रामरक्षा स्तोत्र पठण फायदे. रामरक्षा सिद्ध कशी करावी?


१. रामरक्षा बद्दल थोडक्यात माहिती
आपल्या देशाला वेद, पुराण, कथा आणि ईश्वरीय रहस्यांचा खजिना लाभलेला आहे. तेहातीस कोटी देव आणि प्रत्येकाची रंजक अशी कथा आपल्याला पाहायला मिळेल. जितका आपण यांचा अभ्यास करू तितकेच त्याची गोडी निर्माण होईल. आपण लहापणापासून मुलांवर छान संस्कार व्हावेत यासाठी त्यांना शुभंकरोती, मनाचे श्लोक, स्तोत्र, मंत्र अशा अनेक गोष्टी शिकवत असतो. या गोष्टी पिढ्यान् पिढ्या आपल्या पर्यंत चालत आलेल्या आहेत.
हे मंत्र, श्लोक म्हणल्याने मन शांत तर होतेच शिवाय याचे आरोग्यावर पण खूप चांगले परिणाम होतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मनाची शांती मिळते जी खरंच खूप आवश्यक आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण डगमगत नाही, नकारात्मक परिणाम मनावर होत नाही आणि संकटाना सामोरे जाण्याची शक्ती मिळते ती वेगळीच.
शिवाय कोणतीही सेवा म्हणजेच ईश्वरी सेवा वाया जात नाही. आपण फळाच्या अपेक्षेने सेवा करण्या ऐवजी मनाच्या शांततेसाठी जर मन लावून दोन मिनिटे जप केला तरीही पुरेसा ठरतो. पण याची प्रचिती घेतल्याशिवाय ते समजणार नाही. याशिवाय उच्चार शुध्द ता, पाठांतराची सवय आणि एकाग्रता वाढते.
पण आपण कधी विचार केला आहे का, या श्लोकांची, मंत्राची, स्तोत्राची निर्मिती कशी झाली असेल ??? कोणी केली असेल ??? त्याचे महत्त्व काय ?? फायदे काय ?? किंवा हे स्तोत्र कसे सिद्ध होतात ?? नाही आपण कोणीच विचार करत नाही. घरातील मोठी माणसे किंवा मग पंडित, गुरुजी अशांनी वाचायला सांगितले म्हणून मग आपण ते वाचतो.
पण या प्रत्येक श्लोकाच्या, स्तोत्राच्या निर्मिती मागे काही तरी कारणे आहेत किंवा मग रंजक कथा आहे. आज अशाच एका स्तोत्राची माहिती घेऊया ज्याच्या निर्मिती मागे लपली आहे एक छान कथा. सोबतच पाहूया त्या मागील महत्त्व आणि फायदे.
२. रामरक्षा स्तोत्रची कथा
एकदा माता पार्वती ने भगवान शंकरांना विचारले, जसे विष्णु सहस्त्र नामावली हे खूप फायदेशीर स्तोत्र आहे तसेच दुसरे एखादे नाही का ?? त्यावर भगवान शंकर म्हणाले वाल्मिकी ऋषींनी शंभर कोटी श्लोक असलेल्या रामायणाची निर्मिती केली. हे रामायण सर्वांना मिळावे असे वाटायला लागले. हे रामायण प्राप्त करून घेण्यासाठी देव, दानव आणि मानव भगवान शंकराकडे गेले. रामायण कोणाला मिळावे यासाठी देव, दानव आणि मानव यामधे खूप वाद झाले. त्यामुळे भगवान शंकरांनी सगळ्यांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले.
त्यानतंर भगवान शंकर ध्यानात बसले. इतक्या समान वाटण्या करूनही देव, दानव आणि मानव यांचे मन काही भरेना. भगवान शंकराने ती अक्षरे स्वतःजवळ ठेवली म्हणजे त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सगळेच तिथे वाट पहात बसले होते. भगवान शंकराचे ध्यान काही संपेना म्हणून मग सगळे कंटाळून निघून गेले पण एक ऋषी मात्र तिथेच थांबले.
पण झाले काय शंभर ही संख्या सम असल्यामुळे तीन समान भागात वाटणी केली तरीही एक श्लोक तसाच राहिला. हा श्लोक अनुष्टुप छंद मधील असल्यामुळें एका श्लोकात बत्तीस अक्षरे यात होती. त्याचीही समान वाटणी केल्यावर शेवटी दोन अक्षरे राहिलीच. ती मात्र भगवान शंकराने स्वतःकडे ठेवून घेतली. आणि सगळ्यांना जायला सांगितले.
जे मिळाले आहे त्याहून अधिक काहीतरी मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती, वाट पाहून पाहून त्यांना झोप लागली आणि नेमके त्याच वेळी भगवान शंकरांनी ध्यान संपवून डोळे उघडले. त्यांनी वाट पाहून झोपलेल्या ऋषिंकडे पाहिले आणि त्यांना ऋषींच्या प्रतिक्षेचे कौतुक वाटले. मग भगवान शंकरांनी आशिर्वाद म्हणून ऋषींच्या स्वप्नात जाऊन त्यांना ” रामरक्षा ” सांगितली.
ऋषींना जाग आली आणि स्वप्नात सांगितलेली रामरक्षा त्यांनी लिहून काढली आणि अशा प्रकारे रामरक्षेची निर्मिती झाली. त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी. म्हणूनच या ऋषींचा उल्लेख पंधराव्या अध्यायात आढळून येतो, तो असा
आफिष्ट वान यथा स्वप्ने
रामरक्षा मिमां हरा
तथा लिखित वान प्रातः
प्रबुद्ध बुध कौशिकः
रामरक्षा स्तोत्र हे रामाला अनुसरून लीहण्यात आलेले आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले आहे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की ते उत्तम राजा, पिता, बंधू आणि पती या सर्व नात्यांच्या मर्यादा सांभाळून सगळ्यांसमोर आदर्श घालून दिला. त्यामुळे रामरक्षा म्हटल्याने प्रभू रामचंद्र मधील काही गुण आपल्यात येतात.
रामरक्षा म्हणजे रक्षण करणारा राम असा आहे. रमरक्षेतील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय आणि तारक म्हणजे आपल्याला संकटातून बाहेर काढणारे आहे. लहान मुलांनी तर रामरक्षा अवश्य म्हणायला हवी, त्याने उच्चार स्पष्ट हातात, योग्य संस्कार होतात, आपल्यात एक वेगळ्या प्रकारची शक्ती जागृत होते आणि कोणत्याही संकटापासून रामरक्षा आपले रक्षण करते.
हेही वाचा
पुरुष सूक्तम (प्राकृत) मराठी अर्थासह
३. आपण राम दोनदा का म्हणतो ??
आपण कधी विचार केला आहे का , की आपण “राम-राम” दोन वेळेस का म्हणतो.कारण |
र = २७ वा शब्द. ( बाराखडी मधील क ख ग घ ड……….)
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द.(अ आ…………)
एकूण = ५४.
राम + राम.
५४+५४ = १०८.
आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ आपण एका व्यक्तीला जर दोनदा “राम-राम” म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो…..
रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते
नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते.
हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते.
असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते.
अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते.
सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते.
४. रामरक्षा सिद्ध कशी करावी?
१२१ दिवस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा
गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा…किंवा
अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
५. रामरक्षा स्तोत्रचे इतर फायदे | ramraksha stotra benefits :
१. आपदामपहर्तारम…..हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे.
२. संपूर्ण रामरक्षेचे 15000 पाठ केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
३. प्रत्येक अवयवाचे स्वतन्त्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.
उदा:
कौसल्याये दृशो पातु:…. हा श्लोक सतत म्हटल्याने…
डोळ्यांचे विकार बरे होतात…
===================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.