Skip to content Skip to sidebar Skip to footer

डोक्यावर धो धो पाऊस, हिरवीगार माळरानं, लपाछपी खेळणारे ढग, खळखळ वाहणारे झरे ह्या सर्वांचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील ह्या ठिकाणांना नक्की भेट द्या.

monsoon getaways near mumbai: पाऊस, ट्रेकिंग, अद्भुत निसर्ग सौंदर्य आणि हिरवीगार वनराई ते ही आपल्याच महाराष्ट्रात तर मग इथे नक्कीच भेट द्या …..

मित्रानो पावसाळा सुरू होत आहे. नुकतीच उन्हाळ्याची काहीली सहन करून आकाशातून पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाची आतुरतेने सगळेच वाट पहात आहेत. काही ठिकाणी तर पाऊस पडायला सुरुवात पण झाली आहे तर काही ठिकाणी बाकी आहे. पाऊस म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात, जसे की हातात वाफाळलेला चहाचा किंवा कॉफीचा मग आणि गॅलरीतून पावसाची अनुभूती, गरमा गरम आईच्या हातचे पकोडे, छत्री, रेनकोट घेऊन स्कूल बस पकडण्याची होणारी धावपळ, चुकून छत्री विसरलो म्हणून पावसाने आपल्याला भिजवत दिलेली शिक्षा, मित्रांसोबत पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोमान्स. हो आपल्या जोडीदारासोबत त्याचा / तिचा हात हातात घेऊन पावसाची रिमझिम सर अंगावर घेत भिजण्याची मजा काही वेगळीच असते ना मित्रानो. त्यात मक्याचे कणीस जर खायला मिळाले तर मग हा आनंद द्विगुणित होतो.

विचार करूनच किती छान वाटत आहे ना ?? मग हाच सगळा आनंद आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, डोंगर दऱ्या, पावसाचे धबधबे, हिरवीगार वनराई या सोबत अनुभवला तर ?? मस्तच. कोणाला नाही आवडणार अशी मजा मस्ती करायला ??

आपला महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य असेल जिथे समुद्र किनारे, डोंगरदऱ्या, सुंदर निसर्ग, हिरवीगार वनराई, धबधबे, पर्वत, घाट, पर्वत, पठार, किल्ले अशा सर्व प्रकारच्या निसर्गाच्या छटा आढळतात. आज आपण महाराष्ट्रातील अशा काही सुंदर ठिकाणांची ओळख करून घेणार आहोत जिथे पावसाळ्यात एकदा तरी जाऊन नक्कीच भेट द्यायला हवी.

monsoon getaways near mumbai:

महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. नाशिकपासून ८० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण सातपुडा पर्वतराजीत वसलेले आहे. येथील निसर्ग पाहण्यासारखा आहे. हे ठिकाण पर्वतरांगेत वसलेले असल्यामुळे उंचावरून खाली कोसळणारे धबधबे आकर्षित करतात.

येथील हरगढ किल्ला, कलाकारांचे खेडे म्हणजेच आर्टिस्ट व्हिल्लेज, मध संकलन केंद्रे, गीरा धबधबा, रोपवे, बोटिंग क्लब, संग्रहालय, उगवता आणि मावळता सूर्य देखावा, एको पॉइंट, ॲक्क्वारियम हे सगळे ठिकाणे खूप सुंदर आहेत.

पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात वसलेले भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंग मधून पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची अशी भीमा नदी उगम पावते म्हणून ओळखले याचे नाव भीमाशंकर पडले आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असून घनदाट जंगलाने वेढलेला आहे त्यामुळेच एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हा भाग जंगलाने व्यापलेला असल्याने रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रान ससा, उदमांजर, बिबट्या असे अनेक प्राणी आणि पक्षी इथे पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू फक्त इथेच पाहायला मिळतो. शेकरू म्हणजे तांबूस रंगाची उडणारी खार. गर्द झाडी, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर ठिकाण आहे भीमा शंकर.

प्रेक्षणीय स्थळे : गुप्त भीमाशंकर ( जिथे भीमा नदी ज्योतिर्लिंग मध्ये उगम पावून गुप्त होते आणि मंदिरा पासून जंगलात १.५ किमी अंतरावर पूर्वेला प्रकट होते ), कोकण कडा, सीताराम बाबा आश्रम, नागफणी.

हा घाट नगर कल्याण रस्त्यावर आहे. हा घाट म्हणजे मुसळधार पावसात भिजण्याचे उत्तम ठिकाण आहे. या घाटावर हात उंचावला तरी हातात ढग येतात की काय असे वाटते. घाटातून लांबच्या लांब पसरलेल्या दऱ्या पाहणे म्हणजे दुधात साखर च. त्यामुळेच हे ठिकाण फोटोग्राफरची सगळ्यात आवडती जागा आहे असे म्हणायला हरकत नाही. हा घाट निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. त्यामुळे एकदातरी इथे येऊन पाऊस अनुभवायला हवाच.

लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती | Lohagad fort information in marathi

सिंधुदुर्ग – एक ऐतिहासिक किल्ला | Sindhudurg Fort in marathi

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे (sadetin shaktipeeth) आणि त्यांचा इतिहास

सातारा जिल्ह्यात असलेले महाबळेश्वरपासून अगदी १८-२० किमी अंतरावर असलेले अजून एक पर्यटन ठिकाण म्हणजे पाचगणी. निसर्गाने नटलेले, पब्लिक शाळांसाठी प्रसिध्द असलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. जुन्या काळात पारशी लोकांनी बांधलेले बंगले हे आजही आकर्षित केल्याशिवाय रहात नाहीत. निसर्गप्रेमी लोकांनी अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे पाचगणी. असे म्हणतात की ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर पडला आणि डोंगर तयार झाले. याच पाच डोंगरांच्या समूहावर हे ठिकाण वसलेले असल्याने याचे नाव पाचगणी पडले असावे. डोंगरावर असल्याने उत्तम हवामान आणि निसर्गाचे देणे हे येथील खास आकर्षण आणि वैशिष्ट्य आहेत.

ठिकाणे : खोल दऱ्या, धबधबे, कमळगड, टेबल लेंड, किडिज पार्क आणि गुफा ही येथील प्रसिद्ध आणि पहण्यासरखी ठिकाणे आहेत. येथील टेबल लेंड वर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचा इंजिन बनवण्याचा कारखाना इथे आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे हे गाव. मुंबई आग्रा महामार्गावरील थंड हवेचे ठिकाण म्हणून इगतपुरी प्रसिद्ध आहे. येथील उंचच्या उंच धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोदळा, सुंदर नारायण गणेश मंदिर, कुलांग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड डोंगररांगा याशिवाय सांदान दरी आणि रंधा धबधबा जवळच आहेत.

इगतपुरी येथून कसारा घाटातील धुके अनुभवणे हा एक डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव आहे. या गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मागिरी नावाचे विपश्श्र्चेना केंद्र आहे. येथे साधना करण्यासाठी जगभरातून लोक येतात.

माथेरान हे रायगड जिल्ह्यात वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हे ८०३ मीटर किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर वसलेले आहे. याच्या भोवती चारही बाजूंनी घनदाट झाडी आणि लाल पायवाटा आहेत. याच्याभोवती असलेली पठाराची टोके आणि पूर्व पश्चिम तसेच दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत त्यांनाच येथील प्रेक्षणीय ठिकाणे म्हटले आहे.

माथेरान हे शहर इंग्रजांनी वसवले असल्याने तेथील ठिकाणांची नावे ही त्यांनीच दिली आहेत. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी अशी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडपासुन ही रांग सुरू होते. या गडाला लागून बदलापूर डोंगर आहे. माथेरान हे मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सगळ्यात जवळची आणि निसर्गाने नटलेला जागा आहे.

प्रेक्षणीय स्थळे : शर्लोट लेक, पॅनोरमा पॉइंट, सनसेट पॉईंट किंवा पोरक्युसं पॉइंट, लुईझा पॉइंट, इको पॉइंट, चौक पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, गर्बट पॉइंट, दस्तुरी किंवा माउंट बेरी पॉइंट आणि रामबाग अशी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

हे महाराष्ट्रातील निसर्गरम्य, स्वच्छ आणि कमी गर्दीचे म्हणजेच निवांत समुद्रकिनारे आहेत. हे तिन्ही समुद्रकिनारे कोकणात असल्याने येथील रस्ता वळणावळणाचा आणि तितकाच नयनरम्य असतो.

हा घाट मुंबई पुणे महामार्गावर आहे. मुंबईपासून हे अंतर १४० किमी आहे. सर्वांचे पावसाळ्यातील हे आवडते ठिकाण आहे. तुम्हाला जर निसर्गसोबत धाडस करायला आवडत असेल तर इथे नक्कीच भेट द्या. खोल हिरव्यागार दऱ्या, मुळाशी धरण, येथून जवळच ३० किमी असलेला सिंहगड किल्ला आणि कडेलोटावरून पडणारे धबधबे आकर्षित करतात.

सातपुडा पर्वतरांगेत तब्बल एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. खोल दऱ्या, धबधबे, दूरवर पसरलेले हिरवे वनराई आणि सुंदर धुके असे दृश्य पावसाळ्यात इथे पाहायला मिळते. इथे आल्यावर मुक्कामी राहून देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग आणि दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीमकुंड, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत. येथील कॉफिचे मळेही खूप छान आहेत.

येथील कोणत्याही ठिकाणी भेट देऊन पावसाळा खास बनवा.

===============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Lara
    Posted Jul 29, 2023 at 8:21 am

    I am truly delighted to read this weblog posts which consists of lots of
    valuable data, thanks for providing these kinds of statistics.

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.