Skip to content Skip to sidebar Skip to footer

संत सावता माळी माहिती

Sant Savta Mali Information in Marathi

संत सावता माळी :

आपल्या महाराष्ट्राचा लौकिक पूर्ण देशभर पसरलेला आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. आपल्या महाराष्ट्राला विविध संस्कृतीचा तसेच खाद्य पदार्थांच्या वारसा लाभलेला आहे. शिवाय अनेक शूरवीर राजे महाराष्ट्रात होऊन गेले, आपल्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा, परंपरा या सगळ्यांमुळे आपला महाराष्ट्र एक वेगळीच ओळख टिकवून आहे. या बरोबरच आपल्या महाराष्ट्राला अजून एक गोष्ट लाभली आणि ती म्हणजे संतांची शिकवण. आपल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी ही भूमी पावन केली आहे.सामान्य जनतेला परमार्थ मार्ग दाखवला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव असे बरेच संत महाराष्ट्रात होऊन गेले. ज्यांनी आपल्याला सुखी आणि समाधानी जीवनाचा मार्ग अतिशय सोप्या भाषेत सांगितला.

आज अशाच एका संताबद्दल जाणून घेऊया ज्यांचे नाव संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या बरोबरीने घेतले जाते, ज्यांनी संसार आणि परमार्थ वेगळे न करता संसारच परमार्थमय केला, खडतर आयुष्याचा प्रवास विठ्ठलाचे नाव घेत अतिशय समाधानाने जगणारे, आयुष्याला ईश्वरसेवा मानून जगणारे विठ्ठलाचे परमभक्त संत सावता माळी यांच्याबद्दल.

नाव : सावतोबा.
जन्म : ई. स. १२५०.
ठिकाण : अरण गाव, तालुका : माढा, जिल्हा : सोलापूर.
वडील : पूरसोबा माळी.
आई : नंगिताबाई माळी.
पत्नी : जनाबाई माळी.
व्यवसाय : शेती.
मृत्यू : ई. स. १२९५.

संत सावता माळी यांचा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावात जन्म झाला. त्यांचे वडील पुरसोबा माळी हे शेती करत असत. शिवाय ते वारकरी होते. पांडुरंगाची भक्ती करण्यात ते मग्न असत. दिवसभर शेतात काम करून रात्री भजन कीर्तन करण्यात ते रमत असत. पूर तोबा माळी पंढरीची वारी करत असत. त्यांची आई नांगिताबाई या पण विठ्ठलाच्या भक्त होत्या.दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे सावता महाराजांच्या घरात लहानपणपासूनच भक्तीचे वारे वाहत होते. आणि त्यांनाही पांडुरंगाची अवीट गोडी लागली होती. वडिलांचा व्यवसाय पुढे चालवत त्यांनीही शेती केली. खरतर सावता माळी यांचे मूळ घराणे सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानातील औसे. पण सावता माळी यांचे आजोबा, देवु माळी हे अरण गावात स्थाईक झाले आणि पुढे इथेच राहिले.

अत्यंत साध्या पद्धतीने कृपादृष्टी दाखवणारे आणि प्रसन्न होणारे हे करोडो लोकांचे श्रद्धा स्थान…. बघुया कशी करावी नित्यसेवा

भगवान विष्णूचा अवतार असलेल्या या देवाच्या मंदिरात दान करण्याला का आहे इतके महत्त्व …. जाणून घ्या या मागे दडलेली रंजक कथा

सावता माळी यांनी कधीच पंढरीची वारी केली नाही. ते म्हणत देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी जप तप करण्याची, लांब जाऊन तीर्थयात्रा करण्याची किंवा संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, संसार करत ईश्वर मिळवता येतो, त्यासाठी फक्त मनापासून देवाचे चिंतन करा आणि सोबतीला श्रद्धा असेल तर ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असे ते म्हणत असत. त्यामुळे नेहमीच त्यांनी जप करण्यावर म्हणजेच मनात चिंतन करण्यावर जास्त भर दिला. म्हणूनच त्यांच्या बागेत त्यांनी ईश्वर पहिला. इतकेच काय तर पंढरीची वारी करून पांडुरंगाला भेटायला ते गेले नसले तरी स्वतः पांडुरंग त्यांना भेटायला त्यांच्या घरी येत असे, असे म्हणतात.

संत सावता माळी नेहमी कर्म करत राहिले. आणि सामान्य लोकांनाही तीच शिकवण त्यांनी दिली. देव सदा सर्वकाळ तुमच्या सानिध्यात वसतो म्हणजेच रहातो हे तत्व सामान्यांच्या मनावर त्यांनी बिंबवले. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांचा संबंध उत्तम प्रकारे त्यांनी जोडला.

संत सावता माळी पांडुरंगाचे इतके परम भक्त होते की पांडुरंग त्यांच्या हृदयात वास करत असत. एकदा श्री पांडुरंग संत सावता माळी यांच्या हृदयात वास करत होते आणि त्यांना ह्रदयात लपविण्यासाठी सावता माळी यांनी चक्क खुरप्याने छाती फाडली आणि बाळ रुपात असलेल्या पांडुरंगाला हृदयात ठेवून वरून उपरण बांधून भजन केले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव पांडुरंगाला शोधत शोधत सावता माळी यांच्याकडे आले तेंव्हा दोघांनी केलेल्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावता माळी यांच्या हृदयातून बाहेर आले. इतकी सावता माळी यांची भक्ती अगाध होती.

भेंड गावच्या भानावसे रुपमळी यांच्या घराण्यातील जनाबाई यांच्याशी संत सावता माळी यांनी लग्न केले. संत सावता माळी यांची विठ्ठल भक्ती पाहून त्याही विठ्ठलाची आराधना करू लागल्या . संसारात राहूनही विरक्त असणाऱ्या सावता माळी यांच्याकडे पाहून जनाबाईना त्यांच्यात सत्पुरुष दिसत असे. संत सावता माळी यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये झाली. आपला प्रपंच हा विठ्ठलाचाच आहे असे समजून त्यांनी संसार केला. दिवसभर शेती आणि रात्री भजन कीर्तन करत असत. भक्तिताच खरे सुख, आनंद आणि विश्रांती आहे असे सावता माळी म्हणत.

अशा प्रकारे संत सावता माळी यांनी पांडुरंगाचे नाव घेऊन आयुष्य जगले, आयुष्य ईश्वरसेवा समजून व्यतीत केले आणि समाधानाने जगण्याचा मंत्र सामान्य लोकांना दिला.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: