
सगळे मित्र मैत्रिणी क्लास मध्ये गेले. मागोमाग संजयही धापा टाकत क्लास मध्ये आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला…सगळ्यांची नेहमीप्रमाणे गप्पाष्टक रंगली होती…अंजली मात्र तिच्या आवडीच्या कवीची कविता वाचण्यात गर्क होती…
इतक्यात अंजलीला मंजिरी खिजवत, “आहे बाबा अजयनंतर जागा घेणाऱ्या मिस कवयित्री…कुठल्या कवीची कविता वाचतीयेस…जरा कळू तरी दे आम्हाला…”
अंजली – “अगं…कवी ‘अनुराग’ आहे खूप मस्त असतात यांच्या कविता…माझ्या मते हे पहिलंच प्रकाशन आहे त्यांचं… पण कविता वाचून असं वाटतं कि हा कुणीतरी ओळखीचाच आहे….फार फील असतो गं ह्यांच्या कवितांमध्ये… “
संजयचे कान अंजली आणि मंजिरीच्या गप्पांमध्येच टिपलेले असतात….
संजय – “बापरे!!!! चक्क…कवी यांना जवळून ओळखतो…पण या ओळखतात का समोरच्यांना…”
अंजली वैतागून – “संजय…मी सकाळपासून पाहतेय.. काही ना काही उपरोधिक बोलतोयस तू…पण विषय वाढवायचा नाही म्हणून मी गप्पं बसतीये पण याचा फायदा घेऊ नकोस तू….”
संजय काही बोलणार तेवढ्यात क्लास टीचर वर्गात येतात….
पूर्ण तास अंजलीच लक्ष नव्हतं….कुठे ना कुठे अजयची खंत तिला वाटत होती…. आणि त्यात संजयचा तोडकेपणा…. कसा-बसा कॉलेजचा पहिला दिवस जातो तिचा..
अंजलीचा जाम मूड ऑफ झाला होता आज…. अंजली घरी पोहोचताच…
आई – “काय गं अंजली…आज असं काय तोंड पाडून आलीयेस ..तब्येत बरी आहे ना ?”
अंजली – “आई हो अगं….तब्येत बरी आहे माझी …जरा मूड ऑफ झालाय माझा..”
आई – “तू फ्रेश होऊन ये…मी चहा करते तुझ्यासाठी…किती थकलेली दिसतेय बघ….चहाचा घोट घेताच बघ कसा थकवा जातो तुझा…”
अंजली – “हो आई …दे गं खरंच खूप गरज आहे चहाची…”
अंजलीची आई चहाचा गरम गरम कप अंजलीच्या हातात टेकवते, “हा घे चहा”
अंजली – “वाह..! मस्त झालाय चहा…मम्मा…यु आर सो स्वीट…!”
आई – “आणखी स्वीट म्हणशील …जर पुढची बातमी ऐकलीस तर..”
अंजली – “कुठली बातमी…?”
आई – “अगं या वर्षाअखेरीस लग्नाची तारीख ठरवून आलोय आम्ही दोघे आज…”
अंजली – [लाजत ] “खरंच!!!! खूप लवकर होतंय गं लग्न…! माझ्या तर पोटात गोळाच आला लग्नाच्या विचाराने…”
आई – “अगं…वेडाबाई सगळ्याच मुलींच असंच होतं…माझी काय वेगळी अवस्था होती…मलाही असंच वाटलं होतं …तेव्हा तर किती जुन्या विचारांची माणसं होती..त्याकाळी तर नवरा नवरी थेट लग्न मंडपातच एकमेकांना बघायची…त्यामानाने अभयराव आणि तू किती छान ओळखता बघ एकमेकांना लग्नाआधीच… आणि अभयराव खूप समंजस आहेत गं …आणि कसली ग भीती..? आम्ही आहोत ना…!”
अंजली आईच्या कुशीत डोकं ठेऊन – “नाही गं आई…पण तुम्हाला सोडून जायच्या विचारानेच मनाला हुरहूर लागते….असं वाटतं नको बाई ते लग्न बिग्न….कायम इथेच राहवं तुझ्या कुशीत..”
आई – “हे बघ बाळा…सगळ्या मुलींना असं स्ट्रॉंग व्हावेच लागते..आणि अभयराव तर मुंबईला शिफ्ट होणार आहेत कि लग्नानंतर…मग ह्यांची बदलीही पुढच्यावर्षी मुंबईला असणार आहे..मग मी तर किती जवळ राहील तुझ्या…मग तर खुश…”
अंजली अभयच्या लग्नाची तारीख ह्या वर्षाअखेरीस निघते….
पाहता-पाहता कॉलेजच्या स्पर्धा,क्रीडास्पर्धा वार्षिक स्नेहसंमेलन होऊन जातं आणि शिवाय कॉलेजचं दुसरं वर्षदेखील शेवटच्याच टप्प्यात होतं …या सगळ्यात सगळे मित्र मैत्रिणी अजयला खूप मिस करत असतात….सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये अजय भाग घ्यायचा आणि पारितोषिकही पटकवायचा… पण ह्यावर्षी मात्र त्यांचा वर्ग पारितोषिकापासून लांबच राहिला….अजयची कमी कुणीही भरून काढणारं नव्हतं…
अजय मात्र अधून मधून संजयची चौकशी करायचा….असच एकेदिवशी अजयचा संजयला फोन आला….
अजय – “हॅलो…संजय कसा आहेस..?”
संजय – “मी कसा असेल रे…तुझ्याशिवाय…ऐकत असतो कौतुक त्या माकडाच…ते जाऊ देत…रे पण कॅन्टीनला तुझ्याशिवाय मजाच येत नाही रे..पुणे काय म्हणतंय..?”
अजय – “पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ना…मस्त रमलोय इकडे…आणि तू जर अंजलीला टॉन्ट देत असशील ना.. तर ते करू नकोस हा…झालं गेलं ते विसर रे संज्या….मीही विसलोरोच सगळं असं समज….उगाच ह्या गोष्टीचा त्रागा नको करू आता….आणि तू माझ्यामुळे असाच तुटक वागला ना तिच्याशी तर तिला कळेल”
संजय – “कळू देत कि मग…खरं आहे ते आहे आपण नाही घाबरत कुणाच्या बापाला…!”
अजय – “कृपा करून असं काही करू नकोस…नाहीतर मला वाईट वाटेनं…तुला आपल्या मैत्रीची शप्पथ…”
संजय – “घातला ….घातला राव…”
अजय – “काय घातला??”
संजय – “माझ्या वर्मावर घाव घातला….मैत्रीची शप्पथ घातली म्हणून…नाहीतर केव्हाच…इंगा दाखवला असता..”
अजय – “डोकं शांत ठेव आणि थोडासा खुनशी स्वभाव सोड…”
संजय – “सोडला भावा…तुमच्यासाठी काय पण…!”
अजय – “चल…जातो मी लाइब्ररीत…बाय”
संजय – “बाय…अशीच आठवण ठेव रे बाबा..!”
इकडे अंजलीच्या लग्नाची तयारीही जोरात सुरु असते. घरात दाग-दागिने,उंची कपडे, लग्नपत्रिका,गोड-धोडाचे पदार्थ… घर अगदी भरून आलं होतं…. अभयच्या घरीही सुनेसाठीचे दागिने,साड्या आणि नातेवाईक ह्या सर्वांची जय्यत तयारी सुरु होती.
अंजलीच्या वार्षिक परीक्षा ही येऊनच ठेपल्या होत्या आणि एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे लग्नाची तयारी असं तीच रुटीन चालू होतं…. त्यामुळे अभयशी बोलणं फार कमी होत असे….एवढी लग्नाची धामधूम होती….पण अंजली तिच्या आवडत्या कवीच्या कविता आवर्जून वाचत होती…कवी ‘अनुराग’….शिवाय कविता वाचता वाचता उखाणेही मस्त तयार करून ठेवले होते तिने…
लग्नाचा दिवस उजाडला…. आपल्या परीक्षा संपवून अंजली आपल्या आयुष्याची परीक्षा द्यायला सिद्ध झाली ..भरजरी शालू , अंगभर दागिने,पायात पैंजण,आणि मेहंदी याने तिचे सौन्दर्य अधिकच खुलून दिसत होते…
अभयही खूप मस्त आपल्या बायकोला साजेसा असा तयार झाला होता. दोघांनीही मंगलाष्टक झाल्यावर एकमेकांना पुष्पहार घातले….लग्नाच्या विधिआधी मित्र मैत्रिणींसोबत फोटो सेशन झाले…अंजलीची नजर मात्र सारखी अजायलाच शोधात होती…
कारण खूपदा अंजलीने अजयला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अंजलीच्या प्रयत्नांना यश आले नाही…पण शेवटचा प्रयत्न म्हणून अंजलीने पत्रिका संजयने सांगितलेल्या पत्त्यावर पाठवली होती म्हणून अंजलीचे डोळे अजयला शोधतं होते…पण खूप उशीर झाला होता…. अजय लग्नाला आलाच नाही…पण अंजलीला एक भेट जरूर पाठवली होती…अंजलीने कुतूहलाने…बॉक्स ओपन केला त्यात तिला भेट पाहून खूप आनंद झाला….
भेट होती….एक गुलाबाचं…चांदीचं फुल…फुलं इतकं आकर्षक होत…कि कुणीही त्या फुलाकडे पाहत राहील.. आभार मानायचे पण कसे मानणार…
पुढचा भाग लवकरच आपल्या भेटीला…. पाहुयात अंजली लग्नानंतरची परीक्षा चोख पार पाडतेय कि नाही ते….
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.