जाणून घ्या भारतातले आजवरचे नोबेल पुरस्कार विजेते आणि नोबेल पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती | nobel prize winners in india

जाणून घ्या भारतातले आजवरचे नोबेल पुरस्कार विजेते आणि नोबेल पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती | nobel prize winners in india
नुकतेच २०२१ सालचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना ( nobel prize winners in india) त्यांच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.पण हा नोबेल पारितोषिक आहे काय नेमक? असा प्रश्न आपल्यामधील काही वाचक मंडळींना पडला असेलच ना? चला तर मग आज आपण हा नोबेल पुरस्कार आहे तरी काय याची माहिती घेऊया.
Table Of Contents
1. नोबेल इतिहास
२. नोबेल पारितोषक स्वरूप
3. नोबेल पुरस्कार पात्रता
४. नोबेल वितरण समारंभ
५. भारतीय नोबेल पारितोषीक विजेते | nobel prize winners in india
1. नोबेल इतिहास
आल्फ्रेड नोबेल नावाचे एक स्वीडिश रसायनतज्ञ, अभियांत्रिकी क्षिक्षण घेतलेले एक शास्त्रज्ञ होते. डायनामाईट चा शोध त्यांनी लावला होता.पण पुढे चालून त्याचा वापर विविध प्रकारचे स्फोटक बनवण्यात होऊ लागला. आपल्या नजरेसमोर मानवी उत्क्रांती साठी लावलेल्या शोधाचा उपयोग मानवी हत्या, युद्धा साठी होऊ लागलेला पाहून त्यांना पश्र्चाताप झाला. आपल्या शेवटच्या दिवसात त्यांनी आपल्या मृत्युपत्रात आपल्या संपत्तीचा वापर पाच प्रकारचे पुरस्कार देण्यात वापरण्याची इच्छा व्यक्त केली.पुढे त्यांचा १८९६ मध्ये मृत्यू झाला.हे पाच पुरस्कार पुढे नोबेल पारितोषीक म्हणून जगात प्रसिध्द झाले.आणि त्यांच्या मृत्यू पश्चात अखेर १९०१ मध्ये सर्वप्रथम नोबेल पारितोषिक वितरीत झाले.
२. नोबेल पारितोषक स्वरूप
दरवर्षी पाच विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो.तीन पेक्षा जास्त लोकांमध्ये हा पुरस्कार विभागून दिला जाऊ शकत नाही,पण तीन पेक्षा जास्त लोक असलेल्या एखाद्या संस्थेला वगैरे हा पुरस्कार दिला जाऊ शकतो.
भौतकशास्त्रात,रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र किंवा मेडिसिन,साहित्य आणि शांतीचा नोबेल या पाच क्षेत्रातील मानवजातीला हितोपयोगी शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार तर,साहित्य आणि शांती चा पुरस्कार मात्र उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दिला जातो.
या पुरस्कारानेगौरविण्यात आलेल्या पुरस्कारविरांना एक सुवर्ण पदक,एक डिप्लोमा आणि 1 मिलियन डॉलर ( चलन किंमत नुसार हे पारितोषिक त्या गुणोत्तर नुसार बदलत).मृत्युपत्रान्वये पारितोषिके देण्याचा अधिकार पुढील चार संस्थांना असून कंसांमध्ये त्यांच्या पारितोषिकांची क्षेत्रे दिली आहेत.
(१) द रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (भौतिकी व रसायनशास्त्र)
(२) द रॉयल कॅरोलीन मेडिके-चिरूर्जिकल इन्स्टिट्यूट (शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक)
(३) द स्वीडिश ॲकॅडेमी (साहित्य)
(४) नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिगने) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी
यापैकी पहिल्या तीन संस्था स्टॉकहोम (स्वीडन) येथे व चौथी ऑस्लो (नॉर्वे) येथे आहे.पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी ३-५ सदस्यांची समिती नेमण्यात येते. याच नोबेल समित्या होत. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाही चर्चेसाठी पाचारण करू शकतात. या समित्यांची कामे पारितोषिके देणाऱ्या संस्थांच्या दृष्टीने पूर्वतयारीची व सल्लावजा स्वरूपाची असतात. सुचविण्यात आलेल्या उमेदवारांच्या कार्याचे मूल्यमापन करून आपली मते या समित्या देऊ शकतात. सामान्यतः नोबेल समित्यांच्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्था मानतात तथापि समित्यांचे निर्णय या संस्थांवर बंधनकारक नसतात. या समित्यांशिवाय उमेदवारांच्या कार्याची सखोलपणे पाहणी करणे सुकर व्हावे या दृष्टीने पारितोषिके देणाऱ्या संस्थांना साहाय्य करण्यासाठी वरील समित्यांशिवाय संशोधन संस्था, ग्रंथालये इ. उभारण्यात आली आहेत, त्यांना नोबेल संस्था म्हणतात.
3. नोबेल पुरस्कार पात्रता
नोबेल पारितोषिके सर्वांना खुली असून राष्ट्रीयत्व, वंश, धर्म (संप्रदाय) व विचारसरणी या गोष्टी विजेत्याची निवड करताना विचारात घेतल्या जात नाहीत. एका क्षेत्रातील पारितोषिक एका व्यक्तीला वा अनेक व्यक्तींना संयुक्तपणे देता येते (प्रत्यक्षात जास्तीत जास्त तिघांना संयुक्तपणे पारितोषिक मिळालेले आहे). त्याचप्रमाणे एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक क्षेत्रांतील कार्यासाठी आणि अनेक वेळाही पारितोषिक देता येते.पुरेशी अधिकारी व्यक्ती आढळली नाही किंवा जागतिक परिस्थितीमुळे आवश्यक माहिती मिळविता आली नाही, तर पारितोषिके दिली जात नाहीत.
अशा प्रकारे पहिल्या महायुद्धामुळे १९१४ ते १९१९ या काळात काही विषयांची पारितोषिके आणि दुसऱ्या महायुद्धामुळे १०४० ते १९४२ या वर्षी कोणतेही नोबेल पारितोषिक देता आले नाही. एखाद्या क्षेत्रातील विचारार्थ आलेल्या सर्व व्यक्तींच्या कार्याची गुणवत्ता योग्य तेवढी नसल्यास कधीकधी ते पारितोषिक पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. त्यापुढील वर्षीही अशीच परिस्थिती आढळली, तर राखून ठेवलेल्या पारितोषिकाची रक्कम परत निधीत जमा करावी, अशी तरतूद आहे. राखून ठेवण्यात आलेल्या पारितोषिकामुळे एकाच वर्षी एकाच क्षेत्रातील दोन पारितोषिकेही (गतवर्षीचे व चालू वर्षाचे) दिली जाऊ शकतात.
४. नोबेल वितरण समारंभ
नोबेल पारितोषिकांचा वितरण समारंभ दरवर्षी स्टॉकहोम येथे स्वीडनच्या राजांच्या हस्ते आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा ऑस्लो येथे आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला (१० डिसेंबर रोजी) होतो. बहुधा विजेते समक्ष हजर राहून पारितोषिके स्वीकारतात. विजेता समक्ष हजर राहू न शकल्यास त्याच्या देशाचा तेथील राजदूत पारितोषिक स्वीकारू शकतो.
५. भारतीय नोबेल पारितोषीक विजेते | nobel prize winners in india
रविंद्रनाथ टागोर (1913)
कवी, साहित्यिक आणि राष्ट्रगीत ‘जन गन मन’ लिहिणारे रविंद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नोबेल पुरस्काराने गौरव झालेले ते पहिले भारतीय होते.
सी. व्ही. रमन (1930)
तब्बल 17 वर्षांनी सी व्ही रमन यांच्या रुपाने भारताला नोबेल पारितोषिक मिळालं. भौतकशास्त्रातील कामगिरीबद्दल सी व्ही रमन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग संशोधनासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.
हरगोविंद खुराना (1968)
भारतीय वंशाचे अमेरिकन हरगोविंद खुराना यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जेनेटिक कोडची समीक्षा आणि प्रोटिन सिंथेसिसमधील कार्य यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता.
मदर टेरेसा (1979)
मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मदर टेरेसा यांना 1979 मध्ये शांतीचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं.
सुब्रमण्यम चंद्रशेखर (1983)
भारतीय वंशाचे अमेरिकन सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा विलियम ए फॉलर यांच्यासोबत भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तित्त्व कशामुळे टिकून आहे, यावरील संशोधनासाठी त्यांचा नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आलं होतं.
अमर्त्य सेन (1998)
अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्राची दिशा यामधील प्रयत्नांसाठी त्यांना 1998 साली नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला.
वेंकटरमण रामकृष्णन (2009)
रसायनशास्त्रातील कार्याबद्दल वेंकटरमण रामकृष्णन यांचा 2009 साली नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला. राइबोसोमची रचना यावरील संशोधनासाठी इतर दोन वैज्ञानिकांसोबत वेंकटरमण रामकृष्णन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं.
कैलास सत्यर्थी (2014)
बाल अधिकारांसाठी काम करणारे आणि बचपन बचाओ आंदोलनचे संस्थापक कैलास सत्यार्थी यांचा शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सत्यार्थी यांच्यासोबत पाकिस्तानची बाल अधिकार कार्यकर्ता मलाला युसूफजई यांचाही नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
अभिजित बॅनर्जी (2019)
मुळ भारतीय अमेरिकी नागरिकत्व स्वीकारलेले अभिजित बॅनर्जी यांना २०१९ सालचा अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला होता.