मुलगा हवा होता

आज काळ कितीही बदलला तरी काही गोष्टी अजूनही बदलणार नाही किंवा म्हणा कि अजूनही काही लोक त्याच बुरसटलेल्या विचारांनी घेरलेले असतात. आज आपण अशीच एक कथा बघू या किंबहुना कथा म्हणण्याऐवजी सद्य परिस्थिती आहे असच म्हणू या. कारण अजूनही माझ्या आजूबाजूला मी अशी खूप उदाहरणं बघत आहे
जोशी काका वय वर्ष ५० असेल एकंदरीत.जोशी काका आणि काकू खूपच मन मिळवू होते.कॉलनी मध्ये सगळेच त्यांना ओळखत असत आणि का नाही ओळखणार त्या मागचं कारण म्हणजे जोशी काकांना एकच मुलगी होती नाव तिचा सदू. मुलगा नसल्या कारणाने कॉलोनीतले सगळे लोकं त्यांच्या बद्दल बोलत कि सदूच लग्न झाल्यावर पुढे जोशी काका आणि काकू च कसं होणार.
असा एकही समारंभ नसेल जिथे जोशी काका किंवा काकू ना इतर लोकांनी मुलाचं महत्व सांगितलं नसेल.पण जोशी काका चांगले सुशिक्षित गृहस्थ होते आणि एका सरकारी बँकेत मॅनेजर होते सुशिक्षित असल्या कारणाने जोशी काकांनी कधीच असा विचार केला नाही आणि उलट जोशी काकू नि पण त्यांची साथच दिली. सुशिक्षित असल्याकारणाने जोशी काकांनी सदू ला खूप शिकवलं. सदू एका नामांकित कंपनी मध्ये सिईओ च्या पोस्ट वर कार्यरत होती.
याउलट जोशी काकांचे शेजारी देशपांडे काका खूप बुरसटलेल्या विचारांचे. देशपांडे काकांना एक मुलगा आणि मुलगी.असा त्यांचं सुखी कुटुंब.देशपांडे काकांनी मुलाला तर इंजिनीयर बनवला पण मुलीला वेळीच लग्नाच्या बोहल्यावर चढून दिला आणि आपली सगळी इस्टेट मुलाच्या नावावर करून टाकली होती. पण देशपांडे काकांना मुलाचं लग्न झाल्यावर वेळीच खंत वाटू लागली होती कारण लग्नानंतर मुलाच्या वर्तनात बराच फरक पडला होता आणि तो आता आपला मुलगा राहिला नाही असं कळून चुकलं होतं देशपांडे काका काकूंना.
खरा वाईट अनुभव तर देशपांडे काका काकूंना तेव्हा आला जेव्हा एके दिवशी मुलाने त्यांना घरा बाहेर काढलं होत.एवढं सगळं झाला पण मुलीला काही माहित नव्हता. एके दिवशी ती माहेरपणाला आली पण घराला कुलूप बघून अचंबित झाली म्हणून जोशी काकां कडे गेली, तिथे गेल्यावर जोशी काकांनी सगळी परिस्थिती तिला सांगितली. पण ती फक्त रडूच शकत होती कारण तीही सासुरवाशीण होती. जोशी काकांनी तिला शांत केला आणि देशपांडे काकांच्या नवीन घराकडे घेऊन गेले. देशपांडे काका काकू एका ४ खोलीच्या आलिशान फ्लॅट मध्ये राहायला गेले होते. हे सगळं बघून मुलीला हायसं वाटलं आणि सोबतच ती आश्चर्यचकित झाली होती कि हे सगळं कसा घडलं कारण देशपांडे काका निवृत्त झाले होते आणि आपलं जे होतं नव्हतं ते सगळं काही त्यांनी मुलाच्या नावी केला होतं.
देशपांडे काकांनी मुलीला शांत केला आणि म्हणाले पिल्लू तू रडू नको आम्ही खूप खुश आहोत आणि हे सगळं जे तू बघतेय ते माझ्या दुसऱ्या मुलीने केलं. होय माझी दुसरी मुलगी, दुसरी तिसरी कुणी नसून आपली सदू.
सदू आज सुशिक्षित होती आणि उमद्या पगाराची नोकरी होती तिला त्यामुळे लग्नाआधीच तिने पुण्यामध्ये स्वतःचे २ फ्लॅट्स खरेदी केले होते. एवढंच नाही तर तिने देशपांडे काका काकू ना त्यांची इच्छा असे पर्यंत राहायची परवानगी दिली होती. हे सगळं सांगताना देशपांडे काकांना रडू कोसळला आणि त्यांच्या मनात एक विचार काहूर करून गेला कि खरंच कुणाला आपलं उभा आयुष्य काढायला मुलगा हवा का ?
बोध : आज जगात कितीतरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर रोज पाहायला मिळतात, कि मुली प्रत्येक क्षेत्रात किती कर्तुत्ववान होत चालल्या आहेत. मुलीचा जन्म होताच तिच्या लग्नाचा विचार करण्याऐवजी तिच्या शिक्षणासाठी पैसे एकजूट करणे आणि मुलीला शिकवून तिला तिच्या पायावर उभं करणे आज आवश्यक आहे..
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============