Ritbhatmarathi

Search
Close this search box.

डबडबत्या डोळ्यांनी अजय आपल्या रूमवर गेला आणि आपली बॅग भरू लागला तो कधीही न परतण्यासाठीच. इकडे रोज अंजली आणि अभय एकमेकांना भेटू लागले. कधी एकमेकांच्या घरी तर कधी बाहेर निवांत एखाद्या कॅफे मध्ये. पण रोज रोज तेच रुटीन म्हटल्यावर दोघांनीही ठरवलं कि ह्या सुट्टीमध्ये सहपरिवार केरळला जायचं आणि तसं दोघांनीही आपल्या आई वडिलांना तयार केलं होतं. १५ दिवस दोघांच्याही वडिलांनी एकमेकांसोबत बसून केरळचा छान ६ दिवसांचा प्लॅन बनवला.

ट्रेनची तात्काळ तिकिटे बुक केली होती आणि नशिबाने ती कन्फर्म देखील झाली होती. अंजली आणि अभयच्या आईंनी जायच्या आधी आठवडाभर खायची प्यायची जय्यत तयारी केली होती. तयारी चालू असल्यामुळे अंजली आणि अभयला १५ दिवस भेटायला जमलंच नव्हतं आणि भेटले तरी उभ्याने एकमेकांच्या घरी  भेटत. त्यामुळे खूपदा अंजली आणि अभय फोनवरच बोलत. रात्री जेवणानंतर अंजलीचा रोज टेरेस वर जाऊन अभयशी निवांत फोनवर बोलायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. आज अभयचा फोन नेहमीपेक्षा जरा लवकरच आला होता….अंजली आईला चकल्या करायला मदत करत होती….फोनची रिंग वाजली आणि  अंजली गोंधळलेल्या स्वरात , “आज अभयचा फोन एवढ्या लवकर कसा आला..?”

अंजलीची आई – “उचल उचल….तू राहू दे…थोड्याच राहिल्या आहेत चकल्या…एका घाण्यात तेवढ्या होऊन जातील….तू जा गं बाई नाहीतर आमचे भावी जावईबापू नाराज होतील.”

अंजली लाजवून पटकेस वर गेली आणि तिने अभयला कॉल बॅक केला.

अंजली – Hi अभय !

अभय –   Hi  जानू ….

अंजली – जानू!!!! अरे हे काय…आज स्वारी फार रोमँटिक दिसतेय….

अभय – मग….  कुणी मूर्खचं असेल जो आपल्या भावी बायको सोबत लग्नाआधी रोमँटिक गोष्टी नसेल करत….रोमँटिक नको होऊ तर मग काय फोन वर बातम्या ऐकवू का तुला ?

अंजली – अरे हो रे बाबा….मला तू जानू म्हटलेलं आवडणार नाही का….आज पहिल्यांदाच म्हटला ना तू ….म्हणून थोडं विचित्र वाटलं मला…ए बरं एक गुपित सांगू का तुला….मला ना तू अजिबात रोमँटिक वाटत नव्हता…डोळ्यावर चष्मा….केस चोपडे..असं वाटायचं कि तू फक्त अभ्यासू मुलगा आहेस…आणि चेहऱ्यावर पण तर नेहमी तुझ्या आठ्या पडलेल्या असतात….त्यामुळे हे जानू…बेबीचा..दूरदूरपर्यंत तुझ्याशी संबंध नसणार असं वाटायचं मला…

अभय – ओये हॅलो तुमने समझ क्या रखा है मुझे….कॉलेज मध्ये ये तू आणि बघ किती पोरी फिदा आहेत आपल्यावर…आणि तुला माझा रोमान्स बघायचा आहे??थांब तुला दाखवतोच मी केरळ मध्ये….

अंजली अभयला उकसवून , “अच्छा!!!रोमान्स म्हणजे नक्की काय करणार रे तू?”

अभय – ते तुला दाखवतो मी केरळ मध्ये जरा धरीने घे की 

अंजली – अच्छा तुला आईच्या हातचा आमरस आवडला का?

अभय – हो का नाही….एकदम झक्कास झाला होता…बरं तरी आईने केला होता..तू केला असतास तर!!!! अभय अंजलीला चिढवून

अंजली – मी काही एवढा वाईट स्वयंपाक नाही करत हा ! समोरचा खाऊ शकेल इतका तरी बरा करते

अभय – अगं मी मस्करी करत होतो ग…आता लगेच राग आला का तुला ?

अंजली – नाही रे….तुझ्यावर कशी रागवू मी ?

अभय – अधिकार आहे तुला माझ्यावर पूर्ण रागावण्याचा

अंजली – अधिकार तेव्हा येतील जेव्हा तू पूर्णपणे माझा होशील

अभय – हम्म…म्हणजे कधी होणार मी तुझा ?

अंजली – तू किती casual आहेस रे आपण तर officially married  होऊ तेव्हा

अभय – म्हणजे तू काय माझ्यावर बायकोगिरी करणार कि काय ?

अंजली – घाबरलास कि काय ? तू जर नवरेगिरी केली तर मी बायकोगिरी करणार

अभय – ओह्ह ….म्हणजे फुल्ल कॉन्फिडन्स आहे हा… मग माझं काही खरं नाही बाबा

अंजली- अरे….हो …हो इतक्यात काय घाबरतोस मी बायकोगिरी करणार आणि तू नवरेगिरी करणार सगळं लग्नानंतर ना मग आत्ताच का एवढा घाबरतोस?

अभय – ओह्ह….. मी तर विसरूनच गेलो कि अजून कुठे आपलं  लग्न झालंय  मी मनातच इमले बांधतोय कि काय …

अंजली – अरे हो …तुला माहिती आहे?? आज मी काय केलंय तुझ्यासाठी…?

अभय  – बोल काय काय केलंय आज I mean  काय काय शोध लावलेत आज भटारखान्यात …!

अंजली – मी ना आज तुझ्यासाठी बाकरवडी केलीय…दुसरं काहीच नाही

अभय  – फक्त बाकरवडी दुसरं काही नाही ..!

अंजली – हो आणि मी ना ….

अभय – आणखी काय??

अंजली – ते ना सरप्राईज आहे

अभय – अरे बापरे केवढा suspense आहे ग माझं काही खरं नाही…. बाकरवडी काय…. आणखी सरप्राईज काय ….!

अंजली – मग आहेसच तू माझ्यासाठी तेव्हडा खास

अभय – खरंच…?

अंजली – हो का रे तुला नाही का मी खास वाटत तुझ्यासाठी ?

अभय – म्हणजे काय ? तू तर खूपच खास आहेस माझ्यासाठी पूर्ण आयुष्य तर तुझ्याच बरोबर काढायचंय  मला.. तुला विसरून कसं बरं चालेन ?

अंजली – हो का रे म्हणजे तुला मी फक्त याच जन्मी हवीय ?

अभय – म्हणजे असं का बोलतीयस तू …?

अंजली – मला तर तू सातही जन्मात हवाय…

अभय  – ओह्ह्ह… काय घाबरलो मी…?

अंजली – का बरं …

अभय – अगं मला वाटलं आता लागतीय वाट माझी.

अंजली – आपण ना  केरळला गेल्यावर खूप शॉपिंग करायची …

अभय – बायका असल्या तिथे शॉपिंग असणारच कि… ते काय विचारणं झालं का

अंजली – हे काय अभय मला वाटला मला म्हणशील काय पाहिजे तुला असं

अभय – सॉरी बरं… सांग काय पाहिजे तुला ?

अंजली – मला ना कांचीपुरम साडी पाहिजे नाहीतर मुंडू साडी तरी…

अभय  – हो नक्की देईल तुला मी घेऊन …मग तर झालं ?

अंजली – thank  you अभय …

अभय  – थँक्स काय त्यात तू सांगितली नसतीस तरी मी दिलीच असती तुला

अंजली – किती cute आहेस रे तू…. म्हणूनच मला तू खूप आवडतोस !

अभय – फक्त तुलाच आवडतो मी …आणखी कुणाकुणाला आवडतो  

अंजली – आणखी….आणखी ? माझ्या आईला , बाबाना, आणि मला

अभय  – आणखी कुणाला आवडतो म्हणजे तुझ्या मैत्रिणींना ….??

अंजली – अरे….हो यार तुला ना सांगायचंच राहून गेलं त्या स्वानंदीला आणि मंजिरीला तर तुझी personality काय         आवडली म्हणून सांगू

अभय  – हर कोई खिचा चला आता है यार मेरी तरफ……!

अंजली – का ? तुला कुणी दुसरी आवडतीय का ?

अभय – नाही असं का वाटला तुला ?

अंजली – नाही  रे तुम्हा मुलांचं काही सांगता येत नाही…आज एका फुलावर तर उद्या दुसरया फुलावर

अभय  – तुझा विश्वास नाही का माझ्यावर….!

अंजली – नाही रे तसं नाही पण तू फक्त माझाच आहेस #लडिवाळपणे#

अभय  – अगं हो वेडाबाई….! मी फक्त तुझाच आहे मी तुला प्रॉमिस करतो मी आजन्म तुझाच राहील….

अंजली – हम्म….अरे पण त्या पाहतच  होत्या तुझ्याकडे …कधी ना पाहिल्यासारख्या

अभय – आता त्या माझ्याकडं पाहत होत्या त्यात माझी काय चूक ?

अंजली – हम्म…चूक तुझी नाही ….माझीच आहे मी उगाच तुझी ओळख करून दिली त्यांना

अभय  – असा विचार नाही करायचा हा…उलट किती चांगले आहेत तुझे मित्र कठीण प्रसंगी मदत करणारे

अंजली – हम्म….ते पण आहे….खूप धोरणी आहेस रे तू….

अभय – हम्म… बस झालं माझं कौतुक…ठेवतो फोन उद्या सकाळी कॅड कॅमचा क्लास आहे….

अंजली – हो मलाही खूप तयारी करायचीय….चल बाय …मिस यु  अभय  टेककेयर

अभय – हम्म….same here miss  you  जानू …..बाय…!

 तिसऱ्या दिवशी रात्री सगळेजण ट्रेन मध्ये केरळला जायला बसतात. रात्री १२:३० ची  ट्रेन असल्याने सर्वजण जेवण करूनच घरातून निघाले होते. रात्रीची वेळ असल्याने अंजली अभयचे आई बाबा ट्रेन मध्ये जाताच झोपी गेले. अंजलीही दमली असल्याने लगेच झोपी गेली. पण रात्री ४ वाजता ती बाथरूमला जायला उठली. अंजली बाथरूम मधून बाहेर आली तेवढ्यात तिच्या समोर अभय होता ….झोपेत असल्याने तिला दिसलं नाही आणि ती घाबरली ..ती घाबरून ओरडणार तेवढ्यात अभय एका हाताने अंजलीचे दोन्ही हात पकडतो आणि एका हाताने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला ट्रेनच्या भिंतीला टेकवतो….

अभय – “शह्ह्ह्ह …चूप…चूप…. मी आहे अभय….”

अंजली – “ब्ला ब्ला  …… ” 

अंजलीचा तोतरेपणा बघून अभय तिच्या तोंडावरचा हात काढतो

अंजली धापा टाकत – “अरे काय हे…असा अचानक समोर आला….मी किती घाबरले होते….हार्ट अटॅकच आला असता मला…. “

अंजली थोडी नॉर्मल झाली होती आता..

अभय अंजलीचे दोन्ही हात सोडतो आणि तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे खेचतो , “तुला माझा रोमान्स बघायचा होता ना….”

पुढील कथा नेक्स्ट पार्ट मध्ये

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories