माझ्यातील “मी”भाग २

©स्वाती माळी
(बर थांब देते अस म्हणून सासूबाई किचन मध्ये नाश्ता आणायला जातात…. पण स्वयंपाक नाश्ता काहीच बनवलेलं नसत… रात्रीची भांडी हि बेसिन ला तशीच होती …सासूबाई बाथरूम मध्ये जाऊन बघतात तर कपडे ही तशीच होती…सासूबाई आता खूप चिडतात त्या बडबड करत बाहेर येतात…. काय म्हणावं ह्या बाईला… भांडी घासली नाहीत. कपडे धुतले नाहीत. नाश्ता केला नाही. जेवण बनवलं नाही. कुठे गेली आहे काय माहीत….?)….आता पुढे
ते ऐकल्यावर तर अनिकेत खूप चिडतो…तो रागातच निशाला फोन करतो….पण निशा चा फोन बंद लागतो. काय यार अशी काय ही फोन पण बंद आता कस शोधायचं हिला… अनिकेत चिडून बोलत होता. इतक्यात त्याच लक्ष टेबल वर ठेवलेल्या नोटकडे जात व तो नोट वाचतो…”मी बाहेर जात आहे” इतकंच लिहलं होत…
बाहेर म्हणजे कुठे गेलेय ही… हिला व्यवस्तीत सांगता येत नाही का…. अनिकेत आता खूपच चिडतो. आई मी ऑफिस मध्ये जाऊन खातो. मला वेळ होत आहे. एवढ बोलून तो बॅग घेऊन जाऊ लागतो.
तितक्यात….अरे माझ्या आणि परीच्या जेवणाचं काय…सासूबाई
आई आता तुला दोघींचा स्वयंपाक पण करता येत नाही का?….नसेल तर बाहेरून काही तरी मागव….अस बोलून तो निघून जातो…
दिवसभर अनिकेत निशाला फोन लावत होता पण तिचा फोन बंदच……घरी सासूबाई पण निशाची वाट पाहत होत्या पण निशाचा काही पत्ताच नाही…बघता बघता संध्याकाळ होते.
अनिकेत ऑफिस मधून लवकर आलेला असतो. त्याच्या ओळखीच्या असलेल्या निशाच्या मैत्रिणींना फोन करतो…
हॅलो रूपा निशा आली आहे का तुझ्याकडे…. अनिकेत
कोण…. निशा..? माझ्याकडे..?…. अरे अनिकेत निशाचा गेले चार-पाच वर्षात साधा एक कॉल आला नाही आणि ती काय येते माझ्याकडे…. रूपा
मग ती कोणाकडे जाऊ शकते याचा काही अंदाज आहे का तुला…अनिकेत
अरे अनिकेत गेले चार पाच वर्ष…ती आमच्या मैत्रिणीपैकी कोणाशीच कॉन्टॅक्ट मध्ये नाही एवढं काय संसारात रामलेय काय माहित…रूपा
“कोणाशी कस काय ही कॉन्टॅक्ट मध्ये नाही… मैत्रिणी सोबत बोलायला त्यांच्या सोबत फिरायला निशाला किती आवडायचं…”
अनिकेत त्याच्या विचारात होता इतक्यात निशा समोरून येते …
निशाला समोर बघून अनिकेतच्या जिवातजीव येतो…पण अनिकेतला निशाचा राग आलेला असतो. तो खूप चिडलेला असतो….निशा समोर येताच तो तिच्यावर चिडतो….तू मुर्ख आहेस का… बाहेर जाताना सांगून जाता येत नाही…गेलीस ते गेलीस वर फोन पण बंद कस कॉन्टॅक्ट करायचं तुला….काय समजायच आम्ही…कुठे शोधायचं तुला…अनिकेत
अनिकेत चा आवाज ऐकून सासूबाई बाहेर आल्या
काय ग कुठे गेली होतीस. सांगून जायची पद्धत आहे की नाही…आणि घरची काही काळजी आहे की नाही पदरात एक मुलगी आहे हे पण विसरलीस….
सगळे निशाला ओरडत होते. तिच्यावर चिडत होते. पण निशा शांत राहून त्यांचं बोलणं ऐकत होती …
सगळ्यांच्या मोठ्या आवाजात बोलण्याने परी बाहेर येते व सकाळ पासून आपल्या आईची वाट पाहत असलेल्या डोळ्यांना आई दिसताच ती आईकडे धावत जाते व तिला मिठी मारते.
आई तू कुठे गेली होतीस. मी किती वाट पाहिली तुझी,…तुझ्याशिवाय नाही राहायचं मला…. परी
शांत हो बाळा आता आई आली आहे ना…आणी हो आता आई शिवाय राहायची सवय करायला हवी ना बाळा…
सवय करायला हवी म्हणजे…अनिकेत
म्हणजे मला जॉब मिळालाय उद्या पासून जॉईन व्हायला सांगितलं आहे.
कोणाला विचारून तू जॉब ला चालली आहेस. परी अजून लहान आहे माहित आहे ना…अनिकेत
तू जॉब ला गेल्यावर घर कोण संभाळणार… सासूबाई
तू कुठेही जाणार नाहीस कळलं… अनिकेत
मी तुला विचारत नाहीये…. “सांगतेय”….मी उद्यापासून जॉईन होतेय…निशा
का जॉब करायचा आहे तुला…. काय कमी पडत आहे तुला….अनिकेत
माझा स्वाभिमान…निशाचा आवाज वाढतो
तुला कसला आलाय स्वाभिमान… सासूबाई
कसला स्वाभिमान …पहाटे 5 ला उठून झाडलोट करून तुमच्या नाश्त्याची जेवणाची तयारी करते…. कोणाला काय हवं नको ते पाहते… प्रत्येकाच्या अवडीचा नाश्ता जेवण बनवते ….कपडे धुवायचे.. जेवणाची भांडी धुवायची.. घराची साफसफाई करायची.. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा.. परीच सगळं करायचं.. तिला खाऊ पिऊ घालायचं.. तिचा अभ्यास घ्यायचा.. घरात काही हवं नको ते पाहायचं.. सासूबाईंच्या मूड सांभाळणं…. उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यांचा विचार करायचा …ह्या चार पाच वर्षात मैत्रिणींना एक फोन केला नाही त्यांना भेटले नाही… माहेरी सुद्धा जाण टाळलं…परी लहान आहे…आईंना आता घरच होत नाही…म्हणून मी..माझी नोकरी सोडली…माझं करियर..पणाला लावल…आणि तुम्ही मला विचारताय “तुला घरी काय काम असत”…”काय करतेस तू घरी”…ह्या सगळ्या जबाबदरीत “माझ्यातील मी” विसरून गेलेय…
पण आता बास झालं आता मी.. माझ्यातील मी नव्याने शोधणार… मी जॉब करणार…आणि हे माझं ठरलंय….काल पासून मनात साठून ठेवलेला राग ,होणार त्रास शेवटी बाहेर पडला.
निशा बोलल्यावर अनिकेतला व सासूबाईंना त्यांची चूक कळली… त्यांच्या कालच्या वागण्याची त्यांनाच लाज वाटली.
निशा आय एम सॉरी…खरच माझं चुकलं…मी तुला समजून घ्यायला हवं होतं…अनिकेत
निशा खरच बाळा माझं चुकलं तुला वाईट बोलले तुझ्याशी वाईट वागले माफ कर…
निशा तुला जॉब करायचा आहे ना तू बिनधास्त कर..तुला कोणी अडवणार नाही…मी तुझ्या पाठीशी आहे …
निशाच्या ठामपणामुळे तिला तिचा स्वाभिमान परत मिळाला…
एक स्त्री घरच काम करतेय म्हणजे ती काहीच करत नाही असं नाही. हा जो गैरसमज आहे तो निघाला पाहिजे…घरात स्त्री आहे म्हणून घर आहे…
तिला जपा…! तिचा स्वाभिमान जपा…!
*
समाप्त
(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो….तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका…..