Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ राकेश मेहता

आमच्या बारावीच्या बॅचचे गेटटूगेदर संपुन चार दिवस झाले असतील,इतक्या संख्येने मिंत्रमंडळी येतीलच अशी खात्री नव्हती,
सर्वानी यावं ही इच्छा होती,शंभरजण आले होते सर्व मित्रमैत्रिणींच्या चेहऱयावर आनंद,समाधान ओसंडून वाहत होतं, किमान तीस वर्षांनीं सर्वजण भेटले होते, हजर असलेल्या जवळपास सर्वानाच आपले शाळा,कॉलेजचे दिवस आठवले,आपापल्या आजपर्यंतच्या सुखदु:खाना मनसोक्त वाट करून दिली होती, कांहींना आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलाबी गाठीभेटी आणि न झालेले मिलन त्याची ओढ आठवून गेली, रात्री झालेल्या मित्रांच्या ओल्या पार्टीत या गोष्टी आपोआप बाहेर पडत होत्या, तेव्हा समजल्या,कोणी,कोणाला कसे आवडत होतं,
या ही गोष्टी समजत होत्या अगदी चेष्टा मस्करी करत पुन्हा भेटू,…. भेटत राहू अशा आणाभाका घेत  निरोप झाले, मजा म्हणजे सर्वजण व्हाट्सआप ग्रूप मुळे जोडले गेले होते,
हे नात्यांचे कवित्व चालू झाले आणि गेट टूगेदर नन्तर चार दिवसानी अजितला कॉल आला….! मोबाईल स्क्रीनवर
नाव झळकलं, प्रतिमा वालावलकर…. बरं,

असे अनेक फोन कॉल्स येत होते. हा ही तसाच आला असावा, कारण अजितने गेटटुगेदरचं उत्तम नियोजन केलं होतं, त्याची विशेष छाप पडली होती, हे कौतुक ग्रुप मध्ये चालले होते, ते वाचूनच त्या अनुषंघाने हा कॉल असावा,

अजित बोलला,”हा बोला प्रतिमा मॅडम,” काय म्हणताय ?
“अरे मला तू मला विसरला नाहीस,” भाग्य माझं….! प्रतिमाने एकदम विचारले,

अजित म्हणाला…” हो ,नाव सेव्ह आहे”
कारण आपल्या ग्रुपवर ऍड करण्यासाठी पोस्ट केलेली सर्व नावे, नंम्बरसह सेव्ह आहेत,
तू प्रतिमा वालावलकरना ?

अरे हो,  पण….. मी रिसबुड हेमा….!रिसबुड सरांची मुलगी,

झालं अजितच्या डोक्यात वीज चमकली, हेमाच्या(प्रतिमा)लग्न होऊन किमान 27 वर्षे झाली,असतील,
आज एकदम मला ओळखलंस का? असा प्रश्न ….?
अजित भानावर आला …..

“अग, बोल…हेमा काय म्हणतेस कशी आहेस ? आणि
तू गेट टुगेदर ला का नाही आलीस ?
आह्मी अनेकांना मिस केलं, तू आली असतीस तर खूप मजा आली असती…!

हेमा रिसबुड ही,आमच्या मराठी विषयाचे रिसबुड सर, यांची एकुलती एक मुलगी, लाखात देखणी,अगदी चित्रपट तारका शोभावी अशी……!
मराठीच्या नोट्स,वक्तृत्व स्पर्धेच्या तयारीच्या निमित्ताने, हेमाच्या घरी,अर्थात रिसबुडसरांकडे,फेऱ्या होत असत, त्या वेळी खूप गप्पा पण होत असत,आयुष्यभर असंच बोलता यावं, ही अजितची भावना, मनातल्या मनात असायची,
बरं इतकं,वर्णन मनात पक्कं आहे, भावना ओल्याच असल्या सारख्या आहेत, म्हणजे अजितकडून हेमाच्या प्रेमनगरला प्रवास सुरु झाला होता,
पण, गाडी चुकली होती……!
ही खंत,मनात ठेवूनच तो जगत होता,
आज नकळत पुन्हा ती उफाळून आली,
आयुष्यात, तसं ते गाव खूप मागे टाकुन पुढे आला होता, तरीपण तिच्या विषयीची आपुलकी जागी झाली,
हेच, हेमाच्या फोन कॉलने पुन्हा अधोरेखित होतय, हे अजित व  हेमाला आपापल्या जागी राहून चांगलच लक्षात आलं होतं,
हेमासाठी, वर्गमित्रांच्या ग्रुपवर,अजितचे कौतुक हे निमित्त होतं आणि
अजितसाठी, ती गेटटूगेदर साठी न येताच,कौतुकाचा फोन कॉल म्हणजे सुखद धक्का……!
आज, जे होतंय ते फार अनपेक्षीत, पण सुखद वाटत होतं,
अजितने, संभाषण संपवून झटकन तिचा व्हाट्सप डीपी पाहिला
आणि
कस सांगू, सांगू किती
सौन्दर्याची तुझ्या
वाटायची भीती…..!
ते वयच होतं सोळावं…..!
घाबरायचं नसून,
बरसायचं कसून
हे कसं कळावं…?
अल्लड होतं, धडधडत होतं हृदय आतून,
आज सुद्धा छान दिसतेस
लाघवी हसतेस
मला पाहिल्यावर,
गालावर लाली मस्त ठेवतेस,
झुरत होतो, आजही झुरतोय
मरत (प्रेमात)होतो म्हणतात ना
आजही मरतोय,
पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचे आहे, नाही,नाही
मला एकदा तुझ्या प्रेमात जगायचे आहे,

अशी काहीतरी एक वेगळीच स्तिथी अजित ची झाली,
पण भानावर आल्यावर,अजित थोडा विचारात पडला, आज एकदम ओळखले का ?
हेमाला, असं का विचारावं वाटलं  ? आणि आपल्याशी बोलताना जवळचे काहीतरी हरवल्यासारखी बोलत होती,म्हणजे तसं वाटतं तरी होतं, काय झालं असेल ?

आकस्मिक आलेल्या या उपप्रश्नने मात्र मनात घर केलं,  पुन्हा तिला फोनकॉल करावा की न करावा, तिचा परत फोनकॉल येईल का हा नविन प्रश्न ?
अहमदनगर सारखं मस्त शहर,
कुमार वालावलकर एक बांधकाम व्यवसायिक नवरा.. शहरात फ्लॅट्स,फार्महाऊस असं गडगंज स्थळ, एकच अपत्य मुलगी काव्या, ती सध्या मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला,
हे सर्व सुरळीत आंनदी,सुखद दिसत असताना ती नेमकी कुठं हरवली आहे ?
अगदी धुक्यासारखं, अस्पष्ट, पण…. काहीतरी
नक्किच जाणुन घेण्याचं राहतय,असलं एक वातावरण मनाचं करून टाकलंन, बाकी
गेल्या महिन्याभरात झालेल्या फोन कॉल्स मधून इतकं समजलं, तिचे कॉल्स सुरूच होते,
एक दिवस अचानक हेमा म्हणाली,
अजित
तू तुझ्या भावना, तेव्हा का नाही व्यक्त केल्यास ?” अजित गोंधळालाच,
“हेमा,तुला इतकं आता वाटतय, मग तू तेव्हा का नाही विचारलेस”
पण अजित हा प्रश्न विचारायचे धारिष्ट्यच करू शकला नाही
आणि हाच मुखदुर्बळपणा, भिडस्त स्वभाव, हेमा आणि त्याच्या मध्ये आला होता,
आज त्याची परिस्थिती बदलली आहे,तसा सुखात ही आहे,
आज,हेमाला खरंतर एक आश्वासक, मैत्रीचं आणि स्नेहाच नातं हवं होतं, एक सखा, मित्र तिला हवा होता,
मनातलं सगळं सगळं काही सांगू शकता येईल, असा मित्र….जो अजित मध्ये दिसत होता,
अजितला हे चकित करणारं पण नक्कीच आपण हेमाच्या मनात घर करणारं व्यक्तीत्व आहोत हे समजलं, एक दिवस….
अजितने हेमाला विचारलेच,
“अग, इतक्या वर्षात तुला एकही मैत्रीण नाही मिळाली या गुंणाची ?
जिच्या कडे तुला व्यक्त होता येईल ?
हेमा गप्प…..!

हेमाचा नवरा संशयी आणि रुक्ष असल्याचा तिला खूप त्रास होत होता, “माझं तुझ्यावर प्रेम आहे”…! हे फक्त तोंडाने बोलणारा,
पण प्रेमाचा ओलावा कधीच न दाखवणारा,
हे तिने अगदी स्पष्टपणे अजितला सांगितले होते आणि एक मनात घर करून बसलेली
गोष्ट सांगितली होती, त्या बाबतीत ती अगदीच भाबडी ठरावी असं…!

तिला अहमदनगर खूप आवडायचं, हे तिच्या मामाचं गाव,आयुष्यात ती जेव्हा कधी आईला सोडून राहिली असेल ना तर ती फक्त अहमदनगरलाच राहिली, बाबांच्या बदलीच्या काळात, तिच्या कॉलेजजीवनात शेवटच्या तीन वर्षाचे शिक्षण तिने इथेच घेतले होते, या कालावधीत मामाच्या जवळ राहणारे,
कुमार वालावलकर, यांनी हेमाला पाहताच,
“लग्न करीन तर हिच्याशीच करीन”
असं घरी निर्णायकवृत्तीने सांगितलं होतं,
इतकं मजबूत स्थळ,भाची सुखासमाधानाने राहिल, जवळ राहील, तिला मनाजोगतं शहर पण मिळेल, झालं हेमाच्या मामांनी पुढाकार घेऊन हे लग्न पार पाडलं सुद्धा,
पण या गावाशी नाळ जुळलेली हेमा,नवऱ्याशी सुन्दर रित्या नाळ जुळवून घेऊ शकली नव्हती, कारण त्यांना हवं होतं एक सुंदर जोडीदार आणि तिला हवा होता,मनातील राजा,
पण उच्चशिक्षित घराणे, त्यांची मनं, वृत्ती सहज असेल असं समजून,
तिने सहज होकर दिला,
पण ती एका रुक्ष आणि हेकेखोर पुरुषाची शिकार ठरली,
लग्नाच्या पहिल्या चार दिवसांतील, तिची एक सुगंधीरात्र संपते ना संपते तोच,
संसाराचा भयानक पहिला आठवडा, हे असला दिनक्रम दाखवणारा माणूस पुढे, नेमकं काय  दाखवणार आहे काय माहिती ? पण,असले शेकडो प्रसंग, नजर अंदाज करत तिने आज शेवटी नजरंदाज करण्याचं सोडून दिले, वालावलकर इभ्रतीचा पत्त्याचा बंगला चांगला कसा दिसेल हे पहायचे, पण आपलं, आपल्या हक्काच्या माणसाचं आपल्या वागण्यानं, समोरच्या मनाचं काय होतंय हे न पाहणारे, सारच कठीण होतं खंर……!
या सर्व पार्श्वभूमीवर, ती कंटाळली होती,
कारण तिला मायेचं, प्रेमाचा ओलावा देणारं आपलं माणूस हवं होतं, जे मिळत नव्हतं,
नवऱ्याला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले,
पण ओलावा नसलेलं पुरुषी प्रेम वाट्याला आलं, तिला एक जाणीव झाली होती,
“आवडत गाव आपलसं झालं”
“तरी प्रारब्ध बदलेल असे नाही”,
या मनःस्थिती मध्ये तिला अजित दिसला,
तो आपल्या मित्रमैत्रणीच्या ग्रुप मधील आनंदी, दिलखुलास,सर्वांचे मन ओळखून वागणारा सर्वांचा बालसखा…..मस्त माणूस,

एकदा अजितने हेमाला विचारले “तुला अशा गुणांची मैत्रीण नव्हती का?”
तेव्हा तिने सांगितले होते, साऱ्याच जणी आपल मन मुक्त करायला, मैत्री करत होत्या, ‘पण आपलं मन पारदर्शीपणे व्यक्त करायला धजत नव्हत्या’, अशात माझं ऐकणारे कोणतरी हवं होतं, हवा होता एक मित्र जो नात्यात फक्त विश्वासावर जगत असेल, नात्यांची कदर करणारा असेल, आणि नक्कीच सर्वाना हवाहवासा वाटणारा अजित हा तर माझा जुनी ओळख असलेला, पण आज त्याची खरी माणूस म्हणून नव्याने ओळख झालेला,

अजितचा आज विश्वास मिळावा म्हणून खरोखर, त्या वयात जे सांगता आले नाही, ते आत्ता सांगितले, मला तुझ्याशी लग्न करायचे होते, जेणेकरून अजितला खात्री पटावी की मी अजून किती प्रेमात किंवा किती तुझा सन्मान करते, ……….या उपर जो विश्वास ठेवला जाईल त्यावर  मैत्री,ओढ टिकवून ठेवता येईल, आवडत्या गावाने छप्पर दिले, पण मन जपणाऱ्या व्यक्तीने मनाच्या मजबूत भिंती दिल्या तरी खूप आहे,
प्रारब्ध बदलता येणार नाही, पण,खात्रीनं मन मोकळं जगता तर येईल

हा विश्वास जगवून आपण हेमाला आधार द्यायचा,
या सर्व घडामोडी नन्तर अजितला  लक्षात  आलं, लग्न नाही पण एक पारदर्शक मैत्री, करून किमान आपल्या आवडत्या मैत्रिणीला मदत करु शकतो, म्हणून ही सर्व हकिकत त्याने उशिरा पण जशी घडली तशी आपल्या पत्नीला सौ मोहिनीला सांगितली,या पारदर्शी नात्याची माहिती दिली आणि एक विनंती केली की आपण दोघांनी मिळून हेमाला मानसिक आधार द्यायचा………….झालं, अजित आणि हेमा चे फोन कॉल्स चालू राहिले, या तिघांचं एकत्र येणं  सुरू झालं, मैत्रीचं एक मस्त त्रिकुट जमलं,अनोखी मैत्री सुरू झाली,पण, का कोणास ठाऊक
हेमा एक गोष्ट नक्की पुन्हा बोलू शकली नाही, अजित मला तू खुप आवडतोस आणि मला असाच नवरा,एक सच्चा दिलखुलास मित्र हवा होता, मोहिनीतील स्त्री थोडी का होईना जागी झाली होती,पण, त्या स्त्रीला अजित आणि हेमा मध्ये  खरंच काहीही वावगं सापडलं नाही, आणि हे भेटणं चालू होतं, मोहिनीने हे सर्व, एक उत्तम माणूस, मित्र म्हणून आपल्या नवऱ्याला आधार दिला……..
मन म्हणजे अथांग खोली खूप काही सामावून घेते,आपल्या सुहृदयांच्या सुखाचा आनंदाचा विचार,आणि भावना सुद्धा, काही वेळा अजित मात्र खरंच सुखावून जात असे आणि कधी कधी विचारात पडत असे
हेमा मैत्रीण की प्रेयसी,
मोहिनी पत्नी की सर्व बाजू समजावून घेणारी उत्तम मैत्रीण…..!
विश्वास, ही मनाची एक पातळी बरंच काही देऊन जाते, प्रारब्धच आपल्या आयुष्याची खरी व्याख्या लिहून आणि खरी करून जातं,
तिघांची ही अवस्था आनंदी पण तिन्ही मनं कायमच……प्रारब्धाला एक अस्पष्ट असा सवाल करत राहिले….! माझ्याच बाबतीत असं का ?

लेखक… 

श्री राकेश मेहता, महाड

9881479214

9403024934

====================================

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *