ऋषिपंचमीची कहाणी

rishi panchami vrat katha: युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, “हे श्रीकृष्णा! सर्व पातकांचा, जाणते अजाणतेपणी स्त्री-पुरुषाच्या हातून घडणाऱ्या दोषांचा नाश करणारे असे एखादे श्रेष्ठ व्रत आहे का? असेल तर ते मला सांगावे.” श्रीकष्ण म्हणाला, घरात स्त्रीकडून शिवाशिव झाली तर तो दोष ब्रह्महत्येसमान ठरतो व त्याचे फळ त्या स्त्रीला व तिच्या पतीलाही केवळ याच जन्मी नव्हे तर पुढील जन्मातही भोगावे लागते. म्हणून दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी ऋषिपंचमीचे व्रत करावे. म्हणजे सर्व पापदोषांचा नाश होतो.
यासंबंधी एक प्राचीन कथा आहे. ती मी तुला सांगतो ती ऐक. “पर्वी विदर्भ देशात सुमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव होते जयश्री. एकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली. तिच्या हातून हा मोठाच दोष घडला. काही काळानंतर त्या सुमित्र ब्राह्मणाला व जयश्रीला मृत्यू आला. जयश्रीला तिच्या पूर्वजन्मातील दोषामुळे कुत्रीचा जन्म मिळाला व सुमित्र ब्राह्मणाला बैलाचा जन्म प्राप्त झाला. त्या जन्मात ते दोघेही त्यांच्या पूर्वीच्या जन्मातील त्यांच्या पुत्राच्या घरी राहत होते.
******
एकदा त्या पुत्राच्या घरी श्राद्धकर्म होते म्हणून त्याच्या पत्नीने श्राद्धाचा सगळा स्वयंपाक केला. खीर केली. श्राद्धासाठी ब्राह्मणांना भोजनाला निमंत्रण दिले होते. त्या वेळी एक विचित्र घटना घडली. “खिरीचे भांडे उघडे होते. त्यात एका विषारी सापाने तोंड घातले. त्या खिरीत सापाचे विष पडले. दारात असलेल्या कुत्रीने ते पाहिले. तिने विचार केला, ही विषारी खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर आपल्या मुलाला व सुनेला ब्रह्महत्येचे पाप लागेल म्हणून त्या कुत्रीने स्वयंपाकघरात शिरून त्या खिरीच्या पातेल्याला स्पर्श केला. ब्राह्मणाच्या पत्नीने ते पाहिले.
हेही वाचा
पितृपक्ष कहाणी: पितृपक्षात हे केलं कि पुढची ७ पिढी पित्र ऋण मुक्त होईल.
गिरनारची पौराणिक कथा : जाणून घ्या गिरनार परिक्रमा का पुण्यदायी आहे?
तिला त्या कुत्रीचा अतिशय राग आला. तिने चुलीतील पेटते लाकूड घेऊन त्या कुत्रीला झोडपले. नंतर तिने ब्राह्मणांसाठी दुसरी ताजी खीर तयार केली. त्या दिवशी त्या कुत्रीला काहीही खायला मिळाले नाही. रात्री ती कुत्री रडत रडत आपल्या पतीकडे म्हणजे त्या बैलाकडे गेली. तिने त्याला घडलेली सगळी हकीकत रडत रडत सांगितली. त्या वेळी तिचा पती म्हणजे तो बैल तिला म्हणाला, ‘तू गेल्या जन्मी तुला शिवायचे नसताना श्राद्धाचा स्वयंपाक केलास. सगळीकडे शिवाशिव केलीस. त्या दोषामुळे तुला हा कुत्रीचा जन्म मिळाला. तू माझी पत्नी असल्यामुळे मलाही दोष लागला. त्यामळे मला हा बैलाचा जन्म प्राप्त झाला.
=================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.