

भरपूर प्रमाणात प्रोटीन देणारी आणि झटपट अशी रेसिपी जर तुम्हाला हवी असेल.. जी तुम्ही ब्रेकफास्ट अथवा स्नॅक्स मध्ये कधीही बनवू शकता, तर मिश्र डाळींचे आप्पे बेस्ट रेसिपी आहे. ह्याच पिठाची तुम्ही इडली देखील बनवू शकता .पण आप्पे मऊ आणि क्रिस्पी होतात. म्हणून गरम गरम आप्पे खायलाच काही मज्जा येते.
मिश्र डाळींचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
तांदूळ – १ वाटी
उडीद डाळ – १/२ वाटी
मुगाची डाळ – पाऊण वाटी
चण्याची डाळ – पाऊण वाटी
चवीपुरतं मीठ
आणि आप्पे भाजायला थोडंसं तेल
मिश्र डाळींचे आप्पे बनवण्याची कृती :
प्रथम तांदूळ आणि डाळींचे सगळे जिन्नस स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर एकत्रच साधारण ३-४ तास भिजत ठेवावे.
३-४ तासांनी तांदूळ आणि डाळी छान भिजल्या जातात. ३-४ तासांनी सगळे जिन्नस मिक्सर मधून फिरवून घ्यावेत. आणि इडली सारखं बॅटर तयार करावं. आणि त्यानंतर ४-५ तासांसाठी फेरमेंटेशनसाठी ठेवावं. ४-५ तासातच पीठ चांगलं फुलून येतं.
त्यानंतर तयार बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकून आप्पे आप्पम पॅन मध्ये टाकावे. आप्पे छान दोन्ही बाजूने झाकण ठेवून ५-१० मिनिटे शिजवून घ्यावी.
तयार आप्पे गरम गरम नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावीत.
जर तुम्हाला वेळ नसेल तर पीठ न भिजवता (फेरमेंटेशन) त्यात थोडा खायचा सोडा आणि इनो टाकून लगेच आप्पे आप्पम पॅन मध्ये टाकावीत.
खूप सॉफ्ट आणि क्रिस्पी बनतात हे आप्पे…. आणि मुलांसाठी खूप हेल्थी असा ऑप्शन आहे. तर हे आप्पे नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा


सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.