Ritbhatmarathi

Search
Close this search box.

Ratan Tata information in marathi: एखादी व्यक्ती अमुक क्षेत्रात यशस्वी होते, जगभर यश मिळवते तेंव्हा आपण सहज म्हणून जातो ना काय नशीबवान आहे ?? चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आला आहे. याच्या जागी आपण असतो तर किंवा अशी संधी आपल्याला मिळाली असती तर ?? असे वाटतेच ना आपल्याला. पण हे मिळालेले यश, पैसा, प्रसिध्दी एका रात्रीत घडलेला चमत्कार किंवा जादू असते का ?? तर नाही अजिबातच नाही.

यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात, कष्ट करण्याची तयारी लागते, अपार मेहनत, कोणतेही काम करताना लाज बाळगून चालत नाही, हे असलं काम मी कसं करू ?? असा विचार त्यामागे नसतोच, धोका पत्करण्याची तयारी, अपयश पचविण्याची हिम्मत, प्रयत्नांची पराकाष्ठा, संयम, सचोटी, गुणवत्ता, प्रमाणिकपणा असे अनेक गुण असावे लागतात, बरीच वर्षे यशाची वाट पहावी लागते तेंव्हा कुठे यश पदरात पडते.

आपल्या भारतदेशाला असे अनेक यशस्वी लोक लाभले ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवून इतिहास घडवला, यशाची मालिका आणि नवे नवे विक्रम घडवले. आणि आपले नाव कायमचे अजरामर केले. आज आपण अशाच एका उद्योजकाबद्दल जाणून घेणार आहोत जे स्वभावाने अतिशय शांत आणि लाजाळू आहेत. त्यांच्या उच्च व्यक्तिमत्त्व आणि विचारसरणीने त्यांनी आपली वेगळी ओळख नेहमीच कायम ठेवली आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि ते दिलं पाहिजे या वृत्तीने आपल्या यशतील खारीचा वाटा ते नेहमीच दान करत आले आहेत. इतके मोठे असूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत, आपल्या श्रीमंतीच गाजावाजा न करता एका छोट्या घरात राहतात, प्राण्यांची आणि पुस्तकांशी मैत्री असलेले टाटा उद्योसमूहाचे माजी अध्यक्ष ” रतन टाटा ” यांच्या बद्दल.

[tablesome table_id=’11289’/]

रतन टाटा हे नाव आज उयोगजगतात खूपच आदराने घेतले जाते. त्यांच्या नावाभोवती वेगळाच लौकिक आहे. रतन टाटा हे भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे १९९० ते २०१२ पर्यंत अध्यक्ष होते. ते ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ मध्ये टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष राहिले आहेत. तसेच टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते. त्यांच्या कामाने त्यांनी उद्योगक्षेत्रात अनेक नवे बदल घडवले , टाटा समूहाचे जागतिक व्यवसायात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला.

आजचे रतन टाटा यांचे यश पाहता सगळ्यांनाच असे वाटू शकते की रतन सर हे चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आले आहेत. पण तुमचा यावर विश्वास बसणार नाही मित्रानो त्यांचे बालपणच काय तर आयुष्यातील बराच काळ खूप कठीण परिस्थितीत त्यांनी व्यतीत केला आहे. रतन टाटा अवघ्या दहा वर्षांचे असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले होते. त्यांच्या आईचे नाव सोनू टाटा तर वडिलांचे नाव नवल टाटा. रतन टाटा हे टाटा कुटुंबातील वंशज असले तरीही आई वडीलांच्या विभक्त होण्यामुळे रतन सर आणि त्यांच्या भावाचा सांभाळ त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी जसा जमेल तसा केला. विभक्त झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा रहाता बंगला सुद्धा विकून टाकला होता. पुढे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी रतन टाटा यांना दत्तक घेतले.

रतन टाटा यांनी आपले प्राथमिक शिक्षण कथाड्रेल आणि जॉन कॅनन मुंबई येथे पूर्ण केले. पुढे आर्किटेक्ट होण्याची इच्छा मनात बाळगून त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला. रतन सर यांनी जिथे १९७५ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले त्या कॉर्नेल विद्यापीठ ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. ते शिकत असताना आपले टाटा हे आडनाव विसरून स्वतःच्या हिमतीवर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण पूर्ण करण्याचा धेय्य त्यांनी समोर ठेवले होते. या धेयाने त्यांना इतके झपाटले होते की शैक्षणिक काळात हॉटेलमध्ये भांडी घासण्या पासून ते कारकुनाच्या नोकरी पर्यंत सगळे काही केले. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर हार्वर्ड विद्यापीठातून मनेजमेंट पदवी मिळवली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख असलेल्या जे.आर.डी टाटा यांच्याशी रतन सरांची भेट झाली.

टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू शिकण्यासाठी अशी धडपड करत आहे हे पाहून जे.आर.डी खूप प्रभावित झाले. त्याचवेळी रतन सरांच्या आजीची तब्येत खराब झाल्यामुळे रतन सर भारतात परत आले आणि जे.आर.डी यांनी रतन सरांना टाटा उद्योगसमूहात येण्याचे आमंत्रण दिले. डिसेंबर १९६२ मध्ये रतन सर टाटा समूहात सामील झाले. पण इथेही त्यांचा संघर्ष संपला नव्हताच उलट संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला होता असे म्हणायला हवे. कारण टाटा समूहाच्या परंपरेनुसार १९६२ ते १९७१ मध्ये त्यांना वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करण्यास सांगण्यात आले. या काळात त्यांनी जमशेदपूर येथील टाटा स्टीलमध्ये कोळसा उचलण्यापासून ते भट्टीजवळ काम करण्यापर्यंत सगळे काही करावे लागले .

सगळ्या कामांचा अनुभव घेतल्यानंतर १९७१ मध्ये टाटा समूहातील नेल्को कंपनीची जबाबदारी रतन सरांवर सोपवण्यात आली. पण त्यावेळी नेल्को हि तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी तीन वर्षात स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन सरांनी यश मिळवले. त्यांनी जागतिक बाजारपेठेतील नेलकोचा हिस्सा दोन टक्क्यावरून वीस टक्केपर्यंत आणला. हे खरतर त्यांचे पहिले यश ठरायला हवे होते कारण तोट्यात असलेली कंपनी त्यांनी नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी होत होता. पण त्याच वेळी देशात आणीबाणी जाहीर झाली आणि त्या पाठोपाठ मंदी. यात नेलकोला कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि कंपनी बंद पडली. त्यामुळे रतन सरांचे हे पहिले अपयश ठरले.

पुन्हा १९७७ मध्ये रतन सरांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहाच्या बंद पडत आलेल्या मिलची जबाबदारी दिली. या मिलच्या यंत्र समग्रित अनेक वर्षात गुंतवणूक केलेली नव्हती. कामगार संख्या जास्त त्या तुलनेत उत्पादन कमी असे चित्र होते. त्यामुळे रतन सरांनी यात पन्नास लाखांची गुंतवणूक करण्याची विनंती टाटा उद्योगसमूहाल केली. पण काही संचालकांचा विरोध असल्यामुळे ही मिल सुद्धा बंद पडली. आणि अर्थातच रतन सरांचे हे दुसरे अपयश ठरले.

आई वडिलांचा पाठिंबा नसतानाही चांगली नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आज आहे तब्बल ७०० कोटी संपत्तीचे मालक

१३ वर्षे आयटी मध्ये नोकरी केल्यानंतर जयंती कठाळे ह्यांनी स्वतःच हॉटेल सुरु केलं. आज परदेशातही शाखा आहेत.

सलग दुसऱ्या अपयशाने रतन सर दुखावले गेले पण आजवर आलेल्या कामांचा अनुभव त्यांना बरंच काही शिकवून गेला होता. त्यामुळे १९८१ मध्ये जे.आर.डी यांनी रतन सरांकडे टाटा इंडस्ट्रीजची सूत्रे तर सोपवलीच पण त्याच वेळी रतन सर टाटा उद्योगसमूहाचे वारसदार आणि भावी प्रमुख असणार हे स्पष्ट केले. आणि १९९१ मध्ये जे.आर.डी यांनी स्वतः टाटा उद्योगसमूहाचे सगळी सूत्रे रतन सरांकडे सोपवली आणि ते निवृत्त झाले.

यानंतर मात्र रतन सरांच्या नशिबाने त्यांच्या मेहनतीला अशी साथ दिली की रतन सरांनी यशाचे नवे नवे विक्रम गाठले जे आजही कायम आहे. या यशाने आख्या जगात रतन सरांना एक कायमची ओळख मिळवून दिली. सरांनी कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगभर नामांकित असलेल्या रतन सरांनी खरेदी केल्या. ज्यांनी देशातील तरुणांना नवी ऊर्जा दिली, काम दिले.

टेटली ही कंपनी विकत घेऊन रतन सरांनी जगातील सर्वात मोठी टी बेगज बनवणारी कंपनी निर्माण केली. त्यानंतर रतन सरांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २००४ मध्ये साऊथ कोरिया मधील “Daewoo Commercial Vehicles” विकत घेतले आणि २००७ मध्ये लंडनमधील कोरास ग्रुप स्टील कंपनी विकत घेऊन तिचे नाव टाटा स्टील एरोप असे ठेवले.

आयुष्यभर रतन सर अविवाहित राहिले. कदाचित त्यांचे आई वडील एकत्र राहिले नाहीत म्हणून असेल. पण हे सगळं काम करत असताना, यशाचे शिखर गाठत असताना आपली मूल्ये, सचोटी आणि गुणवत्ता त्यांनी कधीच सोडली नाही. त्याच्यात तडजोड केली नाही. आणि म्हणूनच सचोटी आणि गुणवत्ता म्हणजेच टाटा हे समीकरण तयार झाले. मोठी स्वप्न पहाणे आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा रतन सरांचा स्वभाव असल्याने इंडिगो आणि जगातील सर्वात छोटी कार म्हणजेच नॅनोची निर्मिती त्यांनी केली.

तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त काळ ते टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांना भारत उद्योग जगात लिव्हिंग लिजेंड म्हणतात. आता ते नवुद्योजकाना प्रोत्साहन देण्याचे काम करतात. आज टाटा उद्योग समूहाच्या शंभर पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्या दीडशे पेक्षा जास्त देशात सक्रिय आहेत. त्यांच्या कंपन्यांत सात लाख पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. इतकेच नव्हे तर टाटा समूह आपल्या कमाईतील ६६ टक्के नफा दान करते. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.

  • जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला. पण दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला.
  • प्रत्येक व्यक्तीत काही सुप्त गुण आणि प्रतिभा असतात. ज्याने त्याने आपल्यातील हे सुप्त गुण आणि प्रतिभा ओळखायला हवी.
  • मी त्या लोकांचे कौतुक करतो जे यशस्वी झालेत, पण हे यश निर्दय तेने मिळाले असेल तर मी त्यांच्या यशाचे कौतुक करेन पण इज्जत करणार नाही.
  • महान होणे म्हणजे लहान गोष्टी करणे, ज्याने देश मजबूत होईल. जसे पाण्याचा अपव्यय न करणे, विजेची बचत, जितके लागेल तितकेच अन्न घेणे. अशी लहान पाऊले देशाला महान बनवून आपला देश महासत्ता कडे जाईल.

असे उच्च विचार असलेल्या रतन टाटांनी व्यवसाय फक्त नफा मिळविण्यासाठी नाही केला तर समाजाबद्दल आपली जबाबदारी समजून केला. पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लागला. त्यांनी मिळवलेले यश छोटे नव्हतेच, पण त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, कधी काळी भांडी घासावी लागली. म्हणूनच त्यांच्या यशाची सगळ्या जागाने नोंद घेतली. त्यासाठी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांनी सन्मानित करण्यात आले. तरीही त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. त्यांचा संघर्ष आणि यशाची वाटचाल खरंच सगळ्या युवकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *