पुढचं पाऊल


रंगा चाळीत लताच्या सासूची दहा बाय बाराची रुम होती. लताचा नवरा मिलमध्ये कामाला होता. लता,तिचा नवरा,म्हातारी सासू व दुसरीत असलेली तिची लेक प्रज्ञा..गरीब पण सुखी कुटुंब होतं त्यांच.
मिल कामगारांनी संप पुकारला आणि तिचा नवरा दामोदर घरी बसला. नुसतं हातावर हात धरुन रहाणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. थोड्याच दिवसांत त्याने वॉचमनचं काम पाहिलं. घर चालवण्यासाठी लताही धुणी,भांडी,लादी करु लागली. लताची सासू प्रज्ञाला सांभाळत होती. प्रज्ञा शाळेतून आली की आजी तिला जेवू घालायची. तिला गोष्ट सांगून झोपवायची. प्रज्ञाला आजीचा जास्त लळा होता.
सगळं बरं चाललेलं नियतीला मान्य नव्हतं. एकदा ड्युटीवरून येत असताना, दामोदर रेल्वेरुळ ओलांडत होता. भरधाव येणाऱ्या ट्रेनकडे त्याचे लक्षच नव्हते. लक्षात येताच तो पळू लागला पण ठेचाळला. त्याचे दोन्ही पाय ट्रेनखाली गेले. फक्त धूड शिल्लक राहिलं.
लताच्या कुटुंबाची वाताहात लागली. पहाटे उठून नवऱ्याचं सारं आवरुन,स्वैंपाकपाणी जमेल तसं करुन लता कामाला जाई. आईवडील लहानपणीच गेल्याने माहेरची आशाही संपली होती. एक भाऊ होता पण या कठीण प्रसंगी त्यानेही पाठ फिरवली. लताने आणखी दोन तीन कामं अंगावर घेतली.
तळमजल्यावर एक मालेकर म्हणून इसम रहात होता. त्याची बायको गावी रहायची. त्याने लताला कामासाठी बोलावलं. एक वेळचं जेवण,लादी व भांडी यांचे पाच हजार देतो बोलला.
लता खूष झाली. ती नेमाने मालेकराच्या घरी जाऊ लागली. मालेकरने आणून ठेवलेली भाजी बनवे,आमटी, भात,पोळ्या करी. सगळं आवरुन,ओटा लख्ख पुसे. भांडी घासी,लादी पुसी.
मालेकर तिच्या लेकीसाठी काहीतरी खाऊ आणून ठेवी. लता तो खाऊ घरी घेऊन जाई. कोणतरी आपल्या लेकीसाठी आवडीने खायला आणतय याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर उमटे. दिवाळीत लताला त्याने दोन साड्या,मुलीसाठी फ्रॉक,नवऱ्याला टीशर्ट,सासूला लुगडं गीफ्ट दिलं. लताच्या घरच्यांनाही मालेकर आवडू लागला.
्
लता काम करत असताना मुद्दाम तो तिच्या अवतीभवती घुटमळत रहायचा. तिच्याशी अगदी गोड बोलायचा. आजारपणाने वैतागलेल्या नवऱ्याच्या शिव्या खाणाऱ्या लताला मालेकर हळूहळू आवडू लागला. एकदा लता लादी पुसत असताना पाय घसरून पडली. तिला उठता येईना.
मालेकरने डाव साधला. त्याने आयोडेक्स घेतलं व तिच्या पायाला हलक्या हाताने लावू लागला. तो हात हळूहळू वर जाऊ लागला. लताचं शरीरपण बरेच दिवस उपाशी होतं. ते बंड करुन उठलं. अखेर तिच्या मनापुढे शरीराची भूक वरचढ ठरली. मालेकराने तिच्या सर्वांगाला मोरपिसी स्पर्श केला. तिच्या तरुण देहाला चेतवलं. तिच्या रसरशीत कायेला त्याने त्याच्या ओठांनी गंधाळले. ती घरी जाताना तिच्या हातावर पाचशे रुपये ठेवायला तो विसरला नाही. लता नको म्हणत होती पण त्याने तिच्या ओठांच दिर्घ चुंबन घेऊन तिच्या हातात ती नोट कोंबली.
लता गाणं गुणगुणत घरी आली तेंव्हा दामोदरच्या नजरेतून आपल्या पत्नीच्या नजरेतले बदललेले भाव सुटले नाहीत. त्याचे पाय नसले तरी शरीराची भूक होतीच. त्याची आई व लेक वर माळ्यावर निजायच्या.
रात्री दामोदरने लताला जवळ घेतली पण त्याला लता परक्यासारखी वाटू लागली. लाडात त्याच्या कुशीत शिरणारी लता तिचं डोकं दुखतय सांगून खाटीच्या कडेला कुशीवर वळून निजली. अधू दामोदर तिच्यावर जबरदस्ती करु शकत नव्हता. मुठी आवळून तो त्याच्या फुटक्या नशीबाला कोसत राहिला.
दुसऱ्या दिवशी दुपारीही छान चापूनचोपून साडी नेसून लता मालेकराकडे गेली. मालेकर आत्ता तिला कामात मदत करु लागला,जेणेकरून लवकरात लवकर काम व्हावं.
लता लादी पुसत असताना मालेकराने तिला पाठीमागून त्याच्या पीळदार बाहुपाशात घेतलं व तिच्या ब्लाऊजच्या मोकळ्या पाठीवर आपले ओठ फिरवू लागला. तिच्या कंबरेभोवती हाताची बोटं फिरवू लागला. त्याच्या बोटांनी अलगद तिच्या ब्लाऊजचे हूक काढले,ब्राचा अडसर बाजूला केला व तिचे उत्तेजित झालेले उरोज आपल्या हातांनी कुरवाळू लागला.
मालेकर जबरदस्ती करत नव्हता. तो लताला फुलवत होता व तिच्याकडून हवं ते हळूहळू घेत होता. लतालाही ते सारं हवंहवंस वाटत होतं.
तिसऱ्या दिवशी लादी पुसताना मालेकराने परत तिच्या प्रणयाला आसुसलेल्या उरोजांची भूक भागवली. तिच्या अधरांच दिर्घ चुंबन घेत त्याने तिच्या परकरची नाडी सोडली. लतालाही तेच हवं होतं. लताने त्याला जवळ ओढून घेतलं. भरदार शरीरयष्टीचा मालेकर व कमनीय बांध्याची लता एक झाले होते.
त्यांचे उष्ण श्वास एकमेकांत सामावले गेले. दोघांची बोटं एकमेकांत गुंफली गेली.. लता त्याला अधिकाधिक जवळ घेत होती.
दामोदरला लतातला फरक कळून येत होता पण तो हतबल होता. नेहमी जवळ घेण्यासाठी हट्ट करणारी लता आत्ता त्याच्यापासून दूर रहात होती. तिच्या नजरेतला त्याच्याविषयीचा परकेपणा त्याला अधिकच डिवचू लगला. दिवसेंदिवस तो खचत चालला. एके दिवशी बेगॉन पिऊन त्याने त्याच्या पालापाचोळ्यासारख्या आयुष्याचा निरोप घेतला.
दामोदरची आई धाय मोकलून रडली.
वीसेक दिवसांनी लता पुन्हा कामावर जाऊ लागली. सासूने तिला आत्ता मालेकराकडचं काम सोड म्हणून विनवलं पण लताने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. ती परत मालेकराकडे जाऊ लागली. आजुबाजूची लोकंही आत्ता बडबडू लागली.
सासूच्या कानावर येताच सासूलाही नको जीणं झालं. हीच्या ह्या अशा वागण्यानेच आपल्या लेकाने आत्महत्या केली हे तिला पटू लागलं पण लता कुणाचंही ऐकण्याच्या पलिकडे गेली होती.
मालेकर तिच्या तनुला श्रुंगारत होता. तिची गात्र न् गात्र त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेली असायची.
अगदी निर्भिडपणे आत्ता लता मालेकराकडे प्रणयसुखाची मागणी करी व तोही तिला पुरेपूर प्रणयसुख देई.
नियतीने गणित मांडायला सुरुवात केली.
लताला मालेकरापासून दिवस राहिले. ते कळल्यावर तिच्या सासूने ट्रेनखाली जीव दिला. जाताना आपल्या नातीलाही बरोबर घेऊन गेली. कुणासाठी नाही पण आपल्या मुलीसाठी मात्र लता खूप रडली. चाळीने एक व्यभिचारी बाई असं लेबल तिला लावलं.
मालेकर तिला लग्नाची स्वप्न दाखवू लागला. घटस्फोट घेतल्यावर लगेच पाचेक महिन्यात लग्न करु म्हणून सांगू लागला व तिच्याकडून शरीरसुख घेत राहिला.
एके दिवशी लता नेहमीप्रमाणे मालेकराच्या खोलीवर गेली तर त्याच्या खोलीला भलंमोठं कुलुप होतं. मालेकर तिला काही न सांगता,पत्ताठिकाणा न देता ती रुम विकून निघून गेला होता.
लताने आणखी पंधरा दिवस त्याची वाट पाहिली. रोज ती मालेकराच्या खोलीजवळ जाई. भले मोठे कुलुप पाहून परत येई. आत्ता तर तिथे नवीन बिराडही रहायला आलौ. चाळीतल्या बायका लताशी बोलत नव्हत्या.
शेवटी लताने मुल पाडायचं ठरवलं. डॉक्टरांकडे गेली पण डॉक्टर म्हणाले की आत्ता फार उशीर झाला आहे. तिला मुलाला जन्म देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
चाळकमिटीने तिला खोली विकून निघून जायला सांगितलं. लताने ती खोली विकली व एका महिला अनाथाश्रमात राहू लागली.ं
नंदाताईंनी अशा कुमार्गाला गेलेल्या महिलांसाठी ‘तेजोमय’ आश्रम चालू केला होता. तिच्यासारख्या बऱ्याच मुली,स्त्रिया तिथे होत्या. आश्रमात नेमून दिलेली कामं लता करु लागली. तिथले डॉक्टर नियमित तिचं व तिच्यासारख्या इतरजणींच चेकअप करायचे.
या भरकटलेल्या युवतींना योग्य मार्गदर्शन करुन,त्यांना स्वतःच्या पायावर उभं रहाण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण करणं व त्या अनुषंगाने त्यांना विविध संधी उपलब्ध करुन देणं हे या आश्रमाचं उद्दिष्ट होतं.
लताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचे घारे डोळे पाहून तिला मालेकरच्या घाऱ्या डोळ्यांची आठवण आली व तिला त्या बाळाचा जाम तिटकारा आला. लता त्याला अंगावरचं दूध पाजायलाही तयार होईना. शेवटी नंदाताईंनी त्यांच्या मनोविकारणतज्ञ लेकाला बोलावून घेतलं.
डॉक्टर परागने लताचं सारं म्हणणं ऐकून घेतलं. लता शेवटी रडू लागली. ती म्हणाली ,”डॉक्टर, मला जगायचं नाही. माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत. माझ्यामुळेच माझा नवरा,माझी सासू,माझी पोटची लेक मला सोडून गेली. या मालेकराची निशाणी मला डोळ्यासमोर नको आहे.” डॉ.परागने तिला समजावलं,”लता, हा जरी मालेकराचा अंश असला तरी तुझ्या रक्तामासाचा गोळा आहे तो. त्याला तू जसे संस्कार देशील तसा तो वाढेल. तुमच्या चुकीची शिक्षा त्या निष्पाप बाळाला देऊन तुझ्या पापाचा घडा अजून भरु नकोस.”
“पण डॉक्टर मला नाही जगायचं.”
“असं नको म्हणूस. मागे केलेल्या चुकांत गुंतून राहू नकोस त्यातून धडा घे व पुढे पाऊल टाक. अंधारात लपलेल्या प्रकाशाच्या किरणाला शोध. तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर,लता. या वाटचालीत आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोत. तू शिकलेली आहेस. नर्सिंगचा कोर्स कर. रुग्णांची सेवा कर. तुझ्या बाळाला मोठं कर आणि तुझ्यासारख्या वहावत जाणाऱ्या युवतींना तुझं उदाहरण देऊन दलदलीत जाण्यापासून पराव्रूत्त कर.”
डॉक्टरांच म्हणणं लताला पटलं. लताने नर्सिंगचा कोर्स केला. स्वतःच्या पायावर उभी राहिली. पुढे तिने जागा घेऊन छोटसं घर बांधलं.
तिचा लेक ललितही बघता बघता मोठा झाला. ‘तेजोमय’ आश्रमाशी लताचे ऋणानुबंध कायमचे जोडले गेले. शाळाकॉलेजातल्या मुलांमुलींना लता व्याख्याने देऊन क्षणिक मोहापासून पराव्रुत्त करु लागली. आश्रमाने व डॉक्टर पराग यांनी लताला व तिच्या बाळाला समाजात पुन्हा नव्याने उभं रहाण्याची उमेद दिली.
——–गीता गजानन गरुड.
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.