रिंकू राजगुरू विषयी माहिती | Rinku Rajguru information in marathi

Rinku Rajguru information in marathi : लॉकडाऊन संपले आणि पुन्हा चित्रपट सृष्टी आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नाटक,सिनेमा, वेब सिरीज सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्ववत सुरू होत आहेत आणि प्रेक्षक परत सुखावला आहे. काही महिन्या पासून चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कथा, पार्श्वभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि त्यातील कलाकार या सगळ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मग अमिताभ बच्चन सारखे महानायक जर एखाद्या चित्रपटात झळकणार असतील तर तो चित्रपट आणि त्याच्याशी निगडित चर्चा कशी मागे राहील ??
येत्या ३ मार्चला अमिताभ बच्चन यांचा “झुंड” सिनेमा प्रदर्शित होत आहे आणि यातील कलाकार आहेत सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. हो हे खरं आहे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे चक्क बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत झळकणार आहेत. चला तर मग सैराट, झुंड सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडणाऱ्या रिंकू राजगुरू बद्दल थोडंसं जाणून घेऊ या. (Rinku Rajguru information in marathi)
१. रिंकू राजगुरू बद्दल माहिती | Rinku Rajguru information in marathi
२. सैराट मधील रिंकू राजगुरू चे अभिनय कौशल्य
खूप कमी जणांना रिंकू राजगुरू हीचे नाव प्रेरणा महादेव राजगुरू आहे हे माहीत असेल. रिंकू हे तिचे टोपण नाव आहे. रिंकुला खरी ओळख मिळवून दिली ती अर्ची म्हणजेच सैराट या चित्रपटातील अर्चना पाटील या पात्राने. साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेली श्रीमंत पण धाडसी आणि निश्र्चयी आर्ची ही धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने रंगवल्या मुळे तसेच त्यातील डायलॉग ज्या पद्धतीने तिने बोलून दाखवले ती स्टाइल तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्यामुळे तिचे प्रचंड कौतुक झाले, प्रेक्षकांनी हे पात्र अक्षरशः डोक्यावर घेतले. कॅमेराची ओळख नसताना, कामाचा कसलाही अनुभव नसताना किंवा कोणतेच चित्रपट संबंधित पार्श्वभूमी नसताना इतका सहज सुंदर नैसर्गिक अभिनय यामुळे रातोरात रिंकू राजगुरू स्टार झाली.
तिचा अभिनय पाहून जन्मतःच तिला अभिनय देणगी असल्याचे दिसून येते. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका प्रेम कथेवर आधारीत होता. श्रीमंत घरातील मुलगी शाळेतील एका गरीब मुलाच्या प्रेमात पडते, त्या दोघांनाही आपले नाते पुढे न्यायचे असते पण घरच्यांच्या विरोधाला सामोरे जात दोघेही पळून जातात लग्न करतात त्यांना एक मुलगा होतो पण त्यांचे सुख त्यांच्या घरच्यांना बघवत नाही आणि शेवटी त्या दोघांचा अमानुषपणे खून करण्यात येतो. अशा कथानकाचा हा चित्रपट समाजातील गंभीर वास्तव दाखवून देतो. या चित्रपटातील सगळेच गाणे, अजय अतुल सारख्या सुपरहिट जोडीचे लाभलेले संगीत आणि आवाज ,नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि अर्चि परशा यांचा सहज सुंदर अभिनय यामुळे या हा चित्रपट सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला शिवाय या चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला तर रिंकू राजगुरू हिला उत्कृष्ठ अभिनेत्री राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.
३. रिंकू राजगुरूची कारकीर्द
सैराट मधील तिचा अभिनय सर्वांना इतका आवडला की तिचे काम पाहून कन्नड दिग्दर्शक श्री. एस. नारायण इतके प्रभावित झाले की त्यांनी सैराटचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी खूप अभिनेत्रींची ऑडिशन घेतली पण रिंकू सारखा सहज सुंदर अभिनय कोणालाही जमला नाही. त्यांनी शेवटी रींकुला घेऊनच हा चित्रपट करण्याचे ठरवले आणि तिला यात काम करण्याची विनंती केली. रिंकूने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि यात काम केले. यात रिंकू सोबत निशांत या तेलुगू अभिनेत्याने काम केले आहे. या चित्रपटाचे नाव होते मनसू मल्लिगे आणि हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता.
नंतर २०१९ मध्ये मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा रिंकुचा चित्रपट प्रदर्शित झाला. गावाकडची राजकीय क्षेत्रातील कथा सांगणारा हा चित्रपट होता. यात ती एका मुलाच्या प्रेमात पडते पण काही कारणाने तिला राजकारणात यावे लागते आणि निवडणूक जिंकते सुद्धा. अशा धाटणीचा हा चित्रपट होता.
२०२० मध्ये आलेला “मेकअप” हा रींकुचा पुढचा चित्रपट होता. याचे दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केले होते. यात रिंकू राजगुरूने अगदी बिनधास्त मुलीची भूमिका केली होती. जी स्वच्छंदी असते स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असते तिच्या आयुष्यात एक तिच्या विरुद्ध स्वभावाचा मुलगा येतो आणि तिचे आयुष्या बदलून टाकतो. अशा कथानकाचा हा चित्रपट आहे.
२०२१ मध्ये २०० “हल्ला बोल” हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट तिने केला. यात मुंबईतील एक गँगस्टर मुलींवर अत्याचार करत असतो. त्याने आता पर्यंत तब्बल २०० मुलींवर अत्याचार केलेले असतात. त्यातील एक मुलगी त्याच्या विरोधात आवाज उठवते आणि ती असते रिंकू राजगुरू. पुढे कशा प्रकारे ती लढा देते हे सांगणारा हा चित्रपट आहे.
२०२१ मध्येच रिंकू राजगुरू हीचा अजून एक चित्रपट आला तो म्हणजे “अनकही काहानिया”. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यात एकूण तीन गोष्टी किंवा वेगळ्या वेगळ्या कथा मांडल्या आहेत. त्यातील एका कथेत रिंकू राजगुरू हिने मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या, तिच्या आईच्या आणि भावाच्या त्रासाला कंटाळून गेलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी ती सिनेमा पाहायला जात असते तिथे एक मुलगा तिला आवडतो. दोन एकटे आयुष्याला वैतागलेले लोक प्रेमात पडतात. पुढे काय होते, ते एकत्र येतात का ? हे सांगणारा हा चित्रपट आहे.
इंद्रधनुष्यचे सात रंग असतात. पण आठवा रंग असतो प्रेमाचा. प्रेम ही वैश्विक भाषा आहे जी सर्वांना समजते. यावर आधारित “आठवा रंग प्रेमाचा” हा खुशबू सिन्हा दिग्दर्शित रिंकू रजगुरुचा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता.
Unpaused
“Unpaused” हा अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेला रिंकू राजगुरू चा पुढचा चित्रपट वेगळ्या वेगळ्या पाच कहाण्या सांगणारा आहे. कॉरोना आणि लॉकडाऊन काळातील घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या या कथा आहेत. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. यात एका रूममेट सोबत राहावे लागणारे पात्र रिंकू राजगुरूने रंगवले होते. चुकून एकमेकांसोबत रहव्या लागणाऱ्या दोन मुलींची कथा तनिष्टा चटर्जी यांनी दाखवली आहे.
“हनड्रेड” हा हॉटस्टार वर प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. पोलिसांची एक टीम समाजातील घाण दूर करण्याचे काम करत असते. यातील एक रिंकू राजगुरू आहे. ही अतरंगी टीम असून क्राईम कॉमेडी सिरीज आहे.
रिंकू राजगुरू हीचा ४ मार्च २०२२ मध्ये “झुंड” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा प्रमुख भूमिका आहेत. झोपपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा, संघर्ष आणि जिद्दीची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच अमिताभ बच्चन वंचित आणि सोशीत मुलांसाठी काम करणारे महानायक अशी भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा :
कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया
गड आला पण सिंह गेला” असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडातून का निघाले
हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांची जीवनकहाणी सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या जीवनाचे वास्तव सांगणारा हा चित्रपट आहे. विजय बारसे हे पेशाने शिक्षक आहेत, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांच्या फुटबॉल साठी स्वतःचे १८ लाख रुपये खर्च करून खेळाच्या मैदानासाठी जमीन घेतात, आज त्यांच्या अकॅडमीमध्ये शोषित, वंचित स्तरातील मुले खेळतात,शिकतात आणि राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कोरतात. यातच त्यांच्या अकॅडमी मधून अखिलेश नावाच्या मुलाचा भारतीय संघात समावेश होतो आणि तो भारतीय संघाचे नेतृत्व करतो.
झुंड मधील अमिताभ बच्चन ह्यांची भूमिका
अमिताभ बच्चन या शिक्षकांची म्हणजे विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. अशी व्यक्ती जीने आपले संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीतील मुलांचं भविष्य घडवण्यात घालवलं. नागपूरचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे देणं लागतो आणि ते कोणते यासाठी झुंड पहावा लागेल. शिक्षक असणारा हा व्यक्ती मनाने आणि कार्याने शिक्षक कसा राहतो आणि अशा समाजात राहणाऱ्या माणसाची कथा वेगळ्या पद्धतीने यात सांगण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन सारख्या महानायकाने ही भूमिका पार पाडली आहे यातच सगळं काही आले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी ही व्यक्तिरेखा उभी केली आहे. या चित्रपटाचे लेखक मिहिर पांडे म्हणतात, अमिताभ सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कलाकार एका मागासलेल्या समाजातील नायकाची भूमिका साकारत असेल तर त्याचा अभिनय बघणे अपेक्षे पेक्षा त्याचा असर कितीतरी धारदार असेल. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
रिंकू राजगुरू हिने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात म्हणजेच १३-१४ वर्षांची असताना केली आणि आज तिच्या अभिनय जोरावर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महानायक कलाकार अमिताभ बच्चन यांच्या सोबत झुंड चित्रपटात झळकणार आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अमिताभ बच्चन सोबत एक प्रोजेक्ट मिळवा यासाठी मोठे मोठे कलाकार प्रयत्नशील असतात तिथे रिंकू राजगुरू सारख्या धडाकेबाज आणि नैसर्गिक अभिनय करणाऱ्या अस्सल मराठमोळ्या अभिनेत्रीला खूप लहान वयात ही संधी मिळाली. हे खूप भाग्याचे लक्षण आहे. नाही का ??
1 Comment
bursa kompresör
Bu Gördüğünüz Kompresör Çarpıcı Performansı ile Rakiplerini Geride Bırakır