Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नाकारलेला स्पर्श (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ रेश्मा गोडबोले रासम

शेजारील जोशी काका चा भारतातून फोन आला , आई गेली तुझी ताबडतोब ये, वहिनींनी सांगीतल्या प्रमाणे तुझी वाट न बघता अंतिम संस्कार उरकून घेतोय, शरद साठी ये पण ,आवरत नाहीये कोणाला एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला, अजय स्तब्ध बसून होता फोन घेऊन , आईने एवढं दूर केलं आपल्याला ह्याची जाणीव होऊन प्रचंड चीड आली त्याला, अपमानाने रडू आले, रेवा बाजूलाच होती काय झालं खुणेने विचारलं ती गेली इतकंच म्हणाला,

ताबडतोड रेवाने तिकीट बुक करून त्याची सगळी जायची व्यवस्था केली, इथली काळजी करू नको असं सांगितलं मी आहे ,  केवळ उपचार म्हणून अजयने जायची तयारी केली.

विमानात बसल्या बसल्या त्याला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं ,लहानपणापासून चे सगळे प्रसंग डोळ्यापुढे येऊ लागले,  त्याच अकाली मोठं झालेलं बालपण त्याला आठवू लागल,

आई कुठे आहेस ग बघ हुशार विद्यार्थी म्हणून बक्षीस मिळालं मला  कुठ आहे आई? पण आई कुठ होती ती आतल्या खोलीत शरद जवळ होती , त्याला भरवत होती .आई म्हणाली वा छान ठेव तिथ बघते नंतर . थोडं पाणी आणतोस का ह्याच्या साठी?  खळकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात आणि प्रचंड चीड आली त्याला त्याच्या भावाची .शरद लाळ गाळत त्याच्या कडे बघत होता, हसत होता वाकडे हात हलवून त्याला जवळ बोलवत होता , शरद पूर्ण मतिमंद नव्हता थोडं फार समजायचं माणस , स्पर्श , त्याने धाडकन दार लावलं आणि बक्षीस कोपऱ्यात फेकून दिले,

तू मोठा न शहाणा देवाने तुझ्या भावाला अस केलं तू त्याला समजून घे हेच ऐकत तो मोठा झाला,

वडील तर 6 वर्षाचा असताना वारलेले , आई साठी तरतूद करून गेले होते, घर भाड्याच होत पण मालक फार चांगले होते,.

शरद च्या बेंगरुळ रूपाची त्याला चीड यायची  ,तो निष्पाप  जीव त्याला बिलगायला यायचा पण अजय त्याला झिडकारायचा .आई म्हणायची हे घे लाडू खा शरद पूर्ण खात नाही तू खाऊन टाक टाकवत नाही , आई अस म्हंटली की तो गुपचूप खाऊ टाकून द्यायचा, त्याच उष्ट काय, तोच त्याला सहन होत नव्हता, त्याला त्याची शिशारी यायची , कळू लागल्या पासून त्याने कधी त्याला हात लावला नाही चुकून स्पर्श झाला तरी हात चोळून धुवून टाकायचा

आई म्हणायची देवाने तुला चांगलं केलं आणि त्याला अस तर त्याचा काय दोष तू नीट वाग,

सतत लाळ पुसायचा रुमाल अडकवलेलं ध्यान अजयला बघवायच नाही, त्याने कधीच शरद वर माया केली नाही उलट राग केला.

त्या रात्री मात्र रागाचा कडेलोट झाला  तापाने फणफणत तो निपचित पडला होता , आईने त्याला गोळी घ्यायला लावली , आणि झोप सांगितले अजय ला वाटलं आज तरी आई आपल्याला जवळ घेईल डोक्यावर हात ठेवेल पण नाही आई शरद जवळ झोपली त्याला आईच हवी अस म्हणून हट्टाने गेली तु शहाणा सुरता तुला कशाला आई हवी अस सुनावलं, डोळ्यातल पाणी खळत नव्हतं आणि डोक्यातला स्फोट थांबत नव्हता ठरवलं खूप शिकायचं आणि जायचं बाहेर कायमच परदेशी , बस नको हे नको ही माणसं , स्पर्शा साठी आसुसलेला तो तसाच उठून सगळे पाश तोडून गेला , लग्न केलं सेटल झाला लग्न केलं, आईला कर्तव्य म्हणून 1 फोन केवळ.

 भारतात घरी आल्यावर तो जोशी काकाना भेटला  , देहदान केलं असल्याने पुढचे विधी नाही आईने आधीच सांगितलं होतं. घरी आला शरद शांत बसला होता , जोशी काका म्हटले शरद बघ तुझा दादा आला, शरद ने मान वर केली, पुन्हा शिशारी आली अजयला, शरद हसत होता दादा दादा करत होता, जोशी काका गेले.

शरद उठला त्याला बिलगला , त्याला पुन्हा राग आला किळस आली त्याच्या पासून सूटका करून ,काही फोन वरून आश्रमात चौकशी करायला सुरुवात केली आणि काही गोष्टी ठरवल्या , आईच्या पत्राप्रमाणे पैसे ठेऊन गेली होती शरद साठी त्यात त्याची सोय होत होती, इथे सुद्धा आईने आपली मदत घेतली नाही आणि त्याला फुटका मणी सुद्धा मिळू दिला नाही सगळं शरद च  पुन्हा हा फिस्कटला . नाही म्हणायला एक फोटो ठेवला होता शरद हसतोय  आई हसतेय आणि शरद ने खांद्यावर हात ठेवल्याने चिडलेला असा तो, अजय ने  बॅगेत कपड्याच्या तळाशी टाकून दिला फोटो.

त्या रात्री शरद जवळ आला मिठी मारू लागला दादा  दादा करून , आई वर आकाशाकडे बोट दाखवू लागला, भेसूर रडू लागला, पुन्हा लाळ गळू लागली त्याची ह्यावेळी रुमाल घेऊन आई नव्हती चीड आली त्याला प्रचंड चीड त्याने त्याला ढकलून दिल , भेलकांडत शरद दूर पडला , हात लावू नको किळस येते तुझी दुर हो ओरडत राहिला .

दुसऱ्यादिवशी गाडी आली आश्रमातून शरद ला घेऊन जाऊ लागली अचानक शरद शांत झाल्यासारखा काहीतरी समजल्या सारखा त्यांच्या बरोबर अजय कडे न बघता चालू लागला .

 त्याने थोडं थांबून हात धरला निरोपा साठी यावेळी मात्र शरद ने हात शांतपणे काढून घेतला वर पाहिलं सुद्धा नाही एका रात्रीत वेड बाळ शहाण झालं.

घरी आला अजय त्याच्या, त्याची  बायको नेहेमीप्रमाणे दमलेली दिसत होती, अजय तडक आतल्या खोलीत गेला, त्याचा  मयंक पुन्हा violent झाला होता, वस्तू फेकून ओरडून ,दमला होता , अजय ला बघताच घाबरला अचानक ब्रेक लागल्या सारखा घाबरून बसला कोपऱ्यात. अजयला प्रचंड करुणा दाटुन आली  आपल्या मूलाची .शरद डोळ्यापुढे दिसू लागला , पुढे जाऊन मयांक ला मिठी मारून रडू लागला , मयंक ने no no करत जोरात ढकलून दिले नेहेमी प्रमाणे अजयला, त्याच्या स्पर्शाला त्याने कायम नाकारले होते .

क्षणात एका फटक्यात तू शहाणा न , म तो असा तर त्याचा दोष कसा हे वाक्य कानात वाजू लागलं, शरद चा स्पर्श त्याने नाकारला, आणि मयंकने त्याचा.

=========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *