Skip to content Skip to sidebar Skip to footer

श्रावणात घन निळा बरसला (भाग – २)

वदंना क्लासमध्ये जाऊन बैंचवर बसणार तोच ,” श्शी..!!! किती घाण कपडे. ये तू इथे नको बसू जा. चिखलातून बाहेर आली आहेस की काय तू ? केसांना तेल तर असे वाटते की डोके सगळे तेलाच्या बाटलीत ठेवले आहे. श्शी काय हे..!!” असे म्हणत एक मुलगी तिला अक्षरशः धक्का देऊ लागली.

हे ऐकून वदंनाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ती काही न बोलता तिथून दुसऱ्या बैंचवर बसण्यासाठी जाऊ लागली तोच,” हाय…! मी सुजाता. ये बस इथे. थांब हो जरा बैंच पुसते तू आधीच भिजलेली आहेस यात इथे मी चुकून पाण्याची बाटली ठेवली होती ती पडली सगळे पाणीच पाणी.” असे म्हणत सुजाता पटापट आपल्या रुमालाने बैंच पुसला आणि वदंनाला बसण्यास सांगितले.

वदंनाची दयनीय अवस्था झाली होती. तिला आता फक्त हुंदका फुटायचा शिल्लक होता. कशी बशी ती बैंचवर बसली. बसता बसता उसने हास्य चेहऱ्यावर घेऊन,”मी वदंना” असे म्हणत जराशी अलघडूनच बसली.

” अगं वेडाबाई असे का अवघडून बसत आहेस बस न सरळ.” असे हसत हसत सुजाता म्हणाली.

” नाही ग ते …!!! माझे कपडे ….!! घाण झालेत ग. ते तिथे मी पडले न ग यामुळे.” असे जरासे अडखळतच वदंना म्हणाली.

” छे गं…!! काही घाण वगैरे नाही झाले तुझे कपडे.”

” अगं ती आत्ताच तर बोलली असे मला.”

” ती होय. ती तशीच आहे तुसडी. बघ तिच्या जवळ कोण तरी बसणार का. रजनी नाव आहे तिचे. आम्ही दोघी एकाच शाळेत होतो. तिला ओळखते मी. खूप घमंडी आणि तुसडी आहे. जाऊ दे तिचा विचार करु नकोस. आज पासून आपण दोघी मैत्रिणी.” असे म्हणत सुजाता ने वदंनाचा हात आपल्या हातात घेतला.

पहिला दिवस असा होईल कॉलेजचा याचा वदंनाने कधीच विचार सुद्धा केला नव्हता. ती जेव्हा घरी परतली तेव्हा तिने जे काही झाले ते सर्व आईबाबांना सांगितले. तशी तिला बालपणापासूनच सवय होती शाळेत जे काही होईल ते सगळे आईबाबांना सांगायचे. 

दुसऱ्या दिवशी वदंना कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली तर खरी पण मनात जरा धडकीच भरली होती. तिच्या मनात चाललेली चलबिचल तिच्या आईने ओळखली.

” अरे असे घाबरून कसे चालेल. जा बेटा आज काही होणार नाही. आणि सुजाता आहेच न ग. जे काही झाले ते विसरून जायचे. तुला शिकायचे आहे न मग असे भित्रूबाई बनून कसे चालेल.ही छत्री घेऊन जा. पाऊस यायची शक्यता आहे.” असे म्हणत आईने तिच्या हातात छत्री दिली.

वदंना कॉलेजला पोहचली. ती आपल्या क्लासमध्ये गेली. सुजाता ने तिचे हसत हसत स्वागत केले. 

” किती सुंदर दिसत आहेस गं तू या ड्रेस मध्ये. तुझे लांबसडक केस वाह.” सुजाता वदंना ला म्हणाली.

बघता बघता दोघींच्या गप्पा रंगल्या. इतक्यात बेल वाजली. क्लास सुरू झाले. वदंना मुळातच हुशार होती. तिला शिक्षणाची आवडही खूप होती. तशीच सुजाता देखील. यामुळे या दोघींची मैत्री खूप घनिष्ट झाली. दोघी मैत्रिणी अगदीच कमी वेळात जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या.यांची मैत्री बघून रजनीचा जळफळाट व्हायचा.

आज एक क्लास आॅफ होता म्हणून या दोघी मैत्रिणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेल्या. तिथे दोघींनी वडापाव मागविला. दोघी वडापाव खात होत्या तोच समोरच्या टेबलावर स्वप्निल आपल्या मित्रांसोबत येऊन बसला.

” ये स्वपन्या ते बघ ती बघ तिलाच तू धडकून पडला होतास ना. यार बघ आज काय साॅलिड दिसते आहे ती.”

” ये विन्या गप बस रे. काहीही बरळू नकोस. आधीच मी खजिल झालो होतो. तिला बिचारीला असे अचानक धडकलो ती पडली बिचारी. काय वाटले असेल तिला. तसं तेव्हा मी सॉरी म्हटलो होतो. पण जाऊ दे आज पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणतो.” असे म्हणत स्वप्निल या दोघी जवळ आला.

” सॉरी मिस त्यादिवशी माझ्या मुळे तुला खूप त्रास झाला. क्लासमध्ये पण रजनी तुला खूप काही बोलली. तिच्या तर्फे मी माफी मागतो. ती माझी धाकटी बहीण आहे.” स्वप्निल म्हणाला.

असे अचानक तो समोर येऊन बोलत होता हे बघून या दोघी एकदमच बावरल्या. 

पण नंतर स्वतः ला सावरत सुजाता म्हणाली,” ओह म्हणजे तू होतास होय तो…!!”

” हो मीच तो.‌नेहमीप्रमाणे मला वेळ झाला होता म्हणून मी पळत पळत जात होतो आणि हे घडले.” 

वदंना काहीच बोलत नव्हती तिच्या हातातील वडापाव एकदमच खाली पडला.

” बंड्या दोन वडापाव आण रे. सोबत तीन कडक चहा.” स्वप्निल ने आॅर्डर दिली.

टेबलावर चहा वडापाव आल्यावर स्वप्निल म्हणाला,” आजपासून आपण तिघे मित्र. ही आपल्या मैत्रीची पार्टी.” 

क्रमशः

©® परवीन कौसर

बेंगलोर

===================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/sharvant-ghan-nila-barsala-part-1/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/sharvant-ghan-nila-barsala-part-3/

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: