
पालकाची बर्फी कधी खाल्ली आहे का ? खूप छान होते आणि कुणी म्हणणार देखील नाही कि हि बर्फी पालकाची आहे। बनवायला अतिशय सोपी आहे आणि झटपट बनून होते
पालक बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) पालकाची पानं – ९-१०
२) तूप/देशी घी – २ टेबलस्पून
३) कंडेन्सड मिल्क – १/२ कप
४) मिल्क पावडर – २ कप
५) ड्राय फ्रुटस – सजवण्यासाठी
पालक बर्फी कृती :
सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्च धुवून घ्यावी. त्यानंतर पाने १ कप पाण्यात ५ मिनिटे शिजवून घ्यावी.
पाने शिजली की थंड होऊ द्यावी .थंड झाली की त्याची पेस्ट बनवावी.
त्याबरोबरच एका पॅन मध्ये तूप टाकावं. तूप गरम झाला की त्यात कंडेन्सड मिल्क टाकावे.
त्यानंतर त्यात पालक पेस्ट आणि मिल्क पावडर टाकावी.
मिश्रण पॅनमध्येच चांगलं मिक्स करावं.
५ मिनिटे मिश्रण शिजू द्यावे.
एका प्लेटला तुपाने थोडं ग्रीसिंग करून घ्यावे.
त्यावर तयार झालेला मिश्रण पसरवावे .चौकोनी बर्फीच्या आकारात मिश्रण पसरवावे.
त्यावर आवडीनुसार ड्राय फ्रुटस टाकावे.
मिश्रण थंड झाले की त्याच्या वड्या पाडाव्या.
पालक बर्फी तयार !!!!!!
https://youtu.be/FPIR–pk3WA
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.