
अभय अंजलीचे दोन्ही हात सोडतो आणि तिच्या कमरेवर हात ठेऊन तिला स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो,”तुला माझा रोमान्स पाहायचा होता ना”…? अंजली इकडे तिकडे पाहते आणि म्हणते, ”काय हे अभय…आपण काय घरात आहोत का…please नको.. नाहीतर कुणीतरी उठेल…” तसं अभय तिच्याकडे पाहतच राहतो आणि अंजली नजर चोरून ….”माझ्याकडे असा पाहू नकोस..खूप अस्वस्थ होतंय…” इतक्यात मनीषा म्हणजे अभयची बहीण पाणी पिण्यासाठी म्हणून उठते आणि अंजली लगेच अभयपासून दूर होते आणि अभयला वाकुल्या दाखवत आपल्या जागेवर जाऊन झोपते….
दुसऱ्या दिवशी सगळे जण केरळला पोहचतात आणि सकाळी सकाळी मस्तपैकी चहाचा सुरका मारतात. इतक्यात मनीषा म्हणजे अभयची बहीण मिश्कीलपणे हसते आणि अंजलीला चिडवायला सुरुवात करते, “जिये तो जिये कैसे…बिन आपके…”
इतक्यात अभय …”काही काय मने…काय आवाज तुझा…तुझ्या आवाजापेक्षा गाढव छान म्हणतील गाणे…. जरा आपल्या आवाजाला साजेशी गाणी म्हणत जा…”
मनीषा , ” दादा माझा आवाज काढण्यापेक्षा….गाण्यातल्या भावना समजून घे….त्या महत्व्याच्या आहेत हो कि नाही वहिनी..? ” अंजलीला मनिषाने मारलेला टोमणा कळतो आणि ती गडबडून , ” भा…भा…भावना…नक्की काय म्हणायचंय तुम्हाला..?
अभय बाजू सावरण्याच्या हेतूने मनीषाला ओरडतो आणि म्हणतो…”मने…जास्त आगाऊपणा करू नकोस….नाहीतर इथेच सोडेल तुला…या हॉटेलच्या अण्णा पाशी…बस इथेच भांडी घासत..” त्यांची अशीच चेष्टा मस्करी चाललेली असते. सगळेजण आपला लवाजमा म्हणजे सामान-सुमान रूमवर ठेवतात आणि सगळ्यांचा मोर्चा केरळमध्ये प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या मसाला शॉप मध्ये थेट वळतो.
तिथे सगळ्या प्रकारचे मसाले असतात, मैत्री वाढवणारी दालचिनी, सगळ्यात मिसळून जाणारे तीळ,वाईट गोष्टींचा त्याग करणारा हिंग, शुद्धतेसाठी वापरली जाणारी लवंग, मधुर भाषेसाठी नारळ, वाईट शक्तीपासून रक्षण व्हावं म्हणून काळं जिरं,प्रेम वाढवण्यासाठी विलायची, मनाचा आणि शरीराचा रंग उजळवण्यासाठी हळद अशाप्रकारे सगळ्या मसाल्यांचे गुणधर्म तिथे लिहून ठेवले होते आणि अंजली एकटीच ते वाचत बसलेली असते इतक्यात तिथे अभय येतो आणि अंजलीला म्हणतो, ” माझ्यासाठी कुठला मसाला आहे..”
अंजली, ” ते मला कसं सांगता येईल ” अभय म्हणतो…” तुला एकच मसाला शोभतो…” अंजली म्हणते, ”कुठला…?”
अभय, ” विलायची …प्रेम वाढवणारी विलायची..”
अंजली लाजून, ” हो का ? बरं तुला पटकन कळलं…चल…जेवणासाठी खोळंबलेत सगळे..! ”
जेवल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा बेत आखला…तोपर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती आणि दोघेही मस्त समुद्रकिनाऱ्यावर फिरत होते…फिरता फिरता अंजली कुतूहलाने अभयकडे पाहत होती आणि स्मित हसत होती.
अभय…” काय झाला अंजली ? असं हसतेस का माझ्याकडे पाहून…”
अंजली, ” तुला माहितीय अभय…. आपलं प्रेम ना या समुद्रासारखं अथांग असावं…तुला काय वाटत..?”
अभय तिचा हात आपल्या हातात घेतो..,” हो अंजु आपण ना असंच समुद्रासारखं विस्तीर्ण प्रेम करावं…bye the way तुझ्या दुसरं surprise तू काही सांगितलं नाहीस अजून…”?
अंजली, ” ते इतक्यात नाही सांगायचंय…”
अभय, ” ठीक आहे नको सांगुस पण मी तुला काहीतरी देणार आहे…डोळे बंद कर..!”
अंजली..” हे काय आता नवीन ? “
अभय,” कर म्हणून सांगितला ना ? तुला माझी शप्पथ “
अंजली, ” ठीक आहे करते बंद “
अभयने अंजलीचा हात हातात घेतला आणि तिच्या हातात शिंपल्यांचा ब्रेसलेट घालतो आणि तिला डोळे उघडायला सांगतो..
अंजली, ” अय्या…काय सुरेख आहे यार हे ब्रेसलेट…
अभय, ” सुरेख आहे पण तुझ्यापेक्षा नाही “
अंजली लाजते आणि इतक्यात अंजलीचा मोबाइल खणाणतो…. “अरे देवा..चल पटकन खूप उशीर झालाय…सगळे वाट पाहतायत…”
केरळ मध्ये असताना दोघांचा असंच दिनक्रम असायचा दिवसभर पर्यटनस्थळांना भेटी द्यायच्या आणि रात्री समुद्रकिनारी निवांतपणा शोधायचा…. या ६ दिवसात दोघेही एकमेकांना खूप जवळून ओळखू लागले होते आणि ६ दिवस कधी संपले हे दोघानांही कळले नाही.
सगळेजण आपल्या घरी जाण्यासाठी निघाले…. परतताना केरळच्या आठवणींचा खजिना सोबत घेऊन सगळे निघाले…ट्रेन मध्ये गप्पा-गोष्टी,थट्टा मस्करीना उधाण आलं होतं….
केरळ वरून घरी परतल्यावर अभय तिसऱ्या दिवशीच पुण्याला निघाला आणि पुढल्या आठवड्यापासून अंजलीचही कॉलेज सुरु होणार होतं.
क्रमश:
पुढची कथा पार्ट ५ मध्ये
===========
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.