Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जाणून घ्या पॉडकास्ट म्हणजे काय? पॉडकास्ट बद्दलची संपूर्ण माहिती | podcast meaning in marathi

जाणून घ्या पॉडकास्ट म्हणजे काय? पॉडकास्ट बद्दलची संपूर्ण माहिती | podcast meaning in marathi:

1. पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? | podcast meaning in marathi

आजकाल समाजमाध्यमांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला व्हिडिओ ब्लॉग, किंवा हस्तलिखित ब्लॉग या गोष्टी सर्रास ऐकायला, पाहायला मिळतात. यांच्यासोबतच आणखी एक शब्द कानावर पडत असतो. तो म्हणजे’पॉडकास्ट‘(podcast).नेमकी ही पॉडकास्ट भानगड काय आहे? तर जाणून घेऊ या पॉडकास्ट बद्दलची संपूर्ण माहिती. (podcast meaning in marathi)
आपण आजकाल युट्युब वरती व्हिडिओ ब्लॉग (video podcast) पाहत असतो. बरीचशी वयक्तिक चॅनल्स आज सतत आपल्या फीड वर दिसत असतात. त्याद्वारे प्रस्तावित व्यक्ती ती एखाद्या जागी का गेली, कशासाठी गेली, कशी गेली काय काय अडचणींना सामोरे जायला लागलं हे आपल्या कॅमेरा द्वारे आपल्याला द्वितीय व्यक्तीच्या दृष्टीने/पक्षाने दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपण प्रत्यक्षात तिथे आहोत हा भास होत असतो.पॉडकास्ट मध्ये मात्र ध्वनीसंयुक्त ब्लॉग तयार केले जातात.म्हणजे सादर कर्ता हा आपल्या आवाजात रेकॉर्ड करून नियमितपणे प्रसारित करू शकतो.मुळात ही संकल्पना ब्लॉग पासून आली. बरीचशी पर्यटक मंडळी ब्लॉग लिहायची आणि प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध करायची. नुसते पर्यटन ब्लॉग असावे अस काही अट नव्हती. व्यक्ती अगदी कुठल्याही पर्यटनाची किंवा आपल्या दैनंदिन जीवनाशी सुद्धा माहिती मांडण्याच्या प्रयत्नात असतं.

पुढे त्याची जागा व्हिडिओ ब्लॉग ने घेतली आणि वरती सांगितल्याप्रमाणे सादर करणाऱ्या मंडळींची संख्या वाढत गेली. आणि मग मंडळींना आठवले पॉडकास्ट..! तशी पॉडकास्ट ही संज्ञा जुनीच. आधीच्या काळी रेडिओ माध्यमातून पॉडकास्ट प्रसारित व्हायचे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून रेडिओ द्वारे विविध कार्यक्रम आयोजित केले जायचे. बरेचशे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जाऊ लागले. ज्यामधून वेगवेगळे पॉडकास्ट करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यात येऊ लागले. मुळात पॉडकास्ट अतिशय कमी सामग्रित ,कमी खर्चात निर्माण करू शकतो याबद्दल जशी लोकांना खात्री पटू लागली तसे तसे पॉडकास्ट वापरणारे लोकांची एक वेगळी श्रृंखला तयार व्हायला लागली. पुढे ॲपल कंपनीने स्वतःची असा एक i-tune नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च केला. वर्षभरामध्ये बीबीसीसीबीसी, रेडिओ वन इत्यादी वाहिन्यांनी आपले पॉडकास्ट शो लॉन्च केले. आणि पॉडकास्ट मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस आला. मोठ्या प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या पॉडकास्ट कडे एक अतिशय छोटी, पण प्रसिद्ध गुंतवणूक म्हणून पाहतात. आणि येणारा परतावा सुद्धा योग्य त्या प्रमाणात स्थिर असल्याने आजसुद्धा पॉडकास्ट ट्रेंडी आहे.


2. व्हिडिओ पॉडकास्ट(video podcast):

एक नवीन प्रकारचा पॉडकास्ट you tube वापरकर्त्यांन मध्ये झालेली वाढ. त्यामुळे या प्रकारच्या पॉडकास्ट ची वाढती मागणी आणि त्यातून पुढे आली ही संकल्पना. यामध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे व्हिज्युअल समोर व्हिडिओ मध्ये दिसत असते. आणि आपला पॉडकास्ट चालू असतो. यामध्ये व्हिडिओ मध्ये काही लहरींची एक हलकी हालचाल दिसत असते, पण या प्रकारच्या पॉडकास्ट मध्ये व्हिडिओ दुय्यम स्थानी असते. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट असेल तरच पॉडकास्ट वापरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ पॉडकास्ट साठी आपल्याला अगदी इतर मध्यमंप्रमाने चार्ज अखला जाऊ शकतो. मुळात पॉडकास्ट ही संकल्पना ध्वनिवर आधारित आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉडकास्ट सध्या जरी वापरत आला तरी सुद्धा वापरकर्ते ऑडियो पॉडकास्टलाच जास्त पसंद करतात.

हेही वाचा:

जाणून घ्या काय आहे पॉस्को कायदा 2012 आणि त्या कायद्यासंदर्भातील गुन्हे
म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds
3. पॉडकास्ट ची वैशिष्ट्ये:

.  हवे तेवढं वेळ,हवे तेव्हा आपल्या आवडीचे कार्यक्रम ऐकू शकतो.

. पॉडकास्ट तयार करण्यासाठी लागणारा खर्च,साधने अतिशय कमी आहेत. आणि सहज उपलब्ध होणारी आहेत. तुमचा स्वतःच मोबाईल फोन मध्ये सुद्धा रेकॉर्ड करू शकतो. किंवा एखादी चांगल्या प्रतीचा माईक आणि रेकॉर्डर मिळवलं की बाकी कुठली सामग्री लागतच नाही. एवढंच काय महत्त्वाचं साधन.

. आपण फक्त ध्वनि प्रतीत कंटेंट बनवत असल्याने मागच्या बाजूला म्हणजेच बॅकग्राऊंड सेट करण्याची गरज नाही पडत. कॅमेरा सारखा महागड्या गोष्टींची गरज नाही पडत.त्यामुळे खर्च अगदीच कमी येतो.त्यामुळे ही अतिशय स्वस्त आणि सोपी पद्धत आहे आपला कंटेंट तयार करण्याची.

. डिजिटल मार्केटिंग द्वारे आपण काही पैसे सुद्धा कमावू शकतो. ही मात्र अतिशय बेसिक आणि महत्त्वाची बाब आहे.यासाठी आपल्याला प्राथमिक गुंतवणूक काही लागत नाही आणि अगदी कोणीही आपल्या कौशल्याच्या जोरावर पॉडकास्ट द्वारे पैसे कमवू शकतो.

. podbean, buzzsprout सारख्या कित्येक वेबसाईट आज पॉडकास्ट साठी प्रसिद्ध आहेत. त्याव्दारे एक नवीन प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्याला मिळतो.

तर हे आहे पॉडकास्ट.अगदी आपल्याला हवे तेव्हा हवे तसे एखाद्या विषयावर कुठल्याही जागी व्यवस्थित ऑडियो रेकॉर्ड करून कुठल्याही प्लॅटफॉर्म वर अपलोड करणे. अगदी सोपी, सहज,जास्त वेळखाऊ नसलेली ही एक प्रसारमाध्यमांची नवीन पद्धत. यात परत वयक्तिक,प्रासंगिक,व्यक्तिधिन असे सुद्धा वेग वेगळे प्रकार पॉडकास्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतातच.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *