Skip to content Skip to sidebar Skip to footer

मातृत्व

खरंतर मीरा त्या घरची सर्वात मोठी मुलगी.
दिसायला अतिशय देखणी होती.
तसं तर त्यांच्या कुटुंबाला सौंदर्याचं वरदानच लाभलेलं होतं. तिच्या पाठच्या तिघी बहिणी एकापेक्षा एक सुरेख होत्या आणि बुद्धीचे वरदानही होतं .
पण बुद्धी ,सौंदर्या बरोबर गरीबीचा शापही आला होता.
म्हणतात ना की सरस्वती आणि लक्ष्मी एकमेकींबरोबर राहत नाहीत.. तसेच काहीसे…

मीराच्या वडिलांचा कास्टिंगचा कारखाना होता.
पार्टनरने फसवल्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड कर्ज होतं. आणि त्या धक्क्यानेच मिराच्या वडिलांचे निधन झालं.
जेमतेम फर्स्ट इयरला असलेल्या मीरावरती कुटुंबाची सगळी जबाबदारी येऊन पडली..

त्यावेळेला फर्स्ट इयरचे शिक्षण सोडून द्यावे लागले.
स्टॅटिस्टिक मध्ये मध्ये हुशार असलेल्या मीराला एसबीआय मध्ये लगेचच नशिबाने नोकरी मिळाली.
अशा प्रकारे हळूहळू कर्जही फेडले. नंतर तिने बहिणींनाही शिकवले .

तिन्ही बहिणी हुशार होत्या . त्यानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्या. त्याही चांगल्या स्थिरस्थावर झाल्या. कालांतराने त्यांची लग्न झाली मुलं बाळ झाली.
ताई म्हणून मीराने जेवढे म्हणून करता येईल तेवढे तिने सगळे आनंदाने केले.
हो पण ह्या सगळ्या मध्ये कोणाच्या लक्षातच आले नाही की मीराचे जीवन आहे…
आईचा जीव मात्र सारखा तुटत होता तिच्यासाठी.
” अग आता तरी स्थळ बघ स्वतःसाठी” .कारण माझ्या नंतर तुला कोण असणार आहे ?तू एकटी पडशील.

पण घरात आणि घराबाहेर थोडासा आपलाच अधिकार गाजवणाऱ्या मीराला आता मात्र कोणाच्यातरी आधाराची गरज मनातून वाटत होती पण ते आपल्याला जमेल की नाही याबद्दल ती जरा साशंक होती.

नाही म्हणता मीराला मातृत्वाची ओढ मात्र लागली होती.
बहिणींच्या बाळंतपणाच्या वेळेचा तो शेक शेगडी चा वास, त्या तान्हुल्यांच्या अंगाचा जॉन्सन बेबी पावडर चा वास, थोडक्यात त्या ओल्या बाळंतिणीच्या खोलीचा वास मीराच्या अगदी श्वासात भरून राहिला होता.
तिच्या मनामध्ये वेगळेच विचार यायला लागले होते.

पण लग्न करून आपण कुणाबरोबर तरी आता समजून घेणे हे आपल्याला जमेल की नाही या साशंकतेने तिने लग्नाचा विचार सोडून दिला .
पण मातृत्वासाठी मी एक वेगळं पाऊल उचललं.

काय होते ते पाऊल?
तिने कुमारी माता बनण्याचा निर्णय घेतला.
सगळ्यांनी तिला तू दत्तक घे.असाही एक पर्याय दिला होता .
आईचा आणि तिच्या पाठच्या तिन्ही बहिणींचा या गोष्टीला खूपच विरोध झाला.
एका कुमारीकेला आई होण्याचा मातृत्व स्वीकारण्याचा अधिकारच नाही का ?
लहान वयामध्ये ती सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे घेऊ शकते.
मग हा अधिकार का बरं नसावा?

पण मीराला त्या बाळाच्या गर्भातल्या हालचाली पासून त्याच्या जन्मापर्यंतचा सगळा अनुभव घ्यायचा होता .
आणि आयव्हीएफ करून मीराने तो धाडसी निर्णय घेतला आणि एका गोंडस गोड गोजिर्‍या बाळाला जन्म देऊन आपल्या मातृत्वाचाही आनंद तिला प्राप्त झाला.


– सौ रश्मी किरण

=====================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: