उखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य

आश्विनी प्रथम दिनी सिंहासनी बैसली आदिमाया
… रावांचे नाव घेते ..पंतांची कन्या
नवरात्रीचे नऊ दिवस करते उपवास
.. रावांचा लाभो मज आयुष्यभर सहवास
नवरात्रीत पुजतात देवीची रुपे नऊ
… राव दिसतात कडक आहेत लोण्याहून मऊ
देवीला फळं आणि फुलं वहाते
… रावांसोबत सुखी संसाराची स्वप्नं पहाते

भक्तांच्या नवसाला पावते तुळजाभवानी आई
… रावांच्या नावाचे कुंकू अखंड राहो माझ्या भाळी
नवरात्र आहे हिंदुधर्मातील मोठा सण
… रावांच्या साथीने दळते संसाराचे दळण
घटावर सोडली माळ झेंडू फुलांची
… रावांची नं माझी जोडी राघूमैनेची

शिवशंभोच्या उभी पाठीशी अंबाईची पुण्याई
… रावांच्या जोडीने दर्शना तुझ्या आले आई
संबळ, सनईच्या सुरात भक्तगण झाले दंग उंच्यापुऱ्या
… रावांना शोभून दिसतो श्यामल रंग
हेही वाचा
पुरुषमंडळींसाठी सोप्पेसुलभ उखाणे

शैलराज हिमालयाची कन्या शैलपुत्री
भोळ्या शिवशंकराची अर्धांगिनी
… रावांचे नाव घेते ऐका साऱ्या जणी
दाहीदिशांना दुमदुमतो देवीनामाचा गजर
… रावांच्या सेवेस मी सदा हजर
चार भुजाधारी शैलपुत्री आहे नंदीवर स्वार
… रावांच्या साथीने करते मी भवसागर पार

डाव्या हाती जपमाळ उजव्या हाती कमंडलू
पांढरी साडी नेसते तपस्विनी देवी ब्रह्मचारिणी
शंकर पती मिळावा म्हणून मातेचे निर्जली उपवास
कठोर तपश्चर्या, तपस्येचे फळ लाभले मातेस
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करते मातेचे पुजन
वाहते फुल चमेलीचे प्रिय असे देवीस फार प्रार्थना करते मनोभावे
… रावांस दे यश, किर्ती अपार
नवरात्रीत देवीपूजन करता
लाभे सुखसम्रुद्धी समाधान
… रावांस सासुरवाडीत खासा मान
शैलपुत्री देवीस रंग प्रिय पिवळा
… रावांसोबत अनुभवते देवीचा सोहळा
पाच पांडवांनी बांधिला एकविरा आईचा डोंगर
… रावांच्या जोडीने करते देवीआईचा जागर

काळीपोत ही गळ्यात टिकुदे
नको माते हिरेमाणिक, सोनेनाणी
… रावांच्या नावाचं कुंकू राहो
अखंड माझ्या भाळी
महागौरी सजली पहा गुलाबी साडीत
… रावांच घर आहे सावंतवाडीत
करडी साडी नेसलेली चंद्रघटा देवीची मुर्ती
… रावांची पसरो सर्वदूर किर्ती

आईचा अभिषेक जोडीने करु
आईला हिरवी साडीचोळी नेसवू
कारभारी आयुष्यात एकदातरी
तुळजापूरला जोडीने जाऊ
चंद्रघंटा मातेस नैवेद्य अर्पिते लोण्याचा
… रावांचा नं माझा जोडा लक्ष्मीनारायणाचा
कालरात्रीस करते मध मी अर्पण
… रावांचे नाव घेते ऐका सर्वजण
साडेतीन शक्तीपीठे असती ॐ काराचे सगुण रूप
साडेतीन मात्रांचा ओंकार
त्यात ‘अ’कार पीठ माहूर
‘उ’कार पीठ तुळजापूर,
‘म’कार पीठ कोल्हापूर ऊर्धमात्रा वणीची सप्तश्रृंगी,
आहे जे अर्धपीठ
… रावांच्या साथीने आली
संसाराला गोडी अवीट

नवरात्रीचा आहे नववा दिवस
भक्तीभावाने करते सिद्धीदात्रीचे पूजन
लालसाडीचोळीतली माता चारभुजाधारी
कमलपुष्पावरी विराजमान नेत्रसुखद रुप
मातेने दिला वर अन साक्षात शिव झाले अर्धनारीश्वर
… रावांची साथ अखंड लाभो माता, दे मजसी वर