भारतीय संस्कृती मध्ये कांदा लसूण तामसिक आहारात का मोडते : पौराणिक कथा

onion and garlic belongs to which family: समुद्रमंथनातून अम्रुतकुंभ बाहेर आला तेंव्हा देव व दानव दोघांत अम्रुतकुंभावरनं वाद सुरू झाले. राक्षस तो उचलून घेऊन जाण्याच्या तयारीत होते इतक्यात भगवान विष्णुंनी मोहिनी रुप धारण केले. सुरेख,देखणी, कमनीय बांध्याची अशी ती मोहिनी पहाताक्षणी राक्षस तिच्या रुपावर मोहित झाले. मोहिनी म्हणाली,”भांडू नका. मी स्वतः अम्रुत वाटते. तुम्ही पंगतीत बसा पाहू.”
झालं,दोन पंगती बसल्या, एक देवांची तर दुसरी राक्षसांची. मोहिनी चतुर. तिने आपल्या रुपाने राक्षसांना घायाळ करून सोडले होते. त्यांना कुठली अम्रुतपानाची शुद्ध! ती देवांनाच अम्रुत प्यायला देत होती.
एका राक्षसाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने काय केले! देवाचे रुप धारण केले व देवांच्या पंगतीत जाऊन बसला. मोहिनीने त्यालाही अम्रुत दिले परंतु ते अम्रुत त्याच्या कंठापर्यंतच गेले होते नि विष्णुला त्याचे ढोंग कळले.
हेही वाचा
पितृपक्ष कहाणी: पितृपक्षात हे केलं कि पुढची ७ पिढी पित्र ऋण मुक्त होईल.
विष्णुने सुदर्शन चक्र त्या दैत्याच्या कंठाच्या दिशेने फेकले . दैत्याचे शीर धडापासून वेगळे झाले. वरचा भाग म्हणजे राहू तर खालचं धड महणजे केतू. त्यांचं जे रक्त भूमीवर सांडलं त्यातून या कांदालसणाची उत्पत्ती झाली म्हणतात पण त्या रक्तात अम्रुतही होतं या कारणात्सव कांदा, लसूण यात काही औषधी गुण आहेत असं म्हंटलं जातं.
हे कारण आताच्या युगात साहजिकच पटणार नाही परंतु, पुर्वजांनी सर्वसामान्यांमधे दैत्य, भूत अशा काही भीती घालून ठेवल्या होत्या जेणेकरुन घाबरून, भिऊन ते काही निषिध्द पदार्थांच सेवन करणार नाहीत.
पुर्वी बराच समाज अशिक्षित होता. आता तसंं नाही. आताची पिढी सद्सदववेकबुद्धीला जे पटेल तेच करते मग ती खाणंपिणं असो की आहारविहार.
====================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.