Skip to content Skip to sidebar Skip to footer

संपत्ती 

रघु ला पुण्यात येऊन आता सहा महिने झाले. तो ,आई वडील आणि लहान भाऊ परिस्थिती जेमतेम भाऊ थोडा मंद वडील फारच साधे एक छोटे दुकान वाण सामानाचे, काय भागणार? तरीही रघु नेटाने शिकून बीकॉम झाला पुण्यातल्या एका ओळखीतून त्याला कुलकर्णी गृप मध्ये नोकरी लागली तो शॉप वर काम करू लागला मुळातच मेहनती आणि काम करण्याची हातोटी चांगली, जॉब नीट झाला की नाही त्याचे dimensions नीट आहेत की नाही हे सगळे तो बारकाईने बघू लागला आणि समजून घेऊन काम करु लागला खरेतर त्याला हे सगळे नवीन होते कधीच असे पार्टस वगेरे पाहिले नव्हते पण शिकण्याची तयारी असल्यामुळे त्याला काही वेळ लागला नाही हे सर्व शिकून घ्यायला. 

साहेबांचे सगळ्यांकडे लक्ष असे त्यांच्या लक्षात आले हा मुलगा मेहनती आहे स्वतःचे स्वतः काहीतरी करू शकतो एक दिवस त्यांनी रघु ला बोलावले आणि विचारले तुला एक मशीन घेऊन देतो तुझा व्यवसाय तू कर सुरवातीला मी मदत करेनच पुढे तो तू वाढायचा एक माणूस तुझ्याबरोबर देतो रघु ने होकार दिला आणि त्याची छोटी कंपनी सुरू झाली त्याला मिळाला तो गण्या त्याला टूल्स बद्दल सगळी माहिती होती एकमेकांचे पक्के दोस्त झाले रघु ने व्यवसाय आणायचा आणि दोघांनी मिळून तो पूर्ण करायचा असे सुरू झाले आता कामे भरपूर मिळू लागली.

पैसा चांगला मिळू लागला कुलकर्णी यांनी त्यांची एकुलती एक मुलगी रघु ला देऊ केली आणि मानसी रघु ची बायको झाली .

या सगळ्यात कोकणातल्या आई वडिलांकडे किंवा भावा कडे राघूने कधीच दुर्लक्ष केले नाही त्यांची सुद्धा परिस्थिती उत्तम झाली त्याचे ही लग्न होऊन संसार सुरू झाला एकूण काय राघूच्या एकट्याच्या मेहनतीने सगळे छान झाले .

मानसीला जुळी मुले झाली ती पूर्णवेळ घरी आणि कंपनीत राघव असा दिनक्रम सुरू झाला 

आता पसारा खुप वाढला होता बघता बघता मुले तीन वर्षांची झाली आणि पुन्हा मानसीला दिवस गेले खरेतर तिला हे मूल नको होते खुप प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही आणि पुन्हा मुलगा झाला

सगळे चांगले चालू असताना अचानक एक दिवस राघव ला जबरदस्त हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची ज्योत मालवली .

दुःखाचा डोंगर कोसळला मानसी पूर्ण वेळ गृहिणी असल्यामुळे तिने कंपनीत कधीच लक्ष घातले नव्हते त्यामुळे कशाचीच कल्पना नव्हती पण ती डगमगली नाही गण्या हा फार चांगला माणूस होता त्याने मानसी ला सर्व शिकवण्याचे ठरवले आणि मुलांना गण्याच्या बायकोने सांभाळायचे ठरवले मानसीने त्या दोघांना

घरीच राहायला बोलावले आणि एका नवीन प्रवासाला सुरवात झाली.

मानसीने खुप कष्ट केले मुलांना चांगले शिक्षण दिले तीनही मुलांची तिला अजिबात काळजी नव्हती गण्याच्या बायकोने राधाने ती खुप छान पार पडली होती 

मानसीला उद्योजिका म्हणून खुप पुरस्कार मिळाले आणि तिने एक वेगळीच उंची गाठली.

जुळी असणारे सुरेश आणि रमेश यांचे खुप पटायचे ते दोघेही ऑफिस मध्ये लक्ष घालू लागले धाकटा राघव शांत आणि संयमी होता हळू हळू सगळे शिकून घेत होता जुळ्यांचे सख्या दोघी बहिणींशी म्हणजे मीरा आणि हिरा यांच्याशी लग्न झाले राघव चे आणि रमा चे लव्ह म्यारेज सगळ्यांचे संसार सुरू झाले आणि मानसीने कंपनीतून अंग काढून झाले.

सगळे उत्तम चालू असताना मानसी आजारी पडली आणि तिने तिघांना बोलवून सांगितले माझी स्वतःची सगळी संपत्ती दान करून टाका. 

सगळ्यांचे धाबे दणाणले करण रघु नंतर ती एकमेव मालकीण होती इतक्या मोठ्या कंपनीची अजून वाटण्या व्हायच्या होत्या ,

झाले घरात धुसफूस चालू झाली मीरा आणि हिरा मुद्दाम मानसीच्या अवतीभवती करू लागल्या.

रमा ने हे सगळे आधीच ओळखले या का सारख्या सासूबाई च्या मागेपुढे करताहेत ते, ती तिचे काम करत होती खरेतर मानसीचे सर्वकाही रमाच करायची पण संपत्ती चे कळल्यावर 

रमेश आणि सुरेश सुद्धा थोडे वैतागून गेले होते पण मानसीच्या कडक स्वभावामुळे कोणीही तिला प्रश्न विचारू शकत नव्हते .

आई गेल्यावर काय असा प्रश्न दोघांना पडला होता त्यांनी राघव ला बोलावले आणि विचारले आता तू पुढे काय करणार त्याने उत्तर दिले आईने तर आपल्याला इतके शिक्षण देऊन समृद्ध केले आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा बाकी काय तिने स्वतः आणि बाबांनी मिळून कष्ठाने इतके साम्राज्य उभे केले आहे ते त्यांनी कोणाला द्यायचे हा त्यांचा व्ययक्तिक प्रश्न आहे 

ती संपत्ती मिळवण्याचा आपला काय अधिकार पोचतो? 

 तू श्रावणबाळ असशील आम्ही नाही म्हणून त्याला ते खुप खुप बोलले 

दुसरे दिवशी पासून दोघांनी सगळी कागदपत्रे शोधण्यास सुरवात केली गण्याकाकाला विचारले त्याने पण हात वर केले माहीत नाही म्हणून.

हे सगळे मानसी अनुभवत होती तिला घारातली धुसफूस दिसत नव्हती असे नाही पण ती शांत होती ,

इतकी प्रेमळ मुले, एकत्र कुटुंबात राहून सगळ्यांना संभाळून घेणारी आता कशी वागताहेत याचेच तिला खुप वाईट वाटत होते. “संपत्तीचे दान” या दोन शब्दांनी घराची उलथापालथ होताना दिसत होती.

दोघांनी जंग जंग पछाडले घरच्या वकिलांना विचारले काहीच कल्पना येईना दिवस दिवस अस्वस्थतेत जाऊ लागला, त्यामुळे दोघांनी मिळून आईशी बोलायचे ठरवले आणि रात्री जेवण झाल्यावर विषय काढला विषय वाढता वाढता वाद वाढत गेला राघव मधेच समजूत काढायला गेला तर त्याला खुप बोल लावले हा सगळा ताण असह्य होऊन मानसीची त्याच दिवशी प्राणज्योत मालवली .

ही दुःखद बातमी सगळ्यांना कळाली आणि वकील साहेब आले लगेचच. वकिलांना लगेच सांगण्याची जबाबदारी मानसीने रमाला आधीच देऊन ठेवली होती .

वकील साहेब म्हणाले मला बाई गेल्या की लगेच तासाच्या आत विल वाचायला सांगितले आहे तरी सगळ्यांनी पट्कन या आणि हो गण्याकाका पण उपस्थित असणे आवश्यक आहे तो होताच तिथे 

विल उघडले त्यात सर्व संपत्ती व्यवस्थित चौघांच्यात वाटून दिली होती सुरेश,रमेश,राघव आणि गण्या

कोणी कोणाशी भांडावे असे काहीच नव्हते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला .काही वाटा राघव च्या कोकणातल्या भावाला सुद्धा ठेवला होता इतका विचार विल करताना मानसीने केला होता .

पुढे ते वाचू लागले माझी संपत्ती म्हणजे माझा देह ही इतकीच माझी स्वतः ची आहे जी मी माझ्या मनाने काहीही करू शकते म्हणून माझे नेत्रदान, अवयव दान माझी त्वचा सुद्धा दान करावी आणि देहदान तर करावेच करावे 

मानसी किती मोठ्या मनाची होती हे सर्वांना आज कळले .वकिलांनी येतानाच हॉस्पिटलमध्ये कळवले होते त्यामुळे काहीच अडचण आली नाही.

आपण किती टोकाचा विचार करून आईशी भांडलो याचे दोघांना फार वाईट वाटत होते पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता.🥲

– सौ विशाखा कित्तुर

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: