Skip to content Skip to sidebar Skip to footer

सब्जा आहारात घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर

sabja seeds benefits : मित्रांनो ऋतू बदलतात, त्यामुळे वातावरणात बदल होतात आणि पर्यायाने त्याचे परिणाम शरीरावर ही दिसून येतात. हिवाळा सुरू होताच वातावरणात गारवा निर्माण होतो आणि उष्ण म्हणजेच शरीराला गरम वाटतील असे पेय किंवा आहार आपण घेतो. याच उलट उन्हाळ्यात परिस्थिती असते. हिवाळ्यात हवे हवे वाटणारे ऊन उन्हाळ्यात असह्य होऊन जाते. वातावरणातील दाहकता आपल्यालाच काय तर मुक्या प्राण्यांना सुधा असह्य होऊन जाते अशा वेळी. त्यात वातावरण अती उष्ण झाल्याने उष्माघाताचा त्रास, उन्हाळी लागणे, अंगावर पित्त उठणे, कमी भूक, निद्रानाश, नाकातून तसेच कानातून रक्त येणे, डोळ्यांची जळजळ, मूळव्याध असे एक ना अनेक आजारांना निमंत्रण मिळते. यापासून बचाव करण्यासाठी मग आपण सरबत घे किंवा मग लिंबू पाणी घेणे, उन्हापासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी स्कार्फ बांधणे किंवा मॉइश्चरायर लावणे, नेहमी एसी चालू करून बसणे असे अनेक उपाय करतो. पण या उपायांनी शरीराच्या आतून थंडावा निर्माण होत नाही.

उष्णतेची दाह आणि त्यात होणारे आजार यामुळे नको नकोसे होऊन जाते सगळे. कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो याची वाट बघतो आपण. पण प्रत्येक ऋतू मानानुसार काहीना काही शारीरिक त्रास सुरू असतातच असतात. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या आहारा विहारात त्या त्या ऋतूनुसार योग्य ते बदल करून ऋतू सुसह्य करून घेणे.

================

खूप प्रयत्न करूनही सकाळी लवकर उठणं होत नाही? मग हे उपाय नक्की करून पहा

उन्हाळ्यात उष्णतेपासून राहत मिळण्यासाठी कोणती शीतपिये प्यावी

उन्हाळ्यात उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी आहार कसा असावा

त्याच साठी आपण बघणार आहोत उन्हाळ्यात घराच्या घरी उपलब्ध असणारे सबझा पाणी पिण्याचे काही आरोग्यदायी फायदे.

आता सबझा काय आहे असा प्रश्न कित्येकांच्या मनात आलाच असेल. तर सबझाचे बी हे काळसर रंगाचे असून तुळशीच्या बी पेक्षा थोडे मोठ्या आकाराचे असते. हे सबझा बी पाण्यात भिजल्यावर फुगून पांढऱ्या रंगाचे होते. भिजवल्यामुळे या बियांतून पोषक अँटी ऑक्सीडेन्ट आणि पाचक गुणधर्म बाहेर पडतात. यामुळे ते पाण्यात भिजवून खणेच योग्य असते. हे बी गोडसर असून भिजल्यावर बुळबुळीत लागते. या बियामुळे उष्णता कमी होते शिवाय आतून थंडावा मिळतो.

सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिफ अॅसिड तसेच अनेक पोषक घटक असतात. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे उन्हाळ्यात सब्जाचे पाणी आर्वजून प्यावे. फक्त ते पिताना ते अति प्रमाणाबाहेरही पिऊ नये.

सब्जाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत अनेक फायदे देतो. ते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जातात. मल्टीविटामिन्स व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. सब्जा बी मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि ताणतणाव यासारख्या समस्या दूर करण्यास देखील मदत करतात. सबझा बी आहारातून घेण्यापेक्षा ते पिण्यातून घेतले तर जास्तच फायदेशीर ठरते. पण ते कसे आणि कोणत्या वेळी घ्यावे ते बघुया.

रात्री एक ग्लास पाण्यात 1 ते 3 चमचे सब्जा भिजवा. दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. हे पाणी प्या आणि बिया चघळा. बिया चघळून खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपण दुपारी देखील सब्जाचे सेवन करू शकतो. उन्हाळ्याच्या हंगामात सब्जाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे.

१. उष्णतेचे विकार दूर होतात.

२.लघवीस त्रास होत असल्यास समस्या दूर होते.

३. मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग (युरिन इन्फेक्शनचा) तसेच उन्हाळीचा त्रास दूर होतो.

४. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

५. वजन नियंत्रणात राहते.

६. शरीरातील पाण्याची पातळी भरुन निघते.

७. शरीराला थंडावा मिळतो.

८. पोटात जळजळ होत असल्यास आराम मिळतो.

९. पित्ताचा त्रास कमी होतो.

१०. उन्हातून घरी आल्यानंतर सब्जाचे पाणी प्यावे यामुळे उन्हाचा दाह कमी होईल.

११. अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून रक्त येत असेल तर सब्जाचे पाणी प्यावे.

१२. पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी सब्जा गुणकारी ठरतो.

१३. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच शरीरातील टॉक्सिन दूर होतात.

थोडक्यात उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी प्यायलेले चांगले असते. सब्जा शक्यतो साध्या पाण्यात मिसळावा. सब्जाचे पाणी फ्रिजमध्ये ठेवून ते पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. सब्जा हा मुळात थंड असल्याने त्याचे पाणी पिणे शरीरास आरोग्यदायी ठरेल.

===============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

1 Comment

  • Hello World! https://apel.top/go/gu4winrshe5dgoju?hs=f717f96953a96fdb4a6cc875106d88a8&
    Posted Mar 6, 2023 at 10:06 am

    nb4apd

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.