
सुट्ट्या तर संपल्या तरी अंजलीचा उत्साह कमी नव्हता झाला. उद्या कॉलेज उघडणार होतं त्यामुळे त्याची एक्साइटमेंट तिला होतीच.
“आई…उद्या कॉलेज आहे मला उद्या डबा हवाय..काय देणार डब्याला..”?
“हरभऱ्याची उसळ देते…चालेन का ”?
“हो चालेन”
दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये–
कॉलेजच प्रांगण पुन्हा गजबजून गेलं होतं,मैत्रिणींचा घोळका,हास्यकल्लोळ,थट्टा मस्करी अशाने तर वातावरण दुमदुमलं होतं जणू या सगळ्यांचीच कॉलेज वाट पाहत होतं…अंजली आणि तिचा तो ५ जणांचा ग्रुप आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर कॅन्टीन मध्ये जमला होताच.
स्वानंदी – hi guyz कसे आहेत सगळे…खूप मिस केलं यार सगळ्यांना…
रूपा – हो ना same मलाही असच वाटत होतं यार…खूप मिस केलं यार कॉलेजला..
संजय – काय मग मिस…अंजली तुमचं कसं गेलं vacation तुम्हाला तर विरंगुळ्यासाठी होतं कुणीतरी…आमची आठवण कशी येणार तुम्हाला…?
अंजली – असं काय म्हणतोस…तुमची आठवण येणार नाही मग कुणाची येणार…
मंजिरी बॅग सावरत कॅन्टीन मध्ये येते – सॉरी यार…आज पहिल्याच दिवशी late ना…
संजय – काय मग मांजरे….खूप छळलं असशील ना तुझ्या घरच्यांना…दिल्या का नाही मग जुलाबाच्या गोळ्या त्यांना…तुझं कूकिंग अन बेकिंग चे फूड खाऊन..गरज वाटली का त्यांना..
मंजिरी – संज्या….झालास का रे तू सुरु परत….पाहू ना तुझी बायको आल्यावर काय होतंय ते…तिला येतंय का कूकिंग आणि बेकिंग…मी तर तुला लग्नाची भेट म्हणून पोटदुखीचाच औषध देईल…
संजय – माझ्या बायकोच सोड गं…तुझ्या नवऱ्याची तर वाटच आहे…
अंजली – संजय…अरे जाऊ देत रे..आज पहिला दिवस आहे आज तरी नका भांडू…अजय करायचा अशी मस्करी..त्याची कसर तू भरून कढतोयस बाकी…
स्वानंदी – नाहीतर काय….नगास-नग मिळाला…!
अंजली – अरे…हो पण तो आहे तरी कुठे…एवढं विशेष प्राविण्य मिळालं त्याला,….कॉलेज मध्ये पहिला येणाऱ्यानेच जर वेळेचं बंधन नाही पाळलं तर आमच्यासारखे काय आदर्श घेणार हुशार मुलांकडून….अंजली अजयच्या टिचकुल्या करत म्हणाली….
संजय – अरे….सगळ्यांना सांगायचंच राहून गेलं…एवढा कसा गैबाना मी….!
मंजिरी – तो तर तू आहेसच….पण आज मात्र खात्री पटली…
स्वानंदी – ये.. मंजिरी गप्पं बस यार तू ….संजय बोल ना काय सांगायचं विसरलास तू ?
संजय – अरे….अजय पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेलाय…बरं झालं…आपल्याला बोअर करणारा कवी कमी झाला
अंजली वैतागून – का..???? असं कसं गेला आणि तेही आम्हाला न सांगता….ना फोन ना भेट हि काय पद्धत झाली का??
रूपा – मित्राला बोललं म्हणून कसा राग- आला पहा हिला..!
अंजली – मित्राला बोललं म्हणूनही आणि एका कवीला बोललं म्हणूनही…कविता करणं काय सोप्पं असतं कि काय ?
मंजिरी हू…हू..ठसकत – आपल्यात एक मिस कवयित्रीही आहेत बरं का…?
रूपा – संजय प्रतिभावंतांची अशी कुचेष्टा बरी नव्हे…आणि कशाला पहिल्याच दिवशी भांडताय..ते पण innocent अजय वरून..
संजय – म्हणजे काय…? मी खुसपट काढलंय का भांडायला…
स्वानंदी – संजय….पण एखाद्याच्या टॅलेंट वरून अशी टिंगल-टवाळी चांगली नाही…
मंजिरी – होय…आमचही हेच म्हणणं आहे…
संजय – बरं….माझ्या आयांनो….i am really sorry …!
मंजिरी – नाही असं सॉरी नाही चालायचं…अजयच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे…
संजय – का ? तुमच्यात कसं सॉरी म्हणतात ?
अंजली – काय…म्हणजे काय करायला लावणारेस त्याला…
मंजिरी – ६ प्लेट वडे आणि ६ कप चहा सगळ्यांना आज संजय कडून…तरच चुकीला माफी समजली जाईल…
स्वानंदी – हो …नेहमी अजय द्यायचा आता संजय देणार..मस्त…
संजय – उकळा….उकळा माझ्याकडून उकळा कधीतरी तुमच्याकडून उकळलं जाईल….तरच नावाचा संजय चव्हाण…
[असे म्हणून संजय तडक चहा आणि वड्यांची ऑर्डर द्यायला जातो]
मंजिरी – पण खरंच यार अजयने असं तडका फडकी जायला नको होतं…
स्वानंदी – अगं…असतील काही त्याचे प्लॅन्स…आणि ड्रीम्स
अंजली – हो ना…माझ्या कविता कशाही असल्या ना तरी ऐकायचा तो…पण सुधारणा कर असाही तो निक्षून सांगायचा…एक चांगला मित्र, फिलॉसॉफर आणि गाईड होता तो…
संजय – [ऑर्डर देऊन येतो आणि सगळं बोलणं ऐकत असतो अंजलीच] पहा…..कोण बोलतंय…? म्हणे…मित्र …तत्त्वज्ञ…आणि वाटाडया…
मंजिरी – अरे…काय बोलतोस तू….दोघांचे एका विषयावर एकमत असायचे ते म्हणजे कविता…आणि जर कुणाचं काही चुकत असेल तर…ते चांगलाच सांगणार आणि चांगलाच सल्ला देणार ना…कि वाईट सल्ला देणार?
संजय – मित्र म्हणे मित्र ….आपला काय कॉमन नव्हता त्याच्याशी…तरी भावना कळायच्या आपल्याला…
अंजली – भावना…मैत्री..काय बोलतोयेस तू ? तो काही बोलला होता का तुला ? म्हणजे नेमका काय म्हणायचं तुला ?
मंजिरी – अगं अंजली ….तो असच शेंड्या लावण्यात पटाईत आहे असच पकवतोय तो…चला नाहीतर पहिल्याच दिवशी लाल शेरा लागेल आपल्यावर लेक्चर्स बंक केलं तर …..
अंजली – हो हो …चला नाहीतर पहिल्याच दिवशी ओरडा बसेल…सगळ्या जणी निघून जातात…संजय मात्र तिथे एकटाच बसलेला असतो…आणि एकटाच बडबडत असतो
संजय – मित्र, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणे…एवढं वाटतं तर कशाला त्या माकडाला घेऊन आली सगळ्यांना भेटवायला…हि पोरगी ना पसतावेल एक दिवस…माझ्या मित्राच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलंय…मी त्याला चांगला ओळखतो…त्या छपरी अभय पेक्षा ना आज्या माझा लईच भारी आहे…
इतक्यात त्याच्या डोक्यात कॅन्टीनवाला टपली मारतो , द्या राव पैसे…लवकर…गर्दी होतेय…पैसं द्या आन मोकळं करा आम्हाला…
संजय – घे बाबा…घे …
संजय आपल्या मित्राच्या आठवणीत तसाच लेक्चरला बसतो. बाकी अजय सोडून सगळे होते पण अंजलीला अजयची कमी भासत होती.
to be continued …
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.