Skip to content Skip to sidebar Skip to footer

रामरक्षा स्तोत्र

Ram raksha stotra lyrics:

रामरक्षा या संपूर्ण स्तोत्रांमधे एक अशी पवित्र शक्ती आहे ज्यामध्ये कुठल्याही संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आपल्यात येते म्हणूनच अगदी संपूर्ण शरीरामध्ये रामायणातील एक एक अवतार सामावलेला आहे असे रामरक्षेच्या पहिल्या दहा श्लोकांमध्ये म्हंटलेले आहे . म्हणूनच आपल्या सर्व शरीराचे रक्षण व्हावे यासाठी आजही आपले देवापुढे गाऱ्हाणे असतात .

१. रामरक्षा स्तोत्र हे वाढदिवस साजरा करताना आवर्जून म्हंटले जाते याचे कारण असे कि , शरीराच्या सर्व भागांचे संरक्षक कवच म्हणून हे स्तोत्र काम करते म्हणूनच आताच्या पाश्च्यात्य शैलीतील आधुनिक वाढदिवस साजरा न करता आध्यात्मिक पद्धतीने वाढदिवस साजरा करावा त्यासाठी रामरक्षा स्तोत्राचा जाप करावा         

२. आपले मूल दीर्घायु व्हावे यासाठी मुलाच्या वाढदिवशी स्नान करून नवीन कपडे अंगावर घालून पाटाभोवती रांगोळी काढुन त्याचे औक्षण करावे आणि रामरक्षा स्तोत्रातील पहिली दहा स्तोत्रं म्हणावे कारण या दहा स्तोत्रात शरीरातील सर्व भागांचा उल्लेख आहे आणि या सर्व भागांचे रक्षण करण्याची ताकत या रामरक्षेमध्ये आहे .    

३. देवापुढे अगरबत्ती लावून या रामरक्षा स्तोत्रामधील सर्व श्लोक म्हणावे आणि यांची विभूती घरातील सर्वांनी लावावी म्हणजे घरात सर्वांचे आरोग्य विशेष म्हणजे मानसिक आरोग्य सुधारते आणि घरात एक चैतन्यरुपी शक्तीचा वास राहतो .    

 ४. गरोदर मातांनी रामरक्षा स्तोत्राचा जाप अवश्य करावा जेणेकरून मनातील नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार मनात राहतील     

५. दररोज रामरक्षेचे पठन केल्यास मंगळाची वक्रदृष्टी आपल्यावर राहत नाही .    

६. मनातील सततची भीती नाहीशी होते कुठल्याही दिव्याला सामोरे जाण्याची धमक आपल्यात निर्माण होते.                          

पुरुष सूक्तम (प्राकृत) मराठी अर्थासह

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताबरोबरच लक्ष्मी सूक्त ह्या स्तोत्राचेही पठण करा. श्री लक्ष्मी सूक्त पठण

 ll  श्रीगणेशाय नमः ll

श्रीगणेशाय नमः । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।

बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता ।

अनुष्टुप् छन्दः । सीता शक्‍तिः ।

श्रीमत् हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।।

।। अथ ध्यानम् ।।                

ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् ।

वामाङ्कारूढसीता, मुखकमलमिलल्, लोचनन् नीरदाभम् नानाऽलङ्कारदीप्तन्, दधतमुरुजटा, मण्डलम् रामचन्द्रम्।।                              

 ll इति ध्यानम ll

चरितम् रघुनाथस्य, शतकोटिप्रविस्तरम् ।

एकैकमक्षरम् पुंसाम्, महापातकनाशनम् ।।१।।      

ध्यात्वा नीलोत्पलश्यामम्, रामम् राजीवलोचनम् ।

जानकीलक्ष्मणोपेतञ्, जटामुकुटमण्डितम् ।।२।।     

सासितूणधनुर्बाण, पाणिन् नक्‍तञ्चरान्तकम् ।

स्वलीलया जगत्त्रातुम्, आविर्भूतमजं विभुम् ।।३।।   

रामरक्षाम् पठेत्प्राज्ञः, पापघ्नीं सर्वकामदाम् ।

शिरो मे राघवः पातु, भालन् दशरथात्मजः ।।४।।    

कौसल्येयो दृशौ पातु, विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणम् पातु मखत्राता, मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।।   

जिह्वां विद्यानिधिः पातु, कण्ठम् भरतवन्दितः ।

स्कन्धौ दिव्यायुध पातु, भुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।।  

करौ सीतापतिः पातु, हृदयञ् जामदग्न्यजित् ।

मध्यम् पातु खरध्वंसी, नाभिञ् जाम्बवदाश्रयः ।।७।।

सुग्रीवेशः कटी पातु, सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

ऊरू रघूत्तमः पातु, रक्षःकुलविनाशकृत् ।।८।।

जानुनी सेतुकृत् पातु, जङ्घे दशमुखान्तकः ।

पादौ बिभीषणश्रीदः, पातु रामोऽखिलं वपुः ।।९।।

एताम् रामबलोपेताम्, रक्षां यः सुकृती पठेत् ।

स चिरायुः सुखी पुत्री, विजयी विनयी भवेत् ।।१०।।

पातालभूतलव्योम, चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्‍तास्ते, रक्षितम् रामनामभिः ।।११।।

रामेति रामभद्रेति, रामचन्द्रेति वा स्मरन् ।

नरो न लिप्यते पापैर्, भुक्तिम् मुक्तिञ् च विन्दति ।l१२।।

जगज्जैत्रेकमन्त्रेण, रामनाम्नाऽभिरक्षितम् ।

यः कण्ठे धारयेत्तस्य, करस्थाः सर्वसिद्धयः ।।१३।।

वज्रपञ्जरनामेदं, यो रामकवचं स्मरेत् ।

अव्याहताज्ञः सर्वत्र, लभते जयमङ्गलम् ।।१४।।

आदिष्टवान् यथा स्वप्ने, रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान् प्रातः, प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।।

आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदाम् ।

अभिरामस्त्रिलोकानाम्, रामः श्रीमान् स नः प्रभुः।।१६।।

तरुणौ रूपसम्पन्नौ, सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ, चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।१७।।

फलमूलाशिनौ दान्तौ, तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ, भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।१८।।

शरण्यौ सर्वसत्त्वानां, श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।

रक्षःकुलनिहन्तारौ, त्रायेतान् नौ रघूत्तमौ ।।१९।।

आत्तसज्जधनुषा, विषुस्पृशा-वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः, पथि सदैव गच्छताम् ।।२०।।

सन्नद्धः कवची खड्गी, चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोऽस्माकम्, रामः पातु सलक्ष्मणः ।।२१।।

रामो दाशरथिः शूरो, लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः, कौसल्येयो रघूत्तमः ।।२२।।

वेदान्तवेद्यो यज्ञेशः, पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमान्, अप्रमेयपराक्रमः ।।२३।।

इत्येतानि जपन्नित्यम्, मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकम् पुण्यं, सम्प्राप्नोति न संशयः ।।२४।।

रामन् दूर्वादलश्यामम्, पद्माक्षम् पीतवाससम् ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्, न ते संसारिणो नरः ।।२५।।

रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरम्, सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थङ् करुणार्णवङ् गुणनिधिं, विप्रप्रियन् धार्मिकम् ।

राजेन्द्रं सत्यसन्धन्, दशरथतनयं, श्यामलं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामम्, रघुकुलतिलकम्, राघवम् रावणारिम् ।।२६।।

रामाय रामभद्राय, रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय, सीतायाः पतये नमः ।।२७।।

श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणम् भव राम राम ।।२८।।

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणम् प्रपद्ये ।।२९।।

माता रामो, मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वम् मे, रामचन्द्रो दयालुर्, नान्यञ् जाने, नैव जाने न जाने ।।३०।।

दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम् ।।३१।।

लोकाभिरामम् रणरङ्गधीरम्, राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् ।

कारुण्यरूपङ् करुणाकरन् तम्, श्रीरामचन्द्रं शरणम् प्रपद्ये ।।३२।।

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।।३३।।

कूजन्तम् रामरामेति, मधुरम् मधुराक्षरम् ।

आरुह्य कविताशाखां, वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।३४।।

आपदामपहर्तारन्, दातारं सर्वसम्पदाम् ।

लोकाभिरामं श्रीरामम्, भूयो भूयो नमाम्यहम् ।।३५।।

भर्जनम् भवबीजानाम्, अर्जनं सुखसम्पदाम् ।

तर्जनं यमदूतानाम्, रामरामेति गर्जनम् ।।३६।।

रामो राजमणिः सदा विजयते, रामम् रमेशम् भजे रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणम् परतरम्, रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर ।।३७।।

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यम्, रामनाम वरानने ।।३८।।

                                  ।।इति श्रीबुधकौशिकविरचितं , श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्।।

                                                       ।। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ।।

आज या लेखाद्वारे आपण रामरक्षा आणि त्याचा संपूर्ण भावार्थ पाहणार आहोत.

ll  श्रीगणेशाय नमः ll

श्रीगणेशाय नमः । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।

बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता ।

अनुष्टुप् छन्दः । सीता शक्‍तिः ।

श्रीमत् हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।।

मराठी अर्थ –

सुरुवात श्रीगणेशाला स्मरून , हे रामरक्षा स्तोत्र आहे या स्तोत्राचे लेखक हे बुधकौशिक ऋषी आहेत , या महामंत्राची रचना ही अनुष्टुप छंदांमध्ये म्हणजेच संस्कृतमधील असणाऱ्या साहित्यात या रचनेचा उल्लेख आढळतो , स्तोत्रातील देवी-देवता साक्षात प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतादेवी आहे . श्रीमान हनुमान या देवतेने या मंत्राला सुगंधित केले आहे त्याचप्रमाणे भगवान श्री रामचंद्रांना प्रसन्न करण्या साठी या काव्याची रचना केली गेली आहे .

                                                     ।। अथ ध्यानम् ।।                

ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् ।

वामाङ्कारूढसीता, मुखकमलमिलल्, लोचनन् नीरदाभम् नानाऽलङ्कारदीप्तन्, दधतमुरुजटा, मण्डलम् रामचन्द्रम्।।                              

मराठी अर्थ –

ध्यान करा , ज्यांनी धनुष्यबाण धारण केलेला आहे , जे पद्मासनात बसलेले आहे , ज्यांनी पितांबर परिधान केलेला आहे , ज्यांचे डोळे कमळाप्रमाणे आहेत जणू एकमेकांशी ते स्पर्धाच करत आहेत , डाव्या बाजूला सीतेच्या कमळाकडे डोळे जोडलेले आहेत , ते अजान बाहू विविध अलंकारांनी सजलेल्या श्रीरामांवर ध्यान करतात

                                                      ll इति ध्यानम ll

चरितम् रघुनाथस्य, शतकोटिप्रविस्तरम् ।

एकैकमक्षरम् पुंसाम्, महापातकनाशनम् ।।१।। 

मराठी अर्थ प्रभुरामचंद्रांचे चारित्र हे शंभर कोटी विस्ताराचे असून त्यातला प्रत्येक अक्षर न अक्षर प पापांचे हनन करणारे आहे  

ध्यात्वा नीलोत्पलश्यामम्, रामम् राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतञ्, जटामुकुटमण्डितम् ।।२।।

मराठी अर्थ-

ज्यांचा चेहरा निळ्या कमळाप्रमाणे शामल आहे कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्यांचे डोळे दीर्घ आहे . जे आपल्या पत्नीसमवेत म्हणजेच सीतेसवे आहेत , ज्यांच्या बरोबर लक्ष्मण हि आहेत या समवेत जटेमधे असणारा मुकुट शोभून दिसतोय

 

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरांतकम्।
स्वलीलया जगत् त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥

मराठी अर्थ-

ज्यांच्या एका हातामध्ये तलवार धारण केलेली आहे , दुसऱ्या हातात धनुष्य आणि पाठीला बाणांचा भाता आहे , त्याच धनुष्यबाणाने तो दैत्यांचा सर्वनाश करणार खरोखरच जगाचे रक्षण करण्याच्या हेतूने भगवान श्रीरामचंद्रानी मनुष्यरूपी अवतार धारण केला आहे

रामरक्षां पठेत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्।
शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥

मराठी अर्थ-

अशा या प्रभू रामचंद्रांचे ध्यान सर्वांनी करावे , आपल्या सुज्ञ माणसांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्रीरामाच्या स्तोत्राचे  पठन सर्वांनी करावे . रघु वंशात जन्मलेल्या प्रभू श्रीरामचंद्राने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे , दशरथ पुत्र असलेल्या रामाने माझ्या कपाळाचे रक्षण करावे

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥

मराठी अर्थ-

कौसल्या महाराणींचा लाडका मुलगा असलेला राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण कर , विश्वामित्र यांचा आवडता शिष्य असलेला रामा माझ्या कानांचे रक्षण कर , गुरु विश्वमित्रांच्या यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे  रक्षण कर , सौमित्र नंदन असणाऱ्या आणि भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या श्रीरामा माझ्या मुखाचे रक्षण कर

 

जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित:।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥

मराठी अर्थ-

सर्व विद्या अवगत असलेल्या श्रीरामा माझ्या जिभेचे रक्षण कर , भरताने ज्याला नमस्कार केलेला आहे अशा श्रीरामा माझ्या कंठाचे रक्षण कर , दिव्य अशी अस्त्र ज्या खांद्यावर आहेत त्या खांद्याचे प्रभू  श्रीरामा रक्षण कर , जानकी स्वयंवराच्या वेळी रामा ज्या बाहूंनी शिवधनुष्याचा तू भंग केलास अशा माझ्या बाहूंचे तू रक्षण कर

 

करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित्।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥

मराठी अर्थ-

सीतेचा पती असणाऱ्या प्रभू श्रीरामाने माझ्या हातांचे रक्षण करावे , परशुरामासारख्या क्रोधिष्ट असणाऱ्या अवताराला जिंकणाऱ्या रामचंद्राने माझ्या हृदयाचे रक्षण करावे , खर नाव असणाऱ्या दैत्याचा ज्याने संहार केला त्या रामचंद्राने माझ्या शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करावे , वृक्षराज जांबुवंताला आसरा देणाऱ्या प्रभू रामाने माझ्या नाभीचे म्हणजेच माझ्या बेंबीचे रक्षण करावे

 

सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु:।
ऊरु रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत् ॥८॥

मराठी अर्थ-

वानरराज असणाऱ्या सुग्रीवाचे स्वामी असणारे श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण कर , हनुमंताचे प्रभू असणारे श्रीराम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण कर , राक्षस कुळाचा सर्वनाश करणारे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करा

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखांतक:।
पादौ बिभीषणश्रीद: पातु रामोSखिलं वपु: ॥९॥

मराठी अर्थ-

समुद्रावर सेतू बांधणाऱ्या श्रीरामा माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण कर , दहा तोंड असणाऱ्या रावणाचे हनन करणाऱ्या प्रभू श्रीरामा माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे संरक्षण कर , रावणाच्या वधानंतर सर्व लंका हि राजलक्ष्मीच्या स्वरूपात बिभीषणास देणाऱ्या प्रभू श्रीरामा माझ्या दोन्ही पाऊलांचे रक्षण कर

 

एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥

मराठी अर्थ-

रामाच्या बळाने युक्त असलेली रामरक्षा जर आपण पठन केली तर काय बरं होईल हे यापुढील मंत्रांमध्ये विशद केलेले आहे . तो दीर्घायुषी होईल , पुत्रपौत्र यांचे सौख्य लाभेल आणि सर्व कार्यांमध्ये यशस्वी होईल विशेष म्हणजे एवढे सगळे मिळूनही तो मनुष्य विनयशील म्हणजेच विनम्र राहील

 

पाताल-भूतल-व्योम-चारिणश्छद्‌मचारिण:।
न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥

मराठी अर्थ-

शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी आपण श्रीरामाची वेगवेगळी नावे घेतली आणि ज्या मनुष्य देहाचे रक्षण रामचंद्राने केले आहे अशा मनुष्याला संपूर्ण पाताळ लोकात , भू लोकात कुणीही कपटी नजरेने पाहू शकणार नाही अशा पद्धतीने रामचंद्रानी आपले संरक्षण केलेले आहे

 

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति ॥१२॥

मराठी अर्थ-

राम , रामभद्र किंवा रामचंद्र या नावानी असलेले प्रभू श्रीराम याचे स्मरण जो कुणी करेल तो कधीही पापयुक्त असा होत नाही किंबहुना पाप त्या मनुष्याच्या आसपासही फिरकत नाही , तो मनुष्य अनेक सुखाचा उपभोग घेऊ शकतो आणि नंतर मोक्ष मिळून मुक्तही होतो

 

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्।
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय: ॥१३॥

मराठी अर्थ-

सर्व जगाला जिंकणारा म्हणजे नेहमी जगजेत्ता असणारा जो कुणी आहे ते म्हणजे फक्त राम नाम आहे . त्या राम नामाच्या मंत्राने अभिमंत्रित केलेला ताईत धारण केला तर त्यास सर्व सिद्धी अगदी सहज प्राप्त होतात

 

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्।
अव्याहताज्ञ: सर्वत्र लभते जयमंगलम् ॥१४॥

मराठी अर्थ-

इंद्राचे वज्र जसे एक कवच आहे तसेच राम नाम हेही एक प्रकारे आपले कवचच आहे म्हणूनच अशा वज्रा रुपी रामाचे नाव जो कुणी घेतो त्याला सर्व ठिकाणी  नेहमी जय प्राप्त होत असतो.

 

आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:।l

तथा लिखितवान् प्रातः, प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।।

मराठी अर्थ-

असा हा रामरक्षा मंत्र बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितला बुधकौशिक ऋषींनी हि हा मंत्र सकाळी उठून जसाच्या तसा लिहून काढला आपण किती भाग्यवान आहोत आज आपल्याला हा मंत्र मिळाला आहे.

आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदाम् ।

अभिरामस्त्रिलोकानाम्, रामः श्रीमान् स नः प्रभुः।।१६।।

मराठी अर्थ-

असा हा रामरक्षा मंत्र बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितला बुधकौशिक ऋषींनी हि हा मंत्र सकाळी उठून जसाच्या तसा लिहून काढला आपण किती भाग्यवान आहोत आज आपल्याला हा मंत्र मिळाला आहे.

 तरुणौ रूपसम्पन्नौ, सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ, चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।१७।।

मराठी अर्थ  वयाने तरुण आणि रुपसंपन्न असणारे प्रभू रामचंद्र सुंदर तर आहेच पण त्याचबरोबर अतिशय कोमल आणि सुकुमारही आहे त्याचप्रमाणे बलवान असून त्यांनी राक्षसांचा नाश केला रामचंद्रांचे नेत्र हे कमळाप्रमाणे विस्तीर्ण आहे त्यांनी वल्कले आणि कृष्णजींन परिधान केलेले आहे

फलमूलाशिनौ दान्तौ, तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ, भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।१८।।

मराठी अर्थ-

प्रभू श्रीरामचंद्र काय भक्षण करतात ? तर कंदमुळे आणि जंगलातील फळे …त्यांनी सर्व इंद्रियावर जय प्राप्त केलेला आहे म्हणजेच ते जितेंद्रिय आहे , ते  तपस्वी , ब्राह्म्हचारी आहेत विशेष म्हणजे प्राणिमात्रांचे रक्षण करतात.

शरण्यौ सर्वसत्त्वानां, श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।

रक्षःकुलनिहन्तारौ, त्रायेतान् नौ रघूत्तमौ ।।१९।।

मराठी अर्थ-

सर्व धनुर्धरांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे प्रभू श्रीरामचंद्र आणि बंधू लक्ष्मण हे दशरथ राजांचे दोन्ही पुत्र आमचे रक्षण करो.

आत्तसज्जधनुषा, विषुस्पृशा-वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः, पथि सदैव गच्छताम् ।।२०।।

मराठी अर्थ-

हातामध्ये धनुष्य बाण घेऊन सदैव तत्पर असलेले प्रभू श्रीरामचंद्र नेहमी त्यांच्या भात्यामध्ये बाण असतात म्हणजे त्या बाणांना कधीच क्षय नाही ते अक्षय आहेत कधीही न संपणारे आहेत . असे हे राम लक्ष्मण माझ्या रक्षणकर्ता सदैव तयार असतील.

सन्नद्धः कवची खड्गी, चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोऽस्माकम्, रामः पातु सलक्ष्मणः ।।२१।।

मराठी अर्थसदैव सज्ज असलेला , हातात धनुष्य आणि बाण असणारा अंगामध्ये कवच परिधान केलेला आमचे रक्षण करणारा सदैव लक्ष्मणासोबत भ्रमण  करणारा , आम्हा भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा  राम आमचे सदैव रक्षण करो

रामो दाशरथिः शूरो, लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः, कौसल्येयो रघूत्तमः ।।२२।।

मराठी अर्थ-

असा हा शूर असलेला , पराक्रमी दशरथ राजाचा पुत्र असलेला राम , लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा बलवान असलेला राम , महापुरुष असलेला श्रीराम कौसलेचा पुत्र असलेला श्रीराम रघुकुळात जन्माला आलेला श्रीराम सर्वश्रेष्ठ आहे.

वेदान्तवेद्यो यज्ञेशः, पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमान्, अप्रमेयपराक्रमः ।।२३।।

मराठी अर्थ-

ज्याला वेदांत म्हणजेच वेदांविषयी अगाध ज्ञान आहे , जो पुराणांमधील पुरुषोत्तम आहे , जो सीतेलाही प्रिय आहे , ज्यांच्या पराक्रमाची तुलना कुणाशीही करता येत नाही असा प्रभू श्रीराम.

इत्येतानि जपन्नित्यम्, मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकम् पुण्यं, सम्प्राप्नोति न संशयः ।।२४।।

मराठी अर्थ-

जो अतुल परक्रमी अशा अश्वमेध यज्ञाचा कर्ता करविता आहे त्या यज्ञाचे पुण्य भक्ताला लागेल जर या रामनामाचा जाप केला तर , आणि यात कुठलाच संशय नाही.

रामन् दूर्वादलश्यामम्, पद्माक्षम् पीतवाससम् ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्, न ते संसारिणो नरः ।।२५।।

मराठी अर्थ-

सावळा वर्ण म्हणजेच श्यामल वर्ण याठिकाणी अनेकदा येतो जसे कि , राम म्हणजे दुर्वांच्या पानाप्रमाणे आहे , रामाचे नेत्र हे कमळाच्या पाकळयांप्रमाणे आहेत , श्रीरामाने पितांबर परिधान केलेला आहे . रामाच्या विविध नावानी आपण रामाची स्तुती करतो म्हणून जो कुणी रामनाम गाईल त्या देहाची सुटका या संसारातून होईल म्हणजेच संसाराच्या दुस्तर अशा फेऱ्यामधून मुक्तता मिळेल.

रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरम्, सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थङ् करुणार्णवङ् गुणनिधिं, विप्रप्रियन् धार्मिकम् ।

राजेन्द्रं सत्यसन्धन्, दशरथतनयं, श्यामलं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामम्, रघुकुलतिलकम्, राघवम् रावणारिम् ।।२६।।

मराठी अर्थ-

लक्ष्मणाचा मोठा भाऊ असलेला प्रभू श्रीराम संपूर्ण रघुकुलात सर्वश्रेष्ठ आहे . जानकीचा म्हणजेच सीतेचा पती असलेला श्रीराम सुंदर आहे , सुंदर असूनही त्याच्याकडे सगळे सदगुण आहे म्हणजेच सर्व सद्गुणांचा धनी प्रभू श्रीराम आहे , करुणेचा म्हणजेच दयेचाही सागर प्रभू श्रीराम आहे , सावळा रंग असलेले प्रभू श्रीराम एक शांततेची मूर्तीच आहे , त्यामुळे संपूर्ण राघव कुळाला प्रभू श्रीरामाची शांततेची मूर्ती जणू एका तिलकाप्रमाणेच भासते , रावणासारख्या महादैत्याचा शत्रू असलेला श्रीराम रघुकुलात जन्मास आला अशा प्रभू श्रीरामास मी वंदन करतो.

रामाय रामभद्राय, रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय, सीतायाः पतये नमः ।।२७।।

मराठी अर्थ-

राम , रामभद्र , रामचंद्र , वेदास , नाथ , रघुनाथ अशी ज्याची नावे आहेत , सीतेचा पती असणाऱ्या प्रभू श्रीरामास मी नमन करतो.

श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणम् भव राम राम ।।२८।।

मराठी अर्थ-

हे रघुकुलाच्या नंदना , भरताच्या जेष्ठ असणाऱ्या भावा , रणांगणात कर्कशपणे म्हणजेच कठोरता दाखवणाऱ्या प्रभू श्रीरामा तू आमचे रक्षण कर.

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणम् प्रपद्ये ।।२९।।

मराठी अर्थ-

हे प्रभू श्रीरामा , तुमच्या चरणांचे मी मनापासून स्मरण करतो , हे श्रीरामा तुमच्या चरणांचे मी माझ्या बोलीने स्मरण करतो , हे श्रीरामा तुमच्या चरणावर मी माझे मस्तक ठेवून नमन करतो.

माता रामो, मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वम् मे, रामचन्द्रो दयालुर्, नान्यञ् जाने, नैव जाने न जाने ।।३०।।

मराठी अर्थ-

माझी माता प्रभू श्रीरामाच आहे , पितासुद्धा प्रभू श्रीरामचं आहे इतकंच काय माझा मित्र , माझे स्वामी सुद्धा प्रभू रामचंद्रचं आहे , एवढंच नाही तर माझे सर्वस्वच प्रभू श्रीरामचंद्र आहे , श्रीरामांव्यतिरिक्त मी कुणालाही जाणत नाही.

दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम् ।।३१।।

मराठी अर्थ-

ज्यांच्या उजव्या बाजूला सुमित्रानंदन लक्ष्मण आहेत , डाव्या बाजूस म्हणजेच वामांगी सीतादेवी आहे आणि सर्वांच्या पुढे दास मारुती प्रभू श्रीरामांस वंदन करत उभा आहे.

लोकाभिरामम् रणरङ्गधीरम्, राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् ।

कारुण्यरूपङ् करुणाकरन् तम्, श्रीरामचन्द्रं शरणम् प्रपद्ये ।।३२।।

मराठी अर्थ-

समस्त लोकांना आनंद देणारा , समरांगणात म्हणजेच रणभूमीत आपले धैर्य दाखवणारा , कमळाप्रमाणे नेत्र असणारा , रघुकुलाचं वंशज असणारे प्रभू श्रीराम एक करूनेचाही , दयेचाही सागर आहे अशा या प्रभू श्रीरामांस मी शरण आलोय.

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।।३३।।

मराठी अर्थ-

या ठिकाणी श्रीरामाचे परमभक्त असणाऱ्या श्रीमान हनुमंताची स्तुती केलेली आहे , जो आपल्या मनाप्रमाणे विहार करणारा आहे , ज्याला वाऱ्याची गती प्राप्त झालेली आहे म्हणून तो वेगवान आहे , ज्याने सर्व इंद्रिय जिंकून घेतलेले आहे , बुध्दीमताही अचाट अशी प्राप्त झालेली आहे असा हा परमभक्त वानरसेनेचा प्रमुख आहे अशा या परमभक्तास मी शरण आलोय.

कूजन्तम् रामरामेति, मधुरम् मधुराक्षरम् ।

आरुह्य कविताशाखां, वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।३४।।

मराठी अर्थ-

रामराम जपाचे कोकिळेप्रमाणे गुंजन करणाऱ्या आणि राम नाम सुंदर असे लिखाण करणाऱ्या कवी  वाल्मिकी ऋषींनाही मी वंदन करतो.

आपदामपहर्तारन्, दातारं सर्वसम्पदाम् ।

लोकाभिरामं श्रीरामम्, भूयो भूयो नमाम्यहम् ।।३५।।

मराठी अर्थ-

आपत्तीचा म्हणजेच सर्व संकटांचा सर्वनाश करणाऱ्या प्रभू श्रीरामा , संपत्ती सर्वांना प्रदान करणारा श्रीराम तुम्हाला मी पुन्हा पुन्हा नमन करतो.

भर्जनम् भवबीजानाम्, अर्जनं सुखसम्पदाम् ।

तर्जनं यमदूतानाम्, रामरामेति गर्जनम् ।।३६।।

मराठी अर्थ-

राम , राम अशी रामनामाची गर्जना हि समस्त संसारास भाजून टाकणारी आहे , सुख संपत्ती मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देणारी आहे , यमदूतांचे तारण करणारी आहे त्यांना भय देणारी आहे अशा रामनामाची महती परत परत सांगितली आहे .

रामो राजमणिः सदा विजयते, रामम् रमेशम् भजे रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणम् परतरम्, रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर ।।३७।।

मराठी अर्थ-

सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असणारा प्रभू श्रीराम यांचा सदैव विजय असो , अशा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या प्रभू श्रीरामास मी भजतो , राक्षसांची सेना मारून टाकणाऱ्या प्रभू श्रीरामास माझा नमस्कार असो , रामाहून मला कुणीही सरस वाटत नाही म्हणून मी रामाचा दास आहे असे मला वाटते आहे , म्हणूनच माझे चित्त नेहमी श्रीरामांच्या चरणी लागून राहते अशा श्रीरामांस मी वंदन करतो.

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यम्, रामनाम वरानने ।।३८।।

मराठी अर्थ-

आता या ठिकाणी रामाची सहस्त्र नावे आहेत याचाही उल्लेख दिसतो हाच श्लोक विष्णू सहस्त्रनामातही मांडलेला दिसून येतो , सर्वात शेवटी हा श्लोक आपल्याला पाहायला मिळतो.                                  

                                             ।।इति श्रीबुधकौशिकविरचितं , श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्।।

                                                       ।। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ।।

अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे महास्तोत्र इथेच याठिकाणी समाप्त होते.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: