Skip to content Skip to sidebar Skip to footer

बँकेत न जाता खाते कसे उघडावे ?

Open bank account online: आजकालचं युग हे एक डिजिटल युग म्हणून ओळखलं जात आहे घरबसल्याही आपण बँकेतील व्यवहार करू शकतो त्यासाठी बँकेमध्ये जाण्याचीही गरज नाहीय त्यालाच आपण नेट बँकिंग असे म्हणतो. नेट बँकिंग म्हणजेच इंटरनेट बँकिंग,मोबाईल बँकिंग असेही म्हणतात. जी बँक आर्थिक संस्थेतील ग्राहकांना आर्थिक संस्थेच्या वेबसाईटद्वारे आर्थिक व्यवहार करण्यास मदत करते ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली वापरली जाते. नेट बँकिंग हि प्रणाली भारतातही मोठ्या प्रमाणावर निवडली गेलेली अगदी सोपी प्रणाली आहे. ग्राहकांना ऑनलाईन फंड ट्रान्सफर,डिपॉसिट यासारख्या सुविधा उपलब्ध करते ज्यामुळे ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज पडत नाही. थोडक्यात बँकेमध्ये जा,गर्दीमध्ये किंवा रांगेत उभे राहा यासारखे आपले शारीरिक कष्ट वाचले जातात. सध्या कोरोना महामारीच्या काळात नेट बँकिंगवर खाते उघडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्हणजेच नेट बँकिंगद्वारे आपण कुठलीही खरेदी सहज करू शकतो.

कोणताही व्यक्ती म्हणजे एखादा व्यवसायिक व्यक्ती असो,नोकरदार व्यक्ती,गृहिणी असो किंवा एखादा विद्यार्थी असो नेट बँकिंग हा सर्वांसाठीच एक उपयुक्त असा पर्याय आहे. नेट बँकिंग ही एक सुरक्षित प्रणाली समजली जाते ज्यामध्ये ग्राहकांचा कस्टमर आय डी आणि पासवर्ड हा सुरक्षित केला जातो. यासाठी म्हणजेच इंटरनेट बँकिंगसाठी लॅपटॉप,आपला मोबाईल आवश्यक आहे ज्यामध्ये इंटरनेट असणं गरजेचं आहे.

आपली धावपळ जर वाचवायची असेल आपले व्यवहार सुरक्षित करायचे असल्यास  इंटरनेट बँकिंग या सुविधेचा जर आपण विचार करत असू तर नेट बँकिंग कसे सुरु करावे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत-

– नेट बँकिंग ही सुविधा जर आपल्याला सुरु करायची असल्यास सर्वात प्रथम आपले त्या बँकेमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी नेट बँकिंग हि सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी एखादे खाते असावे

– खाते उघडल्यानंतर नेट बँकींगसाठी त्या बँकेचा एक फॉर्म घ्यावा, तो फॉर्म योग्यरीत्या भरून त्याच बँकेत जमा करावा

– फॉर्म जमा केल्यानंतर त्या बँकेकडून आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड मिळतो.

– त्यांनतर आपल्या बँकेच्या वेबसाईटवर म्हणजेच ज्याठिकाणी नेट बँकिंगसाठी फॉर्म भरलाय त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा,लॉगिन करण्याआधी कॅप्चा व्यवस्थित टाकावा त्यानंतरच लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करावे.

– बँकेच्या वेबसाईटवर जाताच आपल्याला काही माहिती विचारली जाते ती माहिती योग्य प्रकारे भरावी.

– सर्व माहिती अचूक भरल्यानंतर आपल्या मोबाईलवर किंवा कॉम्पुटर वर नेट बँकिंगची सेवा सुरु होईल.

इंटरनेट बँकिंगद्वारे ग्राहक व्यवहारी आणि गैरव्यवहारी दोन्ही कामे करू शकतो. बऱ्याच प्रकारची खास वैशीष्ट्ये या बँकिंगमध्ये आहेत. आता आपण ती वैशिष्ट्ये पाहुयात –

– नेट बँकिंगद्वारे ग्राहक आपले अकाउंट स्टेटमेंट पाहू शकतो.

– नेट बँकिंग सेवा चोवीस तास उपलब्ध असल्याने कुठलेही काम थांबू शकत नाही.

– या बँकिंग सेवेद्वारे आपला पैसे आणि वेळ अशा दोन्ही गोष्टी वाचतात.

– बँकेने केलेल्या व्यवहाराचा तपशील ग्राहक जाणून घेऊ शकतो.

– बँक स्टेटमेंट, विविध प्रकारचे फॉर्म आणि अर्ज सहज डाउनलोड करता येतात.

– त्याचप्रमाणे मोबाईल रिचार्ज, पाणी बील,गॅस बुकिंग यासारखे व्यहार घरबसल्या करू शकतो.

– नेट बँकिंगद्वारे इतर प्रकारची खाती जसे की फिक्स डिपॉसिट आणि रिकुररिंग डिपॉसिट सहज उघडू शकतो. त्याचप्रमाणे एटीएम,डेबिटकार्ड,क्रेडिट कार्ड,बँक पासबुक आणि चेकबुक यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतो.

– नेट बँकिंग सुविधेद्वारे प्रवासही सुखकर करता येतो कारण ऑनलाईन पद्धतीने तिकीटही आपण बुक काऊ शकतो त्यामुळे रिसर्वेशन साठी रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही.

– त्याचप्रमाणे ऑनलाईन खरेदीसाठी नेट बँकिंग हा सर्वोत्तम असा पर्याय आहे.

 असं म्हणतात ना आपल्याला वेळ खर्च करणाऱ्या गोष्टींचं पटकन आकर्षण होतं…. गोष्टी आकर्षित करण्यासारख्या जरी असल्या तरी त्या थोडयाशा त्रासदायकही असू शकतात. हा त्रास आणि डोकेदुखी कमी करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे नेट बँकिंग ही सेवाही थोडीशी त्रासदायक ठरू शकते म्हणूनच नेट बँकिंग सेवा सुरु करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता इंटरनेट बँकिंगसाठी आपण काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो हे आपण पाहुयात –

– आपला आय. डी आणि पासवर्ड लगेच बदलावा आणि पासवर्ड टाकत असताना त्यात कॅपिटल लेटर,स्मॉल लेटर आणि एका स्पेशल कॅरॅक्टर किंवा एखादा नंबर जरूर टाकावा.

– पासवर्ड टाकत असताना आपले जन्मतारीख,आपले नाव शक्यतो टाकू नये कारण हॅकर्स असे पासवर्ड सहज हॅक करतात

– पासवर्ड सतत बदलत राहणे जेणेकरून आपले नेट बँकिंग सुरक्षित राहील.

– नेट बँकिंग हि  सेवा फक्त आपल्या मोबाईलवर, आपल्या पर्सनल लॅपटॉपवर ओपन करावी

– नेट बँकिंग मधील व्यवहार सगळे आपल्यापर्यंत ठेवण्यासाठी मोबाईल आणि आपला पर्सनल लॅपटॉप वापरावा कारण सायबर कॅफे, पब्लिक कॉम्पुटरवर नेट बँकिंग खाते ओपन करू नये.

– नेट बँकिंग खाते जर एखाद्याला समजले असेल तर किंवा आपल्याला अशी शंका आली आहे कि आपल्या नेट बँकिंग खात्याचा वापर दुसरं कुणी करत आहे तर वेळीच आपल्या शाखेशी संपर्क करावा आणि आपले आर्थिक नुकसान टाळावे.

– आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर अँटीव्हायरस टाकलेला असावा जेणेकरून मलवर अटॅक पासून सुरक्षित राहू शकेल. मालवर हल्ले म्हणजे आपल्या संगणक प्रणालीमध्ये आपल्या संगणकातील माहितीला इजा पोहचवण्यासाठी हॅकर्सने अपडेट केलेले एक सॉफ्टवेअर आहे जेणेकरून माहिती सहज हाक करून आपली माहिती संपुष्टात येऊ शकते म्हणूनच अँटीव्हायरस अपडेट केलेला असावा.

– फायरवॉल प्रोटेक्शन नेहमी चालू ठेवावा.

– कोणतीही बँक लॉगिन आय डी,पासवर्ड किंवा मोबाईलवर येणार वन टाइम पासवर्ड विचारत नाही म्हणून असा एखादा कॉल आल्यास त्यांना हि माहिती नं  देता बँकेशी संपर्क करून त्या क्रमांकाचा सर्व तपशील बँकेकडे सुपूर्त करावे आणि आपले आर्थिक नुकसान टाळावे.

नेट बँकिंग हा विषय आपल्या जनसामान्यांना जेवढा सोईस्कर तेवढाच त्रासदायक आहे त्यामुळे वरील सांगितल्याप्रमाणे काळजी घेतल्यास नक्कीच नेट बँकिंग सुरक्षित असणार म्हणूनच योग्य ती दक्षता घेणे हाच यावर एकमेव उपाय आहे.

===============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

                        

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.