भारतातील काही रहस्यमय मंदिरे जिथे रोज काही ना काही घटना होत राहतात

mysterious temples in india: आपल्या देशात अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक धर्माची, जातीची मंदिरे प्राचीन काळापासून बांधलेली आहेत आणि त्यांचे पावित्र्य जपलेले आहे. यातील काही मंदिरे ही खूप जुनी म्हणजे प्राचीन काळात बांधली गेली आहेत तर काही मंदिरे अलीकडे बांधली आहेत.
प्राचीन काळात मंदिरे बांधताना वास्तूशास्त्र आणि भौगोलिक शास्त्र विचारात घेऊन मग ती मंदिरे बांधली जात. तर राजे महाराजे आपला खजीना लपवून ठेवण्यासाठी त्यावर मंदिरे उभा करत आणि खजिण्यापर्यंत पोहचण्यासाठी वेगळी वाट किंवा दरवाजे बनवत.
तरीही आपल्या देशात अशी अनेक मंदिरे उभी आहेत ज्यांचा संबंध कोणत्याच खजिन्याशी नाही, तर त्यामागील करणे आणि रहस्य बरीच वेगळी आणि अद्भुत आहेत. यातील काही मंदिरांच्या रहस्यांचा शोध आजही सुरूच आहे.
आपण जनरली मंदिरात जातो ती आपली मनोकामना किंवा इच्छित कार्य पूर्ण व्हावे म्हणुन. मनःशांती लाभावी म्हणून किंवा मग ज्याच्यावर आपली मनापासून श्रद्धा आहे त्या ईश्वराचे दर्शन व्हावे, सेवा घडावी म्हणून.
आज अशाच काही मंदिरांची अद्भुत वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत जी ऐकून मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ओढ तर वाढेलच शिवाय हवे ते मिळण्याची खात्री पटेल.
चला तर मग जाणून घेऊया भारतातील काही मंदिरांचे रहस्य :
mysterious temples in india:
१. करणी मातेचे मंदीर :
करणी मातेचे हे मंदिर बिकानेर येथे स्थित आहे. या मंदिरातील देवीला दुर्गेचा अवतार मानले जाते. या मंदिराचे वेगळे रहस्य म्हणजे येथे वीस हजार उंदीर राहतात. म्हणूनच या मंदिराला “चुहो का मंदिर” असेही म्हटले जाते. तर येथील उंदरांना “काबा” असे म्हणतात. या उंदरांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांचे रक्षण केले जाते आणि जेवण पण दिले जाते. मंदिरात जाताना पायाखाली उंदीर येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
असे म्हणतात की, एक जरी उंदीर पायाखाली आला तर अपशकून झाला असे मानले जाते. तसेच एक जरी उंदीर पायावरून गेला तर देवीची कृपा झाली असे म्हणतात. या शिवाय पांढरा उंदीर दिसला तर इच्छित मनोकामना पूर्ण झाली असेही म्हटले जाते. त्यामुळे लाखो भक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येतात.
२. कन्या कुमारी मंदिर :
हे मंदिर म्हणजे भारताचे सगळ्यात खालच्या भागाला आहे. या मंदिरात देवी पार्वतीच्या कन्यारुपाची पूजा केली जाते म्हणूनच या मंदिराचे नाव कन्या कुमारी आहे. समुद्र तटावर हे मंदिर वसलेले आहे. याचे वैशिष्ट्य असे की, हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे दर्शन घेण्यासाठी पुरुषांना मंदिरात प्रवेश करण्याआधी कमरेच्या वरील भागाचे कपडे काढावे लागतात. या मंदिराच्या ठिकाणी देवीचा विवाह सोहळा पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे शिल्लक राहिलेले डाळ आणि तांदूळ खडे आणि दडग बनले आहेत.
त्यामुळे असे म्हटले जाते की मंदिरा जवळ डाळ आणि तांदळाच्या आकाराचेच खडे आणि दगड मिळतात. या मंदिराचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे.समुद्र तटावर असल्या कारणाने याच्या प्राकृतिक सौंदर्यात भरच पडते. मंदिराच्या उत्तरे पासून २-३ किमी अंतरावर सनसेट पॉईंट आहे. वेद पुराणातही या मंदिराचा उल्लेख आढळतो.
हेही वाचा
चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी
३. सोमनाथ मंदिर :
हे मंदिर यदुवांशाचे प्रमुख स्थान आहे. कारण भगवान श्री कृष्णाने इथेच देहत्याग केला होता. भगवान श्री कृष्ण भालुकातीरावर आराम करत असताना एका शिकाऱ्याने त्यांच्या तळ पायावरील पद्म चीन्हाला हरणाचा डोळा समजून बाण मारला आणि श्री कृष्णाने इथेच देहत्याग करून वैकुंठगमन केले. त्यामुळे इथे एक श्री कृष्ण मंदिर पण आहे. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंग पैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. म्हणूनच या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
असे म्हणतात की प्राचीन काळात या मंदिरातील शिवलिंग हवेत डुलत होते, पण आक्रमणकारानी याला तोडले. असे मानले जाते की, एकूण २४ लिंगांची स्थापना करण्यात आली होती, त्यात सोमनाथ शिवलिंग मधोमध होते. तर काही शिवलिंग ही आकाशातून खाली उतरताना दिसतात. हे मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातील बंदरगा येथील भेरावर येथे आहे. या मंदिराचे निर्माण चंद्र देवांनी केले आहे. या मंदिराला सतरा वेळा नष्ट करण्यात आले आणि तितक्याच वेळा याचे पुनर्निर्माण केले आहे.
४. अजंता एलोरा :
या मंदिराच्या गुफा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहेत. या गुफांची निर्मिती मोठ्या डोंगरांना तोडून करण्यात आली आहे. २९ गुफा अजंता येथे तर ३४ गुफा एलोरा येथे आहेत. येथील गुफांच्या रहस्यांचा शोध आजही सुरूच आहे.
५. उज्जैन काळभैरव मंदिर :
या मंदिरात काळभैरव देवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे ही मूर्ती मद्यपान म्हणजेच दारू पीते. म्हणूनच या देवाला नैवेद्य म्हणून दारू दाखवली जाते तसेच प्रसाद म्हणून वाटली जाते. असे म्हणतात की काळभैरव हे या शहराचे रक्षक आहेत. भगवान काळभैरव दारू घेत असल्याने मंदिरा बाहेर बारा महिने, चोवीस तास दारू उपलब्ध असते.
६. शनी शिंगणापूर :
सूर्यदेवाचे पुत्र असणाऱ्या शनि देवांची अनेक मंदिरे आहेत. त्यातील महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील शनीचे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य असे की येथील शनि देवाची पाषाणाची मूर्ती म्हणजेच प्रतिमा ही कोणत्याही छता शिवाय मोकळ्या आकशाखाली संगमरवरी चबुतऱ्यावर उभी आहे.
या गावात शनि देवाची इतकी भीती तसेच आदर आहे की मूर्ती छतशिवाय असल्यामुळे येथील कित्येक घरे ही दरवाजे, खिडकी आणि कपाटाशिवाय आहेत. येथील घरांस फक्त पडदे पाहायला मिळतील. असे म्हणतात की इथे कधीच चोरी होत नाही, आणि जर कोणी ती केलीच तर स्वतः भगवान शनि त्याला शिक्षा करतात. असे कित्येक उदाहरणे आजवर पाहायला मिळाली आहेत. शनि देवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी लाखो भाविक दर शनिवारी येथे दर्शनासाठी येत असतात.
७. कामाख्या मंदिर :
देवीच्या ५१ शक्ती पीठांपैकी सगळ्यात महत्त्वपूर्ण असे हे मंदिर मानले जाते. या मंदिरात अनेक तांत्रिक गड आहेत. येथे त्रिपुरा सुंदरी, मातंगी आणि कमला देवीच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. शिवाय सात वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिमा आहेत ज्या मुख्य मंदिराला घेरून आहेत.
या मंदिराची पौराणिक काळापासून अशी मान्यता आहे की, वर्षातून एकदा माता भगवती देवीला मासिक धर्म येतो आणि माता भगवतीची गर्भग्रहस्थितीत अवस्थेत तीन दिवस पाण्याऐवजी रक्त प्रवाह करते. या देवीच्या आणि मंदिराच्या रहस्याची कित्येक पुस्तके उपलब्ध आहेत आणि त्यात हजारो किस्से आपल्याला पाहायला मिळतील.
८. खजुराओ मंदिर :
या मंदिरात अनेक ऋषी मुनींनी तप, साधना केलेली आहे. हे मंदिर मध्य प्रदेश येथील चित्रपुर जिल्ह्यातील कसबा येथे आहे. हे मंदिर म्हणजे ताजमहाल नंतर पाहिले जाणारे उत्तम पर्यटन क्षेत्रात मोडते. भारतीय आर्य आणि पाश्चिमात्य मंदिराचे प्रतीक आहे हे मंदिर. चंदेल शासनाने याची निर्मिती ई.स पूर्व ९००-११३० मध्ये केलेली असून येथे निर्मिती वेळी अल् बिरूनी यांचा उल्लेख पाहायला मिळतो.
जैन संप्रदायाशी संबंधित असलेले हे मंदिर असून अशी एकूण ८४ मंदिरे बांधली गेली आणि त्यातील बावीस मंदिरे शोधली आहेत. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे शारीरिक संबंधवर आधारित एक श्रृंखला येथे बनवली आहे.
९. ज्वाला देवी मंदिर :
हिमाचल प्रदेशातील कांगडा घाटातील दक्षिणेकडे ३० किमी अंतरावर हे मंदिर स्थित आहे. देवीच्या शक्ती पीठापैकी हे एक मंदिर आहे. या मंदिरात देवी सतीचा विजय झाला होता. पांडवांनी या मंदिराचा शोध घेतला होता. या मंदिराचे पाहिले वैशिष्ठ्य म्हणजे या देवीच्या मुखातून हजारो वर्षांपासून अग्नी येत आहे. संशोधकांच्या मता प्रमाणे तो ज्वाला मुखीचा अग्नी असू शकतो.
या अग्नीमधून येणारी नऊ लपटे म्हणजे देवीची नऊ रूपे आहेत असे म्हणतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात तांब्याचा पाईप आहे, ज्यातून नैसर्गिक गॅस वाहतो. त्यामुळे मंदिराचे तो आकर्षण ठरले आहे. देवीचा परमभक्त राजा भोमीचांद यांना स्वप्नात देवीचे दर्शन झाले आणि त्यातून त्यांनी हे मंदिर बांधले आहे. जो कोणी श्रध्देने या मंदिरात येतो, त्याची इच्छा पूर्ण होतेच असे म्हणतात.
१०. मेरू रीलिजन स्पॉट कैलाश पर्वत :
हिमालय पर्वताच्या वरच्या शृंखलावर मान सरोवरावर वसलेले हे ठिकाण आहे. असे म्हणतात की इथे स्वतः भगवान शंकर वास करतात. पौराणिक काळात याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान शंकराच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण अतिशय पवित्र मानले जाते. जगातील सर्वात उंच अशा मान सरोवरवर आणि कैलाशच्या मेरु पर्वतावर स्थित असलेल्या या स्थानाला शिव आणि देवलोक म्हटले जाते.
आहेत ना ही रहस्य अद्भुत आणि वेगळी. जमेल तेंव्हा नक्कीच भेट द्या आणि हवं ते मिळावा.
==========