
नीता साधारण ३० च्या घरातली होती. एका मिडल क्लास फॅमिली मधली मुलगी. उच्चशिक्षित आणि दिसायलाही सुंदर होती. घरी सगळं काही छान होतं. नीता एका बँकेत कर्मचारी होती. घरकामात देखील खूप हुशार!! तसं बघायला गेलं तर नीता सगळ्याच क्षेत्रात नैपुण्यवान होती. फक्त रंग तिचा सावळा होता (पण खरंच रंग मॅटर करतो का ?)
नीता महिन्याभरापूर्वीच ३० वर्षांची झाली होती. नीताला आतापर्यंत १० स्थळ येऊन गेले, पण सगळ्यांनी नीताचा रंग बघून तिला रिजेक्ट केलं होतं. (त्या १० स्थळांमध्ये एखादाच मुलगा गोरा असेन. त्या मुळे मला समाजाची विचारधारणा खरंच कळत नाही कि मुलगी त्यांना सावळी का नाही चालत ? मुलाच्या आई वडिलांना तर सोडाच पण मुलाला देखील मुलीचा रंग गोराच हवा. मुलीचा फक्त रंगच मॅटर करतो का ?)
त्या मुळे नीताच्या आई वडिलांना नीताच्या लग्नाचं सारखं टेन्शन लागून राहायचं. पण नीता त्यांना समजावून सांगत असे कि टेन्शन घेऊन काही गोष्टी बदलणार नाही. ज्या गोष्टी जेव्हा होयच्या तेव्हाच होतात.
असेच बरेच दिवस गेले. नीताच्या बँकेत नवीन बँक मॅनेजर रुजू झाला होता. कारण जुन्या बँक मॅनेजरची बदली झाली होती. आज नवीन बँक मॅनेजरचा पहिलाच दिवस होता आणि नेमकी आजच नीता ची रोजची लोकल सुटली आणि तिला बँकेत पोहचायला उशीर झाला होता .
बँकेत प्रवेश करताच आज काही वेगळंच वातावरण होतं सकाळी सकाळी कुणी कस्टमरही नसतात आणि आज बँकेत एवढी शांतता होती कि सुई जरी पडली तरी तिचा स्पष्ट आवाज येईल. नीता आत गेली तेव्हा सगळे तिलाच बघत होते आणि सगळ्यांचे चेहरे एकदम गंभीर होते. नीता थोडी चकितच झाली होती हे सगळं बघून. कारण कधी कधी तिला उशीर होयचा पण बँकेत सगळे नॉर्मल असायचे.
नीता आपल्या डेस्क वर जाऊन बसली आणि आपली बॅग ठेवली. तेवढ्यात बँक क्लार्कने तिला निरोप दिला कि साहेबानी तिला बोलावलं आहे (साहेब म्हणजे नवीन बँक मॅनेजर )
नीताने केबिनच्या दारावर नॉक केलं. दारावर नेमप्लेट लावली होती सुधाकर दातार च्या नावाने. नॉक करताच आतून आवाज आला “कम इन….. “
नीता मॅनेजर च्या केबिन मध्ये गेली. केबिन मध्ये जाताच एक धष्टपुष्ट , साधारण ३५ च्या घरातला माणूस तिला दिसला. दिसायला खूप हँडसम. कुणालाही भावेल अशी पर्सनॅलिटी होती त्याची.
नीता आत जाताच ,
सुधाकर – “उशीर का झाला ? “
नीता – “सर , माझी रोजची लोकल सुटली त्या मुळे दुसरी लोकल ची वाट बघावी लागली त्या मुळे उशीर झाला .”
सुधाकर – “आज उशीर झाला ते ठीक आहे, पण या पुढे उशीर झालेला मी खपून घेणार नाही. आणि जेवढा उशीर होईल तेवढ्याच वेळ संध्याकाळी थांबून काम करावं लागेन. निघा आता कामाला लागा “
सुधाकर एवढ्या जोरात बोलत होता की केबिन च्या बाहेर हि आवाज गेला होता. नीता केबिन च्या बाहेर आल्यावर थोडी हिरमुसली होती. तिला आता कळालं होतं कि आज बँकेतील वातावरण एवढं गंभीर का होतं. कारण नीताच्या यायच्या आधीच खूप जणांनी सुधाकर ची बोलणी खाल्ली होती. पण नीताला ह्या सगळ्याची सवय नव्हती. नीता आपल्या कामात अगदी निपुण होती. सुधाकरच्या आधीचा मॅनेजर तिच्याकामावर खूप खुश होता .आणि ह्या वर्षी तिला बेस्ट एम्प्लॉयीचं अवॉर्ड देखील मिळालं होतं. असेच दिवस गेले बँकेत. कुठलाही कर्मचारी सुधाकरवर खुश नव्हता. पण नीता त्याची बोलायची ,काम करण्याची पद्धत , त्याची पर्सनॅलिटी या सगळ्यावर भाळली होती. पण तिने तिच्या मनातल्या गोष्टी मनातच राहू दिल्या होत्या. कारण तिला सत्य परिस्थिती माहित होती.
तिचा रंग तिला विचार करण्यास भाग पडत होता की , ” सुधाकर एवढा शिकलेला, बँकेत उच्च पदावर , एवढा हँडसम सगळं काही उत्तम ! मग सुधाकर सारखा मुलगा मला पसंत करण्याचा प्रश्नच येत नाही “
असे बरेच दिवस गेले. सुधाकर स्वभावाने खडूस होता. बँकेत सगळे कर्मचारी नाखूष होते. त्याच्यावर पण नीताने आपल्या कामावर कधीच त्याचा परिणाम पडू नाही दिला. उलट ती अजून मन लावून काम करू लागली .आणि सुधाकर देखील तिच्या कामावर खुश होता. मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील नीताला बेस्ट एम्प्लॉयी चं अवॉर्ड मिळालं होतं.
एक दिवस नीताला खूप काम होतं. तिला नेहमीपेक्षा आज जास्त उशीर होणार होता बँकेतून निघायला. म्हणून ती सगळे कर्मचारी निघून गेल्यावर थांबली होती. नीता कामात एवढी रमली होती कि तिला कळलंच नाही कि रात्रीचे १० कधी वाजले होते. तिचं काम संपलं होतं. ती निघणार तेवढ्यात तिने पाहिलं की सुधाकर देखील अजून बँकेतच होता. निघताना ती सुधाकरचा निरोप घ्यायला आली आणि निघायला लागली आणि तेवढ्यात सुधाकर ने तिला हाक मारली आणि म्हणाला ,
सुधाकर – “थांब नीता , खूप उशीर झाला आहे मी तुला घरी सोडतो.”
नीता – “नको सर, मी जाते एकटी…. काही हरकत नाही. लोकल्स असतात अजून चालू “
सुधाकर – “नाही नको!! चल तू मी सोडतो तुला ,तशीही तू माझ्या घराजवळच राहते. “
नीता – “सर!!!!! तुम्हाला कसा माहित मी कुठे राहते ?”
सुधाकर थोड्या भांबावलेल्या स्वरात म्हणाला , “अगं, तू जी लोकल पकडते ती माझ्याच स्टेशन ला जाते. तू बोलली होती ना एकदा “
नीता – “मला आठवत नाही सर, मी कधी बोलले होते तुम्हाला “
सुधाकर – “जाऊ दे ना आता , चल निघू या “
सुधाकर ने एवढा आग्रह केल्यावर नीता त्याला नाही म्हणू नाही शकली. तसही तिला त्याची कंपनी आवडायचीच.
दोघे सुधाकरच्या कार मध्ये निघाले. बराच वेळ शांतता होती. सुधाकर ने छान रोमॅंटिक गाणी प्लेस्टेशन वर लावली होती. कार मध्ये मस्त रोमॅंटिक वातावरण झालं होतं.
त्या निर्मळ रोमॅंटिक वातावरणात दोघेही रमून गेले होते. तेवढ्यात सुधाकर नीताला बोलला,
“नीता माझ्याशी लग्न करशील ? मला तू खूप आवडतेस. तुझं ते मवाळ बोलणं, तुझा मोहक चेहरा , तुझी परफेक्ट काम करण्याची पद्धत सगळं काही मला हवंहवंसं वाटतं. मी रोज तुला केबिन मधून पाहतो. तू एखाद्या दिवशी रजा घेतली की खाली खाली वाटतं मला. बँकेत मला हेही माहित आहे कि सगळे लोकं मला खडूस समजतात आणि माझ्या मागे वाटेल ते बोलतात, पण तू कधीच माझ्या बद्दल बोलली नाही. याउलट मला समजून घेऊन तू तुझ्या कामावर लक्ष दिलंस, तुझं काम देखील तुझ्यासारखं परफेक्ट आहे “
नीता हे सगळं ऐकून चकितच झाली तिने असा काही होईल ह्याची स्वप्नात देखील अपेक्षा केली नव्हती. तिने फक्त एकाच प्रश्न विचारला,
नीता – ” पण सर तुम्हाला माझा रंग माहित असून देखील तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तुम्हाला काहीच आक्षेपार्ह नाही का?”
सुधाकर – “रंग ? अगं तुझ्यामध्ये इतक्या काही चांगल्या गोष्टी आहेत कि त्याच्यासमोर मला तुझा रंग कधी दिसलाच नाही. तुझा मनाचा निर्मळपणा ,तुझा सुस्वभाव , तुझा मनमोहक चेहरा ह्यामध्ये मी कधी गुंतलो कधी कळलंच नाही.”
ह्या सगळ्या गप्पामध्ये नीताच घर कधी आला ते कळलंच नाही. नीताने सुधाकरचा निरोप घेतला आणि घरात गेली.
घरी गेल्यावर आई वडिलांना सांगितलं. त्यांना देखील काहीच आक्षेपार्ह नव्हता. कारण रिजेक्ट करण्यासारखा सुधाकर मध्ये काहीच नव्हतं.
पुढे जाऊन सुधाकर आणि नीताच्या फॅमिलीची गाठ भेट झाली आणि लग्न जमवून पुढच्या ६ महिन्यातच लग्नाचा बार उडवून टाकला.
आणि त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला……
क्रमशः
बोध : रंगाने एखाद्या व्यक्तीचं फक्त बाह्यरूप दिसतं. लग्नाच्या गाठी जुळवताना अंतर्मन जुळली पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या रंगावरून त्याला पारखणे चुकीचे आहे. कृष्णाचा रंग देखील सावळा होता. पण त्याचा मनमोहक चेहरा आणि बासुरीवादनाने त्याने सगळ्यांना मोहून टाकला होतं. आज सगळं विश्व कृष्णाला पूजतात.
========================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.