Skip to content Skip to sidebar Skip to footer

नंदादीप भाग २

शेवटी मागच्या वर्षी रमाने माधवला गळ घातली व दोघांनी रमाच्या घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले. रमाच्या घरच्यांनी या दोघांवर बहिष्कार टाकला व काकूला पण सक्त ताकीद दिली की रमा बरोबर संबंध ठेवायचे नाहीत.

वर्षभरात खूप गोष्टी बदलल्या.अंगावरच्या कपड्यानिशी रमा माधव च्या घरी गेली होती.1RK भाड्याने घेऊन त्यांनी नवा संसार सुरू केला. तिच्या लग्नानंतर महिन्या भरातच श्वेता चे लग्न थाटामाटात साजरे झाले. रमा व माधवला आमंत्रण नव्हते. श्वेता पण न भेटताच कॅनडा ला निघून गेली.

आरआरने डोक्यावर टपली मारली तशी रमा एकदम घाबरून विचारांच्या तंद्रीतून भानावर आली. “काय मॅडम कसला एवढा गहन विचार करत आहात”?

रमा भानावर येत म्हणाली,” काही नाही असंच.काल तुझ्या आईचा फोन आला होता आणि रुही पण माझ्याशी बोलली. राज, घरातले सगळे खूप टेन्शन मध्ये आहेत. हे काय नवीनच खूळ डोक्यात घेतलं आहेस. नाटक, सिनेमा करायचा आहे म्हणे आणि या सगळ्यासाठी चांगली नोकरी सोडतो आहेस तू? रुही च्या पप्पांना हे अजिबात मान्य नाहीये”.

राज जरा वैतागूलाच. “अरे काय जबरदस्ती आहे ही. रुही आणि मी कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम करतो. इनफॅक्ट तिच्या पप्पांना मी तेव्हापासून आवडायचो. तीन महिन्यापूर्वी आमचा साखरपुडा त्यांनी केला आणि आता पसंत नाही म्हणजे काय”?

“अरे तेव्हा तुझे जॉब सोडून नाटक किंवा पिक्चर चे खूळ त्यांना माहीत नव्हते. रुही ला पण तुझा हा निर्णय मान्य नाही. हौस म्हणून सुट्टीच्यादिवशी जरूर कर . कोणी तुला अडवणार नाही. पण VP Corporation सोडून म्हणजे चक्क मूर्खपणा होईल”.
“रमा, तुला काय वाटते मी काय करावे”?

“आरआर हा तुझा निर्णय हवा, पण जर रुही, तुझे आई बाबा रूही चे पप्पा दुखावणार असतील, तर तू परत विचार कर.रूही चे पप्पा लग्नाला तयार नाही झाले ,तर ती घर सोडून येईल.पण तिचे माहेर कायमचे दुरावले आणि आपली माणसे गमावणे व त्याचे दुःख माझ्यापेक्षा अजून कोण समजू शकेल”?

काल रूही तुझ्या घरी गेली होती व काकां काकूंन जवळ खूप रडली. आरआर, कधीकधी आयुष्यात थोडी तडजोड करून आपण सगळी नाती जिंकू शकतो. तुझा फक्त एक निर्णय तुम्हा सगळ्यांना छान एकत्र ठेवेल. नाट्क, अभिनय म्हणशील तर पाच-सहा वर्षात तुला पण अंदाज येईल हे सगळं तुला झेपतय आहे का आणि मुख्य म्हणजे आवडतय आहे का”?

लुक ,”ग्रास इज ऑल्वेज ग्रीन ऑन द अदर साइड”

तिथे पण खूप कष्ट आहेत खूप कॉम्पिटिशन आहे सगळा सारासार विचार कर. रूही चा पण बिजनेस अजून म्हणावा तसा सुरू नाही. एकाची तरी आर्थिक बाजू भक्कम पाहिजे.रेगे काका काकू सांभाळतील तुमचा संसार पण हे कितपत योग्य होईल?

थोडा विचार कर आणि आज मॅनेजमेंट मीटिंग मध्ये एमडी ना चक्क सॉरी म्हणून राजीनामा परत घे. तुझ्यात खूप क्षमता आहे. VP Corporation ला तुझ्यासारख्या तरुणांची खूपच गरज आहे. पाच सहा वर्षात रुही च्या पण बिझनेसचे बस्तान छान बसेल व तुला पण सर्व परिस्थितीचा अंदाज येईल.”

“हो तू म्हणतेस ते पटते आहे मला .मी जरा जास्तच घाई करत होतो. बोंबला आता एमडी ना कसे पटवू? जाम टेन्शन आलय मला.”

“नको घाबरूस, अजून स्टाफ मध्ये कोणाला सांगितलं नाहीयेस त्यामुळे फार काही प्रॉब्लेम होणार नाही. सरांनी विचारलं की अजून कोणाला सांगितले आहेस का ?तर चक्क खोटं बोल सांग कोणालाही माहित नाही म्हणून अगदी मला पण तू सांगितलं नाहीस.”

“एमडी लई शहाणा आहे. तो लगेच म्हणेल रमाला माहित असेल ना? मी खोटं नाही बोलू शकत यार.”

“ए बावळट तू काही सत्यवान नाहीयेस. कधीकधी चांगल्या कामासाठी थोडं खोटं बोलावं लागलं तर चालत. जा आता आणि निस्तर स्वतः केलेला राडा. ऑल द बेस्ट.आणि हो सॉरी म्हणल्यानंतर तुझ्या डोक्यात VP Corporation साठी असलेल्या सगळ्या योजना त्यांना सांग. ते खुश होतील.”

राज आत मीटिंगला गेला आणि रेगे काकूंचा रमाला फोन आला.

“काय झालं काकू ? राज आत्ताच मीटिंग ला गेला आहे. डोन्ट वरी. सगळ ठीक होईल. मी त्याला समजावून सांगितल आहे.”

रेगेकाकूंचा सूर अगदीच रडवेला झाला होता. “अगं नाही राजपण फोन उचलत नाहीये म्हणून तुला केला. ह्यांना एकदम कसतरी होतंय. मला सुचतच नाहीये. मी काय करू?”

“काकू घाबरू नका, मी लगेच घरी येते. राजला आत्ता मीटिंगमध्ये डिस्टर्ब करत नाही.”

“आरआर, तुझ्या घरून फोन आला होता. घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे . रमा गेली आहे तू पटकन जा.” रीसेप्शनिस्ट कडून निरोप समजताच राज तातडीने घरी धावला.

रमा ने हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून काकांच्या उपचारांची पूर्ण सोय केली.
“थँक्स रमा आज तू नसतीस तर बाबांचं व माझ्या नोकरीचं काय झालं असतं?” आरआर गहिवरल्या आवाजात म्हणाला.”

“वेडा आहेस का ? माझ्या घरी काही प्रॉब्लेम झाला असता तर, तू पण हेच केलं असतं .तुझे बाबा मला माझ्या बाबां सारखेच आहेत ना?”

दोन महिन्यानंतर आरआर व रुही चे थाटामाटात लग्न झाले.रमाला करवलीचा मान मिळाला. ती छान मिरवत होती. माधवची जावईबापू जावईबापू म्हणून कौतुकाने रेंगे काका-काकू सगळ्यांची ओळख करून देत होते. मानसन्मान आणि खूप सारे प्रेम मिळवून ही जोडी तृप्त झाली होती.

रेगे काकू तर खूपच खुश होत्या. आंधळा मागतो एक डोळा देव व देतो तीन डोळे, सुरेख प्रेमळ सून, लाघवी स्वभावाची मुलगी व समजूतदार जावई अजून काय पाहिजे? रेगे काका-काकूंना रमा व माधव चा खूपच आधार वाटू लागला होता.

रुही चे पप्पा पण रमा वर खुश होते. राजला योग्य सल्ला देऊन VP Corporation ची चांगली नोकरी टिकली होती. माधव जाम खुश होता आपल्या बायकोवर. “किती छान मॅनेज केलंस तू , राजला छान समजावून सांगितलं व VP Corporation ची नोकरी वाचली. काकांना वेळीच ऍडमिट करून उपचार सुरू केलेस.मला नसतं सुचलं एवढ् सगळं.” माधव कौतुक भरल्या स्वरात म्हणाला.
“माधवराव , बास झालं माझं कौतुक.” पण रमा मनोमन सुखावली होती.

या सगळ्या गडबडीमध्ये काकू चा फोन येऊन गेला हे रमा माधवला सांगायची विसरली होती.
मध्यंतरी श्वेताच्या आयुष्यात बऱ्याच उलाढाली होऊन गेल्या होत्या.श्वेता ची फसगत झाली होती आणि म्हणून मागच्या दीड महिन्यापूर्वी ती परत घरी आली होती. काकूला राहवत नव्हतं म्हणून गुपचूप तिने फोन केला. आई-बाबांना समजलं तर काकूची काही धडगत नाही रमा म्हणाली.

माधव तर हे सगळं ऐकून एकदम चक्रावलाच होता.
“रमा, तू काहीतरी कर ना?”
“अरे आपण काय करू शकतो?”

एका प्रसन्न रविवारी सकाळी सकाळीच आरआर आणि रुही, माधव व रमाला आमंत्रण देण्यासाठी आले होते.राज व रुही चा पहिला अधिकाचा सण. रुही च्या माहेरी होता आणि त्याचच आमंत्रण करायला हे नवदांपत्य आले होते.
“ अरे आमचं काय काम आहे?”
“जास्त भाव नका खाऊ नणंदबाई “ म्हणत रुही चिडवत होती. “पप्पां चा तुला व माधवला रीतीने फोन येईलच.”
रमा तर अगदीच ओशाळूनच गेली. मागच्या वर्षी तिचं व माधवचे नवीन लग्न झाले होते. पण एकही सण कोणी साजरे केले नव्हते.एवढा मान ,एवढे प्रेम दोघेजण या प्रेमात चिंब भिजून गेले.
आरआर म्हणाला ,”रुही बाई आपल्या आईचा पण निरोप सांगा ना?”
“अरे हो, बर का माधवराव आमच्या रमा ला घेऊन शनिवारी तुमचा अधिकमास आमच्या घरी ,आम्ही करणार आहोत तेव्हा दोघांनी जेवायला नक्की या, त्यानिमित्ताने.रमा ला पण माहेरपण मिळेल व दुसऱ्या दिवशी आपण सर्व एकत्र माझ्या माहेरी जाऊ”.

प्रेमळ आई ,बाबा, भाऊ ,वहिनी जणू संपूर्ण कुटुंबच देवांनी त्यांना दिले होते , गेल्या तीन-चार महिन्यात घडलेल्या घटनांवर रमा व माधवला विश्वास बसत नव्हता .माधवचे मन भरून आले होते.

“सुख म्हणजे नक्की काय असते?” रमा माझ्या आयुष्यात आल्यापासून आयुष्याला एक वेगळाच अर्थ मिळाला आहे.खरंच मी खूप लकी आहे.मागील जन्मात काहीतरी पुण्य म्हणून मला रमा सारखी सहचारिणी मिळाली.

रेगे काका काकू तर पोटच्या च्या मुली सारखी माया करतात रमावर.पण माझी रमापण तितकीच लाघवी स्वभावाची आहे. सगळ्यांसाठी सतत धडपडणारी. योग्य वेळी आर आर ला समजावून सांगितल्यामुळे त्याची चांगली नोकरी वाचली. सासुरवाडी बरोबर मनमुटाव झाला नाही. एमडी बरोबरच्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यत्यय न आणता खंबीरपणे रमाने रेगे काकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार चालू केले व त्यांचा जीव वाचवला. प्रचंड धाडसी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता माझ्या रमा कडे आहे.”

रमा आपल्या विचारांच्या तंद्रीत होती.दीड पावणे दोन वर्षाचा पूर्ण आलेखच डोळ्यासमोर झरझर सरकत होता.माधवचे भेटणे , मग घरच्यांनी केलेला माधव चा अपमान व आपल्यावर टाकलेला बहिष्कार. दोघांनी सुरू केलेला संसार व “Nagmode & Sons” सोडून “VP Corporation” ची मिळालेली नोकरी.

आपल्याला आलेले बरे दिवस व राज रेगे ची झालेली ओळख.रेगे कुटुंबियांसाठी आपण केलेली धावाधाव आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे आपल्याला मिळालेलं एक छानसं हक्काचं कुटुंब.

बापरे ! किती उलथापालथ झाली आयुष्यात . रक्ताची नाही पण जीवाभावाची नाती मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माधवला मिळालेला मान सन्मान.

अंधारून आले होते.माधव व रमा भानावर आले.रमा पटकन उठली डोळे पुसत स्वयंपाक घरात पळाली. माधव पण खूपच हळवा झाला होता. पुढच्या आठवड्यातले दोन आमंत्रणे ही नुसती जेवणाची नसून प्रेमाच्या घट्ट धाग्यांची विण च होती जणू.
माधव नी रमाला हाक मारली.ती डोळे पुसत बाहेर आली.

माधव नी रमा चे दोन्ही हात हातात घेतले. “थॅंक यू रमा, तुझ्या चांगुलपणा मुळे, निरपेक्ष भावनेने केलेल्या मदतीचे फळ आज आपल्याला मिळत आहे.मी आयुष्यात कधीच अनुभवले नाही असे प्रेम,आदर, मानसन्मान आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेमाची नाती, जी तुझ्यामुळे मला मिळाली.”

“माधव, आपण दोघे पण खूप लकी आहोत. आपण आपले काम केले त्याचे ईश्वराने आपल्या पदरात खूप मोठे दान टाकले.गीतेचा श्लोक आज मला आठवला कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ! चल तिन्हीसांज होत आली आहे देवापुढे दिवा लावूयात.”

रमा व माधवने अखंड तेजाने झळकणारा नंदादिप लावून देवापुढे प्रार्थना केली “प्रेमाची नाती मिळाली, आता रक्ताची पण दे”.
देवबाप्पा गालातल्या गालात हसत होता. अखंड तेवणाऱ्या नंदादीप स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाशित करतो
असेच हे जोडपे आहे.
देवांनी ह्या जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले.

समाप्त

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.