Skip to content Skip to sidebar Skip to footer

रातराणी

सौ विशाखा कित्तुर

आनंदी एका छोट्या गावात लहानाची मोठी झाली. उमा आणि महेश ची ही मुलगी .आनंदी चे एक छोटे शेतकरी कुटुंब होते. आनंदी इतकी सुंदर होती दिसायला की येणारा जाणारा नेहमी म्हणे माह्या तुझी मुलगी नाय वाटत रे लै म्हणजे लैच भारी हाय बघ पोरगी.
दोघांनी खुप काळजी घेतली आनंदीची जशी दिसायला सुंदर तशीच खुप हुशार ही होती आनंदी
उमा आणि महेश ने ठरवले होते काय वाट्टेल ते करू पण पोरगी ला काय शिकायाचे ते शिकूदेत मोठी सयाबीन होऊदेत.
शालेय शिक्षण झाले आणि तिला तालुक्याला शिकायला घातली तिथले शिक्षक खुप खुश होते आनंदी वर ,ही शाळेचे नाव मोठे करणार याची खात्रीच होती त्यांना.
त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले तिने पण मन लावून अभ्यास केला आणि खरच सर्वाधीक मार्कने ती पास झाली. तिथेच ज्युनियर कॉलेज केले, बारावी नंतर इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेतली अर्धा एकर जमीन विकून तिचे शिक्षण पूर्ण केले.
आनंदी ला आता परदेशी जायचे वेध लागले पुढच्या शिक्षणासाठी तिला US ला जायचे होते.
कॉलेज च्या सरांनी लोन चे काम करून दिले बँकेतून, आणि ती शिक्षणासाठी भुर्रर्र उडाली सुद्धा.
ती ऐकून होती तिथे कमवा आणि शिका असे असते कारण फक्त शिक्षणाचा खर्च निघाला पण बाकी साठी पैसे हवेच होते की
तिथे हॉस्टेल मध्ये रिटा नावाची एक मैत्रीण झाली दोघीही खुप हुशार होत्या
रिटा आनंदिला बघताच तिच्या प्रेमात पडली होती.
रिटा सुद्धा कमवा आणि शिका अशीच होती थोडे दिवस तिने आनंदी चा खर्च केला शिक्षणा बरोबर आनंदी खुप स्वाभिमानी होती तिने रिटा ला काम बघायला सांगितले.
काहीही करून मला पैसे मिळवायचे आहेत आणि इथला आता बोझ आई वडिलांवर द्यायचा नव्हता
रिटा ने तिला विचारले मी जे काम करते ते तू करू शकशील का? तुला जमेल का? न जमायला काय झाले माझ्या वेळेत असावे आणि माझा इथला खर्च निघावा इतकेच माझे म्हणणे आहे . हो हो दिवसा कॉलेज , अभ्यास आणि nightshift साठी काम ते पण तुम्हाला किती वेळ हवे तेवढे. आनंदी एकदम खुश झाली म्हणाली मी तयार आहे कामासाठी खेड्यातून आल्यामुळे आनंदी ची दुनियादारी शी फारशी ओळख नव्हती रिटा ने आनंदी ला तयार केले खरे तर तय्यार करायची गरजच नव्हती इतकी सुंदर होती.
दोघी हॉटेल मध्ये गेल्या रिटा एक कॉल गर्ल होती हे आनंदिला माहीतच नव्हते
आनंदी पुरती अडकली, खुप घाबरली, आरडाओरडा केला पण एकदा सावज मिळाले की कोणीही सोडत नसते 🥲 तसेच झाले ,तीने तर त्याचा चेहरा ही पहिला नाही खुप रडली घासून घासून अंघोळ केली जाताना त्या व्यक्तीने भरपूर पैसे दिले तिला💸
घरी आल्यावर रिटा ने खुप समजावून सांगितले तिला अग इथे कोणी कोणाला ओळखत नाही शिक्षण होइपर्यंत हे काम करायचे मग जायचे भारतात तीथे कोणाला काय कळणार आहे आणि इथे आपण आपले खरे नाव थोडीच सांगतो
तुझे नामकरण मी “रातराणी” असे केले आहे सो तू काळजी करू नको हा एकच मार्ग आहे भरपूर पैसे मिळवायचा त्यातून तू इतकी सुंदर तुला खुप पैसे मिळतील
फार विचार करू नको शांत झोप आता रडून रडून आनंदी ला ग्लानी आली होती झोपून गेली
दुसरा दिवस सुद्धा राडण्यात गेला रिटा ने समजून सांगितले म्हणाली हे पैसे मिळतात ते थोडे घरी पाठव थोडे खर्च कर इथे छोटी नोकरी लागली म्हणून सांग .तुझ्या आई वडिलांनी विकलेली जमीन त्यांना परत मिळूवून दे .नवीन घर बांधून दे किती खुश होतील बघ
पण हे असल्या मार्गाने ? अग मी शिक्षणात कुठे ही कमी नाही मला चांगली नोकरी लागणारच आहे फक्त ही दोन वर्षे निकड होती तर तू मला असले काम करायला लावलेस🥲
सात आठ दिवस गेले रिटा ने तिच्यावर अक्षरशः बिंबवले की हा व्यवसाय वाईट नाही
बाकीचे व्यवसाय करतो तसाच हा फक्त काळजी घेऊन करायचा म्हणजे झाले हळूहळू आनंदी ला पटले पण तिने एक अट घातली कोणताही इंडियन कस्टमर मला चालणार नाही
जम बसला पैसे हातात खेळू लागले अभ्यासही नीट होत होता प्रोजेक्ट च्या निमित्ताने रितेशशी मैत्री झाली आणि दोघेही प्रेमात पडली प्रोजेक्ट पूर्ण झाले, शिक्षण पूर्ण होऊन भारतातल्या चांगल्या कंपनीने नोकरी दिली आणि हे दोघेही भारतात परतली .
दोघांनाही एकाच कंपनीत जॉब मिळाला आता बंगलोरला राहावे लागणार होते थोडे दिवसात जम बसला की लग्न करू असे दोघांनी ठरवले .
आनंदी बंगलोरला जायच्या आधी आई वडिलांकडे आली शेती परत मिळाल्यामुळे दोघेही खुश होते त्यात हिला चंगली नोकरी पण लागली होती दिवस भरभर पालटणार होते .
तिने रितेश बद्दल घरी सांगितले तिची निवड चुकणार नाही याची खात्री असल्याने त्यांनी होकार दिला .
हळूहळू बस्तान बसले आणि रितेश आणि आनंदी लग्न बंधनात अडकले आनंदी सासरी आली सासूबाई फारच चांगल्या होत्या त्यांनी जंगी स्वागत केले .
दोघेही पूजा झाली की हनिमूनला जाऊन येणार होते आणि मग ऑफिस ला रुजू होणार होते.
पंधरा दिवस कसे गेले कळलेच नाही हनिमून झाला आता ऑफिस चे वेध लागले उद्या सासारहून बंगलोरला जायला निघणार होते दोघे म्हणून आनंदी सकाळी लवकर उठली न्हाऊन स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी चहा करायला गेली आणि आवाज आला
हॅलो रातराणी ………..तिने दचकून मागे बघितले तर तिचे सासरे ……
……
…. सौ विशाखा कित्तुर

========================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.