Skip to content Skip to sidebar Skip to footer

दूध,बदाम काजू…सासुरवाशिणीला खाण्यापिण्याचा मज्जाव

स्वामिनी आपल्या वडिलांची खूप लाडकी…वडील मिलिंदराव नेहमी आपल्या लेकीच्या आवडीचं खायला  आणत असायचे….लग्न करून आपला नवरा कौस्तुभसोबत सासरी खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप काटेकोर असावं लागायचं म्हणून स्वामिनी आपल्या जिभेचे लाड कमी करू लागली…स्वामिनी एका चौकोनी कुटुंबातली असल्याने खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्या भावंडांपेक्षा एक पाऊल पुढेच असायची थोडक्यात काय चणे-फुटाणे,काजू बदाम,दुधाचे पदार्थ प्रामुख्याने दूधही घरात भरपूर प्रमाणात असल्याने स्वामिनी खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी स्वछंद होती…हाच  स्वछंदपणा सासरी गेल्यावर नाही जमू शकला …याचा प्रत्यय स्वामिनीला लग्न झाल्यावर लगेच आला…लग्न झाल्यावर सगळेजण नवी नवरी असल्याने चुडा उतरेपर्यंत कुठलंही काम तिला करू देत नाही म्हणून स्वामिनीच्या सासूबाई स्वामिनीला चहा वैगेरे देण्याचा आग्रह करत होत्या… …पण स्वामिनी नको…नको असं म्हणत असल्याने सासूबाई लीना ताईंना थोडंसं अजब वाटलं…म्हणून स्वामिनीच्या  आत्या असलेल्या अल्काताईंना लीना ताई म्हणतात-

लीनाताई – अलका आत्या…अहो स्वामिनी चहा…कॉफी असं काहीच घेत नाहीय…माहेरी हे सगळं नव्हती का घेत..तुम्ही विचारून पहा स्वामिनीला…!

अलकात्या – स्वामिनी अगं स्वामिनी काय हे…अगं चहा देत होत्या सासूबाई तुला…तू घेत का नाहीस..सांग तरी !

स्वामिनी – अगं आत्या…मी चहा घेतेच कुठं..अगं मी तर एक ग्लास दूध घेत असते…

अलकात्या – ओह्ह…अहो ताई…आमची स्वामिनी दूध घेते…

लीनाताई – [हसत हसत म्हणतात ] अगं बाई…मग सांगायचस तरी सूनबाईंच्या आवडी निवडी जपायला नको का..?

असे म्हणून एक कपभरून दूध लीनाताई…स्वामिनीला देतात स्वामिनीही दूध घेते…आपल्या सासूबाईंच्या बोलण्याने खाण्यापिण्याची आपली आबाळ होणार नाही याच समाधान स्वामिनीला वाटतं…नव्याची नवलाई अखेर किती दिवस टिकते…लीनाताईंनी आधीपासून एक सून म्हणूनच स्वामिनीकडे पाहिलं…स्वामिनी एक मुलगी आहे आणि एवढं नक्कीच आपल्या नवऱ्यासाठी अड्जस्ट करू शकते म्हणून हळू-हळू स्वामिनीच कपभर दूधही बंद  झालं ….दुधाची जागा चहा ने घेतली…एक कप चहावर स्वामिनी आपल्या नवऱ्याचा डबा घरातला सकाळ आणि दुपारचा स्वयंपाक करत असे…त्यानंतर लीनाताईंची आणि माधवरावांची देवपूजा होईपर्यंत सकाळचे अकरा वाजत असे…देवपूजा होईपर्यंत स्वामिनी कपडे धुणं…लादी पुसून घेणं अशी वरची काम करून घेत असे त्यानंतर जेवणाची पानं स्वामिनी घेत असे…तोपर्यंत सकाळचा नाश्ताही स्वामिनी घेत नसत…जेवण उरकल्यानंतर भांडी आवरणं…किचनओटा पुसून घेणं अशी काम स्वामिनी करत असे…हेच रुटीन पुढचे सहा महिने स्वामिनीने केलं…सहाही महिने वरचं खाण्याचं पूर्णपणे बंद होत त्यामुळे स्वामिनी खंगल्यासारखी झाली होती…पूर्वीचे कपडेही स्वामिनीला सैल होऊ लागतात…आपल्या नवऱ्यासाठी एवढं करावंच लागत अशी टोमणीवजा बोलणीही स्वामिनीला ऐकावी लागत त्यामुळे मानसिक ताणही जाणवत असे…एकूण सगळ्या गोष्टी फक्त खाण्यापाशी येऊन ठेपल्या होत्या…एक दिवस अगदी कहरच झाला…

लीनाताई आणि माधवराव आपल्या मेहुणीकडे गेलेले असतात…घरात फक्त स्वामिनीच होती त्यामुळे थोडंसं हलकं आणि रिलॅक्स स्वामिनीला वाटतं असत…कुणीही नाहीय म्हणून स्वामिनी स्वयंपाकघरात काही खायचं आहे का हे पाहत असते…फडताळात स्वामिनीला काहीतरी असल्याचं जाणवलं…तर त्यात काजू,मनुके,बदाम असे सुक्यामेव्याचे पदार्थ असलेले दिसले स्वामिनीच्या तोंडाला पाणी सुटलं…बदाम आणि काजूचे दोन ते तीन तुकडे स्वामिनीने चटकन तोंडात टाकले…तरीही स्वामिनीची खाण्याची तीव्र भूक काही केल्या संपेना…पाहता पाहता बदाम संपूनही गेले…काही वेळाने दारावरची बेल वाजली दारातच आपल्या सासूबाई आणि सासरे या दोघांनाही पाहिलं…तर लीनाताईंच्या बहिणीने म्हणजेच रिनाने बाकरवडी आणि जिलेबी पाठवली होती…लीनाताईंनी आल्या-आल्या बाकरवडी आणि जिलेबी फडताळात डब्यात घालून दडपून ठेवली…आपल्या सासूबाईंना खाण्यासाठी मागणं ही गोष्ट स्वामिनीला जमली नाही म्हणून त्याच संध्याकाळी स्वामिनीने जेवताना बाकरवडी आणि जिलबी सगळ्यांच्या ताटात वाढली ही गोष्ट मात्र आपल्या सासूबाईंना खटकली…जेवण होईपर्यंत त्या काहीच बोलल्या नाहीत…पण नंतर मात्र त्यांनी चांगलीच तलवार उपसली….स्वामिनी  सगळी  आवरा आवर करेपर्यंत घडला प्रकार जसाच्या तसा कौस्तुभच्या कानावर घातला…बदाम फडताळात ठेलेले सगळे संपवले हेही सासूबाईंनी लेकास सांगितले…सगळं आवरून झाल्यावर कौस्तुभने आपल्या बायकोला बोलावले…आणि सासूबाईंनी स्वामिनीला धारेवरच धरले-

लीनाताई – स्वामिनी…आजच वागणं मला अपेक्षित नव्हतं…

स्वामिनी – पण आई…माझं असं काय चुकलं…?

कौस्तुभ – स्वामिनी…माझी दीदी कुसुम तीही तुझ्याआधी या घराची लेक होती…तिलाही असं काजू ,बदाम असे वरचे पदार्थ खाण्याची सवय आम्ही लावली नाही…सासरीही तिने याबाबतीत कुठलीच अपेक्षा केली नाही…

लीनाताई – आज तू…माझ्या बहिणीकडून आणलेला खाऊ चक्क तुझ्या हाताने सगळ्यांना वाढला…हे चुकीचं आहे…

स्वामिनी – पण आई…मी एकटीनं कुठं खाल्ला सगळ्यांनाच दिला ना …

लीनाताई – अगं…मी बाकरवडीच बोलत नाहीय….सगळे बदाम संपवलेस तू…आपल्याकडे काजू,बदाम असे वरचे पदार्थ पुरुषांना देतात…त्यांना जास्त मेहनतीची काम करावी लागतात…तू दिवसभर घरातच असतेस ना…

माधवराव – अगं पण तिला आवडत असेल तर खाऊ देत की….

लीनाताई  – तुम्ही आणखी फूस लावू नका…

सासरे आणि स्वामिनी दोघेही शांतपणे ऐकून घेतात…असंच मन मारून स्वामिनीला जगावं लागत….घरातला सगळा पगड पसारा यावरून स्वामिनीचा जीव भुकेनं कासावीस होत असे…कसंबसं काम आवरून दुपारी पाणी पिऊन झोपत असे…भूक लागली असल्याने झोपही लागतं नसे…म्हणून वर्षभरात स्वामिनी वारंवार आजारी पडू लागते…स्वयंपाकघरात काम करत असतानाच एक दिवस स्वामिनी भोवळ येऊन पडते…कौस्तुभ खूप गडबडीत ऑफिसवरून घरी येतो…घरी आल्यानंतर स्वामिनीला उचलून आपल्या गाडीमध्ये बसवतो…अंगात मरगळ असल्याने स्वामिनी धड उभाही राहत नसे म्हणून डॉक्टरकडेही तसंच उचलून न्यावं लागत…डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या…श्वास घेण्यातही अडथळे येऊ लागल्याने लगेचच स्वामिनीला ऍडमिट करून घेतले…ग्लुकोसचे सलाईन दिले गेले…एक पूर्ण दिवस स्वामिनी ऍडमिट होती…दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले तेव्हा…व्हिटॅमिन बी १२ कमी असल्याचे निदर्शनात आले…त्याचबरोबर हिमोग्लोबिन आणि प्रथिनेही कमी असल्याने अशक्तपणा आला होता पोटात काही नसल्याने श्वास घ्यायला अडथळे येत होते…व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी काही औषधे देण्यात आले…डॉक्टरही स्वामिनीला ओरडले…

डॉक्टर – मॅडम…तुम्ही एवढ्या शिकलेल्या…खाण्या-पिण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा कसा काय करू शकता…तुम्हला मुलं-बाळ व्हायची आहे…तुम्ही दूध घेता की नाही…

स्वामिनी – [या प्रश्नावर मात्र…स्वामिनी कौस्तुभकडे पाहून म्हणते ] नाही….डॉक्टर मी दूध घेत नाही…

डॉक्टर – तुम्ही जर दूध घेत नसाल…तर कसं होईल…व्हिटॅमिन आणि खूप सारी प्रथिने दुधामध्ये असतात…उद्या तुमची मुलंही असंच दूध घेण्यात टाळाटाळ करू लागली तर कसं होईल…?

स्वामिनी काहीही न बोलता डॉक्टरांचं ऐकत बसली होती…डॉक्टरांनी औषधांचा कागद कौस्तुभकडे दिला आणि कौस्तुभ स्वामिनीला घेऊन घरी आला…तर त्याच दिवशी रिनाताई म्हणजे कौस्तुभच्या मावशी आल्या होत्या…येताना आपल्या सुनबाईंसाठी खायला बरंच काही घेऊन आल्या…स्वामिनी घरात आल्या-आल्या मावशींच्या पाया पडली…

रिनाताई – अगं असू देत आजारी आहेस तू…

स्वामिनी – मावशी अहो असू द्यात…

रिनामावशी नवीन विचारांच्या असल्याने स्वामिनीला लगेच समजून घेऊ शकल्या…रिनाताईनीशी मन मोकळं केल्यावर स्वामिनीला खूप दिवसांनी हलकं वाटलं…रिनाताई आपल्या बहिणीला म्हणजेच लीनाला म्हणाल्या-

रिनाताई – खाऊन-पिऊन चांगलं राहावं गं…उद्या मुलं होतील हिला…त्यांना वाढवण्यासाठीतरी चांगलं खावच लागणार…घरात चिकन,मटण,मासे आणत जावे…ती  दूध घेत होती ना..मग लाव की दुधाचा रतीब…आणि कौस्तुभ…तुला विशेष सांगते…

कौस्तुभ – मला काय आणि सांगते…

रिनाताई – अरे…हे बघ आज चार दिवस झालेत स्वामिनी आजारी आहे…घर कोमेजून गेलंय अगदी…ती घरची लक्ष्मी आहे…तू मला माहितीय आपल्या आईसारखाच व्यवहारी आहेस तू…मग तसंच तुला सांगावं लागणार मला…

कौस्तुभ – आता काय मावशी…?

रिनाताई – हे बघ…तू मोठ्या फर्म मध्ये कामाला आहेस…पार्टीला जाणं…मद्यपान करणं होतही असेल तुझं…

कौस्तुभ – मावशी…अगं ते होतंच ग काम आलं माणसं जमली की होणारच सगळं…

रिनाताई – मद्यपानाला कारण आहे बरोबर…मग आपल्या बायकोच्या दूध पिण्याचं ही एक कारण आहे….मला तर असं वाटत की एक बाटली ड्रिंकची घेण्यापेक्षा दुधाची बाटली घे की खूप चांगलं होईल…पटतंय का मला काय म्हणायचं आहे ते…

आपल्या मावशीने दूध आणि मद्य यातला चांगलाच व्यवहार आपल्याला आणि आईला समजावून सांगितला म्हणून कधी नवे ते कौस्तुभ मावशीच म्हणणं पटत…मावशी मस्त जेवण करून स्वामिनीचा निरोप घेते..मावशी घरी कशी येते याचा विचार कौस्तुभ आणि लीनाताई करत असतात…दोघेही स्वयंपाकघरात जातात…माधवराव मात्र आपल्या सुनेपाशी जाऊन म्हणतात…

माधवराव – अगं…पोरी मीच बोलावून आणलं रिनाला इकडं…तुझ्या सासूच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालायला…बघ आत डोळे चोळत बसलीय…

स्वामिनी – [हस्ते ] बाबा…तुम्ही केलंत तर…

माधवराव – बघ आता….कसं बोटावर नाचवतो ते….[मोठ्याने म्हणतात] कौस्तुभ….जा दुधाची २ लिटर ची बॅग घेऊन ये…उद्यापासून या घरात रोज दोन लिटर दूध हवंय मला…

कौस्तुभ – [आतूनच म्हणतो ] हो बाबा…आणतो…

त्या दिवसापासून रोज घरात दूध येऊ लागत…तसंच काजू ,बदाम,मनुके अशी सुकामेव्याचीही पाकीट फडताळाऐवजी डायनिंग टेबल येऊ लागतात.असा बदल प्रत्येक घरात घडण गरजेचं आहे…

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.