Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पितृपक्षामध्ये हे उपाय करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्या

pitru paksha in marathi: आई वडिलांचे ऋण आपण कशानेच फेडू शकत नाही. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, रक्ताचे पाणी करून दिवस रात्र एक करून वाढवलेले असते, शिक्षण दिलेले असते, आपली प्रत्येक गरज पूर्ण केलेली असते. त्यांचे ऋण काही केल्याने फिटणे अशक्यच आहे. आपले आई वडील हे आपली छत्र छाया असतात.

आपले आई किंवा वडील यापैकी कोणी एक किंवा दोघेही जर वारले असतील तर त्यांना आपण विसरता कामा नये. सतत ते आपल्या मनात असायलाच हवेत. आपला कदाचित विश्वास बसणार नाही पण अनेक ठिकाणी असे अनुभवायला मिळते की आई वडील वारले असले तरीही त्यांचे लक्ष आपल्या मुलांकडे कायम असते. कधी ते स्वप्नात येऊन भेटतात तर कधी ते घरातच असल्याचे जाणवते. असे होते कारण ते असतात आणि त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रूपाने संकेत देत असतात. त्यामुळे ते नसले तरीही त्यांची आठवण कायम स्वरुपी आपण ठेवावी यासाठी दरवर्षी आपण त्यांच्या नावे जी पूजा करतो, जे श्राद्ध घालतो त्यालाच आपण पितृपक्ष असे म्हणतो.

पितृपक्ष हा महालय, महाळ, पक्ष पंधरवडा या नावांनी ओळखला जातो. आपल्या हिंदू धर्मात पालकांची सेवा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांना विसरू नये यासाठी श्राध्द करावे असे सांगितले गेले आहे.

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा पासून ते अश्विन महिन्याच्या अमावस्या पर्यंतचा काळ हा पक्ष पंधरवडा म्हणून ओळखला जातो. कारण याच काळात ब्रह्मंडीय उर्जे बरोबरच पितृप्राण थोडक्यात पितर पृथ्वीवर अवतरतात. याच काळात श्राध्द केल्याने पूजेच्या पिंडीतील तांदूळ म्हणजेच भाताचा अंश घेऊन पितर आपल्या आत्माचे ऋण फेडतो आणि पंधरा दिवसांनंतर त्याच ब्रह्मांडच्या ऊर्जेसोबत परत जातो म्हणून त्याला पितृपक्ष असे म्हणतात. म्हणूनच याच काळात पूजा करावी.

मृत्यूनंतर आई वडिलांना विसरु नये यासाठी श्रद्धेने केले जाणारे श्राध्द म्हणजे पितृपक्ष. आपल्या पालकांना मृत्यूनंतर आत्म्याला शांती लाभावी यासाठी केली जाणारी पूजा म्हणजे श्राध्द.

या श्राध्दच्या निमित्ताने लोकं मन , वाणी आणि कृतीने संयमी जीवन जगावी तसेच पूर्वजांचे स्मरण करून पाणी तर्पण, श्राध्द आणि त्यायोगे ब्रह्मनाना दान तसेच भोजन द्यावे हा यामागील उद्देश असतो.

व्रताच्या भोजनात कांदा,लसूण का वापरत नाहीत?

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

मानवावर तीन प्रकारचे ऋण असते. एक पितृ ऋण, दुसरे देव ऋण आणि तिसरे ऋषी ऋण. त्यापैकी पितृ ऋण हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आपण आपल्या पितरांचे श्राद्ध तीन पिढ्यापर्यंत घालू शकतो. म्हणजे श्राध्द घालण्याचा मान हा तीन पिढ्यापर्यंत चालतो. जे लोक योग्य त्या तिथी नुसार म्हणजे ज्या वेळी आपले पितर स्वर्गवासी झाले ती योग्य वेळ आणि तो दिवस कोणता होता त्या दिवसाची तिथी. हे अचूकपने लक्षात ठेवून त्याच तिथीला श्राद्ध घालतात त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात.

पण आपण पितृ पक्ष योग्य त्या वेळी घातले नाही किंवा पूजा न घातल्याने घरात अशांतता, आजारपण, अपघात, वंशवृध्दीसाठी अडथळे, संकटे, अपयश, वाद विवाद, विवाह कार्यात अडथळे, घरात सगळ्या सुख सोयी असूनही मन अस्वस्थ रहाणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याशिवाय आपले पितर अशांत राहतात आणि तोच दोष आपल्याला लागतो. म्हणून पितृपक्ष करणे आवश्यक आहे.

जे रोज केले जाते ते नित्य श्राद्ध. या प्रकारात विश्वदेवाची स्थापना केली जात नाही. फक्त पाण्याचे तर्पण करून हे श्राद्ध केले जाते.

कोणाला तरी निम्मित करून केले जाणारे श्राद्ध म्हणजे नैमित्तिक श्राध्द. यालाच एकोदिष्ट असेही म्हणतात. या प्रकारातही विश्वदेवाची स्थापना होत नाही.

एखादी इच्छा मनात ठेवून जे श्राद्ध केले जाते ते काम्य श्राद्ध.

जोगे आणि भोगे दोघे भाऊ होते. दोघेही वेगवेगळे रहात असत. दोन्ही भावात खूप प्रेम होते. जोगे खूप श्रीमंत होता तर भोगे खूप गरीब. जोगेच्या बायकोला तिच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता तर भोगेची बायको साधी सरळ मनाची होती.

पितृपक्ष आल्यावर जोगेच्या बायकोने श्राद्ध करण्यासाठी सांगितले तर जोगेने हे काय फुकटचे काम आहे असे समजून त्याची चेष्टा केली. पण त्याच्या बायकोला माहीत होते की श्राद्ध केले नाही तर समाजातील इतर लोक नावं ठेवतील. तेंव्हाच तिला आपल्या माहेरच्या लोकांना बोलावण्याचा आणि आपली श्रीमंती दाखवण्याची ही उत्तम संधी आहे असे वाटले आणि ती जोगेला म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास होईल म्हणून नको म्हणत आहात पण मला काहीच त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेते आम्ही दोघी मिळून सगळी कामे करू. मग तिने जोगेला माहेरच्या लोकांना आमंत्रण देण्यासाठी पाठवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर भोगेची बायको आली आणि कामाला लागली.तिने सगळा स्वयंपाक केला अनेक पदार्थ बनवले. सगळी कामे आटपून ती आपल्या घरी निघाली कारण तिलाही तिच्या घरी पितृश्राद्ध घालायचे होते. पण त्याच वेळी जोगेच्या बायकोने तिला थांबवून घेतले आणि म्हणून ती थांबली.

————————-

दुपार झाली पितर पृथ्वीवर आले. जोगे भोगेचे पितर आधी जोगेच्या घरी आले बघतात तर काय त्याच्या सासरची मंडळी तिथे जेवत आहेत. निराश होऊन ते भोगेकडे गेले.

तर तिथे पितरांच्या नावावर अग्नी पेटवला होता आणि त्याचीच राख पितरांनी खाल्ली आणि तसेच उपाशी पोटी नदीच्या काठावर गेले.

थोड्याच वेळात सगळ्यांचे पितर तेथे जमले आणि आपल्या आपल्या श्राद्धचे कौतुक सांगू लागले. जोगे भोगेच्या पितरांनी पण त्यांची कहाणी सांगितली. परत त्यांनी विचार केला की भोगे जर श्रीमंत किंवा आपले श्राद्ध करण्यास समर्थ असता तर आपल्याला असे उपाशी रहावे लागले नसते. पण भोगेच्या घरी तर खाण्यासाठी पोळी पण नव्हती. त्यामुळे त्यांना भोगेची दया आली आणि ते नाचत म्हणू लागले, भोगेच्या घरी पैसा येऊदे, पैसा येऊदे.

संध्याकाळ होत आली तरीही भोगेच्या मुलांना काहीच खायला मिळाले नव्हते. ते आईला म्हणू लागले की भूक लागली आहे तेंव्हा त्यांना टाळण्यासाठी म्हणायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली की, जा अंगणात हौदी ठेवली आहे ती उघडा आणि जे मिळेल ते वाटून खा. मुले तिथे गेली आणि बघतात तर काय हौदी मोहरांनी भरलेली आहे. ते पळत आईकडे आले आणि सगळे सांगितले. भोगेच्या बायकोने सांगितले तर ती हैराण झाली.

अशा प्रकारे भोगे श्रीमंत झाला पण त्याने पैशांचा घमंड केला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आले त्याच्या बायकोने छपन्न पक्वान्न करून ब्रह्मनांस बोलावले जेवू घातले, श्राद्ध केले आणि दक्षिणा दिली. दिर जावेस सोन्या चांदीच्या ताटात जेवू घातले त्यामुळे पितर आनंदी आणि समाधानी झाले.

तर अशा प्रकारे आपल्या पालकांची आठवण ठेवत योग्य वेळी श्राद्ध केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्य सफल होते.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *