Ritbhatmarathi

Search
Close this search box.

Posco Act in marathi | जाणून घ्या काय आहे पॉस्को कायदा 2012 आणि त्या कायद्यासंदर्भातील गुन्हे

Posco Act (पॉस्को कायदा) संपूर्ण माहिती:

निर्भया हत्याकांडानंतर बालकांस अत्याचारांपासून संरक्षण मिळावे,  बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे बालपण, यौवन याचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे ह्या मुख्य हेतूने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२’ (Posco Act) या नावाने केंद्र सरकारने बालकांचे संरक्षणार्थ २०१२ साली विशेष कायदा पारित केला.

आपला देश,आपली संस्कृती,आपले विचार ही आपल्या समाजाची वैशिष्ट्ये…!भारताबद्दल बोलायचं झालं तर ‘भारतमाता की जय’ हि आपली घोषणा..! आपली भारतभूमी आपण आपल्या मातेसमान मानतो..थोडक्यात उच्च स्थान देतो. हे आपले वैशिष्ट्य. पण या भारत मातेच्या कित्येक
निर्भया काही विकृत मानसिकतेच्या बळी पडतात. आणि कुठेतरी आपली संस्कृती सुद्धा…..!

Table Of Contents:

1. निर्भया केस पार्श्वभुमी

2. पॉस्को कायदा (Posco Act) म्हणजे काय?

3. पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हे व त्यासाठीची शिक्षा

4. पॉस्को कायद्यातील सुधारणा | Revised Posco Act 2018
1. निर्भया केस पार्श्वभुमी

तो दिवस होता १६ डिसेंबर २०१२..!एक वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तिच्या एका मित्रासोबत रात्री लाईफ ऑफ पाय नावाचा चित्रपट पाहून घरी परतत होती.वेळ होती रात्रीची ९:३०. एक प्रायव्हेट बस त्यांच्या समोर थांबली आणि त्यांना तिथून घेऊन ती बस निघाली त्यावेळी त्यात ६ जण होते, विशेष म्हणजे त्यांच्यात एक अल्पवयीन मुलगा सुद्धा होता.
जेव्हा नेहमीच्या मार्गाऐवजी ती बस दुसऱ्या मार्गाने निघालो तेव्हा तीच्या मित्राला संशय आला आणि त्याने जाब विचारला तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला , एकाच वेळी ईतर सगळ्यांनी त्याला मारहाण केली आणि तो बेशुद्ध होऊन कोसळला  त्यानंतर त्यांनी निर्भयाला गाडीच्या मागे ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. काही लोखंडी अवजारांचा सुद्धा उपयोग केला आणि तिला मारहाण केली पण या रणरागिणी सुद्धा प्रतिकार केला पण तो प्रतिकार कमी पडला.
त्यांनी एका निर्जन स्थळी चालत्या बस मधून या दोघांना बाहेर फेकल.तिथे जाणाऱ्या एका माणसाला हे दोघे नजरी पडले आणि त्याने पोलिसांना रिपोर्ट केलं.या दोघांना हॉस्पिटल मध्ये जेव्हा दाखल केल तेव्हा निर्भया गंभीर जखमी अवस्थेत होती.तिच्या शरीरावर भरपुर मोठ्या प्रमाणात ईजा झालेल्या दिसत होत्या , अगणित ठिकाणी चावे घेतलेल्या खुणा होत्या ,शिवाय एका गंजलेल्या रॉडचा उपयोग करून तिच्या गुप्तांगावर गंभीर जखम केलेली होती.अखेर पुढील उपचारासाठी तिला सिंगापूर मध्ये नेण्यात आले,पण अखेर दोन दिवसांनी तीची प्राणज्योत मालवली आणि या भारत मातेच्या एका लढवय्या सेनानी ने प्रकृती पुढे आपले हात टेकले.
जगभरातून या घटनेचा तीव्र निषेध झाला आणि राजधानी दिल्ली मधील महिला सुरक्षा हा मुद्दा चव्हाट्यावर आला. ही एक अतिशय गंभीर बाब होती. अंतर्गत सुरक्षा यंत्रणा, कायद्यातील त्रुटी या सगळया गोष्टी या उणिवा बाहेर पडल्या आणि एका प्रबळ कायद्याची सुधारणेची गरज निर्माण झाली आणि अस्तित्वात आला पॉक्सो कायदा (Posco Act)….!

2. पॉस्को कायदा (Posco Act) म्हणजे काय?

‘बालक’ ह्या संज्ञेमध्ये अठरा वर्षांखालील सर्व व्यक्तींचा समावेश होतो. बालक ही देशाची संपत्ती, उद्याची पिढी मानली जाते. बालकांस अत्याचारांपासून संरक्षण मिळावे,  बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, बालकांचे बालपण, यौवन याचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे ह्या मुख्य हेतूने ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२(Posco Act) या नावाने केंद्र सरकारने बालकांचे संरक्षणार्थ २०१२ साली विशेष कायदा पारित केला.

ह्या कायद्यामध्ये बालकांचे (मुली/मुले) लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्याकरिता तसेच अपराध्यास कठोर शासन करण्याकरिता तरतूद आहे. बालकांचे लैंगिक छळणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार, ह्या गोष्टींपासून संरक्षण व्हावे, ह्या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आला.

ह्या कायद्यांतर्गत विशेष न्यायालये स्थापन करून खटले चालवावेत असे म्हटले आहे. ज्या ठिकाणी अद्यापपर्यंत विशेष न्यायालयांची व्यवस्था नाही अशा ठिकाणी सत्र न्यायालयास हे खटले चालविण्याचे अधिकार आहेत. ह्या कायद्यान्वये तक्रार नोंद करतेवेळी पीडित बालकाची तक्रार महिला पोलीस अधिकारीमार्फत नोंदविली जाते. पीडित बालकाचे नाव गुप्त ठेवले जाते. बालकाची वैद्यकीय तपासणी त्याचे पालकांचे अनुमतीने केली जाते. रक्ताचे नमुने व इतर पुरावे तसेच बालकाचे वयाचा दाखला पुराव्यात घेतला जातो. पीडित बालकाच्या मानसिक अवस्थेचा विचार करून त्यास विश्वासाहर्ता वाटेल, अशा वातावरणात खटले चालविले जातात. सुनावणीसाठी बालकास वारंवार न्यायालयात यावे लागू नये, त्यास दबाव जाणवणार नाही, त्रास होणार नाही, ह्याची दक्षता घेतली जाते.

पीडित बालकाचे पुनर्वसन करणे, त्यास नुकसान भरपाई मिळावी, याची कायद्यात तरतूद आहे. पीडित बालक आणि बालक साक्षीदार शारीरिक अगर मानसिक दृष्ट्या दिव्यांग अगर विकलांग असल्यास न्यायालयात साक्ष नोंदविताना त्यांना अनुवादक अथवा विशेष शिक्षकाचे साहाय्य देण्याची तरतूद कायद्यात आहे. ह्या कायद्यानुसार बालकासमवेत करण्यात आलेला कोणत्याही प्रकारचा लैंगिक व्यवहार हा गुन्हा आहे.

3. पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हे व त्यासाठीची शिक्षा

[tablesome table_id=’8985’/]

4. पॉस्को कायद्यातील सुधारणा | Revised Posco Act 2018

वाढत्या अपराधांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०१८ मध्ये ह्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार वय वर्षे १२ खालील बालकांवर अंतर्भेदी लैंगिक हल्ला वा विकोपकारी अंतर्भेदी लैंगिक हल्ला केल्यास अपराध्यास फाशीची शिक्षा फर्माविली आहे. वयवर्षे १६ खालील बालकांवर लैंगिक अत्याचार केल्यास अपराध्यास २० वर्षे वा त्याहून अधिक सश्रम कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच अटकपूर्व जामीन न देण्याची तरतूद केली आहे. नवीन कायद्यानुसार तपासकाम दोन महिन्यांत पूर्ण करून सहा महिन्यांत खटला चालवून निकाली करणेचा आहे. ह्या कायद्यात सुधारणा केल्यामुळे निश्चितच कायद्याची जरब बसवण्यास व गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळेल.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल:

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds

मुखी तांबूल देते तुजला…

सौभाग्याचं लेणं…’ टिकली ‘…लावा पण जरा जपून…

Taliban in Marathi | तालिबान म्हणजे काय?
Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *