Skip to content Skip to sidebar Skip to footer

जाणून घ्या नागपंचमीला सापाला दूध पाजणे श्रद्धा कि अंधश्रद्धा | nag panchami information in marathi

nag panchami information in marathi:

प्राण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवावे ही जाणीव करून देणारा, वर्षातून एकदा येणारा हा सण नक्की का साजरा केला जातो ? बघुया या मागची रंजक कथा….

भारतीय संस्कृती सण,संस्कृतीसाठी प्रसिध्द आहे. येणाऱ्या काही महिन्यात अनेक सण,उत्सव सुरू होत आहेत. सण आणि उत्सवांची विशेष परंपरा लाभली आहे आपल्या संस्कृतीला. त्यामुळे सगळे उत्सव आपण नेहमी मनोभावे साजरे करतो.

आता येणाऱ्या काही दिवसात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे “नाग पंचमी“. नाग पंचमीच्या दिवशी आपण काय करतो हे सणाच्या नावावरूनच लक्षात येते. या दिवशी नागांची, सर्पाची पूजा केली जाते. हा हिंदू धर्माचा प्रसिध्द सण पूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी नाग धारण करणाऱ्या भगवान शंकरांचीही पूजा केली जाते. कारण भगवान शंकर नागधरी आहेत शिवाय शक्ती आणि सूर्याचे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी नागाची पुजा केल्याने कालसर्पदोष निघून जातो. शिवाय या दिवशी केली जाणारी कालसर्प पूजा विशेष फळ देणारी ठरते. रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप या दिवशी आवर्जून करण्यात येतात. दिवस अत्यंत शुभ असल्याने या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजा लवकर आणि जास्त फलदायी मानल्या जातात.

प्राचीन काळापासून आजपर्यंत नागपंचमीची परंपरा चालत आली आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी या तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागांचे दर्शन खूपच शुभ मानले जाते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटपून नागांचे वारूळ बनवले जाते. याचे एका कागदावर चित्र काढले जाते किंवा रांगोळीने वारूळ काढून त्यात अनेक नाग काढले जातात. त्यावर फुल, अक्षदा, धूप, गंध यांनी नागाची पूजा केली जाते. नागाला सुगंध खूप प्रिय आहे त्यामुळे सुवासिक अगरबत्ती लावली जाते. खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी ब्राह्मण बोलावून त्यांनाही जेवण दिले जाते. तसेच या दिवशी गारुडी लोकांस पण पैसे आणि दूध दिले जाते. कारण गारुडी नेहमीच साप, नाग घेऊन फिरत असतात त्यामुळे त्यांनाही या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते.

जाणून घ्या हरतालिका व्रत कुणी व कसे करावे?

नारळीपोर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती

नाग देवता आणि सर्प देवता हे वारूळ करून त्यात रहातात. त्यांचे राहण्याचे ठिकाण हे मंदिरा समान गृहीत धरले जाते. त्यामुळे या दिवशी वारूळ पूजा केली जाते.

१. पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा परिक्षीत राजा हा द्वापार युगातील शेवटचा राजा होता. हा राजा खूपच धर्मशील आणि प्रजा हितासाठी यज्ञ,अनुष्ठान करत असे. तरीही तक्षक नावाच्या सापाने परिक्षीत राजाला मारून टाकले. परिक्षीत राजाचा मुलगा जनमेजय याने रागाने पृथ्वीवरून सापांच्या नाशासाठी यज्ञात सापांची आहुती द्यायला सुरुवात केली.

२. तर दुसरीकडे पौराणीक कथेनुसार नाग माता कद्रू हिने आपली सवत विनिता हिला धोका देण्यासाठी आपल्या मुलांना आज्ञा दिली. पण कद्रूच्या मुलांनी आईच्या आज्ञेची अवहेलना केली आणि सावत्र आईला धोका देण्यास नकार दिला. माता कद्रूने नागांना शाप दिला त्यामुळे नाग जळायला लागले. जीव वाचवण्यासाठी सगळे नाग ब्रह्मदेवाकडे गेले, तेंव्हा ब्रह्मदेवाने नागांना असे वरदान दिले की तपस्वी जगत्करू ऋषींचा पुत्र आस्तिक नागांचे रक्षण करेल. तो दिवस श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीचा होता.

नागांचा समूळ नायानाट करण्यासाठी जेंव्हा जनमेजय याने म्हणजेच परिक्षीत राजाच्या मुलाने तक्षक नागाची आहुती देण्यासाठी मंत्र म्हनला तेंव्हा आस्तिक मुनींनी त्याचे प्राण वाचवले. ही तिथी पण पंचमीची होती. अशा प्रकारे नागांच्या अस्तित्वाचे रक्षण झाले आणि नाग पंचमी साजरी होऊ लागली.

आपल्याकडे सणावारांचे काही खास नियम असतात. तसेच नियम नागपंचमी या सणाचे ही आहेत. बघुया काय आहेत ते नियम.

  • या दिवशी बऱ्याच ठिकाणी नाग दिसल्यानंतर त्यांना दूध पाजून नमस्कार केला जातो. पण असे मानले जाते की, या दिवशी नागाला किंवा सापाला दूध पाजू नये. कारण या दिवशी दूध पाजले तर त्यांचा मृत्यू लवकर होतो आणि तो दोष आपल्याला लागतो त्यामुळे आपण शापित होतो असे म्हणतात.
  • या दिवशी नांगर जमिनीवर चालवू नये किंवा मातीचे खोदकाम करू नये असे म्हणतात.
  • नागाचा फणा हा तव्यासारखा असतो त्यामुळे स्वयंपाकात तवा वापरू नये. म्हणजे या दिवशी तवा गॅसवर ठेवू नये असे करणे म्हणजे नागाला तव्यावर किंवा गॅसवर ठेवण्यासारखे आहे असे मानले जाते.

आपली भारतीय संस्कृती ही प्रेम, आपलेपणा, माणुसकी जपायला शिकवते. आपण नाती म्हणजेच माणसे जशी जपतो तसेच निसर्गावर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रेम करायला पाहिजे. तो ही आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच कधी आपण घरातील पाल मारत नाही तर हाकलून देतो. प्राण्यांवर दया करतो. घरात कुत्री, मांजरे सांभाळतो. अनेक प्राणीमित्र म्हणजेच प्राण्यांची काळजी घेणारे, निसर्गावर भरभरून प्रेम करणारे लोक आजही आहेत. आपण जितके प्रेम यांना देतो तितकेच प्रेम ते ही आपल्याला देतातच देतात. कुत्र्या, मांजरा प्रमाणे साप, नाग हे सुद्धा निसर्गाचा, जंगलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. साप आणि नाग तर चक्क भगवान शंकराने गळ्यात धारण केलेला आहे त्यामुळे तो देवाचे रुप आहे. कालिया पण नाग होता त्याला भगवान कृष्णाने न मारता त्याची चूक लक्षात आणून दिली आणि दुसरीकडे जायला सांगितले.

पण आजकाल लोक स्वतःच्या फायद्यासाठी या प्राण्यांची त्वचा काढून, विष काढून घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात विकतात, त्यांना मारतात किंवा विकून टाकतात. प्रत्येक प्राण्याची कातडी फायदेशीर असते म्हणून त्यांचा व्यवसाय करतात. पण अशाने सापांच्या किंबहुना सगळ्याच प्राण्यांच्या जाती धोक्यात आहेत म्हणूनच सरकार वन्यजीव जंतू विभागाद्वारे सापांना पकडण्यास, दूध पाजण्यासाठी मनाई करत आहे.

त्यामुळेच आपण सर्वांनी नाग, साप इतकेच नव्हे तर सर्वच प्राणी वाचवण्याचा संकल्प करायला हवा. असे कोणतेही उत्पादन वापरणार नाही ज्यात सापांच्या कातडीचा वापर केलेला असेल असा निश्चय या सणाच्या निमित्ताने करायला हवा. या वन्यजीवांना वाचवून आपली संस्कृती कायम ठेवली पाहिजे. जीव जंतुवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी जागरूक राहायला हवे.

तर असा हा वन्यजीव वाचवणारा आणि नागाला देवाचे रूप मानले जाणारा सण उत्साहाने पण प्राण्यांना कसलीही हानी न पोहोचवता छान साजरा करूया. सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा !!!

===================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: