबतच माहुली आणि पुणे येथेही शिवरायांचे बालपण गेले.त्यांच्या आई वडिलांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.शहाजी राजांनी जिजाऊ आणि छत्रपतींच्या वर संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपवली आणि पुण्याला पाठवले.आधी ही व्यवस्था दादोजी कोंडदेव आणि शहाजी राजे यांनी नेमलेले काही विश्वासू सरदार बघत.पुढे दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यू नंतर ही जबाबदारी पूर्णपणे शिवाजी राजांवर येऊन पडली.
कणखरपणा,देशाबद्दल प्रेम आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याचे धैर्य हे जिजाऊंचे गुण शिवबामध्ये आले होते.आईने दिलेली शिकवण आणि प्रेरणेतून छत्रपतींना स्वराज्य निर्माण करण्याची ओढ निर्माण झाली. ज्याच्या ताब्यात किल्ले किंवा गड आहेत अशाच लोकांच्या हातात राज्य असावे असे त्यावेळी मानले जात होते, स्वराज्य स्थापन करणे ही राजांची मनापासून इच्छा होती त्यामुळे आधी आपण जास्तीत जास्त किल्ले ताब्यात घ्यायला हवेत हे राजांना समजले होते.त्यासाठी आपल्याच वयाचे धाडसी आणि खरे मित्र गोळा करून त्यांचा एक समूह बनवला ज्याला त्यांनी ” मावळा ” हे नाव दिले.याच मुठभर मावळ्यांच्या मनात धर्मप्रेम निर्माण करून लढण्याचे प्रशिक्षण दिले आणि स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली.स्वराज्याचा हेतू लक्षात घेऊन मावळ्यांनी आपल्या मित्राच्या स्वप्नपूर्तीसाठी रक्ताचे पाणी केले प्रसंगी जीव पणाला लावला.या मावळ्यांना मदतीला घेऊन शिवाबांनी अनेक गड जिंकण्यासाठी मोहिमा आखल्या आणि फक्त आखल्या नाहीत तर यशस्वीपणाने पार सुद्धा पाडल्या.या शिवाय देशपांडे,देशमुख यांच्याशी वेगळ्या प्रकारे संबंध जोडले आणि त्याचाही त्यांना स्वराज्य निर्मितीत उपयोगच झाला.
हेही वाचा:
शिवनेरी किल्ला”>शिवरायांचे जन्मस्थान -> शिवनेरी किल्ला
“गड आला पण सिंह गेला” असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडातून का निघाले
४. शिवाजी महाराजांचा इतिहास
शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया घालण्यासाठी मोगल साम्राज्याचा राजा औरंगजेब आणि विजापूरचा राजा आदिलशाह इतकेच नव्हे तर प्रसंगी इंग्रजांशी सुद्धा युद्ध केले आणि १६७४ मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला.शिवबांनी त्यांच्या शिस्तबध्द सुव्यवस्थित प्रशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक कार्यक्षम पुरोगामी प्रशासन प्रधान केले इतकेच नाही तर युद्ध विज्ञानात अनेक नवीन गोष्टी केल्या आणि गनिमी युद्धाची एक नवी शैली म्हणजेच शिवसुत्र विकसित केले.प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि कोर्टाचे शिष्टाचार हे सुद्धा नव्याने जीवंत केले.त्यामुळे शिवबा हे एक महान भारतीय राजा आणि रणनितीकर होते हे दिसून येते.
५. राज्याभिषेक
शिवबांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ गड जिंकून राज्य स्थापन केले नाही तर हिंदू धर्माच्या वेदांचे,पुराणांचे आणि देवळांचे सुद्धा रक्षण केले,अनेक किल्ले दुरुस्त करून बांधले तर मंदिरे स्थापन केली.त्यांच्या या अफाट कामाने लोकांचा विश्वास त्यांनी अवघ्या सोळाव्या वर्षात संपादन केला.आपल्या काही खास आणि मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत सोळाव्या वर्षी रायरेश्वर गडावर २७ एप्रिल १६४५ या दिवशी शीवबांनी स्वराज्याची शपथ घेतली.रायरेश्वर गडावर स्वराज्याचे तोरण बांधले त्यामुळे हा किल्ला स्वराज्य शपथ घेतल्याचा साक्षीदार आहे.या प्रसंगी कान्होजी जेधे,बाजी पासलकर,तानाजी मालुसरे, नरस प्रभू गुप्ते आणि बापूजी मुदगल हे मावळे उपस्थित होते.याच किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून राजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला.जनता या राजाकडे भाग्यविधाते म्हणून पाहु लागली तर काहीजण राजाला हिंदुपती,पातशहा म्हणू लागले.स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांनी आणि शिवबाने रक्ताचे पाणी केले आणि अवघ्या ५० वर्षांच्या काळात विजापूर आणि दिली राजसत्तांना आपल्या समोर झुकायला लावले.
६. विवाह
१४ में १६४० मध्ये लाल महाल पुणे येथे सईबाई निंबाळकर यांच्यासोबत राजांचा पहिला विवाह पार पडला.व्यवहारिक राजनीति चालू ठेवण्यासाठी आणि मराठा सरदारांना एका छताखाली आणण्यासाठी शिवबाने एकूण आठ विवाह केले.सोयराबाई मोहिते,पुतळाबाई पालकर, सकवरबाई गायकवाड,काशीबाई जाधव,सगुणा शिंदे,गुणवंतीबाई आणि लक्ष्मीबाई विचारे ही त्यांच्या पत्निंची नावे आहेत.
सईबाई पासून संभाजी आणि सोयराबाई पासून राजाराम अशी दोन मुले त्यांना झाली,शिवाय त्यांना काही मुलीही होत्या.
७. पहिली लढाई तोरणा कसा जिंकला ?
तोरणा किल्ला त्यावेळी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता.या किल्ल्यासाठी तानाजी मालुसरे,नेताजी पालकर,कान्होजी जेधे आणि इतर काही मावळ्यांना सोबत घेऊन आदिलशाह सोबत लढाई जिंकून तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तिथेही स्वराज्याचे तोरण बांधले.हा राजांनी जिंकलेला पहिला गड होता.याचे पहिले नाव होते प्रचंडगड,शिवाजींनी ते नाव बदलून तोरणा असे ठेवले.हाच किल्ला जिंकून ते थांबले नाहीत तर कोंढाणा ( सिंहगड ) आणि पुरंदर हे किल्ले सुध्दा आदिलशहाच्या ताब्यातून मिळवले.तोरणा पासून दहा किमी अंतरावर असलेला मुरंब देवाचा डोंगर ताब्यात घेतला आणि त्याची दुरुस्ती करून त्याचे नाव राजगड असे ठेवले.हे किल्ले जिंकून राजांनी पुणे प्रांतावर पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केले त्यावेळी शिवबा फक्त सतरा वर्षांचे होते.एवढ्यावर थांबतील ते शिवबा कसले ?? पुढे त्यांनी जंजी,वेलरचा किल्ला,पन्हाळा,पुरंदर असे एकूण ३६० गड ताब्यात घेतले.
८. राज्यविस्तार
त्यावेळी विजापूरचे राज्य परस्पर संघर्ष आणि परकीय हल्ल्यांच्या काळातून जात होते.विजापूर मोगलांच्या हल्ल्यामुळे त्रस्त झाले होते त्यामुळे सुलतान आदिलशहाने आपले सैन्य किल्ल्यावरून काढून स्थानिक राज्यकर्त्यांना किंवा सरांजमाना स्वाधीन केले.अशा वेळी सुलतानाची सेवा करण्याऐवजी त्यांच्या विरोधात रणनीती आखण्याची सुरुवात शिवबांनी केली.नेमके त्याचवेळी आदिलशाह आजारी असल्याची चर्चा शहरात पसरली आणि याच संधीचा फायदा घेऊन राजांनी विजापूरमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली.तोरणा आणि रोहिरेश्र्वर ताब्यात घेत असतानाच,आदिल शहाच्या सरदारांना पैसे देऊन आपल्या पक्षात सामील करून घेतले आणि आपला एक दुत आदिलशाहकडे पाठवून सांगितले की,आधीच्या किल्लेदारपेक्षा मी जास्त रक्कम देतो त्यामुळे हा प्रदेश माझ्या ताब्यात करा.मग आदिलशाहने राजांना तोरणाचे अधिपती बनवले आणि याच मिळालेल्या संपत्तीने शिवबाने काही संरक्षणात्मक उणीव दुरुस्त केल्या.इथेच शिवबा थांबले नाहीत,थोड्याच अंतरावर असलेला राजगड ताब्यात घेतला यामुळे आदिलशाह चिडला आणि शिवाजीवर लक्ष ठेवा असे शहाजी राजेंना सांगितले.पण त्याची पर्वा शिवाजींनी केली नाही आणि चाकण,कोंढाणा सर केला.
शेवटी अस्वस्थ होऊन औरंगजेबने मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवून शिवाजींच्या २३ किल्ल्यावर ताबा तर मिळवला च पण पुरंदर नष्ट केला.त्या तहाच्या वेळी शिवाजींनी आपला मुलगा संभाजी राजेंना मिर्झाच्या ताब्यात सोपवावे लागले.याच कोंढाणा लढाईत शिवाजींना तानाजी मालुसरे सारखे वीर मावळे गमवावे लागले.तानाजी मालुसरे यांना आलेल्या वीरमरणमुळे शिवाजींनी गडाचे नाव सिंहगड ठेवले.
पुढे सुपा आणि पुण्याची जहागिरी शहाजी राजेंना देण्यात आली होती पण त्याचा ताबा महादजी निंबाळकर यांनी घेतला असल्यामुळे मध्यरात्रीच शिवाजींनी किल्ल्यावर आक्रमण केले तोही ताब्यात घेतला.त्याचवेळी पुरंदरचा किल्लेदार मरण पावला आणि किल्ल्याच्या पदासाठी त्यांच्या तीन मुलांमधे वाद सुरू झाले,त्यातील दोन भावांच्या आमंत्रणवरून शिवबा तिथे गेले आणि शिताफीने पुरंदरवर वर्चस्व मिळवले.१६४७ पर्यंत चाकण आणि निरा प्रदेशाचे शिवबा अधिपती झाले.त्यानंतर घोडादल सेना निर्माण करून महाराजांनी कोकणात सैन्य पाठवले आणि त्यासोबत अजून ९ किल्ले मिळवले.
अशा प्रकारे स्वराज्याचा राज्यविस्तार झाला.
९. रामदास स्वामी आणि शिवाजी संबंध
रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये गुरु शिष्याचे छान नाते होते.दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचे जसे नाते होते अगदी तसेच नाते समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी राजे यांच्यात होते.१५ ऑक्टोंबर १६७८ मध्ये शिवाजींनी रामदासांना एक पत्र लिहिले होते ज्याची सुरुवात त्यांनी श्री सदगुरुवर्य, सकलतीर्थरूप अशी केली होती,त्यावरूनच त्यांचे संबंध स्पष्ट होतात,पुढे ते म्हणाले की जे रज्य मी मिळवले ते तुमच्या चरणी अर्पण करून सेवा घडावी असा विचार मनात आणला आहे असे ते म्हणाले.जेंव्हा शिवाजींनी अकरा मारुतीची स्थापना केली होती त्यावेळी समर्थांनी आदिलशाहीचा काही भाग मागितला होता,तो भाग शिवाजींनी जिंकावा असा त्या मागील मुख्य संकेत होता.
१०. मृत्यू
मार्च महिन्याच्या शेवटी १६८० मध्ये हनुमान जयंतीच्या पूर्व संध्येला शिवाजी महाराज तापाने आणि पेच प्रसंगाने आजारी पडले आणि ३ एप्रिल १६८० च सुमारास स्वर्गवासी झाले.
अशा या महान राजाला शत शत प्रणाम!!!
==============