Skip to content Skip to sidebar Skip to footer

माझ्या आठवणीतली ‘ती’ ….भाग ८

अंजलीने परत आपला मोर्चा आपली आवड जोपासण्यावर केलामग अंजलीच्या वडिलांनी एका कवी सम्मेलनाची तिकिटे काढून आणलीअगदी दिगग्ज कवी तिथे उपस्थित राहणार होतेअंजलीनेहि खूप आनंदाने संमेलनासाठी जाण्याचं ठरवलंअगदी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत संमेलन चालू होत मग अंजली आदल्यादिवशीच तयारीला लागली कारण अंजली एकटीच संमेलनाला हजेरी लावणार होतीकारण छोट्या आरवला गर्दीमध्ये नेणं जमणार नव्हतं म्हणून अंजली लगबगीनं तयारी करत होती आणि पहिल्याच रांगेतला तिकीट अंजलीला मिळालं होतं म्हणून अंजली भलतीच खुश होतीमस्त मोरपिशी रंगाची साडी तिने निवडली होती,त्यावर मस्त मोरपिशी रंगाची साडी तिने निवडली होती,त्यावर मस्त साऊथ इंडियन झुमके अशी तयारी तिने केलेली..

संमेलनाचा दिवस उजाडलाअंजली खूपच लगबगीने आवराआवर करत होती..गडबडीत जेवायलाही विसरत होती पण आई ओरडली म्हणून कसेबसे घास पोटात टाकलेते म्हणतात नाआपल्या आवडीची गोष्ट असेल तर कसलेच भान राहत नाहीतसं अंजलीच झालं होत मग मस्त मोरपिशी रंगाची साडी त्यावर साऊथ इंडियन झुमके आणि केसांचा मस्त असं अंबाडा गुंफलेला त्यावर चाप्याची वेणी गुंफली होती आणि खूप सुंदर दिसत होती..आईने मग आपल्या लेकीची दृष्ट काढली आणि म्हणाली

अंजलीआईअगंबसबसकिती दृष्ट काढशील आणि आत्ता कोण पाहणार आहे मला

आई – अंजुगप्प बसअजूनही किती सुंदर आहेस तूआणि बघ अजूनही मला तुझं लग्न व्हावं असं वाटतंय..

अंजलीनाही आईआता लग्न या गोष्टीवर माझा अजिबातच विश्वास राहिला नाहीय ..एकदा केलेली चूक मला परत नाही करायचीयजाऊ दे संमेलन सुरु होईल मला उशीर होतोयआरव जेवण झालच आहे  त्याला झोपायला सांग..नाहीतर पित्त होईल त्याला..चल निघते मी..

असे म्हणून अंजली आईचा निरोप घेते आणि साधारण तासाभराने संमेलनात पोचते आणि आवर्जून पहिल्याच रांगेमध्ये बसते …एकापाठोपाठ एक अशा दिग्गज कवींचे आपले कविता सादरीकरण सुरु असते ..  ..अंजलीही ऐकण्यात मग्न असते…साधारण ५-६ कवीची सादरीकरण झाली असतील…मग निवेदकाने अनुराग असे नाव अनाऊन्स केलं तसं अंजलीनेही चमकून पाहिलं तर…त्या कवीच वय साधारण ३२ -३३ पर्यंत असेल, डोळ्यावर चष्मा गळ्यात शबनम,उंच अशी शरीरयष्टी आणि त्याने फक्त कवितेचं शीर्षक वाचलं ‘माझ्या आठवणीतली ती..’ आणि अंजलीच मन १५ वर्ष मागे गेलं आणि अजयची आठवण झाली आणि मग पूर्ण कविता झाल्यावर अंजलीला खात्री पटली कि हाच…हाच…तो अजय कुलकर्णी ….म्हणजेच अंजलीचा लाडका कवी ‘अनुराग’…पूर्ण कविता झाली तरीही अंजली एकटक अजयकडेच पाहत राहिली… कारण अजयची कारकीर्द म्हणजे कॉलेजच्या

काव्यवाचनापासूनच सुरु झालेली होती..ती म्हणजे जिच्याकडे पाहून त्याला कविता सुचत असे ती म्हणजे अंजलीपण अंजलीला हि गोष्ट नव्हती माहिती कारण अंजली अजयला फक्त एक चांगला मित्रच समजत होतीआणि अजयच्या कवितांच्या प्रेमात पडली होती म्हणजे अजयच्या कविमनावर अंजली प्रेम करत होती

अजयने मात्र आपल्या कवितांचा आलेख खूपच वाढवला होता..बऱ्याच चित्रपटांसाठी अजयने कविता लिहिल्या होत्याआणि मोठ्या कवीच्या यादीत अजयचे नाव मानाने लिहिले गेले होते आणि मोठे मोठे डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर अजयच्या अपॉइंटमेंट साठी वर्षानुवर्षे वाट पाहत असत अंजली मात्र अजयकडे एकसारखी पाहतच होती..आणि जेव्हा भानावर आली तेव्हा संमेलन संपून गेलं होत आणि सभागृह हळू हळू रिकामं होऊ लागलं होत पण कवीअनुरागच्या भोवती चाहत्यांचा गराडा होताआणि अंजली अजयला भेटण्यासाठी धडपडत होतीमग एका रांगेत सगळे उभे राहून अजयची स्वाक्षरी घेत होते त्यात अंजलीही उभीच होतीका कोण जाणे आज अंजलीने लग्नातलं अजयने दिलेलं गिफ्टही आणलं होतंमग अंजलीला वाटले आता अजय काही आपल्याला ओळखणार नाही, जेव्हा स्वाक्षरी घेण्यासाठी अंजलीचा नंबर आला तेव्हा अंजलीने मुद्दाम चांदीचे गुलाबाचे फुल अजयसमोर ठेवलेआणि म्हणाली, ” कदाचितआत्ता तुम्ही मला ओळखाल..! ” अजयही बोललाहे गिफ्ट दाखवला नसतं तरीही मी तुम्हाला ओळखलंच असतंकारण आज मी इथपर्यंत पोहोचलोय याच खरं श्रेय तुम्हालाच जात ” ! अंजली तशी चमकून म्हणाली…”ते कसं काय ” ? आणि अजय म्हणाला, ” होय..कारण तुमच्याकडेच पाहून कविता कशी करायची हे समजलंहे वाक्य पूर्ण होत होत तोच अंजलीला कुणीतरी मागे खेचलं आणि म्हणलं , ” काय हे आम्ही काय वेडे म्हणून थांबलोय का इथेआवरा पटकनहा आवाज अंजलीने ऐकला तशी अंजली झर्र्कन मागे झाली आणि आपल्या अश्रुना बांध मोकळा करून दिलाहमसून हमसून रडू लागलीखरंच आपण अजयच्या कायमच तर आठवणीत राहिलोहे अंजलीला कळून चुकले… 

अंजलीला मात्र तिचे मन सारखेसारखे खात राहिले आणि कॉलेजचे दिवस पुन्हा तरळू लागले..आणि आपली चूक उमगली कि , अजयने आपल्यामुळेच कॉलेज सोडलेआपणच आपल्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं..खरंच अजय खूप प्रेम करत होतं हे अंजलीला त्या दिवशी कळले…  

अंजलीने तर आपला संसार थाटलापण अजयच्या तर मनात अंजली कायमची आठवणीत राहिली….खरंच कायमची आठवणीत….

समाप्त….!   

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.