Skip to content Skip to sidebar Skip to footer

प्रपंच भाग ७

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

प्रभाकरच्या बिछान्यावर रतनशेटचा मोगरा भरदुपारी फुलू लागला.

आजुबाजूच्यांना कुणकुण लागली खरी पण रतनशेटसारख्या गुंडाचं नाव घेण्याची कोणाची बिशाद नव्हती. शेजारपाजारच्या बायांनी चांदणीशी बोलणं सोडून दिलं होतं. चांदणीला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. तिच्या अंगप्रत्यंगात रतनशेट भिनला होता. आताशी ती रतनशेटसोबत पळून जाण्याची स्वप्नं बघायची.

अशा कितीक दुपारी  त्या वर्षदिडवर्षात चांदणी व रतनशेटच्या प्रणयावेगात रंगल्या होत्या. उन्हाने तापल्या धरतीवर वळीवाचा पाऊस पडावा नं तिच्यातील आग बाष्परुपाने बाहेर पडावी तशी चांदणीच्या देहाची आग रतनशेटने विझवली होती.

सुट्टीला तारी घरी असली तरी रतनशेट यायचा..मग नुसतं तारीकडेच एकटक बघत रहायचा.
—————————————––———
चांदणीला वाटायचं,’ रतनशेट आपल्यासाठी तळमळतोय, आपल्या दर्शनासाठी येतोय, आपण पुरा मजनू केलाय त्याचा. ह्या तारीला यावेळेला कुठंतरी मैत्रिणीकडं पाठवावं, दाराची कडी आतून लावावी नि झोकून द्यावं स्वतःला रतनशेटच्या बाहुपाशात. त्यानं आपली वस्त्रं फेडावी, आपण त्याला नववनीन रतिक्रीडा करुन रिझवावं.

त्याची नि आपली गात्रं नं गात्रं थंड करावी नि त्याच्या केसाळ छातीवर डोकं ठेवून त्याच्या छातीची आपल्यासाठी चालू असलेली धडधड डोळे बंद करुन ऐकत रहावं. त्याने कितीतरी वेळ पुन्हापुन्हा केलेलं आपल्या डाळिंबी ओठांचं रसपान, आपल्या केतकीदेहावर उमटवलेल्या त्याच्या  बोटांच्या खुणा मग तो पुन्हा येईस्तोवर आंजाराव्या गोंजाराव्या.

न्हाताना त्याने उमटवलेले वक्षकमलांवरील व्रण बोटांनी चाचपावे नि ते धुंद क्षण आठवून खुदकन गालात हसावं, उरोजांवर पाण्याची धार सोडत म्हणावं,”अगदीच बाई घाई तुम्हाला. सावकाशीनं घ्या जरा. शेठ आले की करतील हो लाड तुमचे.”

एकीकडे चांदणीचं असं तर दुसरीकडे तारीही रतनशेटच्या जाळ्यात अडकत चालली होती. त्याच्या नजरेचे बाण तिच्या ह्रद्यात अचूक रुतले होते. तारीला वाटायचं..’रतनशेटची मधाळ नजर लालबुंद सफरचंदावरुन चाकू फिरावा तशी आपल्या प्रत्येक गुलाबी अंगाला भेदून पार  होतेय. त्याचे सुरमा घातलेले मदमस्त डोळे आपल्याकडे कशाची तरी मागणी करताहेत.

आपल्यासाठीच येतो हा. मिशापण कशा पिळदार नी मिशीच्या वरची ती तिरपी खूण कशी शोभून दिसतेय. बंबात जाळ नुसता नैतर कॉलेजातली हडकुळी पोरं! रतनशेठचं अंगावरुन मोरपिसासारखी नजर फिरवणं कुठं नि कुठं त्या मिसरुड फुटलेल्या पोरांचं दात काढून खिदळणं, शिटी वाजवणं. रतनशेटकडे ट्रेनिंगला पाठवायला हवं त्या पोरांना.’

चांदणी रतनशेटसाठी वेलची,आलं घालून कडक चहा करायची. बशीतनं त्याने चहा प्यावा नि आपण नजरेने त्याचा ठाव घ्यावा,त्याने मग नजरेनेच खुणावून उष्टावलेली बशी आपल्या ओठी लावावी..ती विचार करायची..रतनशेट  इतका देखणा तरी आपण सोडून इतर कुणाचा विचार करत नाही, याला कारण आपली रसरशीत काया..मुलं वयात आली तरी आपला चवळीचा बांधा अजुनही जसाच्या तसा आहे. प्रत्येक वळणावर रतनशेटने त्याच्या अधरांचे ठसे उमटवलेत.

तारी मात्र रतनशेटच्या लाघवी बोलण्यावर भलतीच भाळली होती. त्याला आपलं काळीज देऊन बसली होती.  चांदणीचा देह, तिचा प्रणय आता रतनशेटला सपक,मिळमिळीत वाटू लागला होता. त्याला आता नवीन मासोळी हाकारत होती,तारीच्या रुपात.

रतनशेटला हवं होतं मिष्टान्नाचं,पंचपक्वान्नाचं ताट जे तारीच्या रुपात चांदणीने त्याच्यासारख्या आडदांड बाप्यासमोर सहज वाढून ठेवलं होतं..कोवळी लुसलुशीत काकडी जशी पेरापेरानं साखर भरलेली तारी..रतनशेटला आता चाखावीशी वाटू लागली होती. तारीला सेंट, लाली, पर्स,ड्रेस अशा छोट्यामोठ्या भेटवस्तू गुपचूप देऊन तिच्यावर आपल्या मोहाचं जाळं टाकण्यात तो यशस्वी झाला होता.

रतनशेट तारीला गाडीवरनं दूरवर हिंडाफिरायला न्हेऊ लागला. तिचं कॉलेज बुडवून तिला सिनेमाला घेऊन जाऊन थिटेरात तिच्यासोबत हवे तसे चाळे करु लागला होता.

तारीच्या वयात येणाऱ्या तरुण देहाला रतनशेटचे अनुभवी स्पर्श हाकारत होते. रतनशेटचा रुबाब, अंगावरलं मणभर सोनं, गाड्या, पैसाअडका पाहून तारी त्याच्याकडे ओढली गेली..आणि रतनशेटने डाव साधला..बेत आखून तिला पळवून न्हेली.

तारी पळून गेल्याने प्रभाकरची नाचक्की झाली होती तर चांदणीला नेमकं कसं दु:ख व्यक्त करावं हे कळतच नव्हतं.

“पप्पा,रतनशेट दुपारी बरेचदा आपल्या घरी यायचा. शेजारी म्हणत असताना ऐकलं मी . बरीच कुजबुज चाललेय त्यांची. मी गेलो की गप्प होतात.” भिंतीवर हाताची मुठ आपटत दिपक म्हणाला.

सारा प्रकार प्रभाकरच्या ध्यानात येऊ लागला तसा त्याच्या डोळ्यांत अंगार फुलला.त्याने चांदणीकडे पाहिलं. तिच्या कानाखाली तीनचार वाजवतच राहिला. सटासट जाळ काढला. दिपक उठून बाहेर गेला होता.

”दुपारी रतनशेठ आपल्या घरी..कशासाठी.. का..मी कुठे कमी पडलो होतो तुला,चांदणी… जीव द्यायची पाळी आणलात. बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीत. एकाच पुरुषासोबत मायलेकी दोघी..प्रभाकरचा आकांत सुरु होता. तो भिंतीवर डोकं बडवून घेत होता. मायलेकी दोघीही बनाव..रंगेल म्हणत होता.

दाराच्या पायरीवर धनंजय उभा होता. सारंगच्या लग्नाविषयी प्रभाकरच्या कानावर घालावं म्हणून तो असा मधेच आला होता. धनंजयला पाहून प्रभाकर शांत झाला. चांदणीने तेलपाणी लावून केसाच्या झिपऱ्या बांधल्या. तोंड धुतलं नि स्वैंपाकाला लागली.

घरातलं वातावरण पाहून धनंजयने ताडलं की नको त्यावेळी आपलं येणं झालंय.

प्रभाकरने तारी पळून गेल्याचं धनंजयला सांगितलं नि लहान मुलासारखा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. आपली बायकोही त्या मवाल्याच्या नादाला लागली होती नि आपल्याच घरात आपल्या बायकोला तिच्या संमतीने त्याने सतरांदा उष्टावली हे कोणत्या तोंडाने सांगणार होता तो भावाला! तेवढं धैर्य झालं नाही त्याचं. झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणतात तेच खरं. बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड जिला तडा गेला होता.

धनंजयला त्या वातावरणात सारंगच्या लग्नाचा विषय कसा काढायचा तेच कळत नव्हतं..पण तसंच हात हलवत घरी गेला असता तर मालतीला,सारंगला काय उत्तर देणार असता!

लग्न झाल्या दिवसापासनं मालतीच्या नशिबात दु:ख रेखाटलं होतं..आता कुठे सुखाची चाहूल लागत होती आणि त्यासाठी दिराकडे एक भाऊ या नात्याने ती पहात होती. मालतीचे प्रश्नार्थक डोळे धनंजयसमोर येऊ लागले. आरोहीसोबत लग्नगाठ बांधायला आतुर झालेला सारंगा त्याच्या नजरेसमोर येऊ लागला. शेवटी त्याने आजच काय तो सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं.

त्याच निरस वातावरणात डाळतांदळाची खिचडी,भाजीपोळी भावाभावांनी घशाखाली ढकलली.

जेवणं झाली तशी धनंजय खाकरला व म्हणाला,”प्रभा, थोडं बोलायचं होतं..म्हणजे महत्त्वाचं आहे म्हणून नाहीतर तुमची ही अशी बिकट परिस्थिती असताना मी हा विषय काढायलाच नको होता. पण तुझ्या पोटच्या मुलासंबंधी आहे म्हणून म्हंटलं तुझ्या कानावर घालावं.”

“काय ते सांगून टाक एकदा धना.”

“आपला सारंग प्रेमात पडलाय प्रभा.”

“कोणाच्या?”

“आरोही पुंडलिक(दादासाहेब) गावडेच्या.”

“काय..आणि तुम्ही मला हे आता सांगताय..एवढ्या उशिरा..”

“गैरसमज करुन घेऊ नकोस प्रभा.मलाही दोन दिवसांपूर्वी कळलं. दादासाहेबाना भेटून आलोय. ते तयार झालेत सोयरिकीला.”

“ज्या दादासाहेबाने वडाच्या पारासमोर मला लोळवला होता..माझ्या कपड्यांच्या चिंधड्या होईस्तोवर मला मारला होता..त्याचीच पोरगी मिळाली सारंगाला प्रेम करायला!गावातल्या बाकीच्या पोरी काय ओस पडल्या होत्या!”

“बघा बा पोरं तुमची. मी नाही म्हंटलं तरी निपुत्रिक. प्रभा,तुझ्या पोरांना तू कधी जवळ घेतलं नाहीस की माया लावली नाहीस,कधी धडुत कपडा त्यांच्यासाठी पाठवला नाहीस पण मी पोटच्या पोरावानी सांभाळलय त्यांना. पळूनबिळून गेली तर गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही.”

“हो खरंय तुझं बोलणं. खरंतर माझीच पापकर्म फळताहेत. उगी राहून बघावं लागणार. हे पाकिट घे यात पेसे आहेत. सुनेला मंगळसूत्र.. इतर खर्च कर..मला काही येतायेईलसं वाटत नाही.”

प्रभाच्या खांद्यांना धरत धनंजय म्हणाला,”कसंं सांगू प्रभा तुला..फार ऋणी आहे मी तुझा. ये नक्की लग्नाला. या दिपकलाही घेऊन ये. बापाचा गाव दाखव त्याला.”

यावर दिपक आतुरतेने म्हणाला,”हो काका, मी नक्की येईन लग्नाला. मलाही आपला गाव बघायचा आहे.”

धना घरी जाताना विचार करत होता,’केलेल्या कर्माचं फळ याच जन्मात भोगावंं लागतं. प्रभाने मालतीचं पत्नीसुख अव्हेरलं.दुसरा घरोबा केला. तिला काय हवं नको ते पहाण्याचीही त्याला गरज वाटली नाही.

मालती वहिनी खरी साध्वी. रागलोभाच्या पलिकडे गेलेली..आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले. माहेराची वाट धरली नाही. आम्ही देत होतो त्या चटणीभाकरीतच आमच्या छायेखाली काबाडकष्ट करत राहिली.

थोरल्या वहिनीला आई मानते. तिच्या संधीवाताचा उद्रेक मालतीमुळेच सुसह्य होतोय तिला. कुठे बाम चोळ..कुठे निगडीच्या पानांनी शेक दे..चाललं असतं. लेक करणार नाही एवढी सेवा करतेय. गेल्याजन्मीची लेकच असावी आमची..’ अशा विचारांत त्याचे बंद डोळे झरु लागले.

रात्री पुन्हा सारंग व आरोही भेटले. स्थळ अर्थात चांदण टेकडी. आकाशाने चांदणशाल पांघरली होती. त्या टेकडीवर हे दोन प्रेमी जीव आणि भोवताली हवाहवासा गारवा. आरोही आकाशी रंगाचा चुडीदार घालून आली होती. 

क्रमश:

===================

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/

प्रपंच भाग २ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/

प्रपंच भाग ४ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/

प्रपंच भाग ५ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/

प्रपंच भाग ६ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/

प्रपंच भाग ८ :

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-part-8/

=================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Arati
    Posted Mar 11, 2022 at 10:10 am

    Khup chan mandaliy katha
    Waiting for Next part

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.