Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या लग्नात सात फेरेच का असतात? सप्तपदीचे महत्व काय आहे?

saptapadi in marathi:

ज्या विधीशिवाय लग्न सोहळा पूर्ण होऊच शकत नाही, ज्याला पारंपरिक भारतीय लग्न संस्कृतीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असा कोणता विधी आहे ?? जाणून घेऊया…

लग्न हा एक संस्कार सोहळा आहे. या संस्कार सोहळ्याला आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत खूपच महत्त्व आहे. हा संस्कार सगळे विधी पूर्ण करून, काही नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या आशिर्वादाने, अग्नीच्या साक्षीने पार पाडला जातो. लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन, दोन कुटुंबांचे ऋणानुबंध. लग्न म्हणजे दोन शरीरे पण एक मन होऊन आयुष्यभर एकमेकांना दिलेली प्रेमळ सोबत, एकमेकांच्या, कुटुंबांच्या, सगळ्या भावी जबाबदार्यांची एकत्रितपणाने केलेली कर्तव्यपूर्ती.

लग्न म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी. मग ती जबाबदारी पार पाडताना एकमेकांनी एकमेकांना समजून घेणे, विश्वास ठेवणे, प्रामाणिक राहणे आणि ते नाते पूर्ण आयुष्य एकनिष्ठ राहून कडेला घेऊन जाणे ही त्या दोघांची म्हणजेच नवरा बायकोची जबाबदारी असते. हल्ली हा नात्यांचा ट्रेण्ड आणि पद्धती खूप बदलत आहेत आणि वेगळेच वळण घेत आहेत. असो त्यात आपल्याला पडायचे नाही पण प्राचीन काळापासून आजपर्यंत लग्न या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लग्न म्हटले की घरात पाहुण्यांची ये जा, लहान मुलांचा दंगा, बाजारहाट, कपड्यांची खरेदी, घराची सजावट, मंडप, हॉल अशी एक ना अनेक गोष्टींसाठी धावपळ सुरू असे. लग्नाच्या निमित्ताने सगळा परिवार, शेजारी पाजारी एकत्र येतात, गाठीभेटी होतात, आनंद द्विगुणित करतात म्हणून हा सोहळा सगळी मंडळी एकत्र करूनच साजरा केला जातो.

या लग्नाचे विधी प्रत्येक धर्म, जातीप्रमाणे वेगवेगळे आहेत. पण लग्नाचे सगळे विधी पूर्ण होणे खूप महत्त्वाचे असते. तसे तर लग्नातील सगळेच विधी खूप महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक विधीमागे काही विशेष कारणे असतात. जसे की हळद, अंगठी घालने, मुलीला चुडा भरणे, कुलदेवतेचे दर्शन, नवरा नवरीच्या हातातील हळकुंड बांधण्याची रीत, नवऱ्या मुलाची वरात, देवब्राह्मण, मंगळसूत्र घालने, कन्यादान असे अनेक विधी महत्त्वाचे आहेत.

यातीलच एक अतिशय महत्त्वाचा विधी जो नवरा नवरीने मिळून पूर्ण करायचा असतो, ज्याच्याशिवाय लग्न पूर्ण होऊच शकत नाही, ज्या विधीला अतिशय पवित्र मानले जाते तो म्हणजे सप्तपदी.

भारतीय पारंपरिक लग्न सप्तपदी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हिंदू धर्मात लग्नपद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरीही सप्तपदी मात्र सगळीकडे सारख्याच असतात. सप्तपदी म्हणजे होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदळाच्या सात राशी वरून वराने वधूला चालवायचे असते. नवरीने एका एका राशीवर उजव्या अंगठ्याच्या बोटाने राशीवर ठेवलेली सुपारी एक एक वचन घेऊन बाजूला करायची असते. यात नवऱ्याने नगरीचा हात हातात घ्यायचा असतो. म्हणजेच मी या प्रत्येक वचनात तुझ्या सोबत असेन असा त्याचा अर्थ असतो. नवरा बायको अग्निभोवती सात फेऱ्या मारत सात वचने घेतात आणि सात जन्मासाठी एकमेकांचे बनून राहतात यालाच सप्तपदी असे म्हटले जाते. सप्तपदी म्हणजे मरेपर्यंत एकमेकांची साथ निभावणे.

आपल्या शरीरात सात चक्र आहेत, इंद्रधनुष्याचे रंग सात, ऋषी सात, संगीताचे सूर सात, धातू सात, द्वीप सात, परिक्रमा सात त्यामुळेच लग्नात घेतली जाणारी वचने पण सातच.

या सात वचनांचा अर्थ म्हणजे पती पत्नीने आयुष्यभर एकमेकांची साथ देणे असा आहे. अग्निला साक्षी ठेवून भटजींच्या मंत्रगजरात ध्रुव ताऱ्याला साक्षी ठेवून ही वचन घेतली जातात. आकाशात जसे ध्रुव ताऱ्याचे स्थान अढळ आहे तसेच पती पत्नीचे एकमेकांच्या आयुष्यात ते स्थान अढळ राहो हा त्यामागील उद्देश असतो.

आपल्याला ज्ञान देणाऱ्या, जगण्याची नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या गुरूंना मानवंदना देणाऱ्या या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया …..

जाणून घ्या साई बाबा नेहमी पांढरेच कपडे का घालत?

पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा

यात पती पत्नीला नेहमी सुखी ठेवण्याचे वचन देतो. या वचनात पती पत्नी दोघेही आपल्या आयुष्यात धन तसेच अन्नधान्याची कमतरता भासू नये याची प्रार्थना देवाकडे करतात. दोघांच्याही कल्याणाचे मागणं देवाकडे पती पत्नी मागतात. तर पत्नी येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन पतीला देते. एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी एकत्रितपने पुढे चालू असे वचन पती पत्नी घेतात. तसेच एकमेकांवर एकनिष्ठ राहून अनंत प्रेम करत राहू असे वचन देतात.

कोणत्याही नात्यात विश्वास हाच पाया असतो. एकदा का विश्वास संपला किंवा गमावला तर नातं संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे पती पत्नी एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांवर विश्वास ठेवून आणि तो टिकवून पुढे चालण्याचे वचन घेतात. तसेच मानसिक, शारीरिक आणि भावनिक पातळीवर एकता ठेवण्याचे, दोन शरीरे असून एकच मन असल्याप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात मदत करण्याचे, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक चढ उतारात एकमेकांची सुरक्षा करण्याचे आणि साथ देण्याचे , सगळे काही एकत्रितपणे सहन करण्याचे वचन दोघेही एकमेकांस देतात.

एकमेकांची बाजू ऐकून घेण्याचे, समजून घेण्याचे, एकमेकांच्या मतांचा आदर करण्याचे, तुझ माझे न करता आपलं म्हणायचे वचन यात देतात. तसेच धन आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. अध्यात्मिक सेवा म्हणजे कुटुंबातील परंपरेने चालत आलेले कुलधर्म, कुलाचार पूर्ण करण्यासाठी सक्षम रहावे यासाठी प्रार्थना करतात. होणाऱ्या संततीचे आई बाबा होऊन योग्य काळजी, पालन पोषण, शिक्षण आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता देवाकडे मागितली जाते. आयुष्याभर एकमेकाप्रती प्रमाणिक राहण्याची प्रार्थना केली जाते.

यात एकत्र कुटुंबपद्धती टिकवून ठेवणे, मोठ्यांचा मान,आदर ठेवणे हा मुख्य हेतू आहे. त्यामुळे कुटुंबातील मूल्ये राखून ठेवण्यासाठी आणि कुटुंबातील एकता कायम राखण्यासाठी देवाकडून आशिर्वाद मागते नविविवाहित जोडपे. तर पत्नी कोणत्याही परिस्थितीत सतत कायमस्वरूपी प्रेम करण्याचे वचन देते.

सुखी संसाराची जी काही स्वप्ने दोघेही पहिली आहेत ती एकत्रितपनाने पूर्ण करण्याचे आणि त्यासाठी लागणारी मेहनत आणि मदत दोघांनी मिळून करण्याचे वचन पाचव्या पदात पती पत्नी घेतात. तसेच भावी संततीसाठी आशिर्वाद मागितला जातो. आपल्या पोटी छान, निरोगी आणि दीर्घायुषी महान मुल जन्मास येऊदे. त्याने कुटुंबाचे नाव मोठे करावे तसेच कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी यासाठी आशिर्वाद मागितला जातो. तसेच होणाऱ्या मुलाचे उत्तम आई बाबा होण्याचे वचन पती पत्नी एकमेकांना देतात. तसेच मुलाचे योग्य पालन पोषण करून मुलाला मोठे करण्याचं वचन पती पत्नी घेतात. मी नेहमी पत्नीला मित्राचा दर्जा देईन असे वचन पती पत्नीला देतो तर पत्नी नाते प्रेमाने बांधून ठेवण्याचे वचन पतीला देते.

असे म्हणतात की खऱ्या नात्याची कसोटी तेंव्हाच लागते जी नाती दुःखात सोबत असतात. त्यामुळे सुखात तुझ्या पाठीशी पण दुःखात कायम तुझ्या सोबत असेन असे वचन पती पत्नी घेतात. या शिवाय कुटुंब आणि मुलांप्रती असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या नीट पुर्ण करण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना केली जाते. प्रमाणिक आणि चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. या वचनात पती पत्नी एक संतुलित आणि आनंदमयी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करतात.

हे सातवे वचन लग्नाचे पवित्र गठबंधन अधिक मजबूत बनवते. या वचनात प्रेम, विश्वास, सहयोग देण्याचे वचन पती पत्नी एकमेकांना देतात. दोघेही एकमेकांसोबत कायम मित्राप्रमाणे राहतील, एकमेकांपासून काहीही लपवणार नाही, एकमेकांसोबत न डगमगता साथ देतील, नेहमी एकमेकांशी खरेच बोलतील अशी वचने देतात. नात्यातील प्रेम आणि गोडवा कायम टिकून रहावा अशी प्रार्थना करतात.

तर अशी ही महत्त्वपूर्ण सात वचने घेऊन सुखी संसाराची सुरुवात पती पत्नी करतात. दोन्ही पती पत्नीने एकमेकांची प्रामाणिकपणे , एकनिष्ठ राहून, विश्वास, प्रेम, समंजसपणा ठेवून संसार सुखात कडेला न्यावा हाच यामागील स्वच्छ हेतू आहे. सगळ्यांनी याचे महत्त्व समजून घेऊन, घेतलेल्या वचानांना जागून नाते निभावयाला हवे. सगळ्यांनीच या वचनांची जाण ठेवली तर घटस्फोट होणारच नाहीत आणि संसार सुरळीत चालू राहतील.

==========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.