Skip to content Skip to sidebar Skip to footer

पी व्ही सिंधू माहिती | PV Sindhu Information in Marathi

PV Sindhu Information in Marathi

आपल्या आवडीला आपले करिअर बनवणाऱ्या आणि त्यात जाज्वल्य यश मिळवून जगभर आपल्या यशावर स्वतःचे नाव कोरलेल्या या खेळाडूची यशाची उंची जाणून घेऊया…..

प्रत्येकाला आपल्यातील सुप्त गुण ओळखता यायला हवेत. आपण सगळेच शिक्षण घेतो, त्यासाठी एखादे क्षेत्र निवडतो, मग नोकरी किंवा मग व्यवसाय करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करतो. पण तरीही आपण करतो ते काम आपण एन्जॉय करत नाही किंवा मग मला हे नाही दुसरे काहीतरी करायचे आहे असे मन सतत सांगत असते. तेंव्हा आपलीच चिडचिड होते आणि रोजच्या कामाचा कंटाळा यायला लागतो. हे असे बऱ्याच जणांचे होते. पण का होते असे ?? कारण आपण आपले स्किल किंवा आपल्यातील सुप्त कलागुण न ओळखता दुसऱ्याच क्षेत्रात काम करत असतो. पण हेच कलागुण ओळखून आपल्या आवडीला आपण कामाचे किंवा आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याचे स्वरूप बनवले तर आपण आपले काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण आपण आपले काम एन्जॉय करत असतो. जबाबदारी म्हणून किंवा मग करावे लागणार म्हणून करत नाही.

काही कलागुण हे अनुवंशिक असतात तर काही उपजतच आपल्यात असतात. गरज असते ती फक्त त्यांना ओळखून त्यात पारंगत होण्याची. आपल्या आवडीच्या कामाला जर आपले करिअर बनवले ना तर संपूर्ण जगावर आपल्या कामाची छाप पाडून नवा इतिहास आपण रचू शकतो. इतके सामर्थ्य असते आपल्या कलागुणात.

आज अशाच एका व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या अलौकिक सामर्थ्याला अख्या जगाने सलाम ठोकला आहे. जिच्या अचाट कामसू वृत्तीने आणि कधीही न मरनाऱ्या आत्मविश्वासाने भारताला विश्विजेतेपद जिंकून सुवर्ण इतिहास घडवणारी, भारतातील दुसरी वैयक्तिक अथलेट आणि ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटन खेळाडू पी. व्हीं. सिंधू यांच्याबद्दल.

पी. व्ही सिंधू म्हणजेच पूसारला वेंकट सिंधू यांचा जन्म ५ जुलै १९९५ रोजी हैद्राबाद येथे झाला. सिंधू यांचे आई आणि वडील दोघेही व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यासाठी रमन यांना २००० मध्ये त्यांच्या खेळातील कार्याबद्दल भारत सरकारचा प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर त्यांच्या आई पण उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू होत्या. पुसारला सिंधू यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद येथील ऑक्सीलियम हायस्कूल येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट अन्स कॉलेज फॉर वुमेन्स येथे पूर्ण झाले. त्यांनी एम.बी.ए ची पदवी मिळवली आहे. पुसारला सिंधू यांचे आई वडील दोघेही व्हॉलीबॉलमध्ये निपुण होते तरीही सिंधू यांनी बॅडमिंटनची करिअर म्हणून निवड केली. पूसारला सिंधू यांनी २००१ च्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पयन स्पर्धेत पुल्लेला गोपीचंद यांच्यासह सगळ्यांवर आपल्या खेळाची वेगळीच छाप पाडली. त्यामुळे त्यांचे खूप कौतुक झाले आणि इथूनच त्यांनी बॅडमिंटन करिअर म्हणून निवडले.

पुसारला सिंधू यांनी त्यांचे करिअर निवडले होते. आता वेळ आली होती ती त्या खेळात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवण्याची. सिंधू यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी मेहबूब अली यांच्या प्रशिक्षणाखाली ज्ञान प्राप्त केले. हे प्रशिक्षण सिकंदराबाद येथील भारतीय रेल्वे संस्थेत दिले जात होते. काही दिवसांनंतर पुल्लेला यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये दाखल झाल्या. हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना ५६ किमी चा प्रवास करून यावे लागत असे. पण त्या कधीच दमल्या नाहीत किंवा कधीच उशिरा पोहचल्या नाहीत. त्यांची शिकण्याची वृत्ती आणि कधीही न मरणारा आत्मा त्यांच्या गुरूंनी म्हणजेच गोपीचंद यांनी बरोबर हेरला आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले.

आयुष्याला कलाटणी देणारी सुद्धा मूर्तींची हि पुस्तके नक्कीच वाचून बघा

रतन टाटांनी देखील अपयशातून यशाची शिखरे गाठली

पूसारला सिंधू यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात २००९ मध्ये केली.

  • २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कोलंबो सब ज्युनिअर आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक जिंकले.
  • २०१० मध्ये इराण फजर आंतरराष्ट्रीय चलेंजमध्ये सिंगल प्रकारात रौप्य पदक जिंकले.
  • २०१० मध्ये मेक्सिको मधील ज्युनिअर जागतिक बॅडमिंटन उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच २०१० मध्ये सिंधू उबर चषक भारतीय राष्ट्रीय संघाची सदस्य होती.
  • २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जयानी खेळाडू नोझोमी ओकुहराला २१-७, २१-७ असे पराभूत करून रौप्य पदक जिंकून आणि विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय शटलर ठरली.
  • २०१९ मध्ये बॅडमिंटन जागतिक चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. पण हे यश मिळवताना अनेक अपयशांचा त्यांना सामना करावा लागला. अनेक वेळा अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदक हूकले पण सिंधू यांनी हार मानली नाही. शेवटी या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

१. महिला एकेरीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकून जगातील चौथी मोठी खेळाडू.
२. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली आणि एकमेव भारतीय.
३. ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोन पदके जिंकणारी भारताची दुसरी वैयक्तिक अथलेट.
४. २ एप्रिल २०१७ सिंधू यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.
५. सप्टेंबर २०१२ वयाच्या सतराव्या वर्षी BWF या जागतिक क्रमवारीत पहिल्या टॉप ट्वेंटी मध्ये स्थान मिळवले.
६. २०१६ च्या उन्हाळी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि अंतिम फेरीत जाणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली.
७. आजपर्यंत सिंधू यांनी जागतिक स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.
२०१७-२०१८ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक जिंकले.
२०१३-२०१४ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

याशिवाय युवा सर्वोच्च नागरी पुरस्कार तसेच अनेक पुरस्कार पुसरल सिंधू याना मिळाले आहेत.

तसेच महिला आणि पुरुष गटात आजवर कोणालाही सुवर्ण पदक मिळाले नव्हते ते सिंधू यांनी मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

कोणत्याही महिला खेळाडूने सिंधू पेक्षा जास्त पदके मिळवली नाहीत. म्हणजेच महिला गटात सर्वात जास्त पदके मिळवण्याचे मान सिंधू याना मिळाला आहे.

फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. सिंधू यांना भारतातील सर्व युवा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळाला आणि त्याने जगभरात स्वत: चे नाव कोरले.

अशा प्रकारे बॅडमिंटनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून जगातील सगळेच रेकॉर्ड पुसारला सिंधू यांनी त्यांच्या नावावर केले आहेत. त्यांची उत्तुंग कामगिरी वरचेवर अशीच पाहायला मिळो आणि त्यांच्या यशाने भारताचे नाव उज्वल होत राहो हीच सदिच्छा. !!!

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.