राजहंस


सौ विशाखा कित्तुर
आज मी फार खुश आहे माझ्या मुलाचे आज खुप मोठे कॉन्सर्ट आहे. पोटात गोळा आला आहे, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कशी होतील त्याची गाणी? सगळ्यांना आवडतील का? स्टेडियम तर खचाखच भरले आहे
लोकांचे काय आवडले तर डोक्यावर घेऊन नाचतील, नाहीतर खाली खेचायला पण मागे पुढे पण बघणार नाहीत .
पण मला खात्री आहे परफॉर्मन्स बेस्टच होणार . माझी मेहनत अशी वाया जाणार नाही . हो हो माझीच मेहनत त्याचे चीज तो नक्की करणार मला खात्री आहे .
आजही डोळ्यासमोर 15 वर्षापूर्वी चा दिवस आठवतो . मी शाळेत निघाले होते. सिग्नल ला एक 8 वर्षाचा मुलगा त्याच्या आई बरोबर भीक मागत होता माझ्या scooty जवळ येऊन माय पैसे दे ना ग भूक लागली म्हणू लागला मी काहीच बोलले नाही तर त्याच्या आई ने सांगितले बाळा आपण तरी फुकट पैसे कशाला मागायचे तू त्या माय ला एखादे गाणे म्हणून दाखव. त्याच्या डोळ्यात मला एकदम चमक दिसली बहुतेक त्याला खुप भूक लागली असावी मला ही इतक्या हलाखीच्या परिस्तिथीत आईचे संस्कार आवडले मी त्याला गाणे म्हणायला सांगितले .
त्याने सुरवात केली ” एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक”.
गाणे ऐकून मी इतकी भारावून गेले डोळ्यातून कधी आणि कसे पाणी येऊ लागले कळलेच नाही तो मात्र निरागस पणे म्हणाला माय देशील ना ग आता पैसे . हा इतका छोटा मुलगा सगळी गोष्ट म्हणजे गाणे इतके सुंदर रित्या कसा काय म्हणू शकतो हे माझ्यातली संगीत शिक्षिका विचारल्या शिवाय गप्प बसूच शकत नव्हती.
त्याच्या आईने सांगितले ऐकून ऐकून तो म्हणू लागला आहे त्या मुळे चार पैसे सुटतात रोज , त्यावरच आमची गुजराण चालू आहे ओ.
मी विचारले तुम्ही रोज इथेच असता का? त्यांनी एक छोटी झोपडी दाखवली आम्ही इथेच राहतो . मी मुकाट 100 rs काढून दिले आणि शाळेत गेले माला या सगळ्यात खुप उशीर झाला होता .
काही केल्या शाळेत लक्ष लागेना तो लहान मुलगा आणि त्याचा आवाज सारखा डोळ्यासमोर आणि डोक्यात घुमत होता .
त्या दिवशी रात्रभर झोप नाही काय असेल याचे भविष्य? इतका गोड गाणारा मुलगा पुढे जाऊन पण भिकच मागेल का? असे अनेक प्रश्न मला पडले . दोन तीन दिवस मी रोज तिथूनच जाऊ लागले रोज वेगळे गाणे कधी हिंदी कधी मराठी गोड गळ्यातून ऐकू येत होती . शेवटी माझ्या मनाने कौल दिला उद्या रविवार त्या मुलाकडे जायचेच, एका विशिष्ट गोष्टीचा आंनद मनात घेऊन झोपले . दुसरे दिवशी जाऊन त्या मुलाचे नाव विचारले ‘मंदार’ असे सांगितले मग मी त्यांना मला काय वाटते ते सांगितले
तुम्ही दोघे माझ्याघरी राहायला या मी त्याला गाणे शिकवते आणि शाळेत ऍडमिशन पण घेऊन देते त्याचा सर्व खर्च मी करेन तुम्ही काळजी करू नका . त्या बदल्यात तुम्ही माझे घर सांभाळा माझी आई एकटीच असते घरी .तुम्ही घरी असलात तर मी जरा निवांत होईन मला घरची काळजी राहणार नाही . त्यांनी कदाचित मुलाचे भविष्य माझ्या डोळ्यातून पाहिले असावे. त्या माऊलीने लगेच होकार दिला आणि आमचा अखंड प्रवास सुरु झाला . खुप खुप कष्ट घेतले आम्ही दोघांनी . शाळा आणि गाणे मंदार ने कधीच कंटाळा केला नाही आणि मी ही मागे हटले नाही अनेक ,अनेक बक्षिसे मिळवली मंदारने.माझ्या डोळ्यात वात्सल्य ओसंडून व्हायचे तो जिंकला की.
खुप खुप मोठा झाला, अनेक ऑफर्स येऊ लागल्या, अनेक चित्रपटात तो गाऊ लागला, आणि आज खुप मोठ्या संगीतकाराने त्याच्या प्रोमोशन साठी ही कॉन्सर्ट ठेवली होती . फार फार सुंदर गाणी गायली मंदार ने .आणि शेवटी अनौनसमेंट झाली आज या कार्यक्रमातले शेवटचे गाणे माझ्या माय साठी खास.
हो मंदार मला माय म्हणायचा. त्याने गाणे सुरू केले ” एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले तो राजहंस एक” टाळ्यांचा कडकडाटात मंदार वेगाने माझ्याकडे आला आणि कडकडून मिठी मारली दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते, वाहातच राहिले .
सौ विशाखा कित्तुर
=========================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.