
टाळ घेऊनी हाती,चाले वारकरी…
मुखी नाचतो ईथे,पांडूरंग हरी…
सावळ्या विठूची रुक्मिणी,
नाही कोणाच्या ही ठायी….
जगी नाचतो पुरूष, लक्ष्मी कोंडी देवघरी….
जगी विठूची माऊली जाहली..
वेडी रूखमाई आज वांझ ठरली…
लेकरांना ऊराशी धरू पाहे रूखमाई…
तुला ही संसाराने, वाळीत टाकले बाई…
संसाराचा भार म्हणे विठू वाही…
थके विठू तेव्हा, तो तुझ्या कुशीत येई…
जगाच्या हरीला आई तु सुख देई…
संसाराची माऊली तुझ्याविना शोभे अपूरी….
रूखमाई ऊभी हरी संगे विटेवरी…
जग भजे एक नाम पांडूरंग हरी..
रूखमाई कधी येईल तुज साठी वारी…
जन घेऊनी ऊंची पताका भारी…
एकादशी सुध्दा तुझ्या नावाची येऊ दे..
विठू माऊली परी तुला आईपण मिळू दे….

वृषाली मोरे
लहानपणापासून वाचनाची आवड होती. मग वाचता वाचता लिहायलाही लागले. पण स्वतःच लिखाण लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हा प्रश्न पडला होता. मग कळालं कि माझी शालेय मैत्रीण सारिका ने रीतभातमराठीचं व्यासपीठ सुरु केलं. आणि मग काय तिच्या माध्यमातून माझं लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला मिळाली.
13 Comments
Ashutosh Bhoite
Masta
Ashutosh Bhoite
Khup bhri
Sonali Manmode
Khup chan 👌
Dr.Rupal
Nice काव्यात्मकता
Nitin More
Nice
shivaji More
छान
Satish
खूप छान👌👌
Sonali
Nice mam 😍
Chaitali
Great
Sayali Nayakwadi
छानच आहे कविता !!😀😀
Nitin
Khup mast 👏👏
Snehal Talekar
Nice poem
Sneha
So thoughtful …