Skip to content Skip to sidebar Skip to footer

सरोगसी

रिना आंटींजवळ कामाला येणारी गंगी फार चिंताग्रस्त होती. रिना आंटीने तिला विचारलं,”काय अडचण असेल तर मला सांग.  मी तुला एवढ्या टेंशनमध्ये कधी बघितलं नाही.”

गंगीने आंटीला तिची आर्थिक अडचण सांगितली व म्हणाली,”ताई मला या द्रारिद्रयातून बाहेर पडायचय. माझ्या मुलांना खूप शिकवायचंय. नुसती भांडीकुंडी करुन आजकालच्या पुढच्या शिक्षणाची व कलासांची फी भरणं शक्य नाही.”

रिना आंटी तिला म्हणाली,” गंगा, मी एका थर्ड पार्टी संस्थेची एजंट आहे. या थर्ड पार्टी संस्थेत तुझ्यासारख्या परिस्थितीने गांजलेल्या स्त्रिया नावे नोंदवतात. त्या आपली गर्भाशयं भाड्याने देतात म्हणजे ज्या स्त्रियांना गर्भाशय नसतं किंवा पुर्णतः विकसित झालेलं नसतं किंवा प्रजननसंस्थेशी निगडित इतर काही अडचण असल्याकारणाने ज्यांना बाळाला जन्म देता येत  नसतं अशी जोडपी या संस्थेत नाव नोंदवतात. मग ही संस्था त्यांना गर्भाशय भाड्याने देणास इच्छुक असणाऱ्या स्त्रियांचे रेकॉर्ड्स दाखवते. ह्या इच्छुक महिलांना सरोगेट  मदर म्हणतात.

अशी  सरोगेट मदर होण्यासाठी त्या महिलेचे वय पंचेसाळीसच्या आत असणं आवश्यक असतं.

तिच्या शरीराची इतर आवश्यक रक्त तपासणी, एड्स तपासणी करुन घेतात.

गंगी म्हणाली,” या स्त्रियांना किती पैसे मिळतात

यातून?”

 आंटी तिला म्हणाल्या की बाईचं बिजांड व तिच्या नवऱ्याचे शुक्राणू यांचा प्रयोगशाळेत मिलाप करतात.

दोन तीनदा ट्राय केल्यावर गर्भ तयार होतो.

हा गर्भ सरोगेट मदरच्या गर्भपिशवीत सोडतात. या सरोगेट मदरला बाळ होइपर्यंत या संस्थेची सरोगसी सेंटर असतात, तिथे रहावं लागतं.

या कालावधीत सरोगेट मदरला लागण्याऱ्या सर्व वस्तू,औषधे,जेवण,रहाण्याची व्यवस्था याचा खर्च ज्यांनी तिचं गर्भाशय भाड्याने घेतलेलं असतं ते जोडपं करतं.

पैशाचं म्हंटलस तर तीन ते चार लाख असा सध्या रेट आहे. जर सिझर झालं तर पन्नास हजार रूपये अधिक मिळतात. आपल्या महाराष्ट्रात परदेशातून लोक सरोगेट मदरच्या शोधात येतात कारण इथे इतर देशांच्या मानाने फी फार कमी आहे. तुझं नाव तिथे टाकू का ते विचार करुन सांग.”

गंगी तिला म्हणाली,”आंटी मी चारपाच दिवसात तुम्हाला कळवते.”

मग गंगी घरी आली. सरोगसीचा विचार तिच्या डोक्यात घोळत होता. नवरा परागंदा झाल्याने त्याची अनुमती घेण्याची गरजच नव्हती.

तिने सासूला रात्री हे सगळं समजावून सांगितलं

सासू तिला म्हणाली,”गंगी,तुच आत्ता काय तो निर्णय घे. मी तुझ्या मुलांना तू येईपर्यंत वर्षभर सांभाळीन. मला तर यात काय पाप दिसत नाही.”

गंगीने रिना आंटीला तिचा होकार कळवला.

हिमेश चंदवानी व त्याची बायको तारा गंगीचं रेकॉर्ड बघून आपल्या बाळासाठी गंगीला निवडलं. गंगीची सर्व तपासणी झाली. जवळजवळ महिन्यानंतर गंगीच्या गर्भपिशवीत चंदवानींचा गर्भ सोडला गेला. ती सेंटरमध्ये राहू लागली.

गंगीची मुलं आजीबरोबर घरी. गंगीला तिथे चंदवानी कुटुंब हवं नको ते खायला आणून देत होतं. चंदवानीनी तिच्या मुलांनाही लागेल त्या वस्तू पोहोचत्या केल्या. तिच्या खात्यात हफ्त्या हफ्त्याने पैसे भरले.

गंगीचं पोट हळूहळू वाढू लागलं. तारा चंदवानी गंगीच्या पोटाला हात लावून बाळाची हालचाल अनुभवे.

तिला कोण आनंद होई. इतकी वर्ष तिला समाजाने वांझ म्हणून तुच्छ लेखलेलं होतं. आत्ता तिला हक्काचं बाळ मिळणार म्हणून कोण आनंद झाला होता.

नऊ महिने पुरे होताच गंगीनं एका गोंडस परीला जन्म दिला.

हिमेश व तारा चंदवानी लेकीला डोळे भरुन बघितले.

तारा तर गंगीच्या पाया पडली. पंधरा दिवसांनी गंगी घरी गेली. आत्ता तिला आधीच्या वर्षभरात काय झालं ते बिलकूल आठवायचं नव्हतं.

चंदवानींनी दिलेले तीन लाख रुपये गंगीने मुलांच्या शिक्षणासाठी पोस्टात ठेवले व उरलेल्या एक लाख रूपयात एक गाळा भाड्याने घेऊन माऊली पोळीभाजी सेंटर उभं केलं. तिच्यासारख्या गरजू स्त्रियांना ती रोजगार देऊ लागली. गंगीची सासू मरेपर्यंत गंगीच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली.

या सरोगसीने गंगीच्या  व तिच्या मुलांच्याआयुष्याला नवीन दिशा मिळाली. लालवानी कुटुंबाला गोड गोजिरी छोकरी मिळाली.

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: