Skip to content Skip to sidebar Skip to footer

युट्युब वर रेसिपी विडिओ दाखवून कमवले करोडो रुपये…आता आहे भारतातील टॉप युटूबर्स च्या यादीमध्ये

nisha madhulika biography : प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात काहीना काही काम करत असतो आणि पैसे मिळवत असतो. बरेचदा आपण जे काही काम करत असतो ती आपली इच्छा किंवा आवड असतेच असे नाही. आपल्या छंदाला किंवा आवडीला व्यवसायाचे स्वरूप बनवणे सर्वांना जमतेच असे नाही. जेंव्हा आपण आपल्या आवडीचे काम करतो तेंव्हा काळ,वेळ,मर्यादा कशाचेच बंधन रहात नाही शिवाय काम उत्तमच होते.

आज अशाच एका महिला उद्योजिकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी पैसा मिळवणे हा हेतू नव्हताच तर आपली आवड जपून त्यातच काहीतरी करावे आणि त्याचा लोकांना रोजच्या आयुष्यात किंवा जगण्यात काहीतरी उपयोग व्हावा असे त्यांना वाटत होते. आणि त्यांचे स्वप्न केवळ पूर्ण झाले नाही तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात खूप काही त्यांना मिळाले.

तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल ना कोण आहेत त्या ?? तर त्या यशस्वी उद्योजिका आहेत निशा मधुलिका.

निशा मॅडमच्या मिस्टरांची दिल्लीत वेब डेव्हलपमेंटची कंपनी होती. ज्यात त्या अकाउंटटंट म्हणून काम करत होत्या. पण नंतर त्यांची कंपनी नोयाडाला शिफ्ट झाली आणि त्यांनी ऑफिसमध्ये जाणे थांबवले. घरात बसून राहिल्यावर घरकाम संपवून त्यांच्या हातात ३-४ तासांचा वेळ रहात होता. पण हा वेळ गप्पा मारण्यात किँवा निरर्थक मालिका पाहण्यात त्यांना घालवायचा नव्हता. त्यांना असे काहीतरी वेगळे करायचे होते जे लोकांना आवडेल आणि त्यांना रोजच्या आयुष्यात उपयोगी पण पडेल. म्हणून त्यांनी अनेक गरीब मुलांना शिकवण्यासाठी सुरुवात केली. पण बरीच मुले शिकवणी चुकवत. त्यामुळे त्यांना नव्याने शिकवण्यासाठी बरेच सर्च करावे लागत असे.

BharatPay founder Ashneer Grover information in marathi आई वडिलांचा पाठिंबा नसतानाही चांगली नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला

१३ वर्षे आयटी मध्ये नोकरी केल्यानंतर जयंती कठाळे ह्यांनी स्वतःच हॉटेल सुरु केलं. आज परदेशातही शाखा आहेत.

असेच इंटरनेटवर सर्च करत असताना त्यांना एक फूड ब्लॉग दिसला. तो त्यांना खूपच आवडला. तसेही त्यांना शिकवण्याची आणि स्वयंपाकची आवड होतीच. त्यामुळे मग आपणही असाच ब्लॉग लिहायला सुरुवात करावी असे त्यांना वाटू लागले. रात्री त्यांचे मिस्टर घरी आल्यावर त्यांनी ही कल्पना त्यांच्या मिस्टरंना सांगितली आणि त्यांनी लगेच फक्त होकार दिला नाही तर दुसऱ्याच दिवशी एक छानसा डिजिटल कॅमेरा ही आणून दिला. ते वर्ष होते २००७ चे. त्यांच्या ब्लॉगचे नाव त्यांनी “खाना बनाना” ठेवले आणि रोज त्यावर नवीन नवीन घरात बनवलेल्या रेसिपीज फोटो काढून अपलोड करायला सुरुवात केली.

त्यांच्या शंभर रेसिपी झाल्यावर त्यांच्या मुलाने निशा मधुलीका डॉट कॉम या नावाने वेबसाईट बनवून दिली. या वेबसाईटवर लोकांचा खूपच छान प्रतिसाद तर मिळालाच शिवाय लोकांनी व्हिडिओ बनवून अपलोड करण्याची विनंती केली. पण व्हिडिओ बनवणे हे ब्लॉग बनवण्याइतके सोपे नव्हते. त्यासाठी कोणीही प्रोफेशनल माहिती देणारे नव्हते.

त्यामुळे खूप अवघड जात होते व्हिडिओ बनवणे. तरीही २०११ मध्ये त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना सकाळी नऊच्या आत तयार होऊन व्हिडिओ बनवावे लागत कारण त्यांचे मिस्टर सकाळी नऊला ऑफिसमध्ये जात असत. त्या आधीच सगळे व्हिडिओ शूट करावे लागत असत. या यूट्यूब वरील व्हिडिओवर खूप व्ह्यू आणि सबस्क्राइब वाढले म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या आणि त्यावरची पसंती वाढतच गेली.

फक्त भारतातच नव्हे तर अन्य देशात पण त्यांच्या रेसिपीजचे कौतुक होऊ लागले. त्यांच्या कामाचे म्हणजेच त्यांच्या व्हिडिओचे भरपूर पैसे मिळू लागले. खरतर पैसे मिळवणे हा त्यांचा हेतू नव्हताच. तरीही त्यांचे रेसिपी व्हिडिओ अनेक लोकांच्या पसंतीस पडल्याने पैसे मिळतच होते. दिवसेंदिवस त्यांच्या सबस्क्राइबमध्ये वाढ होतच होती.

निशा मॅडमनी हे काम सुरू केले तेंव्हा त्या पन्नास वर्षांच्या होत्या. तर आज त्या एकसष्ठ वर्षांच्या आहेत. आजवर त्यांनी एक हजार पेक्षा जास्त रेसिपी व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्यांचे पन्नास लाखांच्यावर सबस्क्राइबर आहेत तर ऐंशी करोड पेक्षा जास्त लोकांनी त्यांचे व्हिडिओ पाहिले आहेत आणि ते पाहून घरात चवदार आणि वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत. आजही रोज वीस लाखांपेक्षा जास्त लोक रोज त्यांचे व्हिडिओ पाहतात. त्यांचा इन्कम एखाद्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या सीईओ इतका किंबहुना त्याहूनही
जास्तच असेल.

त्यांचे घवघावित यश पाहून २०१२ मध्ये त्यांना रेसिपी क्वीन ऑफ इंडिया हा अवॉर्ड देण्यात आला तर २०१४ मध्ये यूट्यूबने त्यांना यूट्यूब टॉप शेफ हा पुरस्कार दिला.

निशा मॅडम यांचा यशस्वी प्रवास पाहून मेहनत करण्याची तयारी आणि मनापासून काम करण्याची आवड असेल तर वय, काळ, वेळ काहीही मध्ये येत नाही हेच लक्षात येईल. गरज असते ती स्वतः मधील सुप्त गुण ओळखण्याची आणि त्यांना वाव देण्याची. चला तर मग आपल्यातील कलागुणांना वाव देऊया आणि नव्याने सुरुवात करुया.

================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.