Ritbhatmarathi

Search
Close this search box.

ती, खाकीतल्या करड्या नजरेच्या बापाची मुलगी. पोलीस खात्यात असलेल्या कडक शिस्तीच्या आणि करारी आवाजाच्या वडिलांसमोर कधी उभे राहण्याची आणि बोलण्याची हिम्मत झाली नाही. तरीही बापलेकीचा एकमेकांवर जीव होता.
तिचं लग्न ठरलं तेही एका पोलीस ऑफीसरशी. अवघ्या एका महिन्यात लग्न पार पडलं.

त्या एक महिन्याच्या काळात त्याला इलेक्शन ड्युटी लागलेली, त्यामुळे दोघांनाही एकमेकांना फारसा वेळ द्यायला जमलं नाही.लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी तिने त्याला चहा नेऊन दिला.त्याच्यासमोर चहा ठेवून ती पुन्हा किचनमध्ये आली,तेवढ्यात त्याने तिला आवाज दिला.आधीच खणखणीत असलेला त्याचा आवाज तिला जास्तच मोठा वाटला. ती दबक्या पावलांनी त्याच्यासमोर आली तेवढ्यात तो म्हणाला तू घेतलास चहा? तिने मानेनेच नाही सांगितले, यावर तो म्हणाला जा तुझाही चहा घेऊन ये,आजपासून सकाळचा चहा आपण सोबतच घ्यायचा. दिवसभराचं मला काही माहीत नसतं.

ती चहा घेऊन आली,तोपर्यंत त्याने तिच्या आवडीची किशोरदांची गाणी लावली. लग्न ठरल्यानंतर त्याला तीला फारसा वेळ देता नाही आला, तरीही त्याने तिच्या भावाकडून तिच्या सगळ्या आवडी निवडी विचारुन घेतल्या होत्या. सकाळचा चहा आणि किशोरदांची गाणी हे तिचं पहिलं प्रेम आहे हे त्याला कळलं होतं. आणि म्हणूनच त्याने दिवसाची सुरुवातच तिच्या आवडीनिवडी जपण्यापासून केली. ती चहाचा कप घेऊन आली आणि त्याच्यासमोर बसली. तसा तो स्वतःचा कप तिच्या कपाला टेकवत म्हणाला “Let’s celebrate your first love with your second love” तशी ती मनोमन सुखावली.. मनातल्या मनात तिने बाबांना सांगून टाकलं तुम्ही माझ्या साठी परफेक्ट जोडीदार निवडलात…

चहात साखर विरघळावी तशी ती त्याच्यात विरून गेली ❤️

-सुरेखकन्या.
ॲड.अश्विनी सचिन जगताप.

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *