Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जाणून घ्या जागतिक मातृदिनाचे महत्व mother’s day in Marathi

mother’s day in Marathi:
मैं कभी बतलाता नही
पर अंधेरेसे डरता हुं मैं मां
यू तो मैं दिखलाता नहीं
तेरी परवाह करता हुं मै मां
तुझे सब हैं पता है ना मां

शंकर महादेवन यांच्या आवाजातील तारे जमी पर या चित्रपटतील हे गाणं ऐकलं की प्रत्येकाच्या मनातील आई बद्दलच्या भावना उफाळून आल्या वाचून राहणार नाहीतच. हो ना.

आई, माता, जननी, मां अशा नावांनी ओळखली जाणारी आपली आई हे प्रत्येक मुलाचे विश्व असते. आई या नावातच किती माया, आपुलकी दडलेली आहे. असे म्हणतात देवाला आपल्या प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने आई बनवली.

वात्सल्याचा सागर म्हणजे आई, अपार माया म्हणजे आई, निरपेक्ष प्रेम म्हणजे आई, लेकरावरची सावली म्हणजे आई, डोक्यावरचा आशीर्वाद म्हणजे आई. शब्दांशिवाय लेकरांच्या मनातील स्थिती ओळखून घेणारी व्यक्ती म्हणजे आई, सगळ्याच इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे आई, कोणत्याही परिस्थितीत हक्काचा आधार म्हणजे आई, मनातील प्रत्येक गोष्ट विश्वासाने बोलून दाखवतात येणारी व्यक्ती म्हणजे आई. काय आणि किती काय काय सांगावे या आई बद्दल. शब्द कमी पडतील असा विषय आहे खरतर हा.

याच आई साठी वर्षातील ३६५ दिवसांपैकी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण मदर्स डे साजरा करतो. खरतर प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस हा आईसाठी समर्पित असायला हवा. कारण तीच आपल्याला हे जग दाखवते, त्यासाठी नऊ महिने अनेक यातना हसत खेळत सहन करते. संस्कार करते, तिचे पूर्ण आयुष्य तिच्या मुलांसाठी घालवते कसलीही तक्रार न करता. त्यामुळे प्रत्येक दिवस तिला अर्पण केला तर कुठे बिघडलं ?? म्हणूनच अनेकांनी आपल्या आई बद्दलच्या भावना कधी कवितेतून, कधी गाण्यातून, कधी एखाद्या चित्रपटातून तर कधी पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पांडुरंग सदाशिव साने यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहले. तर माधव ज्युलियन यांनी
वात्सल्य सिंधू आई
प्रेमा स्वरूप आई
बोलावू तुज आता
मी कोणत्या उपायी
ही सुंदर कविता लिहली आहे, तर

आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी
ती हाक येई कानी मज होय शोक कारी
नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची चित्ती सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी.

ही यशवंत यांची कविता आई बद्दलच्या भावना किती उत्तम प्रकारे मांडत आहे. खरंय जगातील सगळी सुख एकीकडे तर आईचे सुख एकीकडे. तिच्या प्रेमाची सर बाकी कशालाही नाही. तुमच्याकडे अरबो ची संपत्ती असेल आणि तुमच्याकडे आई नसेल तर तुम्ही भिकारीच आहात हेच सांगते ही कविता.
किती मोठा अर्थ दडलेला आहे या कवितेत. ज्याला तो खऱ्या अर्थाने समजला त्याला आई समजली. आई सोबत असलेली आपली नाळ कधीही न तुटणारी असते.

मदर्स डे हा खरतर पश्चिमात्य देशात सुरू करण्यात आलेला दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यामागे बरीच कारणे आहेत. पौराणिक ग्रीक कथे नुसार याची सुरुवात प्राचीन ग्रीक संस्कृतीपासून चालत आली आहे असे इतिहासकार सांगतात. कारण प्राचीन ग्रीक संस्कृतीत स्यबेले नावाची ग्रीक देवतांची आई होती, ज्यांना ग्रीक वासी माता, मदर,आई असे म्हणत. त्यांच्या प्रीत्यर्थ हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस फक्त ग्रीक मध्ये नाही तर एशिया मायनर जवळ आणि रोम मध्ये साजरा होत असे. तिकडे १५ मार्च ते १८ मार्च पर्यंत चाले. सगळे कुटुंबातील लोक एकत्र येऊन, छान गाणी म्हणून आणि वेगवेगळ्या रंजक पदार्थांचा आस्वाद घेऊन साजरा करत असे. अनेक ठिकाणी मदर्स डे साजरा करण्याची कारणेही वेगवेगळी आहेत, थायलंड मध्ये तिथल्या राणीच्या वाढदिवशी ऑगस्ट मध्ये मदर्स डे साजरा होतो.
तर इथिओपिया मध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी काही दिवस ठरलेले आहेत इथेही सगळे कुटुंबीय एकत्र येऊन छान वेळ घालवतात आणि हॉटेलमध्ये जेवण करतात.
युरोप आणि ब्रिटनमध्ये या दिवसाला मदरिंग संडे म्हणून ओळखले जाते.

काही लोक म्हणतात की याची सुरुवात अमेरिकेत राहणारी अमेरिकन एक्टिविस्ट अँना जर्व्हिस यांच्यामुळे झाली.

इ. स १९०० च्या सुमारास अमेरिकेत या दिवसाची सुरुवात झाली. त्या वेळी अमेरिकेत सिव्हील वॉर चालू होण्याआधी “रिव्हीस जार्विस” या महिलेने व्हार्जिनिया प्रांतात मदर्स डे वर्क क्लब असा क्लब स्थापन केला. ज्यात मतांनी आपल्या मुलांची कशी काळजी घ्यायला हवी याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. नंतर जागोजागी असे क्लब सुरू झाले. त्यांच्या या कामात जुलिया वॉर्ड हावे या त्यांच्या मैत्रीण सुद्धा काम करत होत्या. नंतर अमेरिकेत सिव्हील वॉर सुरू झाले, गृहयुद्धचा भडका उडाला आणि हे सगळं थांबवण्यासाठी सगळ्या माता एकत्र आल्या. हे युद्ध थांबाव आणि प्रेम निर्माण व्हावे यासाठी सगळ्या मातांची एकत्रित शक्ती काम करू लागली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. युद्ध थांबले पण मदर्स डे वर्क क्लब मात्र चालूच होता आणि त्याच काम सुद्धा. हे काम करणाऱ्या रिव्हिस जर्व्हिस यांची मुलगी अँना जर्व्हिस हे सगळं पहात होती. अँना त्यांच्या आईशी खूपच जास्त कनेक्टेड होत्या. त्यांचं त्यांच्या आईवर अफाट प्रेम होत आणि त्यामुळेच त्यांनी लग्न केले नाही. आपल्या सगळ्या मातांनी मिळून केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस असावा इतकीच त्यांची इच्छा होती आणि तशी कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर १९०५ मध्ये त्यांच्या आई म्हणजे रीव्हीस जर्व्हिस यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर ही गोष्ट त्यांना खूपच जाणवायला लागली. पुढे त्यांनी त्यांच्या आईचे काम सुरूच ठेवले.

============

१९०८ मध्ये फिलाडेल्फिया मधील डिपार्टमेंटल दुकानाचे मालक जॉन वणामेकर यांनी अँनाच्या मदर्स क्लबल आर्थिक मदत केली. तेंव्हा पहिल्यांदा अँनाने वेस्ट व्हार्जीनिया मधील ग्राफ्टान येथील चर्चमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. वनामेकर यांच्या दुकानात त्यांनी हा इव्हेंट साजरा केला आणि त्यासाठी खूप लोकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली. पहिला मदर्स डे यशस्वी झाल्यावर अँनाने सगळ्या देशभरात हा दिवस साजरा करण्याची मागणी लावून घेतली. अमेरिकेत बऱ्याच सुट्ट्या फक्त पुरुषांशी निगडित असून स्त्रीसाठी कोणतीही सुट्टी दिली नाही अशी तक्रार अँनाने केली. सगळ्या देशात मदर्स डे साजरा व्हायला हवा यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आणि किती लोकांच्या सह्या येतात हे पेपरमध्ये छापून देऊ लागली. तिच्या प्रयत्नांना यश येत होते. आणि त्याचाच परिणाम म्हणजे १९१२ पर्यंत अमेरिकेत अनेक चर्च, राज्य आणि शहरात मदर्स डे साजरा व्हायला सुरुवात झाली होती. हे सगळे पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येईल आणि त्यासाठी राष्ट्रीय सुट्टी राहील असे १९१४ मध्ये जाहीर केले.

गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व

जागतिक महिला दिनानिमित्त अलक

अँना हा दिवस तिच्या आईच्या आठवणीत घालवण्यासाठी साजरा करत होती. त्यासाठी ती पांढरे कपडे घालून चर्चमध्ये जाणे, तिकडे सेवा करणे, एखाद्या आईला भेट देणे, हॉल मध्ये सगळे जमा करणे, एखाद्या आईच्या कर्तृत्वावर भाषण करणे आणि काही गाणी ऐकणे अशा प्रकारे ती हा दिवस साजरा करते. हळू हळू मदर्स डे ल फुले, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड यांची रेलचेल सुरू झाली आणि या दिवसाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होऊ लागले. याच दिवसाच्या निमित्ताने अनेक गरीब माता ना आर्थिक मदत केली जाऊ लागली.

१९३४ मध्ये प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी एक स्टॅम्प आणला त्यात असे लीहले होते ….
In memory and in honor of the mother’s of America.

म्हणजेच अमेरिकेतील मातांच्या आठवणी आणि सन्मानार्थ.

या मदर्स डे ची खरी सुरुवात ही अमेरिकेत अँना जर्व्हिस यांच्या मुळेच झाली. या देशातील लोक हा दिवस साजरा करण्यासाठी पूर्ण कुटुंबा सोबत एकत्रित पने केक कट करतात आणि हॉटेल मध्ये जेवायला जातात.

तर आपला भारतदेश हा संस्कृती जपणारा असल्याने इथेही हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. केक कापून, आईवर कविता लिहून हा दिवस साजरा केला जातो.

आई आपल्या मुलांसाठी दिवसरात्र कष्ट करते, सगळ्या जगाशी लढायला तयार असते. तिच्या मुलांकडून कसल्याही अपेक्षा नसतात. मुलांवरील तिचे प्रेम कधीच कमी होत नाही. त्या आईशिवाय जग अपूर्णच आहे. म्हणूनच त्या मातेला मानवंदना देण्यासाठी, तसेच वर्षातला एक दिवस आईला विश्रांती मिळावी म्हणून हा मदर्स डे साजरा केला जातो. खरतर वर्षातले ३६५ दिवस आईला समर्पित करण्या सारखेच असतात, तरीही एखादा ठराविक दिवस आईच्या नावाने जगभर साजरा केला जावा. या भावनेतून आपण हा दिवस उत्साहाने साजर करतो. काही ठिकाणी आईला स्वयंपाक घरातून सुट्टी देऊन हा दिवस साजरा केला जातो.
भारत आणि अमेरिका सहित एकूण ४० देशांत हा दिवस साजरा होतो. अजून एक गोष्ट ऐकून आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटल्या खेरीज राहणार नाही आणि ती म्हणजे इतर कोणत्याही दिवसा पेक्षा या दिवशी फोनचे नेटवर्क सगळ्यात जास्त बिझी असते. या दिवशी फुलांची विक्री वाढते, भेटवस्तू, भेटकार्ड यांची खरेदी वाढते. अमेरिकेत या दिवशी आईला भेट देण्यासाठी किमान १८५ डॉलर्स म्हणजेच १४०७२.०८ रुपये इतका खर्च होतो अशी आकडेवारी दाखवते.

आईला खुश करणे ही खूपच सोपी गोष्ट असते. आपण मनापासून केलेली कुठलीही गोष्ट तिला आनंदी करेलच यात शंका नाही. अगदी मग आपण तिच्यासाठी केलेला चहा असो, शॉपिंग असो किंवा तिच्यासाठी तिच्या आवडीचे लावलेले गाणे असो. फक्त प्रयत्न आणि इच्छा मनापासून असायला हवी इतकच.

चला तर मग येत्या ८ मे २०२२ रोजी येणाऱ्या मदर्स डे साठी काहीतरी आपल्या आईला आवडेल, तिच्या चेहऱ्यावर मनापासून हसू आणेल अशी कोणती गोष्ट करायची ते ठरवूया आणि हा दिवस तिच्यासाठी विशेष बनवूया.
===================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *