Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©स्वाती माळी

निशा…..ए निशा कुठे गेलीस केव्हापासून बोलवतेय..माझा चहा अजून दिली नाहीस…..निशाची सासू तिला चहासाठी ओरडत होती……

हो हो आई आले आले…निशा किचन मधूनच ओरडून सांगते..व पाच मिनिटात चहा घेऊन येते……

आई हा घ्या तुमचा चहा….निशा छानशी स्माईल देत सासूच्या हातात चहा देते…..
किती वाजले….आता आणलेस चहा…. मला रोज लवकर चहा लागतो माहित आहे कि नाही किती वर्ष संसार करत आहेस….निशाची सासू निशाच्या हातातील चहाचा कप घेत निशाला ओरडत असते…

आई उद्या पासून वेळ नाही होणार….निशा शांतपणे व चेहऱ्यावर गोड हसू ठेवत सासूबाईना सांगते…..

हे तुझ रोजचच झाल आहे….जा आता पटकन अनिकेत साठी नाष्टा बनव आत्ता एवढ्यात तो ऑफिसला जाण्यासाठी खाली येईल….आणि हो परीसाठी काही केलेस कि नाही…..सासूबाई जरा तावातच बोलत होत्या.

आई करते मी सगळ…..सगळ्यांना वेळेवर नाष्टा मिळेल….अस म्हणत निशा किचन मध्ये जाते ती सासूबाईच बोलन जास्त मनावर नाही घेत कारण तिला हे रोजचच होत….

रोज सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या नाष्ट्याची तयारी करण, सासूबाईना काय हवं नको ते पाहन, परीला शाळेत पाठवण, तिचा अभ्यास घेण, सगळ्यांच्या जेवनाच व त्यांच्या आवडीनिवडी पाहन …गेले दहा वर्ष निशाच असच रूटींग चालू होत…दिवस कसा उजाडत होता व कसा मावळत होता हे निशाला कळायचं सुद्धा नाही….

निशाचा नाष्टा तयार झाला होता ती अनिकेतला म्हणजे तिच्या नवऱ्याला प्लेट मध्ये वाढतच होती…तोपर्यंत अनिकेत निशा निशा करत ओरडत खाली येतो…..आता ह्याला काय झाल एवढा का चिडला आहे हा…..अनिकेत का ओरडत आहे हे पाहायला निशा किचन मधून बाहेर येते…..

अरे काय झाल एवढा का ओरडत आहेस …..निशा किचन मधून बाहेर येत बोलते.
माझ्या फाईल्स कुठे ठेवली आहेस. केव्हा पासून शोधतोय. आज मला ऑफिस ला लवकर जायचं होत. माझी महत्वाची मीटिंग होती.तुझ्यामुळे मला वेळ झाला….अनिकेत निशाला ओरडत होता.

अरे कोणती फाईल्स ते तर सांग मग मी सांगेन ना… कोठे आहे….निशा
ब्ल्यू कॅलरच्या २ फाईल्स होत्या. माझ्या नेहमीच्या ठिकाणी मिळत नाहीत……अनिकेत अरे त्या फाईल्स तर मी तुझ्या बागेत ठेवल्या आहेत…कामाच्या गडबडीत तुला सांगायच राहून गेल…..निशा
विसरायला घरात बसून काय काम असत तुला….काय करतेस काम तू ….वेळेवर सांगता येत नाही…. अस बोलून अनिकेत ऑफिसला निघून जातो.

अनिकेतला चिडलेल पाहून निशाची सासू सुद्धा तिला ओरडू लागली…..घरची चार काम पण निट करता येत नाही का तुला… माझा मुलगा एवढ दिवसरात्र बाहेर काम करून दमतो. त्याला सगळ हातात दयायला काय होत….काम करायला नको तुला…अस बडबडत तिची सासू तिच्या रूम मध्ये जाते.

“अनिकेतच्या या वाक्याने निशा स्तब्धच होते”…..काय काम करतेस तू हे वाक्य तिच्या कानात वाजू लागले. सासूबाईचं बोलण ऐकुन तर तिला खूप वाईट वाटल….निशाला १० वर्षापूर्वीचे दिवस आठवले…आपण पण नोकरी करत होतो. पण अचानक आलेल्या बाळाच्या जबादारीने मला नोकरी सोडावी लागली…..घरच्यांनी मला नोकरी सोडायला लावली. परी मोठी झाल्यावर कर अस सांगितल….सासूबाई ना होत नाही म्हणून घरची सगळी जबादारी अंगावर टाकली…घरच्यांच्यासाठी मी माझ करियर सोडून दिल आणि हे मला म्हणतायत मी काय काम करते….दिवसभर निशाच्या डोक्यातून हे बोलन जात नव्हत. रात्री काही केल्या झोप लागेना…अनिकेत आणि सासूबाई अस कस बोलू शकतात….नाही निशा आता तुला तुझा स्वभिमान जपला पाहिजे….ह्या सगळ्या जबाबदाऱ्यामुळे माझ्यातील मी….मी विसरून गेलेय ते आता सिद्ध करायची वेळ आली आहे….निशा मनाशी काही तरी ठरवते आणि झोपी जाते…

निशा सकाळी लवकर उठून पटपट स्वयंपाक आवरून….परीला उठवुन तीच आवरावर करून तिला काही तरी सांगून हॉल मध्ये मी बाहेर जातेय अशी नोट लिहून बाहेर पडते…. नेहमी प्रमाणे सासूबाई व अनिकेत निशाला हाक मारत होते. पण निशाचे काहीच उत्तर नाही. दोघे एकमेकाला विचारत असतात.
ही कुठे गेली सकाळी सकाळी…मला ऑफिसला लवकर जायचं आहे…आई तू दे नाश्ता मला वेळ होत आहे…अनिकेत बर थांब देते अस म्हणून सासूबाई किचन मध्ये नाश्ता आणायला जातात…. 

पण स्वयंपाक नाश्ता काहीच बनवलेलं नसत… रात्रीची भांडी हि बेसिन ला तशीच होती …सासूबाई बाथरूम मध्ये जाऊन बघतात तर कपडे ही तशीच होती…सासूबाई आता खूप चिडतात त्या बडबड करत बाहेर येतात…. काय म्हणावं ह्या बाईला… भांडी घासली नाहीत. कपडे धुतले नाहीत. नाश्ता केला नाही. जेवण बनवलं नाही. कुठे गेली आहे काय माहीत….?
*
क्रमशः

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *